गणेश उत्सव ( अष्टम दिन )

महड येथील गणपतीला श्री वरद विनायक म्हणतात. गुत्समद  ऋषींनी  या गणपतीची स्थापना केली.

  

गणेश उत्सव ( सप्तम दिन )

 रायगड जिल्ह्यात पाली येथे कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा बल्लाळ हा मुलगा  होता. त्याला गणपती  प्रसन्न  झाला . त्या वेळी बल्लाळाने गणपतीला मूर्ती रूपात प्रकट होण्यास संगितले. म्हणून या गणपतीचे नाव बल्लाळेश्वर आहे.

 

गणेश उत्सव ( षष्ठ दिन )

ओझर येथील गणपतीला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर म्हणतात. विघ्नसुराचा नाश करण्यासाठी सर्व देवतांनी याची स्थापना केलेली आहे .

 

गणेश उत्सव ( पंचम दिन )

लेण्यांद्री येथील गणपतीला " श्री गिरिजात्मज " असे म्हणतात. या मूर्तीची स्थापना पार्वती मातेने केली आहे. पार्वतीचे  दुसरे नाव गिरिजा आहे. गिरिजा मातेचा आत्मज म्हणजे पुत्र म्हणून त्याला गिरिजात्मज  म्हणतात.

गणेश उत्सव ( चतुर्थ दिन )

थेऊरचा गणपतीचे  नाव  " श्री चिंतामणी " आहे. या मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली  आहे.

 
( जागा जास्त असल्यास बॉर्डर मधे असाही  बदल करता येतो  )
 
 
 

गणेश उत्सव ( तृतीय दिन )

रांजणगाव येथील गणपतीला " श्री महागणपती " असे म्हणतात. या मूर्तीची स्थापना श्री शंकरांनी केलेली आहे.

 
(जागा जास्त असल्यास  बॉर्डर चा एक वेगळा प्रकार )
 

गणेश उत्सव ( व्दितीय दिन )

सिद्धटेक येथे गणेशमूर्तीची स्थापना केल्यावर भगवान विष्णूला  सिद्धी प्राप्त झाली.  म्हणून  येथील  गणपतीस " सिद्धिविनायक "  म्हणतात. ही मूर्ती स्वयंभू असून अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची  एकमेव मूर्ती आहे.  सिद्धिविनायकाकड़े, " सर्व भक्तांना  सुख , समृद्धी आणि समाधान लाभो  " ही प्रार्थना करुया.


गणेश उत्सव ( प्रथम दिन )

स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धीदम । 
बल्लाळो मुरुडम विनायक मढम चिंतामणी : थेउरम ॥ 
लेण्याद्री गिरिजात्म्जम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरम । 
ग्रामे रांजण संस्थितो विजयताम कुर्यात सदा मंगलम ॥ 
गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरण मंगलमय झालेले आहे. त्यांच्या सेवेसाठी लहान -थोरांची तयारी ही जय्यद झालेली आहे. तर मग मंगलमय रांगोळ्यांना विसरून कसे चालेल.  माझ्या या रांगोळ्या आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी  सप्रेम भेट ……

गणेश उत्सवासाठी अष्टविनायक रंगोळीत रेखाटण्याच्या माझ्या प्रयत्नाला मोरगांव च्या मोरेश्वराला नमन करून सुरुवात करत आहे.  तुम्हालाही या रांगोळ्याच्या प्रवासात सामिल व्हायला आवडेल न.…  , तर मग तुमचा  अभिप्रय कळवायला  विसरु नका. ब्रम्हा, विष्णू , महेश ,शक्ती आणि सूर्य या पाच देवतांनी मोरेश्वर  गणपतीची  स्थापना  केली  आहे.  याच ठिकाणी सिंधू व कमलासूर दैत्यांचा संहार करतांना गणपतीचे वाहन मोर होते. त्यामुळेच या गणपतीला मोरेश्वर किंवा मयूरेश्वर  म्हणतात. येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली आहे. 
(गणेश  मंडळाच्या मंडपात  कमी  रंग वापरून  तयार  केलेल्या  या गालीच्यामधेही  तुम्ही श्री गणेशाची ही  रांगोळी प्रभावीपणे काढू शकता. )



( ४) श्रावण सोमवार २०१५

महादेव हे लोकांना  अध्यात्मिक  भक्तीसाठी सदैव प्रेरीत करत आलेले आहेत. " संसारात राहुनही संन्यासी बनतां येतं" हे आपल्याला त्यांच्याकडुन शिकतां येत. संन्यासाच प्रतिक म्हणजे , ' मस्तकावर रेखाटलेल्या विभूतीच्या तीन रेषा ' .  महादेवाचे त्रिशुल हे  ' मद , मत्सर आणि मोह '  या तीन वाईट गुणांवर नियंत्रण करण्याचे सुचवते . म्हणूनच विभुतीचे तीन पट्टे आणि त्रिशुल असलेले गंध  शिवभक्तांच्याच मस्तकावर शोभून दिसते. आज  श्रावणातला शेवटचा सोमवार तेव्हा शिवाला आणि  शिवभक्तांना माझे शत् शत् प्रणाम.


गोकुळाष्टमी २०१५

श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त काढलेली ही रांगोळी कृष्णाच्या मंत्रमुग्घ करणा-या बासरीच्या मधुर सुरांची आठवण आपल्याला करून देते. कृष्ण म्हणताच सर्व प्रथम डोळ्यांसमोर उभी राहते," ती कृष्णाची निळसर कांती असलेली काया, त्यातील मुकुटावर दिमाखात मिरवणारे मोरपिस आणि हातातील बासरीवर हळूवार फिरणारी कृष्णाची बोटे". गोकुळाष्टमीचा  हा सण कृष्णलीलांना उजाळा देणारा आहे. सर्व वाचकांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खुप खुप शुभेच्छा .

शिक्षक दिन २०१५

शिक्षक प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आयुष्याच्या नव्या को-या पाटीवर आपण त्यांच्याच सहाय्याने " श्री गणेशाय नम: " लिहून  शैक्षणिक वाटचालीला सुरूवात करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर ज्यांनी मला पुढच्या वाटचालीसाठी प्रेरीत केलं अश्या माझ्या सर्व शिक्षकांना "शिक्षक दिना निमीत्त" माझे भावपुर्ण नमन.

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

 
 
अंगारिका चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी जी तुम्हालाही झटपट काढता येईल.