शिव जयंती ( २०१८ ) निमित्त काढलेली रांगोळी

 शिव जयंती ( २०१८ ) निमित्त काढलेली रांगोळी :
               शिवाजी महाराजांचा जन्म १९/२/१६३० ला झाला असला तरी त्यांच्या विचारांची गरज आजही आहेच. ते जीजाऊंसाठी शिवबा, बाळ संभाजींसाठी आबा साहेब, प्रजेसाठी जाणता राजा, मोघलांसाठी शिवा तर इतिहास कारांसाठी युग पुरुष आहेत.
              अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना,फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. त्यांच्या  ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल.
      पण दुर्दैव ' शिवाजी जन्मावा ते शेजारच्या घरी ' असं आपण म्हणतो. शिव राज्यातले फायदे हवेत पण त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या यातना नकोत. "भगवा " आपला तर मानतो पण महाराजांना अपेक्षित असलेले राज्य निर्माण करता येत नाही. मी इतिहासाची अभ्यासक नाही.....तरी मला वाटतं भगवा म्हणजे एकी....... भगवा म्हणजे सुखी प्रजा.... भगवा म्हणजे स्त्रियांचा आदर..... भगवा म्हणजे सगळे समान......भगवा म्हणजे विरक्ती...... भगवा म्हणजे रयतेचे हित आधी मग राजाचे...... भगवा म्हणजे राज्य विकासाचा ध्यास..... भगवा म्हणजे अन्यायाची चीड.....
            आज आपण फक्त रंगात गुरफटलो आहे. महाराजांचे विचार मात्र विसरत चाललो आहे. आज याच विचारांची आठवण ठेवून....... मना मनात शिव ज्योत लावू या....... ही रांगोळी शिव चरणी अर्पण.......
जय भवानी... जय शिवाजी.... 
 ©️ अंजली मीनानाथ धस्के 
      पुणे, चिंचवड ३३



व्हॅलेंटाईन डे निमित्त काढलेली रांगोळी ( १४/२/२०१८)

व्हॅलेंटाईन डे (१४/२/२०१८):

एक दिवस............प्रेमाचा.
प्रेम.....हा विषय खुप सोपा  तरी तितकाच किचकट आहे.
प्रेम करणं जसं सोपं पण ते निभावणं तितकंच कठीण आहे.
प्रेमाचा एक क्षण जगण्यास पुरेसा, तर प्रेमा शिवाय आयुष्य आवघड आहे. कुठल्याही नात्यातलं प्रेम हे पिसारा फुलवुन नाचणाऱ्या मोरा सारखंच आहे. त्याची भुरळ पाडल्याशिवाय रहात नाही. आपण जन्म घेतो तेव्हाच आई-वडीलांमूळे या प्रेमाची अनुभूती घेतो. प्रेम काय असतं हे पहिल्यांदा कळतं ते आईच्या कुशीत आणि वाडीलांच्या मिठीत. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक नात्यात ते नव्यानं भेटत जातं. म्हणूनच आजची ही रांगोळी त्या प्रत्येक नात्यातल्या प्रेमासाठी समर्पित.......
या रांगोळीत म्हंटलं तर हे आई-वाडीलांच्या कुशीत विसावलेलं माझं बाल मन आहे आणि म्हंटलं तर एका हक्काच्या माणसाच्या प्रेमळ मनात माझं फुललेलं प्रेमी मन आहे....किंवा आम्ही दोघांनी मिळून  जपलेलं आमच्या लेकराचं कोवळं मन आहे.
प्रेम दीनाच्या सर्व वाचकांना प्रेमळ शुभेच्छा.........

©️ अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


महाशिवरात्री (१३/२/२०१८)

महाशिवरात्री निमित्त  (१३/२/२०१८ ) काढलेली रांगोळी :
            " सत्यम्‌ शिवम्‌ सुन्दरम्‌ "
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव शक्ती .......  भक्ती  ........  आणि ब्रम्ह  ..........  आहे.
मोराच्या आनंद नृत्यात ही  शिव ....क्रोधने तांडव करतो तो ही शिव......भक्तांना भरभरून आशीर्वाद देणारा ही शिव आणि दुष्टांचा संहार करणारा ही शिव. सृष्टीच्या कणाकणात आणि प्रत्येकाच्या मनामनात ......आहे तो फक्त शिव.
म्हणूनच " सुबह सुबह ले शिव का नाम, करले बंदे ये शुभ काम " अस म्हणतात हे काही खोटं नाही. महाशिवरात्रीच्या पावन समयी माझी "ही " रांगोळी शिव चरणी अर्पण

महाशिवरात्रीच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेछा !
©️ अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३




व्हँलेनटाइन डे निमित्त केलेली कविता (१४/२/१८)

व्हँलेनटाइन डे निमित्त केलेली कविता :

खरं तर प्रेम या संकल्पनेवर कोणा एका नात्याची मक्तेदारी असूच शकत नाही. प्रत्येक नात्यात प्रेम असावंच लागत. तेव्हाच ते नात फुलतं आणि जपल्याही जातं. कुठल्याही नात्यातलं प्रेम व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही आणि ते साजरं करण्यासाठी विशेष अशा एका दिवसाची गरजही नाही.
 हे जरी खरं असलं तरी प्रवाहा सोबत वाहत जाण्याचा मोह हा आवरताही येत नाही. रांगोळीवरही माझं खूप प्रेम आहे. म्हणून मी काढलेल्या काही रांगोळ्यांचा वापर  इथे करून खास नात्यासाठी खास शब्द रचना करण्याचा छोटा प्रयत्न....... प्रेम म्हणताच पाऊस हमखास आठवतो. उन्हाळ्याची चाहूल लागली असतांना माझ्या मनात मात्र प्रेमाचा पाऊस पडतोय. प्रेम....पाऊस आणि रांगोळी यांच्या साठी केलेली कविता आवडली तर कॉमेंट बॉक्स मधे कॉमेंट करायला विसरू नका.
©️ अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


नयन

मानवी डोळा काढण्याचा सराव करताना काढलेली ही रांगोळी....

निसर्ग चित्र

साधीच निसर्ग चित्र काढली आहेत. काढलेल्या निसर्ग चित्रांच्या रांगोळीत पाऊस पडतोय असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
                                 रांगोळी क्र. १ 


     
                                  रांगोळी क्र.२



रंगीत रांगोळी

 आज अगदी साध्याच  रांगोळ्या रेखाटल्या  आहेत.
                     
                      प्रकार क्र :१

प्रकार क्र :२

प्रकार क्र :३