आनंदाचे लाडू

#आनंदाचे_लाडू
©️अंजली मीनानाथ धस्के

    यंदा मुलांच्या परीक्षा लवकर झाल्या. मे महिन्यात माहेरी जाणारी  आसावरी मार्च महिन्यातच माहेरी गेली. मे महिन्यातल माहेरचं उन तिला सहन व्हायचं नाही. यंदा मार्च महिन्यात माहेरी गेल्याने मनसोक्त भटकून घेण्याचा तिचा मानस होता.
   सुरवातीचे चार पाच दिवस तर आईकडून लाड करून घेण्यात गेले. मैत्रिणींना भेटण्याचं निश्चित केलं आणि लॉक डाऊनची घोषणा झाली.
      बरं झालं माहेरी आधीच आलो होतो ..... नाहीतर या वर्षी माहेरी येता आलं नसतं.... असं वाटून ती आनंदात होती.
          हा आनंद फार काळ टिकला नाही. कामाला येणाऱ्या मावशी, माळी काका आता कोणी  येत नव्हतं. खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंपाकाच्या मावशींनाही सुट्टी दिल्या गेली.
            एरवी तिने सकाळी वाटेल तेव्हा उठावं . वहिनीने हातात चहाचा कप द्यावा . तिने तिचं फक्त आवरल की झालं. तिची स्वतःची पोरं तर ' आई ' अशी हाक मारायची सुद्धा विसरतात की काय इतकी ती मामा मामी आजी आजोबा यांच्यात रमायची.  आईने खास  तिच्यासाठी  बनवलेल्या पदार्थाचा तिने मनसोक्त आस्वाद घ्यावा. दुपारी एसीच्या गार हवेत वामकुक्षी घ्यावी.
      स्वत:च्या घरी कधी वाट्याला येत नाही तो सगळा निवांतपणा माहेरी उपभोगावा. अशीच तिची धारणा . गेले कित्येक वर्षे तिची ही धारणा कायम ही राखण्यात आली होती.
पण यंदा आक्रित घडलं.  ज्यांच्या जीवावर माहेरची सगळी भिस्त होती ते सगळे सक्तीच्या सुट्टीवर गेले. आणि सुट्टी मजेत घालवायला आलेल्या तिला कामाला जुंपाव लागलं.

घरी करत होती त्यापेक्षाही जास्त कामे माहेरी करावी लागत होती. एरवी दिवसभर खा खा करणारी पोरं बघून  आपण  माहेरी आलो की  पोरांच्या अंगावर ही मुठभर मास चढत अस वाटून ती मनाने तृप्त होत असे. पण आता घरातल्या एका पोराने जरी   भूक लागली म्हटलं की ," त्याच्यासोबत  तिच्या डोळ्यासमोर प्रत्येकाच्या आवडी निवडी, फार्माएशी.... त्या पाठोपाठ पडणारा भांड्यांचा डोंगर आणि पोरांची छोटीच पण तरी टी शर्ट मधून डोकावणारी ढेरी दिसू लागे "
स्वतःच्या घरी असतो पाठीत एक धपाटा घालून सांगता आलं असतं ," आता १५ मिनिटापूर्वी खाल्लं की.... किती खाशील .. ती ढेरी कमी कर आधी मग देईल हवं ते खायला " पण इथे तसं म्हणून काहीच फायदा नव्हता. मुलांचे लाड .... लाड कसले फाजील लाड करणारे खूप .... त्यामुळे काही झालं तरी झुकतं माप मुलांनाच मिळणार हे निश्चित. मुलांच्या फर्माईशी आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या मोठ्यांच्या फर्माईशी पूर्ण करता करता दिवस मावळतीला जावू लागला. दिवसाची वामकुक्षी न मिळालेल्या जीवाला रात्रीच्या झोपेचे वेध लागायला लागले. दुपारी सुस्तावलेल्या पोरांना रात्री जणू चेव चढू लागला. काही केल्या लवकर झोपायच नाव घेत नव्हती.
   घरातल्या कामांकडे कानाडोळा करावा म्हटलं तर  आई आणि वहिनी कंबर कसून काम करत असतांना आपण बसून खाण तिला जड जावू लागलं.
     नवऱ्याचा फोन आला की तो नेहमीप्रमाणे चिडवे ," मज्जा आहे बुवा एका माणसाची ..... यंदा माहेरी जास्त रहायला मिळणार .... आवडीच खायला मिळणार " एरवी त्याने असं म्हटल की तिच्या मनात आनंदाचे लाडू फुटायचे पण आता मात्र तिला दिवसभर केलेली काम आठवून टाहो फोडावासा वाटू लागला.

आता माहेरचा अभिमान असणारं तेच मोठं घर ... त्यातली कामं नकोशी वाटू लागली.
       माहेरी आलं की नेहमी जादूची कांडी फिरावी आणि तिने काडी इकडची तिकडे न करता सगळी कामं व्हावी असंच घडत होत पण यावेळी कोणी तरी जादूची कांडी अशी काही फिरवली की कितीही काम करा .... कामं काही संपत नव्हतं.
अंगणातल्या बागेच .... त्यातल्या बंगळीच कोण ते कौतुक होत तिला ..... पण आता तेच आंगण झाडायची वेळ स्वतःवर आली म्हंटल्यावर घामाने चिंब भिजलेल्या तिच्या जीवाला बंगळीवर झुलण्याचा विसर पडला.  भांडी घासून घासून कोरड्या पडलेल्या हातांना बघून आईच्या हातचे पदार्थ म्हणजे नुसते जिभेचे चोचले वाटू लागले.
           पूर्वी ती आली म्हणून बाबा आणि दादा घराबाहेर पडले की  परत येतांना खास तिच्यासाठी काही ना काही घेवून येत असे. यंदा मात्र त्यांनी बाहेर जावूच नये असं तिचं ठाम मत असतांना ते कामाचं निमित्त करून बाहेर पडत होते. येतांना तिच्यासाठी काही तरी घेवून येत होते. तेव्हा त्या वस्तू भेटल्याचा आनंद कमी पण त्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करावे लागणार याचीच चिंता तिला सतावत होती.
   पूर्वी माहेरी असतांना मैत्रिणीचा फोन आला की ती निवांत गप्पा मारत असे. पण यंदा मैत्रिणींना भेटता येत नव्हतं की मनसोक्त गप्पा मारता येत नव्हत्या. घरातसतत काहीतरी काम सुरूच होत. काम सुरू असतांना फोन वर बोलण्यात तिचं चित्तच नसायचं.
एरवी उत्साहाने लाड पुरवणारी आई आता घरात राहून तीच ती कामं करून पुरती वैतागली होती . खरेदीची प्रचंड आवड असलेली वहिनी तिच्या सोबत कुठेही आणि कधीही  खरेदीला व फिरण्याला जाण्यासाठी तयार असायची. तीच वहिनीही आता  घरात कोंडल्या गेल्याने उदास झाली होती.
पूर्वीसारखी काम वेळच्या वेळेवर होत नव्हती. दिवसाचा दिनक्रम बदलून गेला होता त्यामुळे तर आसावरीचीही चीड चीड होत होती.
नेहमी माहेरी आली की आवर्जून पार्लरला जाणारी आसावरी यंदा मात्र तिला गेले कित्येक दिवस स्वतःला आरशात नीट बघता ही आलं नव्हतं.
         मुलांचं आजोळी राहणं सार्थकी लागलं. त्यांच्या सुट्टया मजेत जात होत्या. त्यामुळे त्यांना घराची आठवण येत नव्हती.
आसावरीसाठी सासर माहेर हा भेदच नष्ट झाल्याने तिला मात्र स्वत:च्या घरी जाण्याचे वेध लागले.
 रोज देवाला ती मनातल्या मनात हजार वेळा म्हणत होती ," बाबारे लवकर हा करोना मरू दे. लॉक डाऊन उठू दे आणि मला माझ्या घरी जायला मिळू दे "
पूर्वी घरातली कामं करताना तिला माहेरची आठवण यायची. माहेरी असतो तर .... निवांत राहिलो असतो. आपण न करता ही सगळी कामं वेळच्या वेळी झाली असती. आवडीच आयात खायला मिळालं असत.... एक ना अनेक विचार तिच्या मनात यायचे.
यंदा मात्र माहेरी असतांना तिला तिच्या स्वतः च्या घराची आठवण येवू लागली. माहेरच्या घराला झाडू मारतांना मानत येवू लागले ... नवऱ्याला एक काम धड येत नाही. आपल्या घराची तर रया गेली असेल.
पूजेसाठी फुलं तोडायला अंगणात गेली की तिला तिच्या घरी कुंडीत लावलेल्या तुळशीची आठवण येई आणि जीव कासावीस होई. तिच्या घरी सगळी कामं तिलाच करायची आहे म्हंटल्यावर  मनात असेल ते काम आधी करावं बाकी कामं नाही झाली तरी तिला बोलणारं कोणी नव्हतं पण इथे माहेरी त्यांच्या दिनक्रमाप्रमाणे सगळी कामं करताना तिचा जीव मेटाकुटीला आला होता. तिने काम केलंच पाहिजे असा कोणाचा आग्रह नव्हता पण काम न करावं तर तिला  अपराधीपणाची भावना जाणवत होती. वेगळ्याच मानसिक पेचात ती सापडली. एरवी तिच्या घरी ती कामं करून थकली की नवरोबा प्रेमाने चौकशी करून तिचा थकवा घालवत होता पण इथे तर आता सगळेच थकलेले मग कोण कोणाचं कौतुक करणार.
तिची धुसफुस बघून तिच्या बाबांना जाणवलं की आपल्या चीमिणीचं काही तरी बिनसल आहे. त्यांनी खास वेळ काढून तिच्याशी बोलायचं ठरवलं. दोघे घराच्या माडीवर गहू वाळवायला गेल्यावर त्यांना  तिच्याशी एकांतात निवांत बोलण्याची संधी मिळाली. गव्हावरून हळुवार हात फिरवत त्यांनीच तिला विचारलं," आज माझी चिमणी अशी गप्प गप्प का ? काही बिनसलंय का तुझं? " वडिलांनी असं विचारताच तिचा बांध फुटला... पाणावलेल्या डोळ्यांनी बोलली ," कसं सांगू बाबा ..... सांगितलं तर तुम्हाला खूप वाईट वाटेल" ते लगेच म्हणाले ," डोळ्यात पाणी आलंय माझ्या चिमणीच्या ..... आता  तू नाही सांगितलं तर मात्र नक्कीच खूप वाईट वाटेल". त्यांनी तिचा हात हातात घेऊन हलकेच थोपटला. तेवढ्या स्पर्शानेही ती आश्वस्थ झाली. मन मोकळं करत बोलून गेली," बाबा मला माझ्या घराची खूप आठवण येते.  तुम्हाला वाटेल कामं पडतात म्हणून मला घराची आठवण येते. काम तर मी माझ्या घरीही करतेच की पण ही सक्तीची सुट्टी नको झाली आहे. इथे येवुन गेलं की मी पुढचं वर्ष भर मी इथल्या आठवणीत तिकडे मस्त राहते. इथून मी रिचार्ज होवून जाते. पण यंदा मनात काय सुरु आहे काही कळत नाही. प्रत्येक क्षणाला तिकडची आठवण येते. इथं मन रमत नाही पण हे मी कुणाला सांगुही शकत नाही. आईचं मन फार दुखावेल माझं हे आताच बोलणं ऐकून म्हणून गप्प राहून मनातले विचार मनातच ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. पण खरंच हो बाबा .... आता मला माझ्या घरी जायचं आहे."
   तिचं बोलणं ऐकून बाबांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटल आणि म्हणाले ," बस येवढच..... देव करो आणि तुला तुझ्या घरी लवकर जायला मिळो " त्यांचे हे बोल ऐकून तिने पट्कन विचारलं," बाबा तुम्हाला माझा राग नाही आला?.... मला इथे करमत नाही ऐकुन वाईट नाही वाटलं? " बाबा हसून म्हणाले " वेडा बाई राग कशाला येईल.?... वाईटही का वाटावं? ... माझ्या चिमणीला तिच्या घरट्याची आठवण येते यात आनंदच आहे मला .....  आईलाही अजिबात वाईट वाटणार नाही . तीही यातून गेली आहे. तुम्ही मोठे झाल्यावर आईही माहेरी गेली तरी तुमच्या शाळेचं.... अभ्यासाचं निमित्त करून लवकर परत यायची. अनेकदा तिला सांगून पाहिलं की गेलीस तर रहा निवांत इथली कामं रोजचीच आहे  पण ती म्हणायची ,' तिकडे गेलं की चार दिवस बरं वाटतं मग इकडची आठवण येवुन मन बेचैन होत. तिथल्या आरामात ही इथल्या कामांचीच ओढ असते." तुम्हा बायकांना सासरी असलं की कायम माहेरची आठवण येते . सगळा जीव महेरात असतो तुमचा.... पण माहेरी आल्यावर  लेकीला आपल्या घराची आठवण आली तर आई वडीलांनी समजून जावं  की लेक आता तिच्या संसारात रमली आहे. तू तुझ्या संसारात रमली आहे हे ऐकुन माझे मन  तर  समाधानाने भरून गेले आहे. काळजी नको करू ..... हेही दिवस जातील.... तुला लवकरच तुझ्या घरी जायला मिळेल  पण तोपर्यंत माझ्या चिमणीच्या डोळ्यात पाणी येता कामा नये.... चल .... खाली चल तुझ्या साठी एक गंमत आणली आहे. "
दोघे पायऱ्या उतरून खाली आले. बाबांनी तिच्या हातात फ्रीज उघडून आयक्रिमचा  कोन दिला. लहानपणापासून ती उदास असली की बाबा तिला असाच आईसक्रिमचा कोन द्यायचे. तो कोन बघून ती लहानपणी जशी खुश व्हायची तशीच आताही खुश झाली पण लगेच दुसऱ्या क्षणी तिने विचारलं," आता आईसक्रिम खाल्ल तर चालेल? " ..... तेही लगेच म्हणाले ," एखाद्या वेळेस खायला काही हरकत नाही....  चालेल .... नक्कीच " .
त्यांनी तिची समजूत काढता ती पट्कन बाबांना बिलगली . तेवढ्यात तिथे आई आली आणि म्हणाली, " अजूनही आईसक्रीम दिलं की बाबांना बिलगायची तुझी सवय गेली नाही वाटतं " आईचं ते बोलणं ऐकून ती आईला चिडवत म्हणाली ," आता बाबांनाच नाही तर आईलाही बिलगायची  सवय लागली आहे". लगेच ती
आईलाही  बिलगली.
 तिची धुस फुस कुठल्या कुठे पळून गेली होती. आता तिच्या मनात बाबांचे शब्द घोळत होते ," लेक संसारात रमली " का कुणास ठाऊक पण तिच्या मनात आनंदाचे लाडू फुटू लागले. तिच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद आई बाबांनी टिपला आणि ते ही लेकीच्या प्रेमानें  भरून पावले.
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

लेक बाबांच्या कायम जवळची असते म्हणूनच लेक आणि बाबांची ही रांगोळी इथे देत आहे.

करोनाशी लढा

   #करोनाशी_लढा
संकट आहे मोठं
तरी धीर आता धरा
हेही दिवस जातील
काळ थांबत नाही खरा
ऑल इज वेल म्हणत
मनाची समजूत काढा
कारण हे युद्ध नाही सोपं
आहे करोनाशी लढा
करोना योध्यांचा आदर करू
वागू थोड माणुसकीने
जातीभेद सारे विसरू
लढू एकोप्याने
राजकारण नको याचे
नको कोणत्या अफवा
एकच आहे आपला शत्रू
काढू त्याच्याविरुध्द फतवा
धरू सकारात्मक विचारांची कास
बाळगू थोडा संयम
 देवू घासातलाही घास
पाळून सोशल डीस्टंसिंगचा नियम
चांगले ते सारे स्वीकारू
जीवनशैली  बदलू थोडी
दुःखातही शोधू
आनंदी क्षणांची जोडी
नात्यांमधला वाद विसरत
 वाचा संवादाचा पाढा
विस्मृतीतले छंद आता
 जोपासायला  काढा
कारण हे युद्ध नाही सोपं
आहे करोनाशी लढा
©️अंजली मीनानाथ धस्के
सोबत कवितेला साजेशी माझ्या मुलाने काढलेली रांगोळी ही देत आहे.
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

धाडसी किल्लेदार

#धाडसी_किल्लेदार
©️ अंजली मीनानाथ धस्के
        सोन्या, चंप्या , डिंकू आणि पिंटू अशी जिगरी मित्रांची चौकडीच होती. सगळे एकाच शाळेत एकाच वर्गातले आणि रहायलाही एकाच सोसायटीत. त्यामुळे शाळेत जायला, यायला, आभ्यास करायला, खेळायला सगळीकडे ते एकमेकांच्या कायम सोबत असायचे.
           दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तशी  त्यांनी किल्ला बनवायची तयारी सुरू केली. यावर्षी नेहमीपेक्षाही भारी किल्ला बनवायचं असं त्यांनी ठरवलं . त्यासाठी त्यांना मोठं मोठी दगडं, विटा, माती आणि खराब पोती लागणार होती. सगळं साहित्य गोळा करायला चौघही सायकल घेवून बाहेर पडले. माती आणि पोती तर मिळाली पण संध्याकाळ होत आली तरी दगडं, विटा काही मिळत नव्हत्या. बराच दूर फिरत गेल्यावर एका पडक्या वाड्यापाशी त्यांना विटा आणि दगडं दिसली. त्यांनी सायकल बाजूला लावली. तेवढ्यात तिथे एक पांढरा कुर्ता, धोतर घातलेले म्हातारे  आजोबा आले आणि त्यांना ओरडू लागले," अरे पोरांनो, इकडे काय करता ? हा वाडा झपाटलेला आहे. इथं भुतांच राज्य आहे. इकडे कोणी फिरकत नाही. कशाला उगाच पिडा मागे लावून घेता . निघा इथंन".
        भुताचं नाव ऐकल्यावर चौघांनीही पळ काढला. भीती वाटत असली तरी  त्यांना त्या वाड्याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. घरी आल्यावर मात्र त्यांनी त्या वाड्याबद्दल  चौकशी करायला सुरुवात केली. मोठ्या मुलांनी त्यांना सांगितलं की," काही वर्षांपूर्वी तिथे एक श्रीमंत कुटुंब रहात होते. एक दिवस अचानक सगळ्यांची कोणीतरी हत्या केली . का केली? कोणी केली ? त्याचा शोध अद्याप लागला नाही. तेव्हापासून तिथे जाणाऱ्यांना रात्रीचे चित्र विचित्र भास होतात.    तो वाडा कोणी विकत ही घेत नाही की तिथे कोणी रहायला येत नाही.  त्या कुटुंबातील लोकांचेच भूत तिथे कोणाला येवू देत नसावे. तो वाडा झपाटलेला आहे अशी इथल्या लोकांची खात्री आहे. तुम्ही सुद्धा चुकूनही तिकडे फिरकू नका." हे ऐकल्यावर त्यांनी ही तो विषय तिथेच सोडून दिला.
       दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा किल्ला बनवायला घेतला तेव्हा त्यांना त्या वाड्याची पुन्हा आठवण झाली. पिंटू बोलून गेलाच " दिवसाच्या उजेडात अंगणात पडलेल्या विटा आणायला काय हरकत आहे ." सोन्याला अजूनही त्या वाड्याची भीती वाटत होती. चंप्या त्या वाड्यापर्यंत यायला तयार होता पण फाटकाच्या आत जावून विटा आणायची त्याची तयारी नव्हती. शेवटी डिंकूने आणि पिंटूने आत जाऊन विटा आणायची जबाबदारी स्वीकारली . चौघही त्या वाड्यापाशी पोहचले . सोन्या आणि चंप्या बाहेरचं थांबले तर पिंटू आणि डिंकू विटा आणायला आत गेले . दोघांनी पोत्यात पाच सहा विटा भरल्या होत्या तेवढ्यातच कालचेच आजोबा हातात काठी घेवून ओरडत येतांना पिंटूला दिसले . त्याने डिंकूला," पळ" असं सांगुन धूम ठोकली. डिंकूला विटांचा मोह सोडता येईना त्याने विटांच पोत घेवून पाळायला सुरुवात केली. मागे बघत धावल्यामुळे त्याचा पाय कशात तरी अडकला आणि तो धपकन खाली पडला . तो उठायला गेला तर त्याच्या अंगाखाली त्याला इलेक्ट्रिकची  वायर दिसली. ती नीटपणे जमिनीत लपवल्यासारखी  दिसत होती. मागून आजोबा काठी घेवून येत असल्याने त्याने जास्त विचार न करता विटांच पोत तिथेच टाकून  पाळायला सुरुवात केली. डिंकूच्या कपड्यावरची माती बघून घरचे रागावतील म्हणून थोड्या दूर गेल्यावर ते एका झाडाखाली थांबले . कपडे झटकत असतांना डिंकूच्या डोक्यात मात्र त्याने बघितलेल्या त्या इलेक्ट्रिकच्या वायरचाच विचार सुरू होता. त्याने त्या बद्दल तिघांनाही सांगितलं तेव्हा तिघांनीही त्याची खिल्ली उडवली ," त्यांनी वाडा बांधला तेव्हाचीच असेल ,  त्यात येवढं विचार करण्यासारखं काही नाही" .  डिंकू मात्र त्याच्या मतावर ठाम होता कारण ती वायर काल परवाच त्याच्या बाबांनी आकशदिव्यासाठी   आणलेल्या वायर सारखीच नवी कोरी दिसत होती.  "जर वायर जुनी असती तर ती जुनाट दिसायला हवी होती आणि वायर नवी असेल तर ? भुताने झपाटलेल्या वाड्यात कोणीच रहात नाही मग ही नवीन वायर तिथे जमिनीत काय करते आहे? " त्याने तिघांना त्याच्या मनातला प्रश्न विचारलाच . त्यावर पिंटूलाही शंका आली की एरवी तिथे तर कोणीच जात  नाही मग  ते आजोबा  त्या वाड्याची रखवाली का करतात? त्यांनी परत जावून त्या वाड्याचं निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. सोन्या आणि चांप्याही मदतीला तयार होतेच .
            सकाळची वेळ असल्याने त्यांनी वाड्यापासून बऱ्याच दूर सायकली उभ्या केल्या आणि पायीच चालत गेले . दाट झाडीनी वेढलेल्या त्या वाड्याला तारेचेच कुंपण होते . वाड्याला सभोवती खूप मोठे आवार होते . एके काळी त्यात सुंदर बाग फुलत असेल याचा अंदाज सहज करता येत होता. वाडाही छोटाच पण टुमदार बांधलेला होता. कोणीच रहात नसल्याने जागो जागी झाडांची मूळ जावून  बऱ्याच ठिकाणी त्याची पडझड झाली होती. सगळीकडे  गवत वाढलेलं दिसत होतं. डिंकूने त्या गवताचं बारकाईने निरीक्षण केले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तारेच्या कुंपणापाशी गवताची उंची खूप आहे त्या मानाने आतल्या बाजूने , वाड्याच्या भोवतीचे गवत उंचीने फारच कमी आहे. पटकन् पाहिले तर जाणवणार नाही पण लक्ष देवून बघितले तर वाड्याच्या भोवतीचा वावर सोपा व्हावा म्हणून मुद्दाम कोणीतरी ते गवत  कापल्यासारखे दिसत होते.
पिंटूही विटा ठेवलेल्या अंगणाचे निरीक्षण करत होता . अंगणात, विटांच्या अवती भोवती तर गवत फार नव्हतेच जणू तिथे माणसांचा वावर असावा. चंप्याच्याही नजरेनं हेरल की विटाही म्हणाव्या तितक्या जुन्या दिसत नाहीत.
       सगळ्यांनी जेव्हा आपापली निरीक्षण सांगितली तेव्हा डिंकूने बघितलेले वायर नक्की जाते कुठे याचा शोध घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी छोटी योजना आखली.
           चंप्या आणि पिंटूने त्या आजोबांच्या पाळतीवर राहायचं. ते दिसले रे दिसले की जोरात शिट्टी वाजवायची . डिंकू आणि सोन्या त्या वायरपाशी जावून ती जाते कुठे याचा शोध घ्यायचा. लवकरात लवकर निरीक्षण आटपून परत यायचं .
             पिंटू आणि चंप्या वाड्याच्या जवळच असलेल्या दोन उंच झाडावर चढून बसले . आता त्यांना वाड्यावर नीट लक्ष ठेवता येणार होत. त्यांनी त्यांच्या जागा घेतल्यावर डिंकू आणि सोन्या त्या वायरचा शोध घ्यायला निघाले. सुदैवाने मागच्या वेळी डिंकूने पळतांना टाकलेले विटांचे पोते अजूनही तिथेच पडलेले होते. डिंकूने तो पडला होता त्या जमिनीवरून हात फिरवला आणि त्याच्या हाताला ती वायर लागली.  त्या वायर मधे विजेचा प्रवाह असला तर शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यावर उपाय म्हणून सोन्याने लगेच एक मोठी जाड जुड काडी हाती घेतली आणि त्या काठीच्या मदतीनेच वायरचा
  माग काढायला सुरुवात केली . ती वायर वाड्याच्या तळघराला जी खिडकी होती तिच्या आत जात होती. त्या खिडकीची काच जिथे फुटलेली होती तिथून डिंकूने आत काय आहे हे बघण्याचा प्रयत्न केला. त्या खोलीच्या कोपऱ्यात पाणी पिण्याचा माठ ठेवलेला होता . त्यावर पेलाही होता. जवळच एक चटई टाकलेली होती. भिंतीवरच्या हुकांना दोन तीन टी शर्ट लटकवलले होते.
      त्याच निरीक्षण सुरूच होतं तेवढ्यात शिट्टीचा आवाज आला आणि ते दोघेही कसलाही आवाज न करता माघारी फिरले.
          यावेळी ते आजोबांना दिसले नाही कारण आजोबा मागच्या अंगणातून बाहेर आले होते आणि ही दोघं पुढच्या अंगणात होती. आजोबा मागच्या अंगणात कसे आणि कुठून आले ते काही झाडावर बसून लक्ष देणाऱ्या पिंटूला कळले नाही पण सोन्या आणि डिंकू येईपर्यंत आजोबा मागच्याच अंगणातून वाड्याच्या कुंपणा बाहेर पडलेही येवढं त्याने बघितलं.
           काय घोळ आहे काही कळत नव्हतं पण भिंतीवर टांगलेल्या टी शर्ट वरून   त्या वाड्यात इतरही लोक राहतात याबद्दल डिंकूची खात्री पटली होती.
        जरी ते आजोबा तिथेच रहात असतील तरी त्यांनी आपल्याला विटा घेतांना बघून येवढं चिडण्याची काहीच गरज नव्हती. उलट त्यांनी स्वतःहुन  त्या विटा आपल्याला द्यायला हव्या होत्या. अनेक शंका , प्रश्न त्या चौघांच्या मनात येत होते .
पिंटू अजून झाडावरच होता . सोन्या कंटाळून सायकलकडे जायला निघाला तेव्हा त्याला दुरून तेच आजोबा हातात मोठी पिशवी घेऊन येतांना दिसले. आजोबांचे त्याच्याकडे लक्ष नव्हते . बहुतेक दूरच त्यांना नीट दिसत नसाव. सोन्या लगेच माघारी फिरला. तिघांनाही सावध केलं. पिंटू झाडावरच लपला तर तिघेही जवळच्याच झाडीत लपून बसले . आजोबांचं झाडाखालीच असलेल्या त्यांच्या सायकलिकडे ही लक्ष गेलं नाही . ते आपल्याच धुंदीत पुढे चालत गेले . डिंकूने तेवढ्यात ही त्यांच्या पिशवी वरचे " शिवसागर हॉटेल "  हे  नाव वाचले . आता वाड्यात जावून यापेक्षा जास्त शोध घेणं धोकादायक होत. म्हणून त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला.
घरी जाण्याच्या रस्त्यावरच 'शिवसागर हॉटेल ' होत. डिंकूला त्या हॉटेल मधे जावून चौकशी करण्याची इच्छा झाली. चौकशी करण्यात जर हॉटेल मालकाला शंका आली तरी घोटाळा होवून त्या वाड्यात राहणारी लोकं सावध झाली असती. त्यावर उपाय म्हणून चंप्याने सकाळीच आईने आगरबत्तीचा पुडा आणायला म्हणून दिलेली स्वतः जवळची ५० रुपयाची नोट काढली आणि  सुचवलं की ," चौकशी करण्यापेक्षा आपल्याला त्या आजोबांच्या हातातले खाली पडलेले हे ५० रुपये  परत करायचे आहेत असं सांगू".  हि कल्पना सगळ्यांनाच आवडली. ठरल्या प्रमाणे ते आत गेले . काउंटर वर बसलेल्या माणसाला विचारलं ," आता एक आजोबा इथून पार्सल घेवून गेले ते कुठे भेटतील? " त्यावर तो माणूस म्हणाला," तुमचं त्यांच्याकडे काय काम आहे? " त्यावर सोन्या म्हणाला ," मघाशी त्यांच्या हातातून  हे ५० रुपये खाली पडलेल तेच परत द्यायचे आहेत त्यांना ". त्यावर तो माणूस जरा वैतागुनच बोलला," ते आजोबा?? .....  .. जे रोज चार जणांच दोन वेळच जेवण पार्सल नेतात ते ??? तुम्हाला नक्की तेच हवे आहेत का??  ते कुठून येतात काय माहित नाही.  ते कधीच फार  बोलत नाही . आले की ठरलेलं पार्सल घेतात आणि निघून जातात  " यावर चौघांनी एकमेकांकडे सूचक नजरेनं बघितलं . पिंटू म्हणाला ," आता हे पैसे त्यांना परत कसे करायचे ? " त्यावर तो माणूस म्हणाला ," पैसे परत द्यायचेच असले तर उद्या याच वेळी इथे या , इथेच भेटतील ते तुम्हाला " .
चौघांनीही त्या माणसाचे आभार मानले आणि त्या हॉटेल मधून बाहेर पडले.
       मिळालेली माहिती पुरेशी नव्हती पण शंका येण्यासारखीच होती. भुकेची वेळ होवून गेली होती आणि सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे चौघांनीही आता कडकडून भूक लागली होती . कशाचाही विचार न करता त्यांनी घरची वाट धरली.
 घरी उशिरा गेल्यामुळे चौघांनाही ओरडा खावा लागला. जेवल्यावर सुट्टीचा गृहपाठ करण्याच्या निमित्ताने  चौघं  पुन्हा एकत्र जमलीच. पिंटूच्या घरी सगळे जमले होते आणि पिंटूचा मामा त्यांना गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करत होता.
किल्ला बनवण्यावरच लक्ष तर केव्हाच उडून गेलं होत. आता तर त्यांचं आभ्यासातही लक्ष लागत नव्हतं.  डोक्यात फक्त त्या वाड्याचेच विचार सुरू होते.
 त्यांचं गृहपाठ करण्यात मुळीच लक्ष नाही हे मामाच्या चटकन् लक्षात आलं. त्याने खूपदा विचारल्यावर चौघांनाही रहावलं नाही . मामाकडून मदत करण्याचं वचन घेतल्यावरच त्यांनी सगळी हकीकत मामला सांगितली. ती माहिती ऐकुन मामालाही शंका आली. त्याने "आपण हे सगळं पोलिसांना सांगायला हवं . जे काही असेल ते शोधण्याचं काम त्यांचं आहे. तुमचे वय बघता यात तुम्ही जास्त सहभाग घेणं धोक्याचाच आहे" असं समजावून सांगितलं.
         त्यांना अभ्यासाला बसवून मामा मात्र घराबाहेर पडला. घरा जवळच्याच चौकीत त्याचा मित्र पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काल परवाच रुजू झाला होता. त्याच्या भेटीच निमित्त करून मामा चौकीत गेला आणि बोलता बोलता मुलांनी सांगितलेली हकीकत त्यालाही सांगितली. त्याच्या मित्रालाही अनेक प्रश्न पडले पण त्या सगळ्यांची उत्तर त्या वाड्यातच मिळणार होती म्हणून या प्रकरणाचा छडा लावण्याच त्याने मामाजवळ कबुल केलं.
          मामा आणि त्याचा पोलीस मित्र त्या वाड्यात नक्की काय चालतं हे शोधून घेतील याची खात्री असल्याने पोरांनीही पुन्हा तो विषय काढला नाही.
       चारच दिवसात मामाचा पोलीस मित्र पिंटूच्या घरी मोठा तयार किल्ला, त्यावर ठेवायचे मावळे आणि इतर  सजवायचे सामान घेवून हजर झाला . सोबत चॉकलेट्स चा मोठा डबाही आणला होता. सोन्या, चंप्या आणि डिंकूच्या आई वडिलांनाही पिंटूच्या  घरी बोलावून घेतले.
        सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तेव्हा त्याने सांगायला सुरुवात केली," मामाने सांगितल्यावर आम्ही लगेच साध्या कपड्यातला एक हवालदार त्या वाड्याच्या पाळतीवर ठेवला. एरवी दिवसा लक्षात येणार नाही पण पाळत ठेवल्यामुळे रात्रीच्या वेळी तिथे संशयास्पद हालचाली जाणवल्या.
दुसऱ्या दिवशी  त्या आजोबांवर लक्ष ठेवलं ," तर त्यांनी बाजारात बरीच खरेदी केली .  शिव सागर हॉटेल वाल्याला ही बिलासाठी  २००० ची नोट दिली. तेव्हा या गरीब दिसणाऱ्या म्हाताऱ्या कडे येवढे पैसे आले कुठून? याची शंका आली. आम्ही त्याचा पाठलाग केला तर वाड्याच्या मागच्या भागात एक भुयारी रस्ता सापडला . वाड्याच्या तळघरात ते रात्रीचे झोपतात आणि दिवसा त्या तळघराखालीच त्यांनी नकली नोटा छापण्याचा छोटासा कारखाना चालवतात. पावसाळ्यात त्या खोलीला खूप ओल येवुन छापलेल्या नोटा खराब होत होत्या म्हणून त्यांनी त्या खोली च्या भितींना विटा आणि सिमेंटने पक्क केलं होतं. म्हणूनच चंप्याला जाणवलं त्याप्रमाणे विटा फार जुन्या नव्हत्या.
  त्या खोलीला एकही खिडकी नाही म्हणून त्या खोलीत उजेडाची आणि हवेची सोय करता यावी यासाठी त्यांनी डिंकूला दिसलेली इलेक्ट्रिकची वायर घेतली होती . आठ दिवसा पूर्वीच्या पावसात  जुनी वायर तुटली म्हणून   तिथे नवीन वायर टाकली होती आणि नेमकी त्या वायरच नवे पणच डिंकूने हेरल होत आणि सोन्याने हातात काठी घेतली तेही उत्तम केलं कारण तिच्यात विद्युत प्रवाह सुरू होताच.
पिंटू ला जाणवलं तस  अंगणातली विटांच्या अवती भवती गवत नव्हतं कारण रात्रीच्या वेळी हवेशीर बसण्यासाठी , पाय मोकळे करण्यासाठी त्याच जागेचा वापर केला जात होता.
चौघांनी हिंमत दाखवून जी माहिती मिळवली आणि आम्हाला दिली त्यामुळेच आम्ही अनेक दिवस झाले ज्या कुख्यात गुन्हेगारांना शोधत होतो ती चौघही त्या वाड्याच्या तळघरात नकली नोटा छापताना आम्ही रंगे हाथ पकडू शकलो. मुख्य म्हणजे याच गुन्हेगारांनी काही वर्षांपूर्वी याच वाड्यावर दरोडा टाकला होता. त्यातच त्या घरातल्या सगळ्यांची हत्या केली होती. तेव्हाही ते आमच्या हाती लागले नव्हते आणि गेली चार वर्षे तर ते याच वाड्यात लपून बसले होते. पोलिस त्यांचा शोध त्यांनी दरोडा टाकलेल्या वाड्यात घेणार नाही अशी त्यांची खात्री होती. ती बऱ्याच अंशी खरी ही निघाली. तिथे हत्या झाल्यामुळे कोणीच रहायला येत नव्हतं याचाच फायदा या गुन्हेगारांनी करून घेतला .  बाहेरची काम करण्यासाठी आणि हा वाडा झपाटलेला आहे हे येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगण्यासाठी च त्या आजोबांना त्यांनी ठेवून घेतल होत. इत का मोठा गुन्हा केवळ  या चौघांच्या बहादुरिनेच उघडकीस आला म्हणूनच मुलांसाठी ही छोटीशी प्रेमाची आणि कौतुकाची भेट . हा किल्ला आणि चॉकलेट्स खास तुमच्यासाठी  " म्हणत त्याने आणलेलं बक्षिस मुलांना दिले. " एवढंच नाही तर यावर्षी २६ जानेवारीला या चौघांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल आमच्या डिपार्टमेंट तर्फे त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. त्यांच्या या किल्ला बनवण्याच्या धडपडीची कथा ऐकून डिपार्टमेंट मधे तर या चौघांना ' धाडसी किल्लेदार' असच सगळे म्हणतात आहे  " असं म्हणून त्यांनी त्या सत्कारा संबधीच एक एक  पत्र चौघांच्याही आई वडिलांना दिलं.
आई वडिलांना तर आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मुलांचा आणि त्यांच्या मित्रांचा अभिमानही वाटला. यंदा भारी किल्ला बनवता आला नाही म्हणून चौघं जरा नाराजच  होती पण आता कळलेल्या माहितीने त्यांचे चेहरे उजळून निघाले.
तयार किल्ला सजवून का होईना यंदाची त्यांची दिवाळी नेहमीपेक्षा ही दणक्यात साजरी झाली. किल्ला बनवण्याच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यात एका धाडसाने प्रवेश केला होता. म्हणूनच त्या चौघांना "धाडसी किल्लेदार " अशी नवीन ओळख मिळाली होती.
©️ Anjali Minanath Dhaske(Elgire)
सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 

( सदर कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधिन आहेत. लेखिकीच्या नावासहितच कथा शेयर केली जावी)

टिपः ही कथा आवडल्यास शेअर करतांना नावासहितच करावी.
इतर लिखाण आणि रांगोळ्या ' आशयघन रांगोळी ' या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे.
 anjali-rangoli.blogspot.com ही ब्लॉग ची लिंक आहे.
   
कामिनी (भाग १)

  • #कामिनी

#भाग१
©️अंजली मीनानाथ धस्के

    श्रेया मुंबईत पोस्ट ऑफिसमध्ये  नोकरी करत होती. हेड पोस्ट मास्टर म्हणून बढती मिळाली आणि सोबतच तिची बदली करण्यात आली. तिला ताबडतोब रत्नागिरी जवळच हुंडाळवाडी गावातल्या पोस्ट ऑफिसमधे रुजू व्हाव लागलं. आठवडा कसाबसा पैंगेस्ट म्हणून काढला पण तिला स्वतःच स्वतंत्र घर हवं होतं.
       मनासारखं घर मिळत नसल्याने तिची शोधा शोध सुरू होती. सुट्टीच्या दिवशी असाच शोध घेत असताना एक घर   रिकामं असल्याचं तिला कळलं . ती तडक मिळालेल्या पत्यावर गेली. घर कसलं तो प्रशस्त  पण जुनाट पद्धतीचा बंगलाच होता.   घराची  देखभाल करणारे सामंत कुटुंब बंगल्या  शेजारीच बांधलेल्या छोट्या खोल्यांमध्ये रहात होते.
          घराचं भाडही श्रेयाला परवडणार होतं. घर मोठं असल्याने आईबाबा , दादा वहिनी यांनाही काही दिवस येवुन निवांत रहाता येणार म्हणून तिने लगेच त्या सामंत कुटुंबाला घर भाड्याची आगावू रक्कम दिली. काही सूचनाही केल्या.
     ठरल्या प्रमाणे ठरल्या दिवशी ती सामान घेवून त्या घरात राहण्यासाठी आली. सामंत काका काकू वयस्कर असले तरी बोलायला एकदम मोकळे असल्याने एकट्याने रहाताना तिला त्यांचा आधार वाटला.
    सगळा दिवस सामान लावण्यात गेला. सामान जागच्या जागी लागलं आणि काकू गरमा गरम जेवण घेवून आल्या . त्यांच्या हाताची चव चाखताच रोज त्यांनाच जेवण बनवायला सांगायचं हे श्रेयाने मनोमन ठरवून ही टाकलं. काकूंनी सगळं आवरलं. श्रेयाला रात्रीतून काही हवं  असल्यास इंटर कोम फोन वरून  कळवण्याची सूचना देवून त्या आपल्या खोलीकडे निघून गेल्या.
     दिवसभराचा थकवा , पोटभर जेवण आणि मंद गार वारा तिला दिवाणखान्यात असलेल्या आराम खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागली.
  ठक ठक ठक ठक असा  आवाज आल्याने ती दचकून जागी झाली.
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग २)

#कामिनी
#भाग२
©️अंजली मीनानाथ धस्के

      आवाजाच्या दिशेने शोध घेत ती दिवाणखान्यातून घराच्या छताकडे जाणाऱ्या आतल्या बाजूच्या जिन्यापर्यंत आली.
कोणीतरी घराच्या गच्चीवर असलेलं दार वाजवल्या सारखा आवाज येत होता. आजच तर ती रहायला आली मग येवढ्या रात्री कोण आलं असेल? तेही घराच्या गच्चीवर असलेला दरवाजा का वाजवत असेल?  या विचाराने ती घाबरली . तिला काकूंच्या बोलण्याची आठवण झाली. तिने काकूंना फोन करून तातडीने बोलावलं. काका ही आले. सगळीकडे शोधाशोध घेवूनही कोणी आलं होतं अशा खुणा सापडल्या नाहीत.
      श्रेयाला मात्र खात्री होती की ठक ठक ठक आवाज घराच्या छतावरून आला होता. तिची ती अवस्था बघून काकू तिच्या खोलीत तिला सोबत म्हणून झोपायला तयार झाल्या.
त्यानंतर त्या रात्री  मात्र तो आवाज पुन्हा आला नाही.
          सकाळी पक्षांच्या चिवचिवाटाने श्रेयाला जाग आली. काकू तिच्यासाठी मस्त चहा घेवून आल्या. चहाचा कप घेवून बागेकडे जाता जाता दिवाणखान्यात असलेल्या जिन्याकडे तिचं लक्ष गेलं. रात्रीचा प्रकार आठवून ती छताकडे जायला निघाली. वर मस्त सूर्याची सोनेरी किरणे पसरलेली होती. चहाचा घोट घेत घेत सगळीकडे ती शोधक नजरेने बघत होती. याच छताला मागच्या बाजूला सामंत कुटुंबाच्या खोलीकडे जाणारा लोखंडी जिना ही होता. आणि या जीन्या शेजारीच घराच्या छता वर एक फार छोटी खोली होती. खोलीला बाहेरून कडी लावली होती. श्रेया कडी उघडायला जाणार इतक्यात घरातल्या जिन्यावरून काकू वर आल्या . श्रेयाला त्या छोट्या खोलीपाशी बघून तिला सांगून गेल्या ," काही नाही त्यात... अडगळीच्या सामानाची खोली आहे"
त्यांचं वाक्य कानावर येईपर्यंत श्रेयाने त्या खोलीचा दरवाजा उघडला ही होता . आत नुसती धूळ, जाळे , जुनं सामान  ठेवलेलं होतं.
क्रमशः

#भाग१
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग ३)

#कामिनी
#भाग३
©️अंजली मीनानाथ धस्के
    त्या पसाऱ्यात एक कुलूप बंद पेटी होती . तिला अनेक ठिकाणी पोचे आले होते. पण हे पोचे बाहेरून बसलेल्या माराने आलेले नव्हते तर आतून कोणीतरी सर्व शक्तिनिशी मारल्यावर जसे फुगवटे येतील तसे ते दिसत होते. काकुही तिच्या मागोमाग त्या खोलीत आल्या.  त्या पेटीकडे आश्चर्याने बघत ओरडल्याच ," काल परवाच  मी माझ्या हाताने ही पेटी उचलून ठेवली होती . तेव्हा तर एकदम चांगली होती. ही खाली कशी पडली आणि खराब कशी झाली ?"
श्रेयाने उत्सुकतेपोटी विचारलं ," कोणाची आहे ही पेटी ?"
काकू सांगू लागल्या ," तुमच्या आधी इथे कामिनी ताई होत्या रहायला. या पेटीत त्याच त्यांचं  काही सामान भरून ठेवायच्या. त्या  अचानक इथून गेल्या. त्याचं सगळं सामान तर त्यांच्या वडिलांनी नेले आहे. घाईत असल्याने पेटी तेव्हा त्यांना दिसली नसेल. विसरून  इथेच राहिली . तुम्ही येणार म्हणून  घराची  आवराआवर करतांना शिडी  घेण्यासाठी काका माळावर चढले तेव्हा तिथे ही पेटी ठेवलेली दिसली.
     या पेटीला कुलूप आहे. घरात चावीही सापडली नाही.  तुमचं सामान येणार आहे म्हंटल्यावर मीच ही पेटी इथे आणून या कपाटावर उचलून ठेवली होती. कामिनी ताई आल्या कधी तर त्यांना देता येईल ना.... ही  पेटी खाली पडली त्याचाच रात्री आवाज झाला होता रात्री  म्हणूनच कोणी दिसलं नाही आपल्याला."
     तिच्या वरच्या पोच्यानी ती पेटी खराब झाली होती तरी
  श्रेया त्या पेटी कडे ओढल्या गेली. काही कळायच्या आत तिने जवळच्या लोखंडी दांडूने पेटीवरच कुलूप तोडल.
आत काही पुस्तकं, काही भेट वस्तू , भेट कार्ड आणि काही पत्र होती. पेटीच्या एका कोपऱ्यात एक छोटी स्प्रिंग ची बाहुली होती. बाहुलीच्या पायात छोटे छोटे घुंगरू बांधलेले होते.
        खूपच नाजूक , सुंदर अशी ती बाहुली होती. श्रेयाने ती बाहुली उचलून घेतली तस काकू बोलून गेल्या ," कामिनी ताईंना ही बाहुली खूप आवडायची . ही कायम दिवाणखान्यातल्या  टेबलावर ठेवलेली असायची. जाता येता त्या हिला टिचकी मारून डुलायला लावायच्या . त्यांना कथक नृत्य आवडायचं म्हणून हिलाही त्यांनी तसेच कपडे घातले . पायात पैजण घातले. हिला नटवायची भारी हौस होती त्यांना . त्या अचानक निघून गेल्या त्या दिवसापासून ही बाहुली दिसली नाही . मला वाटलं की त्यांनी सोबत नेली त्यांच्या पण ही तर या पेटीत कुलूप बंद होती. ठेवून द्या तिला परत . ही इथे कुलूप बंद आहे म्हणजे त्या नक्की येतील हे सामान घ्यायला."
         श्रेयाही त्या बाहुलीच्या प्रेमात पडली होती. पण दुसऱ्याची वस्तू त्याच्या माघारी घ्यायला तिचं मन धाजावल नाही.  ती बाहुली परत ठेवून पेटी बंद करून जिथे होती तिथे ठेवून त्या दोघीही खोलीचं दार लावून घेत खाली आल्या.
      श्रेया रोजच्या कामाला लागली. तयार होवून ऑफिसलाही गेली.
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग ४)

#कामिनी
#भाग४
©️अंजली मीनानाथ धस्के
     दिवसभरात ती त्या बाहुलीला विसरूनही गेली.
नवीन जागा , नवीन कार्यालय, कामाचा व्याप हे समजून घेण्यातच तिचे काही दिवस गेले. त्यात तिला डिपार्टमेंटल परिक्षेचा अभ्यास करायचा होता तेही राहून गेलं.
‌ आज तिला जरा  निवांत वेळ मिळाला होता.
 संध्याकाळी काकू स्वयंपाक करत गप्पा मारत होत्या . श्रेयाही  दिवाणखान्यातल्या जेवणाच्या टेबला जवळ बसून त्यांच्या गप्पा ऐकत  कॉफी पीत निवांत बसली होती.
 बोलता बोलता त्या सहज बोलून गेल्या ," ताई तुम्ही बसल्या आहात न तिथे शेजारीच ते कपाट आहे ना छोट त्यावरच  ती स्प्रिंगची बाहुली कायम ठेवलेली असायची. दारातून हलकीच हवा आली तरी ती मस्त डूलायची" त्यांनी तस बोलतच दिवाणखान्यात हवेची झुळूक आली आणि श्रेयाच्या अंगावर काटा आला. ती काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्याकडे बघून काकूंनी विचारलं ,"
  आज रात्रीही मी येवू का सोबतीला " त्यावर श्रेया  नेहमीप्रमाणे बोलली ," नाही .... राहीन मी एकटी. गरज वाटली तर बोलावून घेईन "
           सगळं आवरून काकू खोलीकडे जायला निघाल्या . श्रेयाची काळजी वाटून त्या दारातच थबकल्या . वळून श्रेयाकडे पाहिलं तर ती टीव्ही वरचा कार्यक्रम बघण्यात गुंग होती. गरज लागलीच तर ती फोन करेल असं वाटून त्या तिला," उद्या सकाळी येते ग " सांगून निघून गेल्या.
          टीव्ही वरचा कार्यक्रम संपला . तिने जेवण ही केलं. जेवल्यावर जरा पाय मोकळे करावे म्हणून ती समोरच्या अंगणात फिरायला गेली. श्रेयाला बाहेरची  दाट झाडी दिवसा बघायला छान वाटायची पण रात्री हिच झाडं अंधारात भीतीदायक वाटू लागली. ती माघारी फिरणार इतक्यात  बंगल्याच्या फटकाजवळ काका बसलेले तिला दिसले . तिला धीर वाटला. ती त्यांच्या जवळ चालत गेली." काही हवंय का?" म्हणून काकांनी तिची चौकशी केली. "इतक्या उशिरापर्यंत तुम्ही फटकाजवळ का बसले आहात" असं श्रेया ने त्यांना विचारलं तेव्हा ते बोलले , " मी रोज रात्री इथेच बसून असतो . अधून मधून बंगल्याभोवती चक्कर ही मारतो. हा बंगला मध्यवस्तीत असला तरी बंगल्या भोवतीच्या दाट झाडीने जरा एकटा पडल्यासारखा आहे. मालक रहात होते तेव्हापासून चोरांची भीती नको म्हणून मी फटकाजवळ बसून रात्र पाळी करतो आहे. आता तर इतकी सवय झाली आहे या कामाची की खोलीत झोपायला गेलो तरी झोप येत नाही. रात्रीचा मी जागीच असतो म्हणून इतक्या वर्षात इकडे चोर कधी फिरकले नाही." बोलता बोलता ते सहज बोलून गेले," काकूंनी सांगितलं मला अडगळीच्या खोलीत पेटी खाली पडली म्हणून काल तुम्हाला आवाज आला होता. उंदीर, नाहीतर मांजर खुड बुड करत असतील म्हणून खाली पडली असेल ती पेटी . आज त्या खोलीत छोटा लाईट लावून आलोय . उजेड बघून उंदीर किंवा मांजर नाही येणार . तुम्ही बीनघोर झोपा".
      त्यांनी वरच्या अडगळीच्या खोलीत छोटा लाईट लावला हे ऐकुन श्रेयाच लक्ष वरच्या खोलीकडे गेलं. फटकापाशी उभं राहीलं की वरची खोली स्पष्ट दिसत होती. त्या खोलीला छोटी काचेची खिडकी होती. तिच्यातून मंद प्रकाश बाहेर पडलेला श्रेयाला दिसला. तिच्या डोळ्याची पापणी लवते न लवते तिथल्या छोट्या लाईटाचा उजेड दिसेनासा झाला. श्रेयाने  काकांना तसं सांगितलं . त्यांनीही बघितलं तर तिथे अंधार होता. "आता तर थोड्या वेळापूर्वी  लाईट सुरू होता आता अंधार कसा झाला?" म्हणून त्यांनाही आश्चर्य वाटलं. जुनी वायरिंग असल्याने लूज कनेक्शन झालं असावं असं वाटून ते त्या खोलीकडे कडे जायला निघाले.
     काकांचं वय बघता श्रेयानी  त्यांना रात्रीच्या अंधारात त्या खोलीकडे जाण्यापासून रोखले," इतक्या अंधारात कशाला जाताय.  तसंही तिथे अंधार असला तरी आपलं काही अडत नाही. उद्या एका चांगल्या इलेक्ट्रिशियनला बोलावून ते काम करून घ्या. आता राहू द्या "
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग ५)

#कामिनी
#भाग५
©️अंजली मीनानाथ धस्के

    श्रेया तसं बोलली म्हणून काका माघारी फिरले. जागेवर बसता बसता ते बोलून गेले" कामिनी ताईही अगदी असच काळजीने बोलायच्या ".
              कामिनी ताई हे नाव ऐकताच श्रेयाला पेटीतल्या बाहुलीची आठवण झाली. तिची नजर त्या वरच्या अंधाऱ्या खोलीवर गेली आणि अंगावर सरसरून काटा आला.
               सकाळी लवकर उठून तिला डिपार्टमेंटल  परिक्षेचा अभ्यास ही करायचा होता.  काकांचा निरोप घेऊन ती माघारी परतली. काका जागीच असतात याची जाणीव होवून तिच्यातली भीती थोडी कमी झाली. ती  गाढ झोपली होती.
         तिला तहान लागली म्हणून ती उठली. खोलीत पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा ती विसरली होती म्हणून पलंगावरून उठून स्वयंपाक खोलीत गेली. पाण्याचा पेला भरला आणि पाणी पिणार इतक्यात बारीकसा  छन छन आवाज तिच्या कानावर पडला. आवाज स्वयंपाक खोलीच्या उघड्या खिडकीतून येत होता. नीट बघता यावं म्हणून ती  आवाजाच्या दिशेने खिडकीकडे थोडी सरकली. डोळे बारीक करत बघू लागली.  शोधत बघत असतांना तिला अचानक ती छोटी स्प्रिंगची बाहुली मागच्या  जिण्याकडे  चालत जातेय असं दिसलं. तिला दरदरून घाम फुटला.
            तेवढ्यात पहाटे चारचा गजर झाला. ती दचकून जागी झाली. पलंगाजवळच असलेले खोलीतल्या दिव्याचे बटण दाबले. त्या प्रकशात तिची नजर खोलीभर फिरली. टेबलावर ठेवलेल्या तांब्यातलं पाणी पिल्यावर तिला जरा बरं वाटलं. तहान लागल्यामुळे असं स्वप्न पडले असावे असा तिने अंदाज बांधला. फ्रेश होवून ती अभ्यासाला बसली.
         काकूही सहाला तिच्यासाठी चहा घेवून आल्या. सकाळच्या कामात तिला स्वप्नाचा विसर पडला. ऑफिसमधे गेल्यावर  पत्रांच वर्गीकरण करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा संवाद तिच्या कानी पडला. संवादात विशेष काहीच नव्हतं पण नकळत ती त्या संवादाकडे आकर्षित झाली. तिने संवादात भाग घेत विचारलं ," काय झालं ? कशावर चर्चा सुरू आहे"
तसे ते दोघे उत्तरले ," काही नाही हो मॅडम , या चिठ्ठीला तिकीट नाही म्हणून आम्ही रोज ही चिठ्ठी बाजूला काढून ठेवतो. पण रोज ही चिठ्ठी अमरावतीला पाठवायच्या पत्रांच्या गठ्यात कोणीतरी ठेवत. डोक्याला ताप आहे नुसता. कोणीतरी खोडी काढताय आमची".
      त्यावर श्रेया म्हणाली ," काय पत्ता आहे चिठ्ठीवर ?"
त्यांनी लगेच वाचून दाखवलं ," सदाशिव खरात, ४७, कणक वाडी , वलगाव ,  अमरावती"
श्रेया सहज म्हणाली ," मी देते तिकिटाचे पैसे , तिकीट लावून चिठ्ठी पाठवून द्या . गरजू असेल कोणी , नसेल जमलं तिकीट लावायला. "
तिने तिकिटाचे पैसे दिले आणि आपल्या रोजच्या कामाला लागली.

क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग ६)

#कामिनी
#भाग६
©️अंजली मीनानाथ धस्के
      ती हा प्रसंगही कामाच्या व्यापात विसरून गेली.
     अभ्यास करायचा म्हणून  जरा लवकरच ती घरी परतली. काकूंनी तिच्यासाठी गरम गरम भजी आणि चहा बनवला. तो बेत बघून  श्रेयाच्या मनातले अभ्यासाचे विचार मागे पडले आणि तिने बंगल्याच्या छतावर निवांत बसून भजी आणि चहाचा आस्वाद घेण्याचं जाहीर केले.
काकूंनी सगळी तयारी करून दिली. बागेतल्या झाडांना पाणी देण्यासाठी म्हणून त्या खाली आल्या.
श्रेया मावळतीच्या सूर्याला बघून मस्त मोकळ्या हवेत चहा घेत होती. फिरता फिरता ती मागच्या लोखंडी जिण्याकडे गेली. मागच्या बागेतली गुलाबांची फुले बघून ती पायऱ्या उतरत खाली येतच होती इतक्यात तिच्या पायाखाली काहीतरी आलं. कड् कड् असा बारीकसा आवाज झाला.  तिने दचकून बघितलं तर ..... स्प्रिंगची बाहुली.  बाहुलीच डोकं तुटलं होतं. शरीराला ठीक ठिकाणी चिरा गेल्या होत्या. चेहराही विद्रूप दिसू लागला. भीतीने तिच्या हातातला कप खाली फरशीवर पडला. खळकन... कप फुटल्याचा आवाज झाला त्या आवाजाने काकू तिच्याकडे  धावतच आल्या.
         त्यांनाही त्या बाहुलीला बघून आश्चर्य वाटलं. काकांना बोलावून ,' तुम्ही ही बाहुली इथे ठेवली का?' म्हणून विचारले असता त्यांना याची काहीच कल्पना नाही अशी कबुली त्यांनी दिली.
   बाहुली खोलीच्या... मुख्य म्हणजे  पेटीच्या बाहेर कशी आली?? मांजरीने आणली असेल असं वाटून ते सगळे खोलीकडे गेले तर खोलीचं दार बाहेरून लावलेले होते. खोलीची छोटी खिडकी ही बंद होती. बाहेर तिन्ही सांजेचा अंधार दाटून आला. तेवढ्यात खोलीतला छोटा दिवा आपोआप लागला. तसे तिघेही दचकले.
  काकांनी दोघींना समजावलं," इथली वायरिंग जुनी आहे. काल लाईट आपोआप विझला तसाच तो आज आपोआप लागला " लाईटाच बटण दाखवत अधिक खुलासा केला," लाईट बंद झाल्याने इथलं बटण बंद करायला  मी विसरूनच गेलो होतो. हे बघा बटण सुरूच राहिलं आहे".
        मनाची समजूत काढत तिघे बाहुली जवळ आले.
रात्रीच स्वप्न आठवून श्रेयाच्या मनात एकच गोंधळ माजला. खरंच रात्री ही बाहुली जिण्याकडे जात होती का? कारण तुटलेल्या अवस्थेतही ती बाहुली पायऱ्या चढत असल्यासारखी वाटतं होती. पण ते तर स्वप्न होत खरं कसं असेल ? थंड हवेची झुळूक तिला स्पर्शून गेली. घामाने भिजलेल्या तिच्या शरीरावर शिरशिरी आली. ती भीतीने थर थर कापू लागली.
   काकूंनी सगळे तुकडे गोळा करायला सुरवात केली. काका श्रेयाची समजूत काढण्यासाठी म्हणाले," उंदराने तोंडात धरून बाहुलीला बाहेर आणली असेल आणि मांजरीला बघून इथेच टाकून दुसरीकडे पळून गेला असेल. काही भीती मनात बाळगू नको . बस बरं या खुर्चीत जरा वेळ"
 काकूंनी सगळे तुकडे सुपलीत भरून कचरा कुंडीत टाकले.
त्याही समजुतीच्या सुरात बोलल्या ," होत अस कधी कधी .... उद्याच्या उद्या वरच्या दिव्याच काम करून घेवू आणि  उंदरांच औषधही मरून घेवू. काळजी नको करूस "
        श्रेयाला एकदम आईची आठवण झाली. तिला अशी भीती वाटली की आई तुळशी जवळ दिवा लावून . तिची नजर काढायची. श्रेया तडक घरात गेली.  देवाजवळ  दिवा लावला. आई म्हणायची तशी रामरक्षा म्हणायला लागली.
           देवाजवळच्या दिव्याला बघून श्रेयाला  खूप बरं वाटलं.

क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित शेयर करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग ७)

#कामिनी
#भाग७
©️अंजली मीनानाथ धस्के

     रात्री तिच्या सोबतीला काकू थांबल्या. कामिनीच्या डोक्यात विचार सुरूच होता.... कोणालाही न सांगता एकाएक कामिनी बंगल्यातून निघून का गेली ? तिच्या जाण्याचं गूढ आपल्यासाठी कायमच आहे इतक्यात तिच्या आवडीच्या या बहुलीच गूढ निर्माण झालं आहे. या विचारातच काकूंना शांत झोपलेलं बघून त्यांच्या आधार वाटून तीही झोपी गेली.
        काका बंगल्याबाहेर फटकापाशी बसून विचारात मग्न झाले होते. इतक्यात त्यांच्या कानावर खड खड खड खड असा आवाज गेला. आवाजाच्या दिशेने त्यांनी टॉर्चचा उजेड टाकला . कचऱ्याची मोठी टोपली जोरजोरात हलत होती. मांजर नाहीतर कुत्रा असेल म्हणून काका कचऱ्याच्या टोपलीजवळ गेले . तिच्यावर गच्च झाकण बसवलेलं होतं. काकांनी जोर लावून झाकण उघडलं तशी आतून एका काळ्या मांजराने त्याच्या अंगावर उडी मारली.  काका घाबरून मागे पडले.
थोड्या वेळाने काका कपडे झटकत उठले आणि गालातल्या गालात हसत बोलले ," श्या .... एका काळ्या मांजरीला घाबरलो आपण "
खाण्याच्या शोधत मांजर कचऱ्याच्या टोपलीत पडली असावी, असा समज करून घेत ते फाटकाकडे परत गेले.
             नेहमीप्रमाणेच सकाळ झाल्यावर सगळ्यांची कामाची घाई सुरू झाली. श्रेयाही जरा लवकरच आवरून कामावर जायला तयार झाली. नाष्टा संपवता संपवता पेपर चाळत असताना तिचं लक्ष एका बातमीने वेधून घेतले.
शेजारच्या गावात काही महिन्या पूर्वीच रहायला आलेल्या  कुटुंबातील एका युवकाचा  भयानक आणि गूढ पद्धतीने खून करण्यात आला होता.  त्या तरुणाचे  लग्न पंधरा दिवसांवर आले होते.  नेमकी घरातले इतर सदस्य लग्नाच्याच कामानिमित्त बाहेरगावी गेले असतांनाच हा दुर्दैवी प्रकार घडला होता.
           तो गाढ झोपेत असतांना  कुदळीचे घाव घालत त्याचा खून करण्यात आला होता. चेहऱ्यावरही इतके घाव घातले होते की चेहरा विद्रूप झालेला होता. आश्चर्याची बाब म्हणजे त्या तरुणाच्या रक्ताच्या थारोळ्यात खूपच छोटे छोटे घुंगरू सापडले. हे घुंगरू नेमके कशाचे आहेत?  याचा शोध घेणे सुरू आहे.  लग्न घर असल्याने घरात पैसा , दागिने , भारी कपडे सगळंच सामान भरपूर असूनही एकही वस्तू चोरीला गेलेली नव्हती. त्यामुळे खून कोणी ? कसा ? आणि का केला हे प्रश्न अनुत्तरितच होते. गावातील काही लोकांची जमीन त्या तरुणाने बळकावली होती. त्या वादातून हे घडले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. नेमके काय झाले असावे या बद्दल तक्र वितर्क सुरू आहे पण सत्य काय आहे याचा अंदाज करणे अद्याप तरी शक्य झाले नाही.
       या बातमीने तिच्या मनातले विचार मागे पडले. पैशासाठी माणूस राक्षसा सारखे कृत्य करायला मागे पुढे पहात नाही. ऐन लग्नाच्या पंधरा दिवस आधी कोणासोबत इतकं वाईट कसं घडू शकतं. असे वाटून तिचं मन अधिकच खिन्न झाल.
या विचारां पासून दूर जाण्यासाठी   कामावर लवकर जाणे हा एकच उपाय आहे असे वाटून ती पट्कन कार्यालयाकडे रवाना झाली.
         कचऱ्याची गाडी आली. काकांनी नेहमीप्रमाणे त्या गाडीत कचऱ्याची मोठी टोपली रिकामी करण्यासाठी उचलली. त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं पण नेमकं काय ते काही कळलं नाही.
मागून काकू ओल्या कचऱ्याची टोपली घेऊन आल्या. त्यांनी ओला कचरा कचऱ्याच्या गाडीत टाकला.
       काकांना विचारात बघून काकूंनी विचारलं ," कसला विचार करताय." काका म्हणाले ," काही नाही ग..... काल खाण्याच्या शोधात एक काळं मांजर या मोठ्या टोपलीत अडकडल होत. त्याचे डोळे फार वेगळे आणि ओळखीचे वाटले. आता कचरा टाकतांना तेच डोळे आठवले अचानक . कोणासारखे डोळे होते ते.. हेच आठवण्याचा प्रयत्न करत होतो".
काकू सहज बोलून गेल्या," काहीही नवलच असतं तुमचं, म्हणे मांजरीचे डोळे ओळखीचे वाटले. काहीही .... कालच संध्याकाळी मी सगळे तुकडे गोळा करून  या मोठ्या टोपलीत टाकले होते. तेव्हा पक्क झाकण बसवलं होतं. झाकण काढून मांजर  त्यात पडली असं म्हणायचं आहे का तुम्हाला ? "
       काकूंच्या बोलण्याकडे काकांचं लक्षच नव्हतं त्यांना मघाशी कचऱ्याची टोपली उचलताना काहीतरी वेगळं जाणवलं होत. आता काकूंच्या बोलण्यावरून त्यांना आठवलं की त्या टोपलीत बाहुलीचा एकही तुकडा नव्हता. रात्री श्रेया खूप घाबरली होती. ते आठवून काकांनी काकूलाही त्या टोपलीत सकाळी  बाहुलीचा एकही तुकडा नव्हता याबद्दल काहीच सांगितलं नाही.
         काकूंना ते फक्त इतकंच म्हणाले, "श्रेया  घरापासून इतक्या दूर एकटीच रहाते. काल रात्री तिची अवस्था आठवते का?  इथून पुढे बाहुलीचा विषय चुकूनही तिच्या पुढे काढायचा नाही.... समजली का? "
    अचानक काकांनी विषय बदलेला बघून काकूंनी ही समजल्यासारखी मान डोलावली आणि रोजच्या कामाला लागल्या.
     आईबाबांची आठवण आल्याने सकाळी सकाळीच ऑफिस मधूनच श्रेयाने घरी फोन लावला. आई वडीलांना काळजी नको म्हणून बहुलीबद्दल, तिच्या स्वप्ना बद्दल काहीच बोलली नाही फक्त खूप एकटं एकटं वाटतं आहे एवढंच सांगितलं. आई वडीलांना बोलून तिने फोन ठेवला आणि कामाला लागली.
           मनात कोणतेच विचार येवू नये म्हणून घरी आल्यावरही तिने स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतलं.  दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी श्रेयाचे आईबाबा दारात हजर. श्रेयाला त्यांना पाहून सुखद धक्का बसला. आईबाबाच ते..... न सांगताही तिची काळजी त्यांच्या पर्यंत पोहचली. तिच्या नवीन घराला भेट देण्याचं निमित्त करत ते काही दिवस तिच्या कडे रहायला आले होते.

क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग ८)

#कामिनी
#भाग८
©️अंजली मीनानाथ धस्के

    आईबाबांना बघून श्रेया सगळ्याच चिंता, भीती विसरली.
      आज सुट्टी घेऊन आईबाबांसोबत घरीच वेळ घालवावा असं तिच्या मनात असतांना ऑफिस मधून फोन आला. तिला ताबडतोब बोलावून घेतलं होतं.
          काय झालं असावं याचा विचार करतच ती ऑफिस मधे पोहचली. ऑफिसमधे सगळे अगदी रोजच्या सारखी कामं करत होते. स्वतःच्या केबिनकडे जाता जाता तिने सरिता मॅडम ला विचारलच ," कशाला बोलावून घेतलं आहे मला इतक्या तातडीने ?" त्यांना तिच्या बोलण्याचा रोख न कळल्याने त्या काहीच न बोलता तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिल्या. तिनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि केबिनचा दरवाजा ढकलला
      तिच्या केबिनमधे  एक वृद्ध बसलेले तिला दिसले. तिने त्यांच्या येण्याचे कारण विचारले असता त्यांनी तिला सांगितले ते असे की,"माझं नाव सदाशिव खरात असून तुमच्या पोस्ट ऑफिसचा शिक्का असलेला एक पत्र मला मिळालं आहे. यात माझ्या मुलीच्या जीवनात खूप आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे. त्यासाठी मी काही दिवस इथे तिच्याकडे येवुन रहावं अशी तिने मला गळ घातली आहे. परंतु तीन चार महिन्यांपासून  मुलीचा आणि माझा काहीच संपर्क झाला नाही. ती या गावातून अचानक गेल्यानंतर मी पोलिसांच्या मदतीने तिचा खूप शोध घेतला. ती रहात होती तो बंगलाही मालकाने रिकामा करून मागितल्याने मी तिचं सगळं सामान तिथून स्वतःच्या गावी नेलं. इतके दिवस कसलीच खबर मिळाली नाही आणि काल अचानक मला तिचं हे पत्र मिळालं.  ती इथे भेटेल. कोणता आनंदाचा क्षण तिच्या आयुष्यात येणार आहे हे सांगेल या  आशेने तिचा शोध घेतं पुन्हा येथे आलो आहे."
श्रेया म्हणाली," मी काय मदत करावी असं तुम्हाला वाटतं आहे."
ते म्हणाले," तुमच्या इथे कोणी ही चिठ्ठी  टाकतांना तिला बघितलं असेल तर मदत होईल"
श्रेया सहज बोलली, " रोज इतके लोक येतात कोणा कोणाचे चेहरे लक्षात राहतील .... पण तुम्ही स्टाफ ला भेटून खात्री करून घेवू शकता".
     तिच्या बोलण्याने सदाशिव खरात हवालदिल झाले. त्यांची ती अवस्था बघून श्रेयाला तिच्या वडिलांची आठवण झाली. सांत्वन करण्यासाठी तिने त्यांना एका खुर्चीत बसवलं. पाणी प्यायला दिलं. ते पाणी पीत होते इतक्यात त्यांनी टेबलावर ठेवलेल पत्रं श्रेयाला दिसलं .
त्यावरचा  सदाशिव खरात, ४७, कणकवाडी , वलगाव , अमरावती . हा पत्ता तिला दिसला . तिला लगेच आठवलं काही दिवसापूर्वी आपणच या पत्रावर तिकीट लावायला सांगून पोस्ट केलं होतं.  पत्रा खाली ठेवलेला फोटो बघून तर ती त्या फोटोच्या डोळ्यात बघतच राहिली. खूप ओळखीचे डोळे वाटले तिला.
   ती फोटो निरखून बघते आहे म्हंटल्यावर सदाशिव खरात यांनी तिला विचारले " तुम्ही कुठे पाहिलं आहे का माझ्या मुलीला? "
श्रेयाने सांगितलं ," नाही .... पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय , नाव काय आहे यांचं ?"
त्यांनी सांगितलं ," कामिनी खरात "
श्रेयाला कामिनी नाव ऐकताच स्प्रिंगच्या बाहुलीची आठवण झाली. त्या बाहुलीचे छोटे छोटे डोळे अगदी फोटोतल्या कामिनीच्या डोळ्यासारखे दिसत होते याची जाणीव होवून तिच्या मणक्यातून  भीतीची लहर गेली.  तिने पट्कन तो फोटो स्वत:च्या हातातून टेबलावर ठेवला.
      हिंमत करून तिने विचारलंच ," या कामिनी खरात इथे रहायला कुठे होत्या ?" सदाशिव खरात यांनी श्रेया सध्या रहात असलेल्या बंगल्याचाच  पत्ता तिला सांगितला.
श्रेयाला आश्चर्याचा धक्का बसला होता इतक्यात त्या पत्रा मागच्या बाजूला आकर्षक अक्षरात लिहिलेलं ' कामिनी ' बघून अगदी असच कामिनी लिहिलेलं  तिने या आधी कुठे तरी पाहिलं होतं. कुठे ते काही केल्या तिला आठवेना.
     इतक्यात तिच्या केबिनमधे तिच्या स्टाफचा चपराशी चहाचा एक कप घेवून आला. त्याने तो कप तिच्या पुढे ठेवला आणि जायला निघाला तशी ती त्याला जरा रागातच बोलली ," माझ्या केबिनमध्ये गेस्ट असतांना तू एकच चहाचा कप का आणला ? जा अजून एक कप चहा घेवून ये".
    तो कवरा बावरा झाला," लगेच आणतो " म्हणत केबिनच्या बाहेर पडला. सदाशिव खरात यांच्यासाठी चहा आणल्या गेला नाही म्हणून तिने आपला कप त्यांच्यापुढे ठेवत बोलली ," काय योगा योग आहे... मी या गावात नवीन आहे.
सध्या मीही याच बंगल्यात रहाते आहे." ती हे बोलत होती पण तीच सगळं लक्ष ' कामिनी 'अक्षरावर खिळलं होतं. तितक्यात तिला  आठवलं हे अक्षर तिने तिच्या घराच्या वरच्या खोलीतील पेटीतल्या एका पत्रावर बघितलं होतं. पेटीतल ते पत्र यांच्या कडे कसं आलं?  भीती , उत्कंठा अशा संमिश्र भावना तिच्या मनात निर्माण झाल्या . तिला आता घाई लागली होती घरी जावून ती पेटी उघडून बघण्याची आणि ते पत्र त्या पेटीत आहे की नाही याची  खात्री करून घेण्याची.
     ती  सदाशिव खरात यांना उद्देशून म्हणाली , " मी त्या घरात रहायला आले तेव्हा कामिनी ताईंची एक पेटी तुम्ही तिथेच विसरून गेला होता ती आम्हाला मिळाली. तुम्ही आलाच आहात तर माझ्या घरी चला आणि ती पेटी तुमच्या ताब्यात घ्या. "
       खरं तर मुलगी मिळत नाही आहे याची निराशा इतकी होती की तिची पेटी घेवून काय करायचं असं मत सदाशिव खरात याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं . पण श्रेयाने समजावलं की, त्यातील सामनातून कामिनी सध्या कुठे आहे याचा काही अंदाज लागला तर  तिचा शोध घ्यायला मदतच होईल. ते लगेच श्रेयासोबत तिच्या घरी जायला निघाले.
श्रेया मॅडम आल्या तशा जायला निघाल्या म्हणून तिथल्या स्टाफ ला आश्चर्य वाटलं. पण आज एकंदरीत तिचे वागणे बघून तिची तब्येत बरी नाही म्हणून तिला कोणी ही अडवल नाही.
       घराकडे जातांना अचानक सदाशिव खरात यांनी तिथल्याच जुन्या बस थांब्यावर  श्रेयाला थांबवलं. त्यांनी परतीच तिकीट काढून ठेवलं असल्याने त्यांना तिच्या घरी येता येणार नव्हतं. बस यायला वेळ आहे तोपर्यंत जर श्रेया ती पेटी घेवून आली तरच त्यांना ती त्यांच्या सोबत नेणं शक्य होतं. श्रेयाला काही करून ती पेटी त्यांना द्यायची होती. तिने लवकरच पेटी घेवून येण्याचं आश्वासन दिले. ती पेटी आणायला निघाली तेव्हा ते तिला म्हणाले ," तुला त्रास देतोय पोरी पण तू वेळेत पेटी आणलीस तर मला माझ्या पोरीची भेट झाल्याचा आनंद होईल " त्यांच्या डोळ्यातली पोरीच्या भेटीची ओढ बघून ती तडक घराकडे निघाली.

    इकडे श्रेयाच्या घरी तिचे बाबा घराभोवतीची बाग बघायला गेले असतांना मागच्या बाजूला  असलेल्या गुलाबांच्या वाफ्यात  भिंतीजवळ स्प्रिंगची बाहुली दिसली. ही बाहुली अशा अवस्थेत होती जणू ती खूप थकून गुडघ्यात डोकं घालून बसलेली आहे. ते त्या बाहुलीलाकडे आकर्षित झाले.
 त्या बाहुलीला घेण्यासाठी ते तिच्या जवळ गेले. तिच्या जवळ जाताना त्यांना गुलाबाचे काही काटे टोचले. काट्यांनी ओरबाडल्या गेलं, थोड रक्त ही आलं पण  बाहुलीला उचलून घेण्याच्या नादात त्यांच्या ते  लक्षातही नाही आलं.

क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे.
साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग ९)

#कामिनी
#भाग९
©️ अंजली मीनानाथ धस्के

    त्यांनी ती बाहुली घरात आणली. श्रेयाच्या आईला दाखवली. ती बाहुली चिखलाने माखलेली होती. बाहुलीची ती अवस्था बघून त्यांना ती बाहुली अजिबात आवडली नाही त्या रागातच म्हणाल्या ," शी घाण कशाला आणली उचलून . आधी फेका तिला बाहेर" . श्रेयाचे वडिलांनी मात्र ती बाहुली फेकून न देता मागच्या अंगणातील नळावर  नेवून तिला धुवून स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं. जसं जसं तीच्यावरची माती वाहून जावू लागली तिचं सुंदर रूप दृष्टीस पडू लागलं. त्यांनी स्वच्छ केलेली ती बाहुली नेमकी काकूंच्या नजरेस पडली. श्रेयाच्या पायाखाली येवुन तुटलेली, कचऱ्यात फेकून दिलेली बाहुली पुन्हा नव्यासारखी सुंदर झालेली बघून त्यांची दात खीळीच बसली .
     काकांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. श्रेयाच्या वडीलांना काहीच कळायला मार्ग नव्हता. या बाहुलीला बघून ही दोघं एवढी का घाबरली. संध्याकाळ व्हायला थोडाच वेळ राहिला होता .   काकांनी मनाशीच काहीतरी विचार केला आणि ते मागच्या लोखंडी जिन्याने वर गेले. वरच्या खोलीत ठेवलेली कामिनीची पेटी घेवून आले. श्रेयाच्या वडिलांकडून ती स्प्रिंग ची बाहुली ते नको नको म्हणत असताना काढून घेतली आणि
"नसती ब्याद नकोच घरात म्हणत" ती बाहुली त्या पेटीत ठेवली. त्यांनी ती पेटी उचलून फटकाबाहेरच्या कचरा पेटीत टाकायला नेली. इतक्यात काकूंची तब्येत अधिकच बिघडली. श्रेयाच्या वडिलांनी श्रेयाच्या आईला मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली. त्या हाका ऐकुन काकांनी ती पेटी फाटकाजवळच ठेवली आणि काकूंकडे धाव घेतली.
     काकूंच्या तोंडावर पाण्याचे हबके मारले. श्रेयाची आई काकुंसाठी लिंबू सरबत बनवून घेवून आली. ते पील्यावर काकूंना जरा बरं वाटलं. काकांना पेटीची आठवण झाली. त्यांना ती पेटी संध्याकाळच्या आत दूर फेकून यायचं होतं. ते फाटकाजवळ गेले तिथे ती पेटी नव्हती. कुठल्या तरी भुरट्या चोराने ती उचलून नेली असावी असं वाटून ते माघारी परतले.
त्यांना एकट्याने येतांना बघून श्रेयाच्या आईने विचारले, " श्रेया आली ना ... मला तिच्या गाडीचा आवाज आला " काकांनी नकारार्थी मान हलवली तसे श्रेयाचे बाबा म्हणाले ," आज सगळंच विचित्र घडतंय.... एकाएक वातावरण काय बिघडलं आहे ...   बहुलीला बघून काकू काय  घाबरल्या.... तुला श्रेया आल्याचा भास काय झाला "
काका समजुतीच्या सुरात म्हणाले," इथून पुढे हा बाहुलीचा विषय बंद करा.... त्यातच आपलं हीत आहे".

     एकाएक वातावरण बिघडल्याने   घाईत घरी आलेल्या श्रेयाला फाटकातच कामिनीची पेटी ठेवलेली दिसली. तिला वाटलं वेळ वाया जायला नको म्हणून काका काकूंनी फाटकातच   पेटी आणून ठेवली. तिने मागचा पुढचा विचार न करता ती पेटी उचलून घेतली आणि जुन्या बस थांब्याकडे तिची टू व्हीलर वळवली.
   तिने पेटी सदाशिव खरात यांच्याकडे सुपूर्त केली. काळोख पडायला सूरवात झाली. तरी  त्यांनी पेटी उघडली. ते त्यातली एक एक वस्तू निरखून बघू लागले. त्यातील कामिनी आणि त्यांच्या एकत्रित  फोटोवर मायेने हात फिरवू लागले. मनाशीच पुटपुटले," पोरी तुझ्या भेटीसाठी जीव अडकला आहे बघ" असं म्हणत असतांनाच त्यांची नजर पेटीतल्या स्प्रिंगच्या बाहुलीवर पडली. त्यांनी बाहुली उचलून घेतली तशी  गार हवेची झुळूक आली. श्रेया डोळे फाडून त्या बहुलीकडे बघत राहिली. ती पूर्वीसारखीच सुंदर दिसत होती. सदाशिव खरात यांनी ती बाहुली उचलून हृदयाशी धरली. त्यांच्या डोळ्यात लेकीच्या भेटीचा आनंद दिसत होता. वीज कडाडली ... त्या प्रकाशात सदाशिव खरात यांनी जणू कामिनीलाच हृदयाशी धरले आहे असा भास श्रेयाला झाला.
          रिमझिम सुरू झाली. बाहुलीच्या डोळ्यातही बापाची भेट झाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. ते दृश्य बघून श्रेयाच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. तुटलेली बाहुली पुन्हा पूर्वीसारखी कशी झाली? फेकून दिल्यावर ती या पेटीत कशी आली? काका काकूंना कसलीच कल्पना दिली नसतांना त्यांनी पेटी फाटकाजवळ कशी आणून ठेवली? तिच्या डोक्यावर ताण वाढत गेला आणि श्रेया चक्कर येऊन खाली पडली.

क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग १०)

#कामिनी
#भाग१०
©️ अंजली मीनानाथ धस्के

    श्रेया घरी आली नाही म्हणून सगळीकडे तिची शोधाशोध सुरू झाली. बाबांनी ऑफिसच्या लोकांना फोन करून विचारल्यावर कळलं की ऑफिस मधून तर ती लवकर गेली होती.  पण  घरी मात्र पोहचली नव्हती. आई बाबांना काका काकूंना तिची फारच चिंता सतावू लागली. गाव नवीन.... कोणाला मदतीला बोलवायचं म्हटलं तरी इथले लोक नवीन. श्रेयाच्या आईचा धीर सुटला  त्यांच्याकडे बघून श्रेयाच्या बाबांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. तिथे तक्रार नोंदवून झाली पण त्यांचं समाधान झालं नाही.
श्रेया भेटली की एकमेकांना आणि घरी  फोन करून कळवायचे ठरवून काका आणि श्रेयाचे बाबा तिला शोधण्यासाठी बाहेर पडले.  अचानक बिघडलेले वातावरण. त्यात रिमझिम पडणाऱ्या पावसाने जोर धरायला सुरवात केली. श्रेयाच्या काळजीने बाबांचा जीव घाबरा घुबरा झाला. इतक्यात त्यांना मागून कोणीतरी आवाज दिला," इतक्या पावसात कुठे निघालात?". त्यांनी मागे वळून पाहिले पिंपळाच्या झाडाखाली एक वृद्ध त्याच्या लेकीला घेवून बसलेले त्यांना दिसले. त्यांनी सांगितलं ," माझ्या मुलीला शोधायला निघालो आहे " झाडा खालच्या वृद्धाने आपल्या लेकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत श्रेयाच्या बाबांना सांगितलं," या बाजूने जा सरळ ... जुन्या बस थांब्यापाशी  मिळेल तुम्हाला तुमची लेक ".
       श्रेयाच्या काळजीने कसलाच विचार न करता त्यांनी सरळ पुढे चालायला सुरुवात केली.  जुन्या बस थांब्यापाशी त्यांना ती बेशुद्ध पडलेली दिसली. त्यांनी श्रेयाच्या आईला फोन करून श्रेया मिळाल्याच कळवल . थोड्याच वेळात त्यांनी काही लोकांच्या मदतीने तिला गावातल्या दवाखान्यात दाखल केलं.  काकूंना अजूनही खूप थकवा जाणवत होता म्हणून काका आणि काकू घरीच थांबले श्रेयाची आई एकट्यानेच दवाखान्यात गेली.
          श्रेया शुद्धीत आली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास काकाही दवाखान्यात येवुन श्रेयाला बघून गेले. श्रेयाच्या आई बाबांचा तर डोळ्याला डोळा लागला नव्हता. पहाटे पहाटे पावसाचा जोर जरा कमी झाला. थोड्याच वेळात पाऊस पूर्णपणे थांबला. तिला भेटायला तिच्या ऑफिसचे काही जण आणि पोलिसही  दवाखान्यात आले.
उन्हाची किरणं खिडकीतून श्रेयाच्या चेहऱ्यावर पडली तशी तिला शुद्ध आली.
     तिला शुद्धीत आल्यावर सगळ्यांना आनंद झाला. तिला मात्र आश्चर्य वाटलं की ,ती दवाखान्यात कशी पोहचली ? तिने सगळ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं. सगळ्यांनी तिला शांत केलं. बाबांनी तिला सांगितलं की काल रात्री  ती त्यांना जुन्या बस थांब्याजवळ बेशुद्ध पडलेली सापडली.

           श्रेयाला एकदम सदाशिव खरात यांची आठवण झाली. तिने त्यांच्याबद्दल सगळ्यांना सांगितलं. कामिनीची पेटी परत देण्यासाठी म्हणून त्यांना सोबत घेवून  ती घाईतच ऑफिसच्या बाहेर पडली होती. पेटी फाटकातच दिसल्याने ती बाहेरच्या बाहेरचं जुन्या बस थांब्याकडे गेली. तिथे तिला पेटीत ती स्प्रिंगची बाहुली दिसली आणि मग ती बेशुद्ध पडली. असं ती पोलिसांना सांगत असतांनाच ऑफिस मधल्या लोकांना हे ऐकुन नवल वाटलं कारण ऑफिस मधून बाहेर पडतांना तिच्या सोबत कोणीच नव्हतं. ती स्वत:शीच बडबडत बाहेर पडली होती? त्यांनी लगेच पोलिसांना तसे  सांगितले . ते ऐकुन पोलीस बुचकळ्यात पडले तर श्रेया खात्रीने सांगू लागली. सदाशिव खरात यांना श्रेयाने तिकीट लावून पाठवायला सांगितलेली कामिनीची चिठ्ठी मिळाली होती म्हणून ते  तीला भेटायला ऑफिसमधे आले होते.
           ऑफिसच्या स्टाफ पैकी एकाने परत तिचे बोलणे चुकीचे आहे असे सांगितले, कारण तिने तिकीट लावून पाठवलेली चिठ्ठी त्या पत्यावर सध्या कोणीच रहात नसल्याने कालच परत आली होती.
          ती विचार करून थकली . ताण जाणवून परत बेशुद्ध पडली.  पोलिस तिला शोधण्यासाठी केलेली तक्रार ती सापडली म्हणून बंद करण्यासाठी तिला भेटायला आले होते. मात्र इथली सगळी हकीकत ऐकल्यावर हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही याची जाणीव होवून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं त्यांनी ठरवलं.

क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग ११)

#कामिनी
#भाग११
©️ अंजली मीनानाथ धस्के

     श्रेयाला अजून  ताण येवू नये म्हणून पोलिसांनी तिला काहीच न विचारता या प्रकरणाबाबत तिथे असलेल्या इतरांकडे  असलेली सगळी माहिती गोळा करायला सूरवात केली.
सगळ्यांशी बोलून त्यांना अनेक शंका निर्माण करणारे प्रश्न पडले.
त्यातला पहिला प्रश्न म्हणजे ही कामिनी कोण???
  त्याच अनुषंगाने त्यांनी शोध सुरू केला.
      कामिनी खरात ही गावातल्या बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होती. ती सध्या श्रेया राहते तिथेच ती रहायला होती. ज्या दिवशी काका काकूं शेजारच्या गावात एका नातलगाच्या लग्नात मुक्काम करावा लागला नेमकी त्याच दिवशी ती कोणालाही काही न सांगता निघून गेली. ती कुठे गेली हे कोणालाच माहित नव्हतं .
एवढी प्राथमिक माहिती त्यांना पोलीस स्टेशन मधूनच मिळाली.
      ती ज्या बँकेत काम करत होती तिथे चौकशी केल्यावर अजून माहिती मिळाली.
 तीच एकावर प्रेम होतं ती लवकरच त्याच्याशी लग्न करणार होती. ही नवीन माहिती तिच्या बँकेतल्या मैत्रिणीकडून मिळाली होती पण त्या मैत्रिणीला तिचं कोणावर प्रेम होत त्या युवकाच नावं माहीत नव्हतं. कामिनीने तिचं एका मुलावर प्रेम आहे हे इतर कोणासही सांगण्यास मनाई केली होती
 म्हणून तिच्या मैत्रिणीने या आधी ही माहिती लपवली होती.
              आता कामिनीचा प्रियकर कोण?  त्या युवकाच्या नावावर प्रकरण येवुन थांबलं तेव्हा पोस्टात कमिनीची सदाशिव खरात म्हणजेच तिच्या वडिलांना पाठवलेली चिठ्ठी परत आली होती . याची तपास कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला आठवण झाली. त्याने ती चिठ्ठी श्रेयाच्या कार्यालयातून मिळवली. तिच्यावर दिलेल्या पत्त्यावर जावून त्यांनी सदाशिव खरात यांची सगळी माहिती मिळवली.
कामिनीच्या अचानक गायब होण्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. ती त्यांच्या जगण्याचा एकुलता एक आधार होती. तिच्या काळजीने हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे नुकतेच निधन झाले होते. कोणी जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांच्या राहत्या घराला शेजारी राहणाऱ्या एका नातलगाने तात्पुरते कुलूप लावले होते. त्यांच्याजवळ सदाशिव खरात यांच्या निधनाचा पुरावा म्हणून डेथ सर्टिफिकेट ही पोलिसांना मिळाले होते. कामिनी आली की तिला तिचे घर देता यावे यासाठीच ही तरतूद करण्यात आली होती. तेही कामिनीच्या परत येण्याची वाट बघत होते.
              इकडे  श्रेयाच्या पोटात वारंवार दुखत होत. त्यांचं नेमक निदान करता येत नव्हतं. पुढच्या इलाजासाठी तिला मोठ्या दवाखान्यात न्याव असंच इथल्या डॉक्टरांचं म्हणणं पडलं. श्रेयाला थोड बरं वाटायला लागलं. तेव्हा तिला घरी सोडण्यात आलं.
           पोलिसांनी तिला सदाशिव खरात यांचा फोटो दाखवून खात्री करून घेतली की, बेशुद्ध पडण्याआधी ती त्यांनाच भेटली होती का? तीने तो फोटो बघून खात्रीने सांगितलं की ," हेच सदाशिव खरात.. यांनाच ती भेटली होती. श्रेयाच्या वडिलांनी ही तो फोटो बघितल्यावर सांगितलं की याच वृध्द माणसाने त्या रात्री श्रेया कुठे सापडेल हे सांगितलं होतं. तेव्हा त्याच्यांसोबत त्यांची मुलगीही होती. कामिनीचा फोटो बघितल्यावर तर त्यांनीही खात्रीने सांगितलं की हे दोघेच त्या रात्री जुन्या बस थांब्या जवळच्या एका मोठ्या झाडाखाली बसलेले होते.
           हे ऐकुन पोलिसांना खूपच आश्चर्य वाटलं, कारण श्रेया बेशुद्ध पडली होती त्याच्या दहा दिवस आधीच सदाशिव खरात यांचा मृत्यू झाला होता. तसे सगळे पुरावेही त्यांच्याकडे होते.
         श्रेया आणि तिचे कुटुंब या गावात नवीन होते. श्रेयाची तब्येत नाजूक म्हणून पुन्हा एकदा खात्री केल्याशिवाय त्यांना काहीच न सागण्यांचे पोलीस अधिकाऱ्याने मनोमन ठरवले.
श्रेयाला  तर त्यांनी काहीच सांगितलं नाही पण तिच्या वडिलांना लवकरात लवकर त्यांनी हवा पलटासाठी श्रेयाला दुसऱ्या गावी न्याव  असा सल्ला दिला.

     श्रेयाच्या समोर कोणीच जुना बाहुलीचा विषय काढत नव्हतं.   सगळेच तिची काळजी घेत होते. पाय मोकळे करण्यासाठी ती बंगल्याच्याच बागेत फिरत होती. नेहमीप्रमाणे मागच्या बाजूला गुलाबाच्या वाफ्याकडे ती गेली असता गुलाबाची झाडं सुकल्या सारखी वाटली. त्यांच्या मुळाशी घुशीने मोठं मोठी बिळ केली होती. त्या वाफ्याची पाहणी करतांना अचानक तिची नजर एका बिळाच्या तोंडाशी मातीत रुतलेल्या एका डायरी वर गेली. तिने उसुक्तेपोटी ती डायरी बाहेर काढली . त्या डायरीची सगळी माती झटकली. डायरीची  अवस्था तशी फार चांगली नव्हती तरी तिने पाहिलं पान उघडंल आणि त्यावर लिहिलेलं ," कामिनी खरात" हे नाव वाचून तिने ती डायरी तिथेच टाकून घराच्या दिशेने धूम ठोकली. तिची तब्येत पुन्हा बिघडली. श्रेयाच्या बाबांनी पोलिसांना बोलावलं. त्यांना डायरी मिळाली ती जागा दुरूनच दाखवली .  तिथे ती डायरी पडलेली होतीच. पोलिसांनी ती ताब्यात घेतली.
      श्रेयाची वारंवार बिघडती तब्येत बघता तिच्या आईबाबांनी लवकरात लवकर हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी श्रेयाच्या कार्यालयात बदलीचा अर्जही  दिला.
       पोलिस स्टेशनमधे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या डायरीत जेवढा वाचण्यासारखा मचकुर होता तेवढा वेगळा करून त्यावर संशोधन सुरू केले. त्यात त्यांना मिळालेली माहिती.
पान १.....
आज मी खूप आनंदात आहे.
मला कोड आहे. सध्या तो दर्शनीय भागात नसला तरी येत्या काही वर्षातच माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा  घेणार आहे. हे सांगूनही त्याच माझ्यावरच प्रेम कमी झालं नाही.
आता माझही संसार मांडण्याचं स्वप्न पूर्ण होईल.
पान ६.....

नवीन गावी बदली झाली.
बंगला छान आहे.

पान १२
आज तिला जरा बरं नव्हतं तर काकाकाकूंनी तिची लेकी प्रमाणे काळजी घेतली.
पान १६....
तिला गुलाब खूप आवडतात म्हणून काकांनी बंगल्याच्या मागील रिकाम्या जागेत खास एक वाफ तयार करायला घेतला.

पान २५..
मी आई होणार आहे.
हे बाळ आमच्या प्रेमाची निशाणी आहे.
मला या बाळाला जन्म द्यायचा आहे.

पान ३०
त्याच्या घरचे माझ्या या कोडाच्या आजाराबद्दल ऐकल्यानंतर लग्नाला तयार नाहीत.

पान ३७

मला शंका यायला लागली आहे की , त्यालाच माझ्याशी लग्न करायचं नाही.

पान ३९
तो आज घरच्या सोबत मुलगी बघायला गेला.
पान ४०
 मी त्याच्या घरी जावून त्या सगळ्यांना आमच्या होणाऱ्या  बाळाबद्दल सगळं सांगणार आहे.

पान ४५
त्याने मला समजावलं . माझ्या सांगण्याने आमच्या बाळाला ते अनैतिक ठरवतील . आमच्या  बाळाला नावं ठेवलेली आम्हाला अजिबात चालणार नाही. ते आमच्या प्रेमाची निशाणी आहे.
 त्याच्या घरी काहीच सांगायच नाही असं आमचं ठरलं
पान ४७
 त्याने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता येत्या शुक्रवारी माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबांना फोन वर सांगण्याची हिंमत होत नाही. त्यांना पत्र पाठवून बोलावून घेणार आहे. आल्यावर नीट समजावून सांगता येईल. तसंही मला आता हे सगळं जास्त दिवस लपवता येणार नाही. बाबा समजून घेतली. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे.
पान ५०
काय सुंदर  योगायोग आहे. उद्या आम्ही लग्न करणार आहोत आणि आज काकांनी मागच्या वाफ्यात  लावण्यासाठी खूप सुंदर गुलाबाची रोपं आणली आहेत.

पुढची सगळी पानं कोरी होती.
   शेवटच्या पानावर अगदी बारीक अक्षरात लिहिलेला एक मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. त्या नंबर वर कॉल केल्यावर कळले की तो सध्या अस्तित्वात नाही.
 तो नंबर कोणाच्या नावावर आहे. याचा शोध सुरू झाला.

क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

कामिनी (भाग १२)

#कामिनी
#भाग१२
 ©️अंजली मीनानाथ धस्के

          तो फोन नंबर सचिन काशिनाथ खडसे युवकाच्या नावावर होता. याच सचिन खडसे चा काही दिवसापूर्वी खून झाला होता. त्याच्या खूनाच गूढ अजून कायमच होते.
आता मात्र पोलिसांना शंका यायला लागली की  प्रेम प्रकरणातून तर त्याच्या खून झाला नव्हता. कोणताच पुरावा परिपूर्ण नव्हता.  शोध कार्यात  धागे दोरे मिळत होते पण कशाचा कशाशी पट्कन संबंध लागत नव्हता.
         श्रेयाच्या बदलीचा अर्ज मंजूर झाला होता. श्रेयाची बदली तिच्या मुळ गावी करण्यात आली होती.    ती आई बाबांना घेवून तिच्या स्वत:च्या गावी... घरी जाणार होती.
         ती जायला निघाली त्याच दिवशी त्यांच्या बंगल्यावर  पोलीस आले. त्यांनी गुलाबाच्या वाफ्यात खोदून बघण्याचा निर्णय घेतला होता. तिथे अजून काही पुरावे मिळतील अशी त्यांना आशा होती.
            एकीकडे श्रेयाच सामान ट्रक मधे चढविल्या जात होते तर दुसरीकडे पोलिसांनी वाफ्याच खोदकाम वेगाने सुरू केलं होत. आता काही अमंगल बघण्याची वेळ आपल्या मुलीवर येवू नये म्हणून श्रेयाच्या आई वडिलांनी तिथून निघण्याची घाई सुरू केली. श्रेयाची नाजूक तब्येत आणि मानसिकता बघता तिच्या माघारी हे सगळं होण अपेक्षित होतं.
         आज सकाळ पासूनच काका काकूं त्यांच्या खोली बाहेर पडले नाही.  काय होणार आहे याची कल्पना त्यांना आली असावी. त्यांच्या डोळ्यात दुःख दाटून आलं होतं. ते दुःख श्रेयाच्या जाण्याच आहे असंच श्रेयाला  वाटलं. त्यांना समजावण्यासाठी ती बोलली ," लवकरच पुन्हा भेटू आपण ". त्यांचा निरोप घेतला.
 जो काही शोध लागेल तो कळवण्याचे पोलिसांनी श्रेयाच्या वडीलांना कबूल केले . श्रेयाच्या वडिलांनी घाईतच  सगळ्यांचा निरोप घेतला.
              श्रेया जावून फार वेळ झाला नाही. पोलिसांना त्या वाफ्यात  एका स्त्रीचे मृत शरीर सापडले. चेहरा ओळखू येत नव्हता. त्या शवाच्या कपड्यावरून काका काकूंनी ओळखले की हे मृत शरीर कामिनीचे आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
            पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी शेजारच्या काही लोकांना बोलावलं. तेव्हा ते मृत शरीर कामिनीच असल्याची खात्री पटली. सापडलेल्या सगळ्या वस्तूही कमिनीच्याच होत्या. तिथे जमलेल्या अनेकांनी सांगितलं की कमिनीचे वागणे सगळ्यांशी चांगले होते.  तिच्याकडे कायम एक तरुण तिला भेटायला यायचा. तो आला की परत जातांना कायम नाक्यावरच्या ए.टी.एम मधून कामिनी त्याला पैसे काढून द्यायची.
           शव विच्छेदन करतांना त्यांना पुढील बाबी कळाल्या.
मरण्यापूर्वी झालेल्या झटापटीत मृत स्त्री व्यक्तीच्या मुठीत  काही  केस अडकलेले होते.
मृत व्यक्ती गर्भवती होती .
 गळा दाबून तिला मारण्यात आले होते.
 कुदळीचे घाव घालून चेहरा विद्रूप करण्यात आला होता. पोटातला  गर्भ मृत असूनही खराब अजूनपर्यंत खराब झाला नव्हता.
           तपास कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला काही शंका आल्या . खात्री करून घेण्यासाठी त्यांनी मृत शरीराच्या मुठीत सापडलेले केस सचिन खडसेंच्या केसांशी जुळतात का ते बघितले.
केस हुबेहूब जुळत होते. मृत गर्भाची डी एन ए चाचणी घेतली तीही सचिन खडसे शी जुळली.
       कामिनीला कोड असल्याने सचिन खडसेला
 तिच्यासोबत लग्न करायचे नव्हतेच. तिच्या पगारावर फक्त मजा मारायची होती. ती गर्भवती राहिली आणि लग्नासाठी मागेच लागली. काका काकू नसतांना तो भेटायला आला . क तेव्हा कामिनी दिवाणखान्यातील छोट्या टेबलजवळ  बसून डायरीत नोंद करत होती.
 तो लग्नाला नकार देतो आहे म्हंटल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. म्हणून त्याने तिचा खून केला. बंगल्याच्या मागच्या बाजूला एक वाफा रिकामा होता . त्याने तिथेच मोठा खड्डा करून तिला पुरलं. तिच्यासोबत तिची डायरीही पुरली. कोणी त्या वाफ्यावर खोद काम करू नये म्हणून त्यावर काकांनी आणून ठेवलेली गुलाबाची रोपं ही लावून टाकली.
इथपर्यंत  पोलिस अधिकाऱ्याने बरोबर अंदाज बांधला .

            गुलाबाची रोप लावल्यानंतर पुढे तो घरात आला तर टेबल वर कामिनीने तिच्या वडिलांना लिहिलेलं पत्र , त्याने दिलेल्या काही भेट वस्तू त्याला दिसल्या. जवळच एक पेटी होती. त्यात त्याने सगळं समान भरल . घाई घाईत टेबलावर असलेली स्प्रिंग ची बाहुलीही त्याने पेटीत टाकली. तिथेच ठेवलेले कुलूप लावले. चावी स्वतःच्या खिशात टाकली. पेटी सोबत नेणं शक्य नसल्याने ती घरतल्या माळावर मागे सरकुन ठेवून दिली.
या सगळ्याची  पोलिसांना काहीच कल्पना नव्हती .  कामिनी मात्र या सगळ्याची साक्षी होती.