गाणे, मी आणि बाळराजे

#गाणे_मी_आणि_बाळराजे  

©️ Anjali Minanath Dhaske (Elgire)

हंसराज रघुवंशी यांनी गायलेले "शिव समा रहे मुझ मे और मै शून्य हो रहा हूँ " हे गाणे माझे फार आवडीचे आहे.  गाण्यातील शब्दांचा अर्थ मनाला जितका भावतो तितकेच गाण्याचे सूर मनाला सुखावून जातात.

     हे गाणे अनेक वेळा कानावर पडल्याने बाळराजेंनी आपसूकच त्यावर विचार करायला सुरवात केली असणार....

" आई तुला हे गाण ईतक का आवडत ग?" इती  बाळराजे

" गाण्यातले शब्द, सूर आणि मुख्य म्हणजे गाण्याचा भाव मनाला शांत, तृप्त करतो म्हणुन मला हे गाण ऐकायला आवडत " इती मी 

" तुला नाही वाटत कधी की गाण्याचे शब्द थोडे वेगळे हवे होते " इती  बाळराजे

" नाही बा .... पण तुला का असे वाटले " इती मी 

" तू म्हणतेस ना नेहमी की, माणसाने प्रतिकूल परिस्थितीत ही सकारात्मकच विचार करायला हवा " इती  बाळराजे

" हो... त्याचा ईथे काय संबंध?" इती मी 

" अरे  .... गायक म्हणतो की ,"शिव समा रहे मुझ मे और मै शून्य हो रहा हूँ " परंतू  जर त्याच्या मधे शिव वास करणार आहेत तर मग तो शून्य कस काय होवू शकतो..... त्यानी स्वतःच्या बाबतीत सकारात्मक विचार करून ,"शिव समा रहे मुझ मे और मै शिव हो रहा हूँ " असे गायला हवे" इती  बाळराजे


" अरे.... या गाण्यात भगवान शिव प्रती समर्पण भाव व्यक्त केला आहे.  शिव माझ्यात अशा काही प्रकारे संचार करतो आहे की मी माझे अस्तित्व विसरून त्याच्या चरणी लीन होत आहे.  असे म्हणायचे आहे गायकाला " इती मी 

" अग .. शिव त्याच्यात संचार करतोय तेव्हा गायक शून्य होतो.... हे जरी खरं असलं तरी तो शून्य होतोय म्हणजेच तो शिव होतोय ना.... तूच सांग शिव जर तुझ्यात आहे तर तू शून्य कशी होवू शकते?.... " इती  बाळराजे


आजची पिढी कुठे कसे डोके लावेल याचा काही नेम नाही. आपण घेत असलेल्या पारंपारिक अर्थाचा क्षणात नवीनच दृष्टीने विचार करणे भाग पडते. 

त्याच्या या प्रश्नाने जणू माझे पालकत्व पणाला लावल्या गेले असे मला वाटू लागले. 

"हो ... बरोबर आहे तुझे . परंतु या गाण्यात एका भक्ताची भक्ती दर्शविली आहे.  " मै शिव हो रहा हूँ " असे म्हणण्यात अहंकार दिसतो. या उलट ,'मै शून्य हो रहा हूँ " म्हणण्यात समर्पण भाव, विनयशीलता प्रकट होते. शिव चरणी लीन होताना आपण आपले उग्र विचार, अहंकार, द्वेष, मत्सर, क्रोध अशा सगळ्या वाईट गुणांचा त्याग करायचा.  अगदी स्वतःची स्वतःशी देखील स्पर्धा/तुलना करायची नाही.  

 शिव बनणे ईतके सोपे नाही. शिवा पुढे आपण म्हणजे समुद्रातील एक थेंब आहोत. थेंब समुद्राचा अंश असतो म्हणुन आपण थेंबाला समुद्र म्हणत नाही ना. तसेच 

 आपल्या मधे जो शिव अंश आहे त्याला  शिव म्हणणे योग्य होत नाही.  आपण जेव्हा आपल्या 'मी ' पणाचा त्याग करू तेव्हाच तर शिव आणि आपण यातले अंतर नष्ट होईल.  म्हणुन या गाण्यात ,'मै शून्य हो रहा हूँ ' हेच योग्य आहे " इती मी 

" तू सांगितल ते पटले आहे पण तूच म्हणतेस ना, शब्दा पेक्षा भाव महत्त्वाचा मग..... गाणं म्हणणारा समर्पण भावनेनेच " मै शिव हो रहा हूँ " असे म्हणत असेल तर काय हरकत आहे. म्हणजे आपण ' शिव' होवून आपल प्रमोशन पण करायच आणि विनय शीलता पण अंगी बाळगायची."

इती  बाळराजे

" काही हरकत नाही..... गाणे तुला जसे म्हणायचे तसे म्हण.

गायकाला जो भाव आणि अर्थ अपेक्षित आहे तो समजण्यासाठी तुझे वय अजून लहान आहे.  एक दिवस तुझे तुलाच जाणवेल की गाण्यातल्या ओळी किती समर्पक आहेत आणि तेव्हा तू स्वतःहून "शिव समा रहे मुझ मे और मै शून्य हो रहा हूँ " असेच म्हणणे पसंत करशील " इती मी 

 अनेकदा आपल मत मुलाला पटवून देता येईलच किंवा आपण सांगितल्यावर त्याला ते पटेलच याची खात्री नसते परंतू त्यानिमित्ताने होणारे विचारमंथन फार महत्त्वाचे आहे.  " आध्यात्मिक आनंद व त्या अनुषंगाने येणारा समर्पण भाव " समजण्यासाठी   त्याचे वय अजून कच्चेच आहे. 

मी काही आदर्श पालक नाही.  मुलांना त्यांची स्वतंत्र मते असतात आणि त्याला नाकारून चालत नाही याची जाणीव मात्र आहे.  आज जी गोष्ट त्याला समजावून सांगायला कठीण वाटते तीच गोष्ट त्याच्या योग्य वयात त्याला आपसूकच समजेल अशी खात्री बाळगून मी संवाद आटोपता घेतला.  काही गोष्टी काळावर सोडून दिलेल्या चांगल्या असतात. 

आपल्या मुलांना त्यांची स्वतंत्र आणि आपल्या मतांशी प्रतिकूल मते असू शकतात. आपण त्या मतांचा  स्विकार करू शकत नसलो तरी त्यांची मते ऐकून घ्यायला काहीच हरकत नसावी. त्या अनुषंगाने होणारा संवाद मुलांना त्यांचे विचार मांडण्याचा आत्मविश्वास देवून जातो तसेच आपल्याला विचार करण्यासाठी नविन दृष्टिकोन मिळतो. 

©️ Anjali Minanath Dhaske (Elgire)

टिप: लिखाण आवडल्यास नावासहित शेयर करण्यास हरकत नाही. ईतर लिखाण 'आशयघन ' रांगोळी या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे . लिंक खाली देत आहे. 

anjali-rangoli.blogspot.com 

अनेक सुंदर व सोपे कलाविष्कार पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. Link 👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg




आकर्षक गालिचा रांगोळी (ठिपक्यांची रांगोळी)

 #गालिचा_रांगोळी 

रांगोळीचा फोटो बघून विश्वास बसणार नाही की ही ठिपक्यांची रांगोळी आहे. ठिपक्यांची रांगोळी गालिचा सारखी आकर्षक दिसेल जेव्हा तुम्ही ती रांगोळी व्हिडिओ मध्ये दाखविल्या प्रमाणे काढाल. संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇👇👇👇https://youtu.be/7QisX13VKfs


व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)




घराची आकर्षक पोस्टर रांगोळी

 #घराची_आकर्षक_पोस्टर_रांगोळी 

वास्तू पूजन, कलश पूजन,  गृहप्रवेश, घराचा वाढदिवस किंवा कोणत्याही शुभ मुहूर्त असल्यास अगदी सहज काढण्यासारखी ही पोस्टर रांगोळी तुम्हाला नक्की आवडेल. संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/_KrP_uPaZLc

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)




रांगोळी डिझाईन

 #रांगोळी_डिझाईन 

कमी वेळेत , रांगोळीचे कमी रंग वापरून सोप्या पद्धतीने रेखाटलेली ही मोठी रांगोळी तुमच्या सणाची शोभा नक्किच वाढवते. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇

https://youtu.be/Qp2lUA_6rv4


व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)




गणेश रांगोळी

 #गणेश_रांगोळी 

अतिशय सोप्या पद्धतीने काढलेली आकर्षक अशी ही गणेश रांगोळी तुम्हाला नक्की आवडेल.  रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇👇👇

https://youtu.be/4JQYa7sgQis

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)


बुद्ध पौर्णिमा 2022

 #बुद्ध_पौर्णिमा

    बुद्ध पौर्णिमा विशेष आकर्षक आणि तितकीच सोपी पोस्टर रांगोळी ईथे देत आहे. ही रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/SLMNGpSXmbE

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



ती ,वेळ आणि चहा

 

#जागतिक_चहा_दिवस निमित्त......

*********** ती,वेळ आणि चहा **********
तिची ही धंद्याची वेळ. रोजच्या सारखी मुरडत ती गिर्‍हाईक शोधत होती. तेवढ्यात  पाऊस सुरू झाला अन् ती चिंब भिजली. मोडक्या छताचा आसरा घेत ती थांबली. या संधीचा फायदा घेत काही जण तिला उगाच खेटू लागले  तर काही नजरेनेच तिचे चीर हरण करू लागले. तीही या सगळ्याला निर्ढावलेली होती तरी ओल्या देहाकडे बघणाऱ्या वखवखलेल्या नजरा बघून  फुकट मजा घेवू पाहणाऱ्यांची तिला किळस आली . तेवढ्यात त्याने आपल्या बलदंड  हाताने वाफाळत्या चहाचा कप तिच्या समोर धरला. त्याच्या त्या छोट्याशा कृतीनेच काहींनी आपल्या हातची संधी गेली म्हणत काढता पाय घेतला. तर काहींनी त्याच्या धिप्पाड शरीरयष्टीकडे बघत आपला फालतू मोह आवरता घेतला.
तिची चहाची वेळ नसतांनाही तिच्या वेळेला धावून आलेल्या चहाच्या कपाभोवती तिच्या हातांची पकड घट्ट झाली. तो मात्र पाऊस थांबला तसा आल्या मार्गाने निघूनही गेला.
©️Anjali Minanath Dhaske ( Elgire)



मोराची आकर्षक रांगोळी


 #flowerrangoli

मोराची आकर्षक रांगोळी 

ही रांगोळी सोप्या पद्धतीने काढली आहे . तरीही ती फार आकर्षक दिसते आहे.  कशी काढली हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ईतर सोप्या सुंदर रांगोळ्या पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube चॅनल Subscribe करायला  विसरू नका. 

©️Anjali Minanath Dhaske ( Elgire)

https://youtu.be/OpJj235TTVc  👇👇👇👇





तिलकुंद गणेश चतुर्थी 2022

 तिलकुंद गणेश चतुर्थी 2022

#DIY #Ganesh #MakarSankranti
#Rangoli
तुमच्याकडे रांगोळी काढण्याचे फारसे कौशल्य नसले तरी तुम्ही ही रांगोळी सहज काढू शकता. काळ्या #तिळाचा वापर करत गणेशाचे सुंदर रूप रांगोळीत रेखाटले आहे.
अत्यंत #आकर्षक अशी ही रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा

DIY #Ganesh #Rangoli for #Chaturthi #चतुर्थी निमित्त सुंदर #गणेश #रांगोळी #Sand_art
व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)


https://youtu.be/5yzVYnPgqK8




अक्षय तृतीया 2022 ( दोन रांगोळ्या)

#अक्षयतृतीया 2022 ( दोन रांगोळ्या)

 #rangoli_design 

या अतिशय सोप्या आणि सुंदर रांगोळ्या  कशा काढल्या हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

रांगोळ्या आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करायला विसरू नका. 

@Anjali Minanath Dhaske (Elgire)

https://youtu.be/oR2y5w_gets 👇👇👇