गौरी गणपती 2022

#गौरीगणपती2022

पिंपळ पानाचा वापर करत अत्यंत आकर्षक अशी लक्ष्मी पाउले आणि गणपती बाप्पा रांगोळीत रेखाटले आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/U8ALVVpu3_I

 ©️Anjali Minanath Dhaske 



हरितालिका विशेष रांगोळी 2022

 #हरितालिका विशेष #रांगोळी #2022

तुमच्या साठी घेवून येत आहे अत्यंत सुंदर अशी poster रांगोळी. ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ⬇️

https://youtu.be/zY27haoZIGY

©️Anjali Minanath Dhaske 



एक मिनिटात होणार्‍या २रांगोळ्या

#One_minute_Rangoli 
झटपट काढा आकर्षक रांगोळ्या 




फुलांचा वापर करून आकर्षक रांगोळी 👇👇👇



गौरी गणपतीसाठी आकर्षक रांगोळी 👇👇👇



©️Anjali Minanath Dhaske 

 

श्रावण सोमवार (४) २०२२

 #श्रावण_सोमवार 

#शिवामूठ 

#जवस 

सोपी आणि सुंदर शिवलिंग रांगोळी 👇👇👇

https://youtu.be/uFSOancjExI


©️Anjali Minanath Dhaske 









एका मिनिटात काढायच्या आकर्षक रांगोळ्या

  #oneminute 

#Rangoli

#shorts

एका मिनिटात काढायच्या आकर्षक रांगोळ्या 



15 ऑगस्ट निमित्त छोटी रांगोळी link 👇

https://youtube.com/shorts/Ss-Q0Xs2bMA?feature=share


लक्ष्मीची सोन पाऊले असलेली फुलांची रांगोळी  link 👇

https://youtube.com/shorts/5YryvJoD-mM?feature=share







 #निसर्ग 

#प्रदूषण 


               राम तेरी गंगा मैली हो गयी .........

हे गाणे फार जुने असले तरी आजच्या परिस्थितीत त्याची दखल गांभिर्याने घेण्याची गरज आहे. 

             रुढी ,परंपरा ,संस्कृती जपायला हवी. पिढी दर पिढी स्वतःच्या सोयी नुसार काही बदल त्यात केले जातात. परंतू  समाजाचा, निसर्गाच्या सद्य परिस्थितीचा विचार करून काही बदल आवर्जून करायला हवे. संस्कृतीत कालानुरूप होणारे बदल हे मात्र कायम समाजाच्या दृष्टीने हितकारक असावेत. 

'एक गाव एक गणपती'  ही संकल्पना मागे पडून घरोघरी गणपती ही प्रथा सुरू झाली आहे. तेव्हा 'माझा बाप्पा माझी जबाबदारी ' ही संकल्पना आत्मसात करायला हवी. मनाला पटतील असे बदल स्विकारत निसर्गाची मदतीची हाक ऐकायला हवी. व्यावसायिक सांडपाण्याचा विनियोग योग्य पद्धतीने होण्यासाठी काही कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. नद्यांचा गाळ वेळोवेळी उपसून पूर परिस्थितीचे संकट टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. 

             कोणत्याही नदीच्या किंवा समुद्र किनारी नजर फिरवली तर मानवनिर्मित कचर्‍याचे ढीग दृष्टीस पडतात. एखादे सरकार, संस्था किंवा संघटना यासाठी काम करेल हे पुरेसे नाही. निसर्गाच्या सान्निध्यात मजा लुटतांना निसर्गाचा आदर राखला जावा, त्याच्या प्रती कृतज्ञ भाव मनात कायम असावा. असे संस्कार भावी पिढ्यांना अधिक जाणीवपूर्वक द्यावे लागतील. 

         या साठी आजच्या पालकांनी प्रयत्न करायला हवेत.  मुलांमधे जागरूकता निर्माण करायला हवी. अन्यथा पाणी शुद्ध करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले तरी नैसर्गिक स्त्रोत नष्ट झालेत किंवा प्रदूषित राहिलेत तर त्याचे दूरगामी परिणाम हे अत्यंत वाईट स्वरूपाचे असतील. 

      तेव्हा वेळीच सावध होण्याची गरज आहे. 

अडचणी अनेक आहेत, कारणे अनेक आहेत परंतु त्या सगळ्यांवर मात करून निसर्गाचा मान राखत संस्कृती जपणारा समाज निर्माण करण्याची गरज ही  आहेच.

जागरूक होणे.... संघटित होणे... आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेणे. 

हीच काळाची गरज आहे. 

©️Anjali Minanath Dhaske




त्या दोघी ( लघुकथा)

 लघुकथा: त्या दोघी 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

पुणे 

          

           गेली अनेक वर्ष मंदिरातील गाभाऱ्यात ती मखमलीच्या आसनावर विराजमान होती.  रोज नवनवीन फुलांचे हार गळ्यात घातले जात होते. आरती, धूप यांच्यासोबत रोज चांदीच्या ताटात गोडाचा नैवेद्यही दाखवला जात होता.  समईच्या मंद प्रकाशात तिची सुवर्ण कांती उजळून निघत होती. तीही सगळ्यांना प्रसन्न चित्ताने भरभरून आशिर्वाद देत होती. सगळे कसे मनासारखे घडत होते. एक दिवस अचानक तिच्या आशिर्वाद देणार्‍या हाताला भेग गेली आणि तिचे दिवसच फिरले.

       झाल्या प्रकाराबद्दल घरातल्या मोठ्यांना सगळ्यात आधी कळविण्यात आले. त्यांनी जाणकार लोकांचे मत घेण्याचा निर्णय घेतला. जाणकारांच्या सल्ल्याने घरातील थोरामोठ्यांनी एक मताने तिची हुबेहुब प्रतिकृती आणण्याचा ठराव पास केला. नवीन मूर्तीच्या आगमनाची आणि तिच्या विसर्जनाची जय्यद तयारी करण्यात आली. 

                 आज तिच्यासोबत जे काही झाले त्यात नवल नव्हते.  रुढी, नियम याच्या नावाखाली तिची रवानगी नदीच्या वाहत्या पाण्यात करण्यात आली होती. जड अंतःकरणाने तिला निरोप देण्यात आला.  हे सगळे स्विकारणे तिच्यासाठीही सोपे नव्हते. परंतु जो पर्यंत मूर्ती पूजा केली जाईल तो पर्यंत तिच्या सारख्या भंगलेल्या अनेकींना विसर्जित केले जाईल. हे सत्यही ती जाणून होती. 

           तीही मागे वळून न पाहता मूकपणे गढूळ प्रवाहाबरोबर तिच्या नवीन प्रवासाला निघाली. 

               नदीच्या पाण्यात विसर्जन करण्याची पद्धत जरी जुनी होती तरी हल्ली नद्या पूर्वीसारख्या स्वच्छ राहिल्या नाहीत की आता त्या खळाळून वाहत देखील नाहीत. वर्षानुवर्षे साठलेला नदीतील गाळ कधी उपसला जात नाही म्हणून तिच्या या लांबच्या प्रवासात तिला अनेक ठिकाणी अडकून पडावे लागले.  प्रवाहासोबत जातांना जिथे जिथे ती अडकून पडली तिथे तिथे मानव निर्मित कचर्‍याने, घाणीने तिचा जीव गुदमरून गेला. कधी काळी तिच्यातल्या देवत्वाची पूजा केल्या जात होती. हे विसरून अडकून पडल्यानंतर प्रत्येक वेळी तिने हा वेदनादायी प्रवास लवकर संपावा म्हणून तेहतीस कोटी देवांचा, तिच्या सहकार्‍यांचा धावाही  केला .  

     या वेळी रात्रीच्या अंधारात  ती नेमकी कुठे अडकून पडली होती, याचा तिलाच अंदाज येत नव्हता. झुंजूमुजू झाले तसे तिला जाणवले. अंधारात ती घाटाच्या पायर्‍यांपाशी येवून पोहोचली होती. जवळच्या झाडावरील पाक्षी दाण्याच्या शोधत दूर उडून गेले. सकाळी सकाळी अनेक लोक घाटावर सूर्य दर्शनासाठी आले. अनेकांशी तिची नजरा नजरही झाली. परंतु 'दगडाचे काळीज' असणार्‍या त्यांच्या नजरेत भंगलेल्या दगडी मूर्तीची किंमत शून्य होती. याचा अनुभव तिने आज नव्यानेच घेतला.

           काही बायका धुणे धुण्यासाठी आल्या होत्या.  त्यांनी तर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वतःचे काम लवकर उरकण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या येण्याने गढूळ नदीचे पाणी अधिक प्रदूषित झाले होते खरे परंतु त्यांच्या सुगंधित साबणाच्या रासायनिक पाण्याने तिला मात्र दुर्गंधीपासून क्षणिक सुटका मिळाली होती.

          दिवस वर चढला तशी घाटावर माणसांची गर्दीही कमी झाली.  दुपारच्या एकांतात दूर कुठेतरी झाडाच्या सावलीत काही लोकांचा घोळका गुपचूप मद्याचा आस्वाद घेत बसला होता. त्यांच्या येण्याची तिने थोडा वेळ वाट बघितली. परंतु कोणीही घाटाकडे फिरकले नाही. स्वतःच्या वेदना मद्यात बुडवू पाहणार्‍या त्यांना पाण्यात बुडलेल्या तिची वेदना कशी समजणार?

      डोळे दिपवणार्‍या रखरखत्या उन्हात गढूळ पाण्याचा स्पर्श तिला गारवा देत असला तरी या वेळी आपली सुटका लवकर होणार नाही या जाणिवेने तिला ग्लानी आली. 'जे व्हायचे आहे ते होईल' म्हणत तिनेही स्वतःला नियतीच्या स्वाधीन करत डोळे मिटले. 

              बराच वेळ शांततेत गेला. सांज होत आली. कुठून तरी निरर्थक बडबड तिच्या कानी पडू लागली.  त्या बडबडीचा आवाज जस जसा जवळ येवू लागला. तसे काही लहान मोठे दगड पाण्यात येवून पडू लागले.  संथ पाण्यात अचानक माजलेल्या खळबळीने तिच्या आडोशाने अन्न शोधणाऱ्या छोट्या माश्यांनी अधिक खोल पाण्यात दडी मारली. तिनेही घाबरून डोळे उघडले. 

        तिच्यापासून फक्त एका पायरीच्या अंतरावर निरर्थक बडबड करत असलेली एक अतिशय घाण अवतारातली स्त्री बसलेली तिला दिसली. केसांच्या जटा झाल्या होत्या. त्यावर माश्या घोंगावत होत्या. चेहर्‍यावरचे तेज हरवले होते. दात किडलेले होते, नखात  माती फसलेली होती. अंगावरचे कपडे प्रचंड मळलेले होते. ठिकठिकाणी फाटलेलेही होते. दोन्ही पायात दोन वेगळ्या प्रकारच्या चपला होत्या. नजर भूतकाळात हरवलेली होती व हातवारे करत तोंडाने  असंबद्ध बडबड सुरू होती. 

                गढूळ पाण्यात जीव मुठीत घेऊन राहिलेल्या तिला 'हिची' अवस्था पाहून फार वाईट वाटले.  नियतीने दोघींसोबत सारखाच खेळ खेळला होता. 'हिच्या' मेंदूला वाईट घटनेचा धक्का लागल्याने ही माणसातून उठली होती. तर 'ती' काळाच्या ओघात भंगल्याने गाभार्‍यातून नाईलाजाने उठवली गेली होती. 'हिच्या' अखंड बडबडीच्या तालावर 'तिचे' विचार चक्र सुरु होते. 

         इतक्यात पायरीवर बसलेल्या 'हिची' पाण्यात असलेल्या 'तिच्या' वर नजर गेली.  दोघींची क्षणभरच नजरानजर झाली.   'तिच्या' छातीत धस्स झाले अन् 'हि' मात्र खुदकन हसली. लगेच पुढे होवून 'हिने' तिला उचलून घेतले. आपला कपाळ मोक्ष होणार या खात्रीने 'तिनेही' डोळे गच्च मिटून घेतले.  

          प्रत्यक्षात घडले मात्र आक्रित. तिच्या भोवतीचे वातावरण क्षणात बदलले.  'हिने' घाटाजवळ  झाडाच्या खाली असलेल्या दगडी  देवळीत 'तिला' नेवून ठेवले आणि आल्या पावली हसत, टाळ्या पिटत निघूनही गेली. 

          इथे धूप,दीप नसले तरी दुर्गंधी ,घाण नव्हती. आता सभोवती गढूळ पाणीही नव्हते. शुद्ध हवेची एक झुळूक तिला सुखावून गेली. घंटा नाद कानी पडला. तसे तिने आवाजाच्या दिशेने पाहिले. तिच्या अगदी समोरच एक छोटे मंदिर होते. गाभार्‍यात तेवणार्‍या मंद समईचा प्रकाश तिच्या कणाकणात झिरपत गेला. तसा शाश्वत अशाश्वत याचा भेद गळून तिला स्वतःचीच नव्याने ओळख झाली. ' ती' ही मग स्वतःशीच खुदकन हसली आणि या भौतिक जगाच्या बंधनात न अडकता निर्गुण, निराकार झाली. ती ... एका लांबच्या प्रवासातून कायमची मुक्त झाली. 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

पुणे 

टिप: कथेतील विचार हे सर्वस्वी काल्पनिक असून माझे आहेत. आपण सहमत नसल्यास इतर विचारांचाही मला आदर आहे.  लेखन आवडल्यास नावासहितच शेअर करायला हवे. 

इतर लिखाण आणि रांगोळ्या ' आशयघन रांगोळी ' या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे. 👉anjali-rangoli.blogspot.com 

 लाईक, कमेंट  करण्याची सक्ती नसली तरी त्यांचा धो धो पाऊस पाडण्यास माझी अजिबात हरकत नाही. धन्यवाद




व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी( भाग १३ )

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग १३ )

विषय: कौटुंबिक कथा

भाग १३:

©️Anjali Minanath Dhaske 

         एवढ्या रात्री प्रतीकला बस थांब्यावर बघून साक्षीला आश्चर्य वाटले. वडील आणि भाऊ दोघे थोडा वेळ काहीतरी बोलले. भावाने वडिलांना पैशाचे बंडल दिले. वडिलांनी खिश्यातून काहीतरी काढून भावाच्या हातात दिले. भावाने ते खावून अलगद वडिलांच्या मांडीवर डोके ठेवले.  

      आपल्याच भावाला भेटायला येतांना वडिल आपल्याशी खोटे का बोलले? इतक्या रात्री हे एकमेकांना का भेटतात? वडिलांनी खिशात काय लपविले होते? भावाने इतके पैसे कुठून आणले व आपल्या वडिलांना का दिले? असे अनेक प्रश्न साक्षीला पडले होते. इतक्यात प्रसादचा फोन वाजला. त्या आवाजाने मुलगी दचकली परंतु आपला भाऊ मांडीवर गाढ झोपून आहे याचे तिला आश्चर्य वाटले. 

           प्रसाद मोबाईलवर बोलू लागला, " अहो शेठ, देतो तुमचे पैसे, इथे सगळे फासे उलटे पडले म्हणून वेळ लागतोय. .... नाही.... आता  पैसे देण्याऐवजी येतांना तुमच्यासाठी कोवळा माल घेवून येतो. महिनाभरात तो तयार होईल. लतच अशी लागेल की त्याला तयार व्हावेच लागेल. सध्या माझ्या मांडीवरच डोक ठेवून शांत झोपला आहे. नाही.... नाही..शेठ... मुलगी तर अजूनच कोवळी आहे. दिसायला सुंदर आहे. तिचे तर वेगळे वीस लाख घेणार त्याहून एक रुपया कमी घेणार नाही. फोटो पाठवतो तुम्हाला. तुम्हीच बघा. पैसे माझ्या खात्यात जमा झाले की लगेच तुम्हाला माल पोच करतो. शब्द आहे आपला.... शेठ. काळजी करू नका. यावेळी फसवणार नाही. गुड नाईट "

         प्रसादने मोबाईल मधून साक्षीचे अनेक फोटो घेतले होते. त्यातील एक फोटो त्याने त्याच्या शेठला पाठविला.  

           त्याचे हे बोलणे आणि कृती बघून, ऐकून साक्षी भीतीने गांगरून गेली. प्रतीकने झोपेचे नाटक सुरूच ठेवले अन्यथा प्रसादला संशय आला असता आणि बर्‍याच गोष्टी अधिक हाताबाहेर गेल्या असत्या.  प्रसादने प्रतीकचे डोके बाकावर ठेवले. खिशातून पैसे काढून नीट मोजून घेतले. लगेच तो आपल्या खोलीवर जायला निघाला. 

             साक्षी तिथेच एका दुकानाच्या आडोशाला लपून राहिली. प्रतीकला नक्की काय झाले आहे याची तिला तपासणी करायची होती. प्रसाद गेल्यानंतर साक्षी भावाजवळ गेली. तसा प्रतीक उठून बसला. त्याने खिशात लपवून ठेवलेले पान उघडून बघितले. त्यात दोन गोळ्या ठेवलेल्या होत्या. प्रसाद काय समजायचे ते समजून गेला.  त्याने साक्षीच्या हाताला धरून तडक घर गाठले. मुलांना दारात बघून वनिताने सगळ्यात आधी देबश्री ताईंना फोन केला. देबश्री ताईंनी दुसर्‍याच क्षणी दबा धरून बसलेल्या पोलिसांना कळविले. खोलीवर परतणा-या प्रसादला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. 

        दोन्ही मुलांनी वनिताला कडकडून मिठी मारली. मुलांना झालेला पश्चाताप आणि वनिताला झालेला आनंद दोन्ही अश्रू रूपाने ओघळू लागले. आयुष्याची कठीण लढाई वनिताने पुन्हा एकदा देबश्री ताईंच्या मदतीने जिंकली होती. 

         सध्या प्रतीकने परदेशात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून भारतात चांगल्या पगाराची नोकरी मिळवली.  लग्न होवून त्याचे छोटे चौकोनी कुटूंब आहे. साक्षीने सी.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. चांगल्या कंपन्यांसाठी उत्तम आर्थिक सल्लागाराची कामे ती तिच्या छोट्या कार्यालयात सक्षमपणे पार पाडते. एका गोंडस मुलीची ती आई असून सुखी संसार सांभाळते आहे. 

               प्रत्येक स्त्रीमधे संकटांवर मात करण्याची शक्ती असतेच. संकटात असलेल्या स्त्रीला गरज असते ती तिच्यातील शक्तीला ओळखून योग्य मार्गदर्शन देण्याची आणि थोड्या आधाराची. याची प्रचीती वनिताला आश्रमातील आयुष्यात अनेकदा आली होती. संसारात स्त्रीचे चरित्र पुरुषाचे भाग्य ठरविते तर पुरुषांचे कर्म स्त्रीचे आयुष्य घडविते. प्रसादचे वाईट वर्तन वनिताच्या दुःखाला कारणीभूत ठरले होते तरी तिने स्वतःच्या क्षमतांचा शोध घेत आयुष्याला नवी झळाळी प्राप्त करून दिली.

                 वनिताने सेवा निवृत्ती स्विकारली असून देबाश्री ताईंच्या  आश्रमाचा कारभार तीने विस्तारण्याचे  काम सुरू केले. प्रत्येक भागातील गरजू स्त्रीला आणि अनाथ मुलांना योग्य वेळेत मदत मिळावी म्हणून तिने आश्रम संस्थेच्या अनेक छोट्या शाखा काढल्या. मुंबईत स्थापन केलेल्या आश्रम शाखेचा कार्यभाग ती स्वतः सांभाळत आहे. वनिताच्या आईवडिलांनी तिला भेटून घरी येण्याविषयी तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या नात्यातील स्वार्थाने आधीच ती पोळल्या गेली होती. त्या मायेचे दोर तीने केव्हाच कापून टाकले होते. आता मात्र तिच्या सारख्या अनेक स्त्रियांना त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदतीचा हात देत आहे. " स्त्री क्षणाची  पत्नी आणि अनंत काळाची माता असते " या उक्ती प्रमाणेच तिने आयुष्य व्यतीत केले. आयुष्याच्या कठीण समयी देबाश्री ताईंनीच तिच्या पालकांची भूमिका अगदी चोख निभावली होती. म्हणूनच आईवडिलांकडे न जाता तिने देबाश्री ताईंच्या सत्कार्याचा वारसा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

       अल्प कालावधीतील तिचे अफाट समाजकार्य बघून तिला अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे .

स्वतःच्या आयुष्यातील काळा भूतकाळ मागे टाकत अनेक स्त्रियांच्या, अनाथ मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून त्यांना उज्ज्वल भविष्य बहाल करते आहे. आता वनिता हे फक्त नाव राहिले नसून तीचा सहवास अनेकांसाठी वरदायक ठरत आहे. निर्मोही होवून समाजकार्य करणारी ती आता अनेकींची तारिणी देखील आहे. 



©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

टिप:  तुम्हाला कथा मालिका कशी  वाटली? तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. कथेतील  संपूर्ण कथानक काल्पनिक असून कुठल्याही पात्राशी वास्तवात साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. लेखन आवडल्यास नावासहितच शेयर करावे ही नम्र विनंती. संपूर्ण कथा वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद. 

भाग १  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ५ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html

भाग ६ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_9.html

भाग ७ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html

भाग ८ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_11.html


भाग ९ link:

भाग १० link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_13.html

भाग ११  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_87.html

भाग १२ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_46.html



व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी( भाग १२ )

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग १२)

विषय: कौटुंबिक कथा

भाग १२:

©️Anjali Minanath Dhaske 

               सगळ्यात आधी वनिताने प्रसादला फोन करून ती एकही रुपया देणार नसल्याचे कळविले.  वनिता घरी परतली तेव्हा साक्षी बॅग घेवून वडिलांकडे चालली होती. आई आपल्याला अडवेल, त्रागा करेल, समजावून घरात परत नेईल अशी साक्षीला आशा होती. परंतु वनिताने साक्षीला अडविले नाही उलट तिने साक्षीला ती विसरलेल्या काही वस्तू आठवणीने बॅगेत ठेवायला दिल्या आणि म्हणाली, " बेटा तू जाण्याचा निर्णय घेतला आहेस तर मी अडविणार नाही, तिथे गेल्यावर डोळे आणि कान मात्र सदैव उघडे ठेव. माझी गरज पडू नये अशी आशा आहे परंतु तशी वेळ आलीच तर कुठलाही विचार न करता मला कधीही फोन कर मी ताबडतोब हजर होईल." तिच्या या संयमित वागण्याचे  साक्षीला आश्चर्य वाटले. साक्षीचे  पाऊल घरा बाहेर पडले होते. ते थांबवणे तिलाही शक्य झाले नाही. ती आपल्या वडिलांकडे गेली.

        प्रतीक घरी आला तेव्हा वनिताने शांतपणे सगळ्याच घटना त्याला नीट समजावून सांगितल्या. काहीही झाले तरी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साठवलेले पैसे ती प्रसादला देणार नव्हती. प्रतीकलाही वडीलांकडे जाण्याची इच्छा असल्यास तिची काहीच हरकत नाही असेही तीने समजावले.  

      एरवी आपल्या बाबतीत अतीशय दक्ष असणारी आपली आई साक्षी घर सोडून गेली तरी इतकी शांत कशी? या प्रश्नाने प्रतीक अस्वस्थ्य झाला. त्याने सगळ्याच घटनांचा नीट विचार करायला सुरुवात केली. आईचे कष्ट, जिद्द, प्रेम या सगळ्यांची त्याला जाणीव होवू लागली. आईने सांगितलेले खरे की वडिलांनी सांगितली  ती हकिकत खरी या विचारांचे द्वंद्व सुरू झाले.  रात्र वाढू लागली तशी त्याच्या बुद्धीला जास्त विचार करणे कठीण झाले. त्याला वडिलांच्या भेटीची अनामिक ओढ थांबवणे जड जावू लागले. तो घराचे दार उघडून बाहेर पडला तसा त्याला वनिताचा आवाज आला, " वडिलांना भेटायला जातो आहेस तर नक्की जा.... फक्त त्यांनी पान खायला दिले तर त्यात नशेची गोळी नाही ना? याची एकदा खात्री करून घे " वडील आपल्याला खायला पान देतात याची माहिती आईला कशी झाली याचे प्रतीकला आश्चर्य वाटले.  

        इकडे प्रसाद सारखी चिडचिड करत होता. पूर्वी वनिता घरातून निघून गेल्यानंतर त्याला एका हॉटेलात पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. त्याने मिळवलेल्या पदवी शिक्षणाची कागद पत्रेही खोटी होती. महाविद्यालयात असल्यापासून तो चुकीच्या संगतीत होता. झटपट पैसे मिळविण्यासाठी तो अश्लील चित्रफित बनवून विकत असे. अनेकांना तो या चित्रफितींचा वापर करून ब्लॅकमेल करत असे. त्याच्या मोबाईल मधे त्याने वनिताला धाकात ठेवण्यासाठी तिच्याही चित्रफिती काढून ठेवल्याचे आढळले होते. पैशाची चणचण भासल्यास त्याही चित्रफिती विकण्याचा त्याचा मानस होता. पोलिसांच्या ताब्यात त्याचा लॅपटॉप लागल्याने सगळे उघडकीस आले होते. उजळ माथ्याने समाजात वावरत लोकांच्या,पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकता यावी म्हणून त्याने वनिताशी लग्न केले होते. त्याला सुरवातीपासूनच स्त्रियांबद्दल आकर्षण नव्हते.  जेव्हा त्याच्या या सगळ्या वाईट कृत्यांबद्दल घरच्यांना कळले तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडले होते. प्रसादमुळेच वनिता पळून गेली म्हणत वनिताच्या वडिलांनी घेतलेले पैसे परत करण्यास नकार दिला होता. तुरुंगातून सुटल्यावरही तो रहात असलेल्या शहरात त्याची बदनामी झाल्याने त्याला पैसे कमविण्यासाठी शहर सोडून भटकंती करावी लागत होती. कर्ज वसूल करणारी माणसे त्याला सुखाने जगू देत नव्हती. वाढत्या कर्जाचा डोंगर त्याला लवकर फेडायचा होता. वनिताला धमकावत उरलेले आयुष्यही त्याला तिच्या पैशावर मजा मारत घालवायचे होते. पोटच्या पोरांबद्दल त्याला माया नव्हती.  मौजमजा आणि नशा करण्यासाठी पैसे मिळवितांना तो कोणत्याही थराला जावू शकत होता. वनितामुळेच आपल्याला वाईट दिवस बघावे लागले असे वाटून  प्रतीकला नशेच्या आहारी घालून त्याला वनितावर सूड उगवायचा होता. वनिताने पैसे द्यायला नकार दिलाच तर साक्षीला पळवून नेऊन त्याच्या शेठला विकण्याचा पर्यायही त्याने विचार करून ठेवला होता.  परंतू सरळ मार्गी, भित्री  वनिता पैसे द्यायला नकार देणार नाही याची त्याला खात्री होती.  त्यात साक्षीही न विचारता त्याच्याकडे निघून आल्याने त्याचा पुरता गोंधळ उडाला होता. साक्षीच्या उपस्थितीत त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या.  सध्यातरी प्रतीकला भेटायला बोलावून त्यालाच नेहमीप्रमाणे घरातून पैसे चोरून आणायला सांगण्याचा बेत त्याने आखला. रात्री प्रसाद खोली बाहेर पडला तसे साक्षीने त्याला हटकले. तो कुठे जात आहे याची चौकशी केली. काहीतरी खिश्यात लपवत साक्षीला त्याने पाय मोकळे करून येतो अशी खोटीच थाप मारली.  

        वनिताने साक्षीला कान आणि डोळे उघडे ठेवण्याची ताकीद दिली होती याची आठवण तिला झाली. तीही वडिलांच्या मागे मागे चोर पावलांनी चालू लागली.  

क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

साक्षीला सत्य उमगेल का? प्रसाद वनिताला नमवेल काय? वनिताला प्रसादच्या तावडीतून मुलांची सुटका करता येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

भाग १  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ५ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html

भाग ६ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_9.html

भाग ७ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html

भाग ८ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_11.html


भाग ९ link:

भाग १० link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_13.html

भाग ११  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_87.html

भाग १३ link:  समाप्त (The end )

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html



व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग ११ )

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग ११)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ११ :

©️Anjali Minanath Dhaske 


       वनिताच्या घरातले वातावरण एकदम बदललेले. साक्षीचे अभ्यासातील लक्ष कमी होवून ती कायम महागड्या मोबाईलवर सतत काहीतरी करत बसे . येवढा महागडा मोबाईल कोणी दिला? असे वनिताने विचारले असता साक्षी वनिताला धड बोलत तर नाहीच, मात्र 

 " तू आमची हौस कधीच केली नाहीस सतत बंधनात ठेवले. तूला फोन मागितला असता तर तू नक्किच घेवून दिला नसता. माझ्या वडिलांनी मात्र मला न मागता हा मोबाईल भेट दिला आहे. इतकी वर्षे आम्हाला खोटे बोलून त्यांच्यापासून दूर ठेवले आता त्यांच्या भेटवस्तूही हिसकावून घ्यायच्या आहेत का?" असे उलट उत्तर दिले. 

       प्रतीक हल्ली रात्र रात्र भर घराबाहेर असतो. कुठे जातो? काय करतो? काही सांगत नाही. त्याने परदेशी शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तयारी ही करणे सोडून दिले आहे.  प्रसादला देण्यासाठीही रक्कम जमत नाही. दोन्ही मुले हाताबाहेर चालली आहे या जाणिवेने वनिता पुरती गलितगात्र झाली.  "वडिलांचा येवढा पुळका आला आहे तर त्यांच्याकडेच जावून रहा " असे ती चिडून साक्षीला म्हणाली. साक्षीही, "  हो... हो जाईलच मी माझ्या  वडिलांकडे" म्हणत तोऱ्यात निघून गेली. 

        सगळ हातून निसटून जात आहे या भावनेने वनिता धायमोकलून रडू लागली. तेवढ्यात तिला देबाश्री ताईंनी भेटायला बोलाविले. वनिताची दोन्ही मुले तिच्या माघारी प्रसादला भेटत होती. प्रसादने दोन्ही मुलांच्या बुद्धीवर वडिलांच्या मायेचा पडदा टाकला होता. इतकेच नाही तर त्याने अनेकदा प्रतीकला घरातून पैसे आणायला सांगितले.  दर वेळी पानाच्या माध्यामातून प्रतीकला नशेची गोळी खावू घालायला सुरवात केली आहे. त्या नशेच्या अंमलाखाली असल्याने प्रतीक रात्री घरी परतत नाही. प्रतीकला कल्पनाही नाही की त्याचे वडील त्याला पानातून नशेची गोळी देत आहेत. तो अत्यंत निरागस भावनेने वडिलांचे प्रेम मिळवू पाहत आहे. 

                   वनिताला अशी सगळी माहिती देबाश्री ताईंकडून समजल्यावर मुलांना प्रसादच्या विळख्यातून सोडविण्यासाठी तिने तडकाफडकी घर विकून रक्कम जमविण्याचा निर्णय घेतला. तिचा त्रागा, हतबलता देबाश्री ताईं समजून घेवू शकत होत्या. त्यांनी तिला शांत केले. "प्रसादला कितीही पैसे दिले तरी तो पैसे संपले की त्रास द्यायला पुन्हा येणारच आहे. आता त्याने मुलांच्या मनात प्रेम निर्माण केले आहे तेव्हा त्याला आयुष्यातून हाकलून लावले तरी मुलांचा त्याच्याकडे असलेला ओढा कमी होणार नाही. पोलिसांच्या मदतीने प्रसादकडे असलेल्या नशेच्या गोळ्या पुरावा म्हणून वापरत त्याला तुरुंगात टाकता येईलही परंतु तुरुंगातून सुटल्यावर तो मुलांना खोटे सांगून पुन्हा तुझ्या विरोधात भडकवेल. तुझी समस्या सुटण्यासाठी मुलांना त्याचे खरे रूप कळणे गरजेचे आहे. तेव्हा यावेळी प्रसाद पासून दूर न जाता खंबीरपणे त्याचा सामना करणे गरजेचे आहे " असे त्यांनी वनिताला समजावले. यावेळी वनिता एकटी नसून त्या तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत याची तिला खात्री दिली. तिला त्यांचा खूप आधार होता. त्यांच्यामुळेच तिची प्रसाद बद्दलची भीती थोडी कमी झाली.  आयुष्याच्या खडतर प्रवासात देबाश्री ताईंनी तिला कायम सांभाळून घेतले होते. आताही त्यांनी सुचविल्याप्रमाणेच वागायचे असे तिने ठरवले. 


क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

प्रसादचा खोटेपणा मुलांसमोर उघड होईल का? कात्रीत सापडलेल्या वनिताला स्वतःची सुटका करून घेता येईल का? मुलांच्या आयुष्यातील प्रसादरुपी संकट तिला दूर करता येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

 भाग १  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ५ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html

भाग ६ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_9.html

भाग ७ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html

भाग ८ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_11.html


भाग ९ link:

भाग १० link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_13.html

भाग १२ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_46.html

भाग १३ link:  समाप्त (The end )

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html



व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग १०)

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग १०)

विषय: कौटुंबिक कथा

भाग १० :

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 


            दोन तीन महिने वनिताच्या व मुलांच्या पाळतीवर राहून प्रसादने त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवली होती. वनिताने त्याला भेटायला यायचे कारण विचारले तेव्हा त्याने उघडपणे पंचवीस लाखाची मागणी केली . ती सोडून गेल्यावर तिच्या शोधात त्याचा बराच वेळ खर्ची पडला होता. धंद्यात अनेक नवीन नवीन पोरं आल्याने त्याची मागणी कमी झाली होती आणि जी मागणी होती त्यातून त्याचा खर्च भागात नव्हता. घरच्यांना तो खरे सांगू शकत नसल्याने त्याला घरच्यांना वेळच्यावेळी पैसेही पाठवावे लागत होते. यातच त्याच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाले होते आणि तो व्यसनांच्या पूर्णपणे आहारीही गेला होता. त्याचा मित्र कलकत्त्याला कामा निमित्त आला होता तेव्हा त्याने वनिताला तिच्या महाविद्यालयातून बाहेर पडतांना बघितले होते. त्याच माहितीच्या आधारे प्रसादने तिचा शोध लावला होता.  त्याच्या राजासारखे जगण्याच्या स्वप्नाला तिने पळून जातांना प्रतीकला सोबत नेवून  सुरुंग लावला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी तो आता आला होता. 

               वनिताने त्याला पैसे देण्यास नकार दिला तसा तो बिथरला. मुलांना तिच्या विरोधात भडकावून तिच्यापासून दूर करण्याची धमकी त्याने तिला दिली. तिने त्याच्या त्या धमकीला भीक घातली नाही तसे त्याने मुलीला पळवून नेऊन बाजारात विकण्याची धमकी दिली. ते ऐकून तिच्या छातीत धस्स झाले. आपले शब्द अगदी वर्मी घाव घालणारे ठरले याची जाणीव होवून प्रसादने एक आठवड्याची मुदत देवून तेथून काढता पाय घेतला. 

          वनिताला धमकी देण्याआधी त्याने प्रतीकशी संवाद साधला होता. साक्षीलाही चोरून भेटत होता. खोट्या कथा रचून त्यांची सहानुभूतीही त्याने मिळवली होती. आपल्याला वडील नाहीच या संभ्रमात वाढलेल्या मुलांना अचानक वडील जीवंत असून आपल्यासाठी ते जीव ओवाळून टाकतात आहे. ही जाणीव सुखावणारी होती.  या आनंदात मुलांनीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वनिताला काहीच सांगितले नव्हते.  उलटपक्षी वनिताच मुलांच्या नजरेत खोटी, दोषी ठरली होती. 

          त्याची धमकी व मागणी ऐकल्यावर वनिता खूप घाबरून गेली. मुलांचे भविष्य घडविण्यासाठी इतके दिवस तिने एकटीने कष्ट केले त्या सगळ्याची धूळधाण होईल की काय अशी भिती तिच्या मनात निर्माण झाली. तिने तडक देबाश्री ताईंची भेट घेतली. सबळ पुराव्याअभावी प्रसादला धडा शिकवणे अवघड होते. परंतू पोलिसात जावून प्रसादपासून वनिता आणि तिच्या मुलांच्या जीवाला धोका आहे या आशयाची तक्रार तिला नोंदविता येणार होती.  तक्रार नोंदविण्याआधी दोन्ही मुलांना सगळी कल्पना द्यावी म्हणजे प्रसादने पुढे काही करण्याचा विचार केलाच तर दोन्ही मुले सावध असतील. प्रसादबद्दल मुलांना स्वतः वनिताने संपूर्ण कल्पना द्यावी असे  देबाश्री ताईंचे मत होते. वनितालाही त्यांचे म्हणणे पटले.  

          तिने मुलांना सगळे काही स्पष्टपणे सांगितले. प्रसादच्या विरोधात ती पोलिसात तक्रार देणार आहे याची कल्पना देखील दिली. तिला वाटले होते की तिची दोन्ही मुले तिच्या बाजूने खंबीर पणे उभी राहतील परंतू याच्या अगदी उलट झाले. दोन्ही मुलांनी पोलिसात तक्रार द्यायला विरोध केला. तिच्या हट्टामुळे वडिलांचे सानिध्य त्यांना मिळाले नाही असे वनिताला बोल लावत त्यांनी प्रसादची बाजू घेतली.  

            ज्या मुलांसाठी तिने आयुष्य खर्ची घातले त्यांनीच आज तिला चुकीचे ठरवावे. या धक्क्यातून तिला सावरणे कठीण झाले. प्रसादने मुलांची मने अधिक कलुषित करण्याआधी तिने आहे ती जमा पुंजी प्रसादला देवून त्याच्यापासून पिच्छा सोडविण्याची तयारी सुरू केली. देबाश्री ताईंना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी साक्षीवर दुरून लक्ष ठेवण्यासाठी आश्रमातील एका सेविकेला सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत प्रतीकवरही लक्ष ठेवण्यासाठी विना गणवेशधारी हवालदाराची नेमणूक केली.

            या पाळतीत असे लक्षात आले की प्रसाद दोन्ही मुलांच्या संपर्कात आहे. दिवसा महाविद्यालयाच्या वेळेत तो साक्षीला भेटायला जातो. महागडी भेटवस्तू देवून थोडी रडपड करतो. साक्षीची सहानुभूती मिळवतो. रात्री उशिरा घरातले सगळे झोपले की प्रतीक प्रसादला भेटायला जातो. चौकातल्या बस थांब्यावर दोघे एकमेकांशी अगदी थोडा वेळ बोलतात. त्या थोड्यावेळामधे प्रसाद पान बनवायला घेतो आणि दोघेही पान खातात. पान खाल्ल्यावर प्रतीक अनेकदा तिथेच बाकावर प्रसादच्या मांडीवर डोके ठेवून झोपून जातो. प्रतीकला कळायला लागले तेव्हापासून त्याने आईला कायम काम करतांना बघितले. तिच्याजवळ कधीच मुलांजवळ बसुन त्यांचे हट्ट पुरविण्यासाठी वेळ नव्हता. इतके दिवस त्याचे काही वाटले नव्हते परंतू आता रोज प्रसाद त्याला हलके थोपटून झोपवत असे तेव्हा प्रतीकला आतून अतिशय शांत अशा वेगळ्याच आनंदाचा अनुभव येत होता. त्या आनंदाला वारंवार अनुभवण्यासाठी तो रोज रात्री चोरून त्याच्या वडिलांना भेटत होता. 

              इकडे वनिता प्रसादला देण्याकरिता पैसे जमवत होती. परंतु त्याने सांगितलेली रक्कम पूर्ण होवू शकत नव्हती. तसे तीने त्याला कळविले. प्रसादने काहीही ऐकून घेतले नाही. पूर्ण पंचवीस लाख मिळाले नाही तर दोन्ही मुलांना तो तिच्या पासून कायमचे दूर करण्याची धमकी पुन्हा देवू लागला.  


क्रमशः 


©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 


वनिता पैसे जमवू शकेल का? मुलांना सत्य समजेल का? प्रसाद वनिताचा सूड घेण्यात यशस्वी होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 


भाग १  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ५ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html

भाग ६ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_9.html

भाग ७ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html

भाग ८ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_11.html


भाग ९ link:







श्रावण सोमवार (३) २०२२

  #श्रावण_सोमवार२०२२ (3)

#शिवामूठ #तीळ #रांगोळी 

ठिपक्यांची ही रांगोळी काढायला खूप सोपी असून अत्यंत आकर्षक दिसते. संपूर्ण व्हिडिओ दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. 

https://youtu.be/eiuImtdeqYE

©️Anjali Minanath Dhaske 




व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग ९ )

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग ९ )

विषय: कौटुंबिक कथा

भाग ९ :

©️Anjali Minanath Dhaske 

         सुमन निराधार असून आश्रमात एकटीच रहात असल्याने तिला वनिता आणि प्रतीकचा लळा लागला. शिवणकाम विभागात काम करतांनाच ती अधून मधून प्रतिकलाही सांभाळू लागली होती. वनिताचे दिवस भरत आले तरी सुमनच्या मदतीमुळे ती शेवटपर्यंत काम करत होती. बाळंतपण सुखरूप पार पडले. तिच्या पोटी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. मुलीचे ' साक्षी ' असे नामकरण करण्यात आले.  बाळंतपणात तिला आलेला थकवा बघता तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ आश्रमातील इतर बायका आळीपाळीने करत .  तिला मात्र दोन्ही मुलांचे भविष्य घडविण्यासाठी अधिक मेहनत करायची होती. देबाश्री ताईंना तिच्या धडपडी आणि लाघवी स्वभावाने खूप प्रभावित केले होते. आश्रमातील नोकरीतून मिळणार्‍या पगारात तिच्या दोन्ही मुलांच्या संगोपनाचा खर्च भागविणे कठीण जाईल म्हणून तिने आश्रमा बाहेर जास्त पगाराची नोकरी करावी असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. मुले लहान असेपर्यंत तरी तिला आश्रमा बाहेर नोकरी करणे शक्य नव्हते. याचाच तिला फायदा व्हावा म्हणून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला प्रोत्साहित केले. 

             दोन्ही मुलांना सुमन अत्यंत आनंदाने सांभाळत होती.  अभ्यास, आश्रमाची कामे व आश्रमातील नोकरी यातच वनिताचा अधिक वेळ जात असल्याने मुलांना ती इच्छा असूनही फार वेळ देवू शकत नव्हती.  सुमन सोबत असल्याने तिला मुलांची फारशी काळजी राहिली नव्हती.  तिने जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मुक्त विद्यापीठातून तिला पी.एच.डी. करण्याची ईच्छा होती. मुलांचे खर्चही वाढत चालले होते. जास्तीचे चार पैसे गाठीशी असावे म्हणून तिने रिकाम्या वेळेमधे शिवणकाम विभागात बॅगा शिवण्यास सुरुवात केली. तिने स्वतःला कामात झोकून दिले होते. अतिशय कष्टाने तिने अवघ्या दोन वर्षात पी.एच.डी. ही पूर्ण केली. दोन्ही मुले आता शाळेत जावू लागली होती.  मुलांच्यामुळे तिला आश्रमा बाहेर नोकरी करण्याचे धाडस होत नव्हते. केवळ शिक्षण घेवून फायदा नाही तिच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी तिने आश्रमा बाहेर नोकरी करणे गरजेचे आहे हे ओळखून देबाश्री ताईंनी त्यांच्या ओळखीने आश्रमाजवळील  महाविद्यालयात तीला अध्यापिकेची नोकरी मिळवून दिली. 

          सुमनने मुलांना शाळेत नेण्याआणण्याची जबाबदारी ही स्विकारली. संस्थेचे आर्थिक व्यवहार वनिता हाताळत होतीच. आता नोकरीमुळे ती तिच्या आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करून बँकेचे व्यवहारही चोख सांभाळत होती. सुमन करत असलेली मदत बघता तीने सुमनसाठी ही थोडी रक्कम शिल्लक टाकायला सुरुवात केली. विनिता सुरवातीपासून स्वाभिमानी होती. श्रीमंत लोक आश्रमातील अनाथ मुलांसाठी, स्त्रियांसाठी अनेक गोष्टी दान करत परंतू वनिता स्वतःसाठी किंवा मुलांसाठी कधीच त्या वस्तूंचा स्विकार करत नसे. तिच्या ह्याच स्वाभिमानी स्वभावाने तिने अध्यापिकेच्या कामात ही स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. आश्रमा बाहेर नोकरी करणार्‍यांना आश्रमात रहाण्याची परवाणगी तेव्हाच मिळत असे जेव्हा तिथे रहाण्याच्या मोबदल्यात पगारातील ठराविक रक्कम दरमहा आश्रमाला दिली जात असे. तसेच आश्रमातील आतल्या बाजूच्या खोल्या सोडून आश्रमाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या खोल्यांमधे त्यांना त्यांचे बस्तान हलवावे लागे.  वनितानेही सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले .  सुमनही त्यांच्या सोबत राहू लागली. 

            आश्रमात आल्याने आपल्या जीवनाला एक चांगली दिशा मिळाली या जाणिवेने वनिता आश्रमाला दरमहा घरभाड्यासोबत एक ठराविक रक्कम देत होती. याव्यतिरिक्त आश्रमातील आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून त्यातील चुका सुधारण्याचे कामही ती निशुल्क करत होती. बघता बघता दोन्ही मुले मोठी झाली. याच दरम्यान वनिताने तिच्या महाविद्यालयातील संदेश चक्रवर्ती या विधूर कारकुनाचे स्थळ सुमनसाठी देबाश्री ताईंना सुचविले. देबाश्री ताईंनीही नीट चौकशी करून संदेश आणि सुमनचे लग्न लावून दिले. वनिताने  सुमनसाठी साठवलेली रक्कम तिच्या नवीन संसाराला शुभेच्छा म्हणून दिली.  निराधार सुमनला तिच्या हक्काचे घर मिळाले. 

               वनिता दुसरे लग्न करणार नाही याची देबाश्री ताईंना खात्री होती. परंतू आता वनितानेही स्वतःचे स्वतंत्र घर घ्यावे अशी देबाश्री ताईंची इच्छा होती. त्यांच्या  इच्छेला मान देत वनिताने घरातून बाहेर पडतांना जवळ बाळगलेले दागिने विकून छोटेसे घर घेण्यासाठी नोंदणी केली. 

            प्रतीकने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकला पदव्युत्तर शिक्षण परदेशात करण्याची इच्छा होती. त्यासाठीच्या स्पर्धा परीक्षांची तयारीही तो करत होता. साक्षी वाणिज्य शाखेत शिकत असून सी.ए. ची तयारी करत होती.  

       सगळे काही सुरळीत सुरू असतांनाच अचानक तिच्या महाविद्यालयात प्रसाद तिला भेटायला आला. त्याला समोर बघून तिचे हृदय एका क्षणासाठी थांबले. तिच्या पोटात भीतीने मोठा खड्डा पडला .


क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 



प्रसाद इतक्या दिवसांनी वनिताच्या समोर का आला आहे? वनिताचा भूतकाळा तिचे भविष्य नष्ट करणार का? प्रसादला पश्चाताप झाला असेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 


भाग १  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ७ link:







व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग ८)

कथा मालिका :  व.नि.ता ( भाग ८)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ८:

©️Anjali Minanath Dhaske 

       वनिताला लवकरात लवकर निर्णय घेणे भाग होते. विना नोकरी करता मिळणार्‍या पैशांची चटक लागल्याने प्रसाद सुधारणार नव्हता. उलट तिच्या मुलांचे भविष्य धोक्यात येणार होते.  तिने मनाशी काहीतरी पक्के केले.  दागिने, थोडे पैसे, दोन ड्रेस आणि प्रतीकचे थोडे कपडे घेवून ती घराबाहेर पडली.

               वर्षभरापूर्वीच तिला कलकत्त्याच्या एका सेवाभावी संस्थेची माहिती मिळाली होती. अगदी शेवटचा पर्याय म्हणून तिने त्या संस्थेचा पत्ता असलेला कागद स्वतःजवळ जपून ठेवला होता. अजूनही प्रसाद सुधारेल या आशेवर ती दिवस ढकलत राहिली असती तर एक दिवस प्रतीकही या दलदलीत ढकलला गेला असता. आता तर काळजीत गर्भातील दुसर्‍या निष्पाप जिवाची भर पडली होती. म्हणूनच प्रसाद सुधारेल या आशेचा दोर कापत तसेच मनात परतीचा मार्ग बंद करूनच तिने कलकत्त्याचा मार्ग स्विकारला. 

        बस बदलत बदलत ती कलकत्त्याच्या सेवाभावी संस्थेत दाखल झाली. तिथे देबाश्री ताई सगळ्या संस्थेचा कार्यभार सांभाळत होत्या.  त्यांनी तिची प्रेमाने चौकशी केली.  तिला आश्रमातील एक खोली रहायला दिली.  ती स्वतःच्या मर्जीने आश्रमात दाखल झाली आहे या आशयाचा कागद तिला सही करण्यासाठी दिला.  पुन्हा फसवणूक तर होणार नाही? या भीतीने तिच्या हातातले त्राणच गेले. आता भविष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे या काळजीने तिचे अश्रू अनावर झाले. आश्रमात येणार्‍या प्रत्येकाकडून असा कागद लिहून घेतला जातो. यात काळजी करण्यासारखे काही नाही अशी हमी तिला देबाश्री ताईंनी दिली. प्रसादकडेही ती फार काळ सुरक्षित नव्हतीच. तिनेही मन घट्ट करून देवावर सगळे सोडून कागदावर सही केली.

         सुरुवातीला तिला आश्रमातील सगळ्यांमधे मिळून मिसळून रहायला अवघड जात होते. आश्रमात अनाथ लहान मुले होती. घरच्यांनी किंवा नवर्‍याने पैशासाठी बाजारात विकलेल्या काही स्त्रियांची सुटका करून त्यांनाही इथे राहण्याची सोय केली होती. वेगवेगळ्या  वयाच्या अनेक निराधार स्त्रिया होत्या. आश्रमातील  मुलांना शिकवण्याची सोय होती. स्त्रियांनाही शिकण्याची आवड असेल तर शिक्षण दिले जात होते. ज्यांना शिक्षणात आवड नाही त्यांना इतर कला शिकवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली जात होती. स्त्रियांना आश्रमातील विविध विभागात काम करून पैसे मिळविता येत होते. ज्यांना आश्रमा बाहेर नोकरी करण्याची इच्छा होती त्यांना तशी परवानगी दिली जात होती. आश्रमाबाहेर जाणार्‍या स्त्रियांना संध्याकाळी सात वाजण्याआधी आश्रमात परतण्याची सक्ती होती. आश्रमात स्त्रिया आणि लहान मुले यांनाच प्रवेश असल्याने आश्रमातील वातावरण अतिशय सुरक्षित होते. आश्रमातील प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागविले जावे अशी देबाश्री ताईंची शिस्त होती. आश्रमातील नियमांची रचनाच अशी होती की कोणीही कोणालाही त्रास देत नसे. तसेच प्रत्येकीला आश्रमातील काहीना काही काम करावेच लागत असे. 

         आश्रमातील अनाथ मुलांच्या राहण्याचा व शिक्षणाचा खर्च आश्रम करत असे. ज्या स्त्रियांसोबत त्यांची लहान मुले आहेत त्यांना मात्र मुलांच्या, स्वतःच्या शिक्षणाचा व खाण्यापिण्याचा खर्च स्वतः करावा लागत असे.  त्यांची सुरक्षित वातावरणात राहण्याची सोय मात्र आश्रमा तर्फे केली जात असे. त्या मोबदल्यात आश्रमातील कामे निःशुल्क करावी लागत.

      तिथल्याच शिवणकाम विभागात काम करणार्‍या व मराठी बोलणार्‍या सुमनशी वनिताची मैत्री झाली. आश्रमात आपल्याला रहायला जागा मिळाली, खायला अन्नही मिळते. या भावनेने वनिताने आश्रम झाडणे, स्वयंपाकात मदत करणे, देबाश्री ताईंच्या कार्यालयाची स्वच्छता करणे अशा कामांना स्वतःहून सुरुवात केली. 

            सुरवातीचा महिनाभर देबाश्री ताईंने  तिला आश्रमात रुळायला मदत व्हावी म्हणून तिला आवडेल ते काम करण्याची मुभा दिली. त्या  तिच्या टापटीप काम करण्याने प्रभावित झाल्या. पदरी एक मूल असतांना पोटात वाढणार्‍या गर्भाची काळजीही तिला घ्यायची होती. आश्रमातील कामे करत असतांनाच तिने आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनणे गरजेचे होते.

            इकडे वनिताचा शोध तिच्या सासरचे आणि माहेरचे लोक घेत होते. प्रसादला वनिताच्या जाण्याचे फारसे दुःख नव्हते परंतू जातांना ती सोबत दागिने आणि मुलाला घेवून गेली याचे त्याला जास्त वाईट वाटले होते. वनिताने कलकत्त्याचा उल्लेख देखील कधी कुणाजवळ न केल्याने ती महाराष्ट्रा बाहेर गेली असेल याची कोणाला शंका देखील आली नाही. त्याच कारणाने ती सुरक्षित ही राहिली. 

          वनिताला माहीत होते घराची आठवण काढून रडण्यात काही अर्थ नाही. मुलांना चांगले आयुष्य द्यायचे असेल तर तिला खंबीरपणे आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यक आहे. वाणिज्य विभागातून पदवी शिक्षण पूर्ण असल्याने देबाश्री ताईंने तिला आश्रमातील प्रत्येक विभागाच्या जमा खर्चाचा लेखाजोखा मांडून ठेवण्याची जबाबदारी दिली. तिच्या कामात नीटनेटकेपणा होता. संस्थेच्या प्रत्येक जमा खर्चाची माहिती संगणकात ही साठवावी लागत असे. थोड्याच दिवसात तेही काम वनिताने शिकून घेतले. अशा प्रकारे तिचे बाळंतपण सुखरूप होईपर्यंत संस्थेतील नोकरी देवून त्यांनी तिला आर्थिक मदत केली.


क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

वनिताचा आश्रमात येण्याचा निर्णय योग्य ठरेल का? तिच्या मुलांचे भविष्य ती घडवू शकेल का? कधीच घरा बाहेर न पडणारी ती इतक्या दूर आल्यावर इथे टिकाव धरू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

भाग १  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ७ link:

भाग ९ link:




एका मिनिटात काढायच्या आकर्षक रांगोळ्या

 #oneminute 

#Rangoli

#shorts

एका मिनिटात काढायच्या आकर्षक रांगोळ्या 


लक्ष्मी पाऊले रांगोळी

https://youtube.com/shorts/mL2nz7Gkkdw?feature=share



गणेश रांगोळी







राखी पौर्णिमा रांगोळी





शिवलिंग रांगोळी



फुलांचा वापर करून विठ्ठल रुक्मिणी रांगोळी














१५ ऑगस्ट २०२२

 #१५ऑगस्ट२०२२

#स्वातंत्र्यदिन 

अत्यंत आकर्षक अशी ही रांगोळी 'मंडला' कला प्रकराने  प्रेरित झालेली आहे.  संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/85CkG8Bj1lY

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)






स्त्री आणि परावलंबित्व (लेख)

 लेख: स्त्री आणि परावलंबित्व 

विषय: स्त्री आणि परावलंबित्व 

#इराराज्यस्तरीयलघुकथास्पर्धा 

©️ Anjali Minanath Dhaske 


               फार पूर्वी पासून आपल्या विचारांची जडण घडण अशी झाली आहे की, स्त्री आणि परावलंबित्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे आपल्याला भासते. 

        संसार रुपी रथाची स्त्री आणि पुरूष ही दोन चाके आहेत असे आपण वारंवार म्हणत असलो तरी प्रत्यक्षात मात्र आर्थिक बाजू सांभाळणार्‍या पुरुष रुपी चाकाला महत्व दिले गेले. घरात राबणाऱ्या  स्त्री रुपी चाकाचे अस्तित्वच दुर्लक्षित राहिले. 

         आपल्या आयुष्यात होत असणार्‍या प्रत्येक तुलनेत ' आर्थिक  स्वावलंबन' या संकल्पनेला जेव्हा प्राधान्य दिले गेले तेव्हा  त्या तुलनेत स्त्रिया सर्वाधिक परावलंबी ठरल्या. घरात ज्याच्या हाती आर्थिक व्यवहार असेल त्याच्याच हातात घरातील निर्णय घेण्याची सत्ता दिली आणि घरासाठी राबणारी स्त्री तिच्याही नकळत परावलंबी होत गेली.  

              लग्न म्हणजे संसारात एकाने आर्थिक बाजू सांभाळली तर दुसर्‍याने कौटुंबिक बाजू सांभाळायची असा साधा सरळ व्यवहार होता. आजही ज्या घरातील प्रत्येक निर्णय सामंजस्याने एकमेकांच्या संमतीने घेतला जातो त्या घरातील स्त्री कधीच परावलंबी होत नाही. संसारात ' वर्चस्व ' स्थापित करण्याची भावना निर्माण झाली तेव्हाच सामंजस्य लोप पाऊन ' पैसा म्हणजेच सत्ता " हे समीकरण प्रचलित झाले असावे. खरे पाहता स्त्री घरी असे म्हणुनच पुरुष निश्चिंत मनाने घराबाहेर पडून अर्थार्जन करू शकत होता. 

             शारीरिक बलाचा वापर होणार्‍या कामात स्त्री पुरुषावर अवलंबून असे तर कोमल स्वरूपाच्या कामात पुरुष स्त्रियांवर अवलंबून होते. मुळात दोन्ही कामांचे स्वरुप भिन्न असल्याने त्या कामांच्या तुलनेतील निकषांवर एकाने दुसर्‍याला परावलंबी ठरविणे तात्विक दृष्ट्या योग्य नाही.  पुरुष आणि स्त्री एकमेकांना पूरक मानले जात होते तोपर्यंत स्त्रीच्या बाबतीत 'परावलंबी' हा शब्द चलनात नव्हता. आयुष्यात जेव्हा  'पैसा' मोठा झाला तेव्हा कमावत्या पुरूषाची बायको परावलंबी झाली आणि कमावत्या स्त्रीचा नवरा परावलंबी मानला गेला.  ज्या घरात स्त्री पुरुष दोघेही कमावते झाले तिथेही आर्थिक स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणारी स्त्री मात्र छोटे मोठे निर्णय घेतांना बर्‍याच अंशी परावलंबीच राहिली होती. निर्णय घेण्याच्या दृष्टीने स्वावलंबी असणारी स्त्री जर कमावती नसेल तर सामाजिक दृष्ट्या तिला परावलंबी मानण्यात आले. 

            आदिवासी जमातीत स्त्रीया शिकारीला जात नाहीत तरी त्यांच्या समाजात त्यांना परावलंबी मानले जात नाही. कारण ते निसर्ग नियम मानतात.  स्त्री आणि पुरुष शारीरिक दृष्ट्या भिन्न असल्याने त्यांच्या योग्यतेनुसार कामांची विभागणी केलेली असते.  स्त्री शारीरिक दृष्ट्या कोमल असल्याने बळकट पुरुषाने शिकार करून/ जंगलात फिरून आणलेल्या साहित्याची  स्वच्छता, साठवणूक करणे. कातडी वाळविणे, त्यांची वस्त्रे बनवणे,  पदार्थांना  शिजवणे, सगळ्यांना खावू घालणे,  मुलांचा सांभाळ करणे अशी कामे स्त्रिया करतात. तिच्या कामाचे स्वरुप जरी कोमल असले तरी त्यांचे महत्व नाकारले जात नाही. 

            निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांना परस्पर पूरक बनविले आहे.  तेव्हा त्यांच्यात तुलना होऊच शकत नाही. आपण उच्च शिक्षित समाज असूनही स्त्री पुरुषांची सर्रास तुलना करतो.  स्त्री पुरुषांच्या शारिरीक तुलनेत स्त्री परावलंबी ठरते. यावरच न थांबता आपण दोन स्त्रियांची वर वर तुलना करत एकीला परावलंबी घोषित करतो.

        कमावत्या स्त्रीच्या तुलनेत घर सांभाळणारी स्त्री परावलंबी  ठरते.  स्वतःचे निर्णय स्वतः घेणार्‍या स्त्रीच्या तुलनेत कुटुंबाच्या मताला प्राधान्य देणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वतःची कामे स्वतः करणार्‍या स्त्रीच्या तुलनेत कामात दुसर्‍यांची मदत  घेणारी स्त्री परावलंबी ठरते.  स्वतःच्या आवडीचे कपडे परिधान करणार्‍या स्त्रीच्या तुलनेत इतरांच्या आवडीचे कपडे परिधान करणारी स्त्री परावलंबी ठरते. गाडी चालविता येणार्‍या स्त्रीच्या तुलनेत गाडी चालविता न येणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वयंपाक  येणार्‍या स्त्रीच्या दृष्टीने स्वयंपाक न येणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वतःच्या आवडीचे पदार्थ बनविणाऱ्या स्त्रीच्या तुलनेत इतरांच्या अवडीनिवडी सांभाळणारी स्त्री परावलंबी ठरते.  स्वतःसाठीचा खास वेळ राखून ठेवणार्‍या स्त्रीच्या तुलनेत संसारात गुरफटलेली स्त्री परावलंबी ठरते. खंबीर, कणखर स्त्रीच्या तुलनेत अडचणीत सापडलेली दुबळी स्त्री परावलंबी ठरते. 

        अशा अनेक निरर्थक तुलना आपल्या आजुबाजूला सतत होत असतात म्हणुनच जगाच्या प्रत्येक कोपर्‍यात, प्रत्येक स्त्री कोणत्यातरी एका क्षणी परावलंबी ठरत असते.

              स्त्री निसर्गाची सुंदर निर्मिती आहे. प्रत्येक स्त्री खास आहे.  प्रत्येक स्त्रीची वैचारिक, शारीरिक आणि आर्थिक जडण घडण वेगवेगळ्या परिस्थितीत होत असते.  त्या सगळ्यांचा परिपाक तिच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकट होत असतो. म्हणूनच प्रत्येक स्त्रीचे व्यक्तिमत्त्व भिन्न असते.  प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचा आदर व्हावा असे लोकशाहीची मूल्ये  आपल्याला सुचवितात. परंतू,  तुलना केल्याने स्त्री आणि परावलंबीत्व यांचा परस्पर संबंध ईतका घट्ट झाला आहे की अनेक स्त्रियांना वैचारीक आंधळेपणा येवून त्यांनी स्वतःचे परावलंबित्व मान्य  केले  आहे. 

           आदी शक्तीचा अंश असणार्‍या आपण स्त्रियांनी आपल्याच समस्या सोडविण्यासाठी संघर्षाची कास सोडून परावलंबीत्व स्विकारले. आपल्या आत असणार्‍या प्रचंड ऊर्जेला डावलून इतरांच्या मदतीवर विसंबून राहणे पसंत केले. प्रत्यक्षात आहे त्या परिस्थितीत स्वतःचा स्विकार करून आदर करण्यापेक्षा इतरांच्या सहानुभूती वर जगणे स्विकारले. इतरांशी तुलना करत आपणच ' परावलंबित्वाशी ' आपले नाते  घट्ट  केले. 

           स्त्री परावलंबी नव्हती.  परावलंबी नाही.  जगाचा  उद्धार करण्याची क्षमता असलेल्या स्त्रीने ' परावलंबित्व ' या संकल्पनेचा स्विकार केल्यास किंवा  ईतर स्त्रियांच्यावर ही संकल्पना लादल्यास समाजाचा वैचारिक पाया मात्र अधिक ढासळत जाईल. म्हणूनच भविष्यातही स्त्री परावलंबी राहणार नाही यासाठी प्रत्येकीने स्वतः  प्रयत्न करायला हवेत.  परावलंबित्वाचा स्त्रीच्या विचारांवर लादलेला संबंध मोडीत काढून स्वावलंबनाची विस्तृत व्याख्या निर्माण करायला हवी.  स्वतःच्या क्षमतांची जाण ठेवत स्वावलंबनाचे धडे गिरवत पुढच्या पिढ्यांनाही  ' नवे विचार, नवे आदर्श ' द्यायला हवे. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या प्रतिभेचा शोध घ्यायला हवा.  शारीरिक, वैचारिक आणि आर्थिक स्वावलंबनाचा योग्य अर्थ स्वीकारून समाजातील प्रत्येक स्तरावर  तो रुजवायलाही हवा. 


©️ Anjali Minanath Dhaske 

पुणे 

टिप: लेखातील विचार हे सर्वस्वी माझे  आहेत. आपण सहमत नसल्यास इतर विचारांचाही मला आदर आहे. लेखन आवडल्यास नावासहितच शेअर करायला हवे.  लाईक, कमेंट  करण्याची सक्ती नसली तरी त्यांचा धो धो पाऊस पाडण्यास माझी अजिबात हरकत नाही. धन्यवाद



व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग ७)

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग ७)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ७:

©️Anjali Minanath Dhaske 

         बघता बघता सहा महिने निघून गेले. सासूबाई वरचे वर मुक्कामाला येत होत्याच. प्रसादच्या चांगल्या वागण्याने वनिता सुखावली. काहीशी निश्चिंत झाली. तिला दुसर्‍यांदा दिवस गेले. पोरांचा संसार रूळावर येतोय असे वाटून सासुबाई ही निश्चिंत झाल्या.  

          नेमकी याच दरम्यान सासर्‍यांची तब्येत बिघडली.  सासू बाईंना गावी जावे लागले.  त्यांच्यासोबत वनिताही गेली.  प्रसाद नेहमी प्रमाणे आठवड्याला येणे जाणे करत होता.  सुरुवातीला त्याच्या वागण्यात पुन्हा बदल होतोय हे वनिताला जाणवले नाही. तिला तिसरा महिना लागला तेव्हा मात्र तिची खात्री होवू लागली की प्रसाद चांगले वागायचे नाटक करतोय.  प्रसाद तीला कधीच शिक्षणाची, नोकरीची परवानगी देत नसे. ती आर्थिक दृष्ट्या परावलंबी रहावी याची तो कायम खात्री करून घेत होता. आताची तिची परिस्थिती आधी पेक्षाही बिकट झाली होती. तिने प्रसादच्या खोट्या वागण्याला बळी न पडता दक्ष रहायला हवे होते.  प्रतीकचे भविष्य अंधारात असतांना तिने दुसर्‍या गर्भाला वाढविण्याची चूक केली होती. नकारात्मक विचारांनी तिला घेरले. दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर तिला प्रसाद जे म्हणेल ते करण्याशिवाय पर्याय राहणार नव्हता.  

       सासूबाईंच्या कानावर तिने तिची समस्या घातली. त्यांच्या मुलाच्या विरोधात त्या काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. तसे  काही असते तर त्याच्या वागण्यातून  जाणविले असते. वनिताही दुसर्‍यांदा गरोदर राहिली नसती. असे त्यांचे मत होते. संसारात कमी जास्त होतच असते. फुकट संशय घेवून संसाराची धूळधाण करण्यात काहीच अर्थ नाही म्हणत त्यांनी विषय उडवून लावला. 

           तिने वडिलांना पुन्हा एकदा तिची समस्या  समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.  प्रसादला इतर पुरुषांचे आकर्षण वाटते असे तिने सांगितल्यावर त्यांनी अगदी थंडपणाने  तिला समजावले, " अग जावईबापूंना दुसर्‍या बाईचा नाद नाही ना मग कशाला काळजी करतेस. दुसर्‍या माणसाला लेकरं होणार नाहीत आणि ते तुझ्या संसारावर हक्क ही सांगायला येणार नाहीत.  जोश आहे तोपर्यंत करतील असले धंदे नंतर तुझ्याचकडे परत येतील. दोन पोरं पदरी घेवून जाशील कुठे? आम्ही आहोत तो पर्यंत दोन घास खावू घालूही परंतू आमच्या माघारी तुझे हालच होणार आहे. त्यांना जे करायचे ते करू दे. दोन महिन्यापूर्वी शेतीसाठी लाखभर रुपये मागितले तर पटकन दिले जावई बापूंनी. मनाचे खूप चांगले आहेत. झाकली मूठ सव्वा लाखाची असते पोरी. उगा त्यांना बदनाम करू नकोस. उलट त्यांच्यासोबत राहून स्वतःसाठी भरपूर पैसे साठवायला सुरुवात कर.  तुझी म्हातारपणाची चिंता जाईल. त्यांची बदनामी झाली तर तुझी ही होईल. मग  तुझ्या बहिणींची लग्न कशी होतील? आमच्या जीवाला म्हातारपणी घोर लागेल. "  त्यांचे हे बोल ऐकून वनिताला कळून चुकले की तिने कितीही या सगळ्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला तरी तिला सासरचे किंवा माहेरचे  कोणीही साथ देणार नाही. 

         अशातच दवाखान्यात तपासणी करता गेलेली असतांना तिथे तिची प्रसादच्या मित्राशी गाठ पडली. बोलता बोलता तिला समजले की, प्रसादचे नोकरीत कधीच नीट लक्ष नव्हते. कामात ढीगभर चूका करत असल्याने वरीष्ठ अधिकारी  कायम  त्याच्यावर वैतागत होते. त्यात भरीस भर त्याने कामकाजातील हिशेबात लाखोंचा घोळ केला. तपासणीत रक्कम त्याच्या खात्यात न सापडल्याने ठोस पुराव्या अभावी त्याच्यावर असलेला आरोप वरीष्ठ अधिकार्‍यांना सिद्ध करता आला नाही. परंतू त्याला कायमचे कामावरून मात्र काढून  टाकण्यात आले होते. इतर कामाच्या ठिकाणी त्याने घोटाळे करून ते पचवू नये म्हणून ब्लॅक लिस्ट मधे त्याचे नाव टाकले. त्यावेळी प्रसादने थोडे नमते घेतले असते तर गोष्टी या थराला गेल्या नसत्या.असे मित्राचे मत होते. 

        ही हकिकत ऐकून तिच्या पाया खालची जमीन सरकली. तिला खरे काय आणि खोटे काय याचा काही मेळ बसत नव्हता.  त्यातच  वनिताने सासूबाईंशी केलेल्या चर्चेबद्द्ल प्रसादला कुणकूण लागली.  वनिताला एकट्या गाठून त्याने पुन्हा तिला धमकावले. 

क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

प्रसादच्या खोटे पणाला वनिता कशी सामोरी जाणार? ती दुसर्‍या बाळाला जन्म देणार का? तिच्या आयुष्यात कोणते नवे वळण येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

भाग १  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html



व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग ६)

कथा मालिका :  व.नि.ता ( भाग ६)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ६ :

©️Anjali Minanath Dhaske 


                 वनिताला चार चौघींसारखा साधा सरळ संसार करायचा होता.  तीने  विचारल्यावर प्रसादने सगळे कबूल केले तेव्हा तिला थोडी आशा वाटली की, अजूनही ती त्याचे मन वळविण्यात यशस्वी झाली तर तिचा संसार नक्की वाचेल. प्रसाद बाहेरून परत आल्यावर ती त्याला छोटा का असेना व्यवसाय करण्यासाठी विनवू लागली. देहविक्रीच्या  कामातून येणारे पैसे आपल्याला नको.  सरळ मार्गी कामातून कमी पैसे मिळाले तरी  घर भागविता येईल, असे सांगू लागली. तेव्हा मात्र प्रसाद चीड चीड करू लागला. त्याने स्पष्ट सांगितले की, " नोकरी आता पुन्हा मिळणार नाही . व्यवसायासाठी भांडवल गुंतवावे लागते.  कोणत्याही व्यवसायात रातोरात जम बसत नसतो तेव्हा जम बसेपर्यंत सगळे खर्च कसे भागवायचे? हे सगळे खर्च भागविण्यासाठी पुन्हा नवे कर्ज काढण्याची माझी तयारी नाही. गावच्या घर बांधणीसाठी काढलेले कर्ज डोक्यावर आहे. त्यात शहरातला आपला खर्च वाढलेला आहे. मी ज्या कामात आहे तिथून माघारी फिरता येणे शक्य नाही. या कामातही आता कुठे माझा जम बसलाय. भरपूर मोबदला मिळू लागला आहे. देहविक्रीच्या कामातून झालेल्या ओळखीचा ऊपयोग करत मागच्याच महिन्यात तुझ्या भावाला मी चांगल्या नोकरीला लावले आहे.  आपल्या  प्रतीकसाठी मला बराच पैसा जमवून ठेवायचा आहे." असे तो  सांगू लागला. 

प्रतीकचा विषय निघाल्यावर वनिताने त्याचाच आधार घेत प्रसादचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. 

"आपल्या मुलावर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. अजूनही उशीर झालेला नाही. आपण गावी जावून शेती करू आणि त्याचे भविष्य उज्ज्वल करू" असे तिने सांगितल्यावर तर तो अधिकच चिडला.  

         "मीही गावी शिकलो,काय ऊपयोग झाला? बहिणींची लग्न करून देण्यात बापाला अर्धी जमीन विकावी लागली. दोघे भाऊ शिक्षणात कमी म्हणुन राहिलेली जमिनीत ते शेती करतात.  त्या दोघांची लग्न अजून बाकी आहेत. वडिलांनी शेतीसाठी वेळोवेळी सावकाराचे कर्ज करून ठेवले आहे डोक्यावर तेही फेडायचे आहे.    मला नोकरी लागली होती त्यात सगळ्या जबाबदार्‍या पार पडत नव्हत्या. तेव्हा माझ्या ऑफिस मधील एकाने मला या कामाची माहिती करून दिली. मी विरोधाच केला होता. मी कामाला लागलो होतो तेव्हा पासून  माझ्या वरीष्ठ अधिकाऱ्याची माझ्यावर वाईट नजर होती. घरच्यांनी माझ्या लग्नाचा आग्रह धरला आणि आपले लग्न झाले. माझे लग्न झाले आहे हे समजल्यावरही वरीष्ठ अधिकारी काही माझा पिच्छा सोडत नव्हता. सुटीच्या दिवशीही तो मला मुद्दाम बोलावून घेत होता.माझ्या समोर इतर मुलांशी चाळे करून त्यांना रोख रक्कम देत होता. मी दुसरीकडे नोकरी शोधायला सुरुवात केली पण यश आले नाही. तेव्हाच प्रतीकच्या आगमनाची चाहूल लागली. तू गावी असल्याने मी ऑफिस मधे थांबून जादा काम करत होतो. एक दिवस इतर सहकार्‍यांच्या मदतीने माझ्या चहा मधे नशेची गोळी टाकून बॉसने माझ्या त्या अवस्थेचा गैर फायदा घेतला.  शुद्धीत आल्यावर सगळा प्रकार माझ्या लक्षात आला तेव्हा मी त्याच्याशी भांडण करून त्याला बेदम मारहाण केली.  त्याचाच राग म्हणून त्याने मला नोकरीवरुन  काढून टाकत ब्लॅक लिस्टमध्ये माझे नाव टाकले. काय करावे? कुठे जावे? कोणाला सांगावे? काही कळात नव्हते.  माझी अवस्था फार वाईट झाली होती.  सगळी सोंगं आणता येतात परंतू पैशाचे सोंग आणता येत नाही.  आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या मी पूर्णपणे उध्वस्त झालो होतो. तेव्हा माझ्या रूम पार्टनरने मला समजावले की अजूनही मी नवी सुरवात करू शकतो. माझ्या मनात सुडाची भावना पेटली होती. बॉसला पैशाचा माज आहे म्हणून माझा गैरफायदा घेतल्या गेला होता. मलाही आता भरपूर पैसे करावयाचे होते. मी स्वतःहून देहविक्रीच्या व्यवसायात उतरलो.  माझ्याच वरीष्ठ अधिकाऱ्याशी आता मी घसघशीत रक्कम घेवून संबंध ठेवू लागलो.  तो मूर्ख अभिमानाने आंधळा झाला होता.  वरीष्ठ अधिकारी व ज्या सहकार्‍याने मला फसविले होते त्यांच्याशी संबंध ठेवतांना मी गुपचूप व्हिडिओ काढून ठेवले. याच व्हिडिओचा वापर करून मी तुझ्या बहिणीच्या लग्नासाठीची रक्कम तातडीने उभी केली होती.  सुरवातीला  मन मारून हे काम करत होतो. गेली दोन वर्षे या कामातून मिळणार्‍या पैशांमधून घरखर्च भागवत आहे . आता तर माझ्या हाताखाली दहा मुले आहेत. त्यांचे  कमीशनही मिळते.  मी या क्षेत्रात अनुभवी असल्याने मला मागणी आहे. पूर्वी महिनाभर राबून जितका पगार मला मिळत होता तेव्हडी रक्कम आता एका दिवसात मिळते. दोन वर्षात सगळे कर्ज फेडून मी राजा सारखे राहणार आहे.  तू साथ दिली तर तुलाही राणी सारखे ठेवीन. "  

लोकांना दाखविण्यासाठी दिखाऊ राणी बनण्यात काहीच अर्थ नाही हे ती मनोमन समजून गेली. त्याचे हे बोलणे ऐकून वनिताने  घटस्फोट घेण्याचा निर्णय त्याला सांगितला.  त्यावर प्रासादने तिला स्पष्ट सांगितले, " तुला घटस्फोट हवा आहे तर तो द्यायला माझी हरकत नाही परंतू  आपल्या प्रतीकचा ताबा मी माझ्याच कडे ठेवणार. " त्यावर वनिता हतबल होत म्हणाली, " काहीही झाले तरी प्रतिकचा  ताबा मी सोडणार नाही "

प्रसाद शांतपणे उत्तरला ," तू आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही, प्रतीकचा  ताबा माझ्याकडेच राहील त्याच्या भविष्यासाठी मीच पुरेसा आहे " त्यावर वनिता चिडून म्हणाली, " तुझ्या सानिध्यात राहून तो काय शिकणार आहे.  तू त्याला काय संस्कार देणार आहे?"

त्यावर प्रसाद म्हणाला, " मी त्याला माझ्याच धंद्यात घालणार आहे.  मी फार उशिरा आलो या क्षेत्रात.  लहान मुलांना जास्त मागणी असते.  खूप पैसे मिळतात.  वय आहे तोपर्यंत कमावून घ्यायच, नंतर आरामात बसुन खायचे. माझ्या पाठीशी कोणी नव्हते .मला जास्त पैसे कसे मिळवता येतात हे सगळे समजून घ्यायला अवघड गेले, आता मात्र मी त्याच्या पाठीशी आहे. एकदा का तो थोडा मोठा झाला की मी त्याला सगळे शिकविणार आहे.  तो कामाला लागला म्हणजे बादशाही थाटात राहू आम्ही दोघे.  घटस्फोट घेतांना माझी बदनामी करून प्रतीकचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करशील तर घटस्फोट मिळेल तेव्हा मिळेल परंतू प्रतीकचे नखही तुझ्या दृष्टीला पडणार नाही ईतक्या दूर त्याला घेवून जाईल.  माझे संबंध मोठ्या लोकांशी आहेत. आम्ही दोघे कुठे गायब झालो याचा पत्ता तुला आयुष्यभर लागणार नाही. तुझ्या नकळत तुलाही विकून टाकेन. मग आयुष्यभर रडत बसशील. शहाणी असशील तर जे जसे सुरू आहे तसेच सुरू राहू दे. " हे बोलत असतांनाच तो प्रतीकला खेळवतही होता. येरवी प्रतीकला त्याच्या हातात हसतांना बघून तिला समाधान वाटले असते परंतू आता मात्र तिच्या मनात प्रतीकच्या आणि स्वतःच्या भविष्या विषयी चिंता दाटून आल्या. तिने स्वतःला या आधी इतके हतबल कधीच अनुभवले नव्हते. प्रसादने जे सोसले त्याबद्दल त्याला सहानुभूती द्यावी की आता तो जसे वागतो आहे त्याचे दुःख करावे. वनिताची विचार शक्ती क्षीण झाली. तिने प्रसादला दाखविले नसले तरी आतून ती पूर्णतया कोलमडली होती. 

         तिने वडिलांना नवर्‍याला सोडून राहण्याची शक्यता सांगितली तसे त्यांनी तिच्यावर चिडचिड सुरू केली. " नवरा मारहाण करत नाही, घरात लागेल ते सगळे आणून देतो, मुलाकडे लक्ष देतो,  तुला कपडेलत्ते सगळे घेतो मग उगी चांगलं सुरू असताना मोडता घालू नकोस. त्यांचे घेतलेले पैसे परत करण्याची आमची ऐपत नाही तेव्हा गपचूप संसार कर. आमच्या जीवाला घोर लावू नको" म्हणत त्यांनी तिच्या मनातील वादळ जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.

            माहेरच्यांची मदत मिळत नाही म्हंटल्यावर तिने सासू बाईंना प्रतीकचे कारण देत स्वतःकडे शहरात बोलावून  घेण्याचा तगादा लावला. अखेर सासूबाई  सुरुवातीला महिनाभरासाठी रहायला आल्या.  तेव्हा तिने प्रसाद उशीरा घरी येतो, बाहेरच्या खोलीत झोपतो,वेळी अवेळी कामावर जातो, फोन आला की लगेच घराबाहेर पडतो, काय करता? कुठे जाता? असे प्रश्न विचारले की चिडचिड करतो. अशा अनेक बारीकसारीक गोष्टी सासू बाईंच्या निदर्शनास आणून द्यायला सुरवात केली. सासूबाईंनेही मुलाचा संसार सुरळीत रहावा म्हणून आडून आडून त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला.

         प्रसादच्या लक्षात ही गोष्ट यायला वेळ लागला नाही. आई घरात असे पर्यंत त्यानेही चांगले वागण्याचे नाटक सुरू केले. इतकेच काय एकांतात त्याने वनिताशी शारीरिक जवळीक साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वनिताने विरोध केला. परंतू रविवारी तो सगळ्यांना बाहेर फिरायला घेवून जावू लागला. वनिताला आवडते म्हणून सिनेमाला नेवू लागला. प्रसादचे आताचे वागणे खरे मानावे की त्याच्याबद्दलचे जे सत्य आपल्याला कळले आहे ते खरे मानावे. असा संभ्रम तिच्या मनात निर्माण झाला. आईच्या सांगण्यावरून प्रसाद सुधारला तर झाले गेले विसरून जावून नवीन सुरवात करायची आशी वेडी आशा तिच्या मनाला  लागून राहिली.

क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

आईच्या येण्याने प्रसाद खरच  सुधारला आहे का? वनिताच्या संसाराची गाडी पून्हा रूळावर येईल का? वनिताच्या सुखी संसाराचे स्वप्नं अस्तित्वात येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

भाग १  link 

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html


भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html


भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html


भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html


भाग ५ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html


भाग ७ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html


भाग ८ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_11.html


भाग ९ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_20.html

भाग १० link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_13.html

भाग ११  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_87.html

भाग १२ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_46.html


भाग १३ link: समाप्त (The end)

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html