रक्षाबंधन स्पेशल छोट्यारांगोळ्या भाग३ (४ते४ थेंबी)


#रक्षाबंधन_स्पेशल
#४ते४ठिपक्यांच्या
#छोट्या_रांगोळ्या
#भाग३
#कमळ
#मोर
#स्वस्तिक
#दिवे
खास तुमच्यासाठीच घेवून येत आहे. मोर ,कमळ, स्वस्तिक दिवे अशी चिन्हे असलेल्या अगदी सोप्या आणि सुंदर रांगोळ्या .
रांगोळ्या बघितल्यावर तुम्हालाही रांगोळी काढून बघण्याचा मोह अनावर होईल.
सुंदर  रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर छोट्या रांगोळ्यांचे तीन प्रकार (भाग ३) हा व्हिडिओ नक्की बघा. याचेच भाग १  आणि भाग २ हे व्हिडिओ ही बघायला विसरु नका.
सगळ्या रांगोळ्या बघण्यासाठी *रंग माझा वेगळा* या यू ट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे )

                          प्रकार १:


प्रकार २:



प्रकार ३:







जागतिक मैत्री दिवस रांगोळी २०२०

#जागतिक_मैत्री_दिवस(२०२०)
#आगळी_वेगळी
#रांगोळी 
       जागतिक मैत्री दिवस निमित्त घेवून येत एक सुंदर आगळी वेगळी रांगोळी. आपल्या परसबागेतील फुला पानांचा वापर करून एक अनोखी रांगोळी साकारता येते. अगदी सोपी सुंदर अशी ही रांगोळी तुम्हाला आवडली का ? प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका.
जागतिक मैत्री दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
          असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि
"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
Thank you
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

रक्षाबंधन स्पेशल छोट्या रांगोळ्या (४ते४थेंबी) भाग २



#रक्षाबंधन_स्पेशल२०२०
#छोट्या_रांगोळ्या
#भाग२
#४ते४थेंबी
श्रावणात सणांची रेलचेल असते. रोज देवासमोर / दारात छोटी का होईना रांगोळी काढावी वाटते.
    म्हणूनच खास तुमच्यासाठी घेवून येत आहे #४ते४ ठिपक्यांच्या #झटपट होणाऱ्या आणि तितक्याच #सुंदर दिसणाऱ्या रांगोळ्या.  #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. आकाराने #अतिशय #छोट्या असल्याने ह्या रांगोळ्यांना जास्त #जागा आणि वेळ लागतं नाही.
विशेष म्हणजे रक्षाबंधन सणाला  याच छोट्या  रांगोळ्यांच रूपांतर राखी रांगोळी मधे अगदी सहज करता येते.
      सुंदर  रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर छोट्या रांगोळ्यांचे तीन प्रकार (भाग २) हा व्हिडिओ नक्की बघा. याचेच भाग १  आणि भाग ३ हे व्हिडिओ ही बघायला विसरु नका.
   #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त. तुम्हीही काढून बघा. तुम्हाला रांगोळी शिकण्यासाठी या व्हिडिओचां फायदा होतो आहे का? हे जाणून घ्यायलाही नक्की आवडेल.
#व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करू शकता. तसेच  *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि
"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
Thank you
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

                           प्रकार १:



प्रकार २:


प्रकार ३:





प्रकार ४:


छोट्या रांगोळ्या


राखी रांगोळ्या






श्रावण_सोमवार१ शिवामूठ रांगोळी (२०२०)


#श्रावण_सोमवार१
#शिवामूठ
#रांगोळी
     
 यंदा घराबाहेर पडून मंदिरातील महादेवाचे दर्शन घेवून शिवामूठ आणि बेल पाने वाहाने शक्य नसले तरी घरच्या घरी सुरक्षित वातावरणात शिवा मूठ पासून मनमोहक  रांगोळी साकारून ती रांगोळी शिव चरणी अर्पण करून भक्तीमय वातावरणाची निर्मिती नक्कीच करू शकता. बेल पाने रांगोळीत साकारून घरच्या घरी मनोभावे पूजा करून मन आणि घर प्रसन्न ठेवू शकता.
         म्हणूनच खास तुमच्यासाठी घेवून येत आहे  #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी #रांगोळी. ह्या रांगोळीला जास्त #जागा आणि वेळ लागतं नाही.
तयार रांगोळी बघितल्यावर तुम्हालाही अध्यात्मिक सुखाचा अनुभव येईल.
#व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करू शकता. तसेच  *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि
"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Thank you
धन्यवाद
#Stayhomestaysafe
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

ती, तो आणि प्रेमळ संवाद (प्रसंग २)

    #ती_तो_आणि_प्रेमळ_संवाद
प्रसंग २
   ©️ अंजली मीनानाथ धस्के
 कोरोना नावाच्या विषाणूने जग बंद पाडलं होतं पण तीच काम काही बंद पडलं नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच फुकट गेल्या. पावसाळी सहलीला   जाण्याचे योगही नष्ट झाले. चीनी लोकांच्या वृत्तीचा आणि सामानाचा निषेध करून झाला तरी हा मेला विषाणू मरायच नाव घेत नाही याचा राग मनात खदखदत होता. आपणच बनवायचं, आपणच खायचं आणि नंतर आपणच भांडी घासायची याचा आलेला कंटाळाही लपवू म्हंटल तरी तिला लपवणे कठीण जात होत. त्याचा ताण शरीरावर आणि मनावरही येत होताच.
 अधिक महिन्यात माहेरी जाता येणार नाही याची चिंताही मनाला सतावत होती. दिवसाच्या रूटीनमधे या  ऑनलाईन शाळेने जी काही उलथा पालथं केली होती तिचा जोरदार विरोध करण्याचा विचार असूनही तो कधीच कृतीत आणता येत नाही याची सलही मनात बोचत होतीच.
     सकाळी सकाळी डबा  बनवण्याची घाई असलेल्या तिच्या डोक्यात विचारांचा नुसता गोंधळ सुरू होता.
          इतक्यात ऑफिसला जाण्याची तयारी करत असलेला नवरोबा अधून मधून स्वयंपाक घरात चक्कर टाकून जात होता. पहिल्या खेपेला त्याच्या हातात नाश्त्याची प्लेट दिली. दुसऱ्या खेपेला मस्त गरमा गरम चहा दिला. तरी तिसऱ्या खेपेला ती डबा नीट भरते आहे की नाही याची खात्री करून घेत तो उगाच तिथे घुटमळला.
     आपण तिच्यावर लक्ष ठेवतो आहे हे तिच्या लक्षात येवू नये म्हणून उगाच खिडकी बाहेर झाडाच्या फांदीवर  अंग फुगवून निवांत बसलेल्या चिमण्याकडे बघत तो बोलला ," बघ ग ...  लॉकडाऊनमुळे हा चिमणा जाड झालाय ना ?"
     तिने  चिमण्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला. एक जळजळीत कटाक्ष शर्टच्या इन मधे लपण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या ढेरीकडे टाकला  आणि बोलली ," चिमणा जाड झालाय खरा "
तस त्याने एका श्वासात पोट आत  तर पाय काढता घेतला.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबतीला रांगोळी ही आहेच.

ती, तो आणि प्रेमळ संवाद ( प्रसंग १)

#ती_तो_आणि_प्रेमळ_संवाद
प्रसंग १
©️ अंजली मीनानाथ धस्के
    टिव्ही वर साबणाची जाहिरात पाहिली की तिला भारी नवल वाटत.
जाहिरातीतील स्नानगृह हे झाडा झुडूपानी भरलेलं जंगलच  असतं.....
आंघोळीला जातांना यातल्या बायका  साबणाची नवी कोरी वडी काय घेतात. त्या वडीवरच नाव दाखवत आंघोळ काय करतात. अंघोळ करून झाली रे झाली की स्नान गृहाच्या बाहेर पडल्यावर आई, मुलगी, बहीण, वहिनी तत्सम ....जी कोणी व्यक्ती बाहेर असेल तिला आधी मिठी काय मरतात.   कौतुक करायला नवरा हजर असतो आणि तो भरभरून स्तुती काय करतो. साबणाची वडी असते अगदी त्याच रंगाचे मॅचींग कपडे काय घालतात. भरीस भर छोटी पोरगी....  गर्दीतही "मम्मी " अशी हाक मारते.... त्याचंही कोण कौतुक .... म्हणे संतूर मम्मी .
चिमुकली पोरगी ... पुन्हा पोरगीच हं .... आपल्या सगळ्या मित्र परिवाराला घेवून आंघोळ करून शुचिर्भूत झालेल्या आपल्या आईच्या दर्शनासाठी काय  येणार  "मिम्मी तुझा चेहरा बघितला की दिवस चांगला जातो काय म्हणणार.
किटाणू मारायची वेळ आली की मग चिखलात लोळायच काम मात्र  मुलांच्या वाट्याला येणार. त्यांची आई ती आणि तिचा गुणी बाळ किटाणू मारण्यात कसे तज्ञ आहेत हे मिरवणार.
वरील अनेक गोष्टी जुळवून आणल्या तरी मुलगी नसणाऱ्या आयांना सुंदर  मम्मी .... सो कॉल्ड संतूर मम्मी बनता येणार नाहीच का ???? आम्ही काय कायम किटाणूच मारत बसायच का जन्मभर ????
असा खडा सवाल तिने लॅपटॉप मधे डोकं घालून काम करणाऱ्या तिच्या नवरोबाला विचारला ........
तो ढिम्म....
ते काही नाही ..... मुलगी नसली म्हणून काय झालं....
मलाही संतूर मम्मी बनायचं आहे. तिने तिचा निरागस हट्ट त्याच्या पुढे पुन्हा नेटाने मांडला.
"चिंताssतूर" मम्मी आहेस तेवढं पुरेस नाही का ??? अजून " संssतूर  " मम्मी कशाला हवंय. असं म्हणत तो स्वतःच्याच शब्द कोटीवर मोकळा हसला...
      बाळराजेंनी नजरेनेच वडीलांना सहनभूती दाखवली. तसा
नवरोबाचा श्वास अडकला तरी त्याने धैर्याने ' तो मी नव्हेच' असे भाव चेहऱ्यावर ठेवून पुन्हा लॅपटॉपमधे डोकं खुपसून काम करत असल्याचा अभिनय सुरू ठेवला.
शब्द तीर वर्मी घाव लागेल याचा ठाव घेत निघाला होता.    घरात एकदम भयाण शांतता पसरली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

नागपंचमी २०२०

#नागपंचमी
 #रांगोळी
#४ते४ठिपक्यांची 
 यंदा घराबाहेर पडून नागपंचमी साजरी करणे सुरक्षित नसले तरी घरच्या घरी सुरक्षित वातावरणात नागाचे मनमोहक रूप तुम्ही रांगोळीत साकारू शकता.
पाटावर ही रांगोळी काढून मनोभावे पूजा करू शकता. मन आणि घर प्रसन्न ठेवू शकता.
         म्हणूनच खास तुमच्यासाठी घेवून येत आहे #४ते४ ठिपक्यांची #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी #रांगोळी. आकाराने #अतिशय #छोटी असल्याने ह्या रांगोळीला जास्त #जागा आणि वेळ लागतं नाही.

या आधी तुम्ही अशी सोपी सुंदर रांगोळी बघितली नसेल.
#व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करू शकता. तसेच  *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि
"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Thank you
धन्यवाद
#Stayhomestaysafe

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
रोज काढण्यासाठी छोटया व अतिशय सोप्या रांगोळ्या ही चॅनलवर उपलब्ध आहेत.

महादेव रांगोळी (४ ते ४ ठिपक्यांची)


#श्रावण_मासारंभ
#महादेव #रांगोळी
#४ते४ठिपक्यांची

श्रावण निमित्त  ४ते४ थेंबी महादेव रांगोळी सुंदर ६ प्रकार
        श्रावण सुरू होणार आहे. श्रावणात सणांची रेलचेल असते.
यंदा घराबाहेर पडून महादेवाचे दर्शन घेणे सुरक्षित नसले तरी घरच्या घरी सुरक्षित वातावरणात महादेवाची सहा सुंदर मनमोहक रूपे तुम्ही रांगोळीत साकारू शकता. मन आणि घर प्रसन्न ठेवू शकता.
        रांगोळी काढायची इच्छा असते पण  नीट जमत नाही.  म्हणूनच खास तुमच्यासाठी घेवून येत आहे #४ते४ ठिपक्यांच्या #झटपट होणाऱ्या आणि तितक्याच #सुंदर दिसणाऱ्या रांगोळ्या.  #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. आकाराने #अतिशय #छोट्या असल्याने ह्या रांगोळ्यांना जास्त #जागा आणि वेळ लागतं नाही. 
या आधी तुम्ही अशा रांगोळ्या बघितल्या नसतील.
  रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर छोट्या महादेव रांगोळ्यांचे सहा प्रकार असणारा  हा व्हिडिओ नक्की बघा  #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त. तुम्हीही काढून बघा.  तुम्हाला सकारात्मक वातावरण निर्मितीचा अनुभव घेता येईल. तुम्हाला रांगोळी शिकण्यासाठी या व्हिडिओचा फायदा होतो आहे का? हे जाणून घ्यायलाही नक्की आवडेल.
      तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेयर करायला विसरू नका.
#व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करू शकता. तसेच  *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇
https://youtu.be/vU68kDz-o6U

Thank you for watching this video.
धन्यवाद
#Stayhomestaysafe
रंग माझा वेगळा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
                             प्रकार १:

प्रकार २:


प्रकार ३:


    
                                प्रकार ४:

प्रकार ५:


प्रकार ६:




रक्षाबंधन स्पेशल२०२० छोट्या रांगोळ्या भाग१ (४ते४थेंबी)

#रक्षाबंधन_स्पेशल२०२०
#छोट्या_रांगोळ्या
#भाग१
#४ते४थेंबी
श्रावण मासारंभ निमित्त
श्रावण सुरू होणार आहे. श्रावणात सणांची रेलचेल असते.
        रांगोळी काढायची इच्छा असते पण  नीट जमत नाही.  म्हणूनच खास तुमच्यासाठी घेवून येत आहे #४ते४ ठिपक्यांच्या #झटपट होणाऱ्या आणि तितक्याच #सुंदर दिसणाऱ्या रांगोळ्या.  #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. आकाराने #अतिशय #छोट्या असल्याने ह्या रांगोळ्यांना जास्त #जागा लागतं नाही. रक्षाबंधन सणालाही  याच छोट्या रांगोळ्यांच रूपांतर राखी रांगोळी मधे अगदी सहज करता येते.
  रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर छोट्या रांगोळ्यांचे तीन प्रकार (भाग १) हा व्हिडिओ नक्की बघा  #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त. तुम्हीही काढून बघा.  तुम्हाला सकारात्मकत वातावरण निर्मितीचा अनुभव घेता येईल. तुम्हाला रांगोळी शिकण्यासाठी या व्हिडिओ चां फायदा होतो आहे का? हे जाणून घ्यायलाही नक्की आवडेल.
 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करू शकता. तसेच  *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇👇👇👇👇
https://youtu.be/gKm0S2ForEU
#Stayhomestaysafe
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
               

                      प्रकार १:


प्रकार २:





प्रकार ३:





छोट्या रांगोळ्या


राखी रांगोळ्या






बॉर्डर रांगोळ्या ( तीन प्रकार)

 #सुंदर
#बॉर्डर
#रांगोळ्यांचे तीन प्रकार
सणांची शोभा रांगोळीने वाढते म्हणूनच अगदी सहज सुंदर सोप्या दारातील/ देवघरा समोरील  बॉर्डर रांगोळीचे प्रकार इथे देत आहे. तुम्हीही काढून बघा. कमी वेळात झटपट होणाऱ्या या रांगोळ्यांनी  तुमच्या घराची/ सणांची शोभा नक्कीच वाढेल. तुम्हाला सकारात्मकत वातावरण निर्मितीचा अनुभव घेता येईल. तुम्हाला रांगोळी शिकण्यासाठी या व्हिडिओ चां फायदा होतो आहे का? हे जाणून घ्यायला नक्की आवडेल.
व्हिडिओ आवडल्यास *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
#Stayhomestaysafe
रांगोळ्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://youtu.be/Ou5Dx2Z7jSk
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

                              प्रकार १:

प्रकार २:


प्रकार ३:






फुलपाखरू रांगोळी (४ते४थेंबी)

 #फुलपाखरू
#रांगोळी
#४ ते ४ थेंबी
        रांगोळी काढायची इच्छा असते पण हाताला वळण नसल्याने #रांगोळी नीट जमत नाही. #ठिपक्यांची_रांगोळी ही हाताला वळण देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. म्हणूनच #४ते४ ठिपक्यांची #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी रांगोळी खास तुमच्यासाठी. #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आकाराने #अतिशय #छोटी असल्याने ह्या रांगोळीला जास्त #जागा लागतं नाही. कुठलीही #भीती न बाळगता पुढच्या पिढीने  रांगोळीचा #वारसा जपावा म्हणून केलेला हा #प्रयत्न. रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हा व्हिडिओ नक्की बघा  #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त.
 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://youtu.be/sVDKhBegTek
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

छोट्या रांगोळ्या

#कमी_रांगोळीत
 #सुंदर
 #छोट्या_रांगोळ्या
     आपल्या संस्कृतीत सण समारंभ , व्रत, उपासना यांना खूप महत्त्व आहे. श्रावणाची चाहूल म्हंजे सणांची चाहूल. सणांचं येणं म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा अनुभव असतो. परंतु सध्या एक प्रकारची नकारात्मकता वातावरणात पसरली आहे.
सणांची शोभा रांगोळीने वाढते म्हणूनच अगदी सहज सुंदर सोप्या दारातील/देवघरा समोरील  अगदी छोट्या जागेत काढता येतील अशा छोट्या रांगोळ्यांचे प्रकार इथे देत आहे. तुम्हीही काढून बघा. यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास नक्कीच मदत होईल.
कमी वेळात, कमी रांगोळीत  तुमच्या घराची/ सणांची शोभा नक्कीच वाढेल. अगदी सहज  तुम्हालाही सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेता येईल.
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
या रांगोळ्याचां व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://youtu.be/SGbwGkEJobs

प्रकार १

प्रकार २


प्रकार ३



गणेश चतुर्थी ४ ते ४ थेंबी रांगोळी प्रकार २

#गणेश_चतुर्थी
#४ते४थेंबी
#रांगोळी
#प्रकार२

        रांगोळी काढायची इच्छा असते पण हाताला वळण नसल्याने #रांगोळी नीट जमत नाही. #ठिपक्यांची_रांगोळी ही हाताला वळण देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. म्हणूनच #४ते४ ठिपक्यांची #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी रांगोळी खास तुमच्यासाठी. ४ ते ४ थेंबी गणेश रांगोळी प्रकार २ तुम्हाला नक्कीच आवडेल. प्रकार १ चा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा . गणेश प्रकार १ ची लिंक 👇👇👇👇
https://youtu.be/DXJB8xfxHxk
 #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आकाराने #अतिशय #छोटी असल्याने ह्या रांगोळीला जास्त #जागा लागतं नाही. कुठलीही #भीती न बाळगता पुढच्या पिढीने  रांगोळीचा #वारसा जपावा म्हणून केलेला हा #प्रयत्न. रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि रांगोळी शिकण्याचा #श्री #गणेशा कराच. #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त.
 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
४ ते ४ थेंबी गणेश रांगोळी प्रकार २ चा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://youtu.be/XDgQ02EUVdk
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
गणेश रांगोळी प्रकार २:


वयाच्या नाजूक वळणावरचे प्रेम

#वयाच्या_नाजूक_वळणावरचे_प्रेम
©️ अंजली मीनानाथ धस्के

   हल्ली नवऱ्याच माझ्याकडे मुळीच लक्ष नसतं. मी अनेकदा या विषयावर  त्याच्याशी  बोलले पण ऑफिस मधे खूप काम असतं म्हणून दुर्लक्ष होतंय माझ्याकडे अशीच सबब तो पुढे करतो.
          मी वयाच्या नाजूक वळणावर .  असचाळीशी आली की असे म्हणतात , या वयात मन उत्साहाच्या घोड्यावर स्वार होऊन तारुण्यात हातून  निसटलेला  प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने  वेचू पहातं. वयाच्या या नाजूक वळणावर कोणीतरी आपल्याकडे आवर्जून  लक्ष द्यावं... आपल्या वाचून कोणाचं तरी अडावं.... आपल्यावर कोणीतरी जीवापाड... वेड्यासारखं प्रेम करावं... आपणही बेधुंद मनाच्या लहरींवर स्वार होत मुक्त भावनांची उधळण करावी. असं उगाचंच वाटायला लागतं.
असं असतांनाही नावरोबा माझ्याकडे दुर्लक्ष करणार तर माझं मन या सगळ्यांचा शोध घेत भटकटणारच.
         मी विचारांच्या समुद्रात गटांगळ्या खात असतांना एक दिवस अचानक ' तो ' माझ्या आयुष्यात आला. स्वयंपाक घराच्या खिडकीतून त्याची आणि माझी नजरानजर झाली. तो दिसायला राजबिंडा होता.  नकळत माझी नजर त्याच्यावरच खिळली.
 वय कितीही उधळू पहात असल तरी मी इतकीही चंचल स्वभावाची नाही. त्यामुळे सुरवातीला मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्याच्या दिसण्यावरून त्याच्या वयाचा अंदाज येत नव्हता. पण आता तो हळू हळू माझा अंदाज घेत बोलू लागला. लोक काय म्हणतील या भीतीने मी त्याच्याशी एक शब्द बोलायचे नाही. त्यालाही ते जाणवलं असावं. तो ही पक्का बेरकी होता. नवरा माझ्याजवळपास असला की हाही माझ्याकडे बघून न बघितल्या सारखं करी. नवर्‍यासाठी सकाळचा डब्बा बनवत असतांना रोज मीही चोरून चोरून त्याला बघत होतेच.
आता त्याने   नवरा ऑफिसला गेल्यावर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याची प्रत्येक हालचाल मोहक होती. त्याचं  वागणं खूप संयमी होतं. न बोलताही माझी घाई , चीडचीड त्याला कळत होती. मी चिडून स्वतःशीच बडबड करत असले तरी तो शांतपणे सगळं ऐकुन घेत होता. त्याचा आवाज दमदार होता. तरी तो हळुवार गोड आवाजात मला बोलला की माझा रागही शांत होई. त्याच असणं मला सुखावू लागलं.
 अखेर मी त्याच्याकडे आकर्षित झालेच.
       सकाळी नवऱ्याने दहादा आवाज दिला तरी उठायला टाळाटाळ करणारी मी सुटीच्या दिवशीही त्याची हाक कानी पडताच उठून बसत होते. चहाचा बहाणा करून स्वयंपाक घरात रेंगाळत होते. त्याच्या आवडीचे पदार्थ सगळ्यांच्या चोरून त्याला खायला घालत होते.
     फक्त सकाळीच भेटणारा तो आता मुद्दाम दिवसातून चार वेळा चकरा मारत होता. मीही वेड्यासारखी त्याच्याशी बोलता यावं म्हणून स्वयंपाक खोलीत जास्तीत जास्त वेळ घालवत होते.
         दुपारचा चहा तर हमखास आम्ही सोबत घेत होतो. घरात कोणी तिसरा नाही याची कल्पना येताच तो आनंदात मोठमोठ्याने गप्पा मारायचा. त्याच माझ्या हालचालींवर बारीक लक्ष असायचं. ही बाब मला खूप सुखावत होती. मीही त्याच्या आवडी निवडी जपत होते. दिवस आनंदात जात होते. पूर्वी नवरा ऑफिसला जायला निघाला की प्रेमाने अडवणारी मी आता घाई घाईने डब्बा त्याच्या हातात कोंबून त्याला घराबाहेर काढत होते. माझ्यातले हे बदल नवऱ्याच्याही लक्षात आले पण नेहमीप्रमाणे  दुर्लक्ष करणं नवऱ्याला जड जावू लागले.
 '  तो' माझ्याशी इतका गोड आणि मोकळे पणाने बोलायचा की मी सतत त्याच्या येण्याची वाट बघायचे. मुलाचे लाड पुरवणारी मी आता मात्र त्याची चाहूल लागताच मुलाकडे ही दुर्लक्ष करू लागले.  त्याचं माझ्याशिवाय अडत या जाणीवेने मी मुलाचा विरोध ही मोडीत काढला. आमच्या भेटी वाढल्या तसा तो मला आणि मी त्याला अधिक समजून घेवू लागलो. 
आमच्या भेटीत एक दिवस ही खंड पडू नये असं वाटत असतांनाच रविवार यायचा आणि कामाच्या व्यापात त्याला रोज सारखा निवांत वेळ देणं मला अशक्य होवून बसायचं. त्याची भरपाई म्हणून तो सोमवारी त्याच्या आवडीचा पदार्थ माझ्याकडून घेतल्याशिवाय ऐकायचा नाही.
बाहेरगावी गेल्यावर तर मला त्याची आठवण छळायची. त्याच्या ओढीने मी घरी परत आले की तोही त्याचा लटका राग व्यक्त करत त्याने मला कितीदा आठवले हे सांगायचा.
एक वेगळंच नात आमच्यात तयार झालं होतं. त्याला माझ्या बद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला होता.
 पण ......
पण एकदिवस अचानक तो तिला घेवून आला. त्याच्या आयुष्यात ' दुसरी' आली. माझ्याशी खिडकीतूनच का होईना पण तिचा औपचारिक परिचय करून दिला. एका स्त्रीला... आपल्या नवऱ्याच्या मैत्रिणीबद्दल वाटते तशीच असूया.... भीती तिच्या वागण्यात जाणवत होती. आमच्यातला हा तणाव संपावा म्हणून तो बडबड करून वातावरण हलकं करू पहात होता. तो माझ्याशी वागायचा त्या पेक्षाही  तिच्याशी मोकळेपणाने वागत होता ते पाहून मला खात्री पटली की खरं तर त्याच्या आयुष्यातली ती 'पहिली '.... मीच ' दुसरी ' होते. एखाद्याच्या आयुष्यात ' दुसरी ' होण काय असतं ते दुःख मी त्या निमित्ताने अनुभवलं.
    वाढत्या वायाला मी कितीही लपवू पहात असले तरी   वयानुसार माझ्यात समजूतदारपणाही वाढला होता. तो लपवणे शक्य नव्हते.  ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे डोळे खूपच बोलके होते. त्याच्या राजबिंड्या रूपाला ती अगदी साजेशी होती. पहिल्यांदाच आली आहे म्हंटल्यावर मी तिला पेढ्याची पोळी दिली. ती अजिबात खायला तयार नव्हती. त्याने समजावल्यावर तिने मनाविरुध्दच खाण्याच नाटक केलं. तिचा माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता हे तिच्या वागण्यात मला स्पष्ट जाणवलं
       वर वर समजूतदारपणा दाखवत असले तरी तिच्या अशा वागण्याने त्या दोघांमधे मी तिसरी ठरत होते. मन अजुनच दुख्खी झालं. माझ्या अपेक्षा तरी काय होत्या..... त्याने माझ्याशीच बांधील रहावं अशी सक्ती मी कधीच केली नव्हती. त्याला त्याच हक्काचं माणूस हवंच... याला माझी हरकत नव्हतीच. त्याच्या आयुष्यात मी कायम ' दुसरी' राहणार हे ही मी मान्य करायला तयार होते. माझ्या मनाचा जराही विचार न करता तो तिला घेवून आला . एरवी माझ्याशी गोड बोलणारा तो आता तिच्या भोवती गोंडा घोळत होता . तिच्या आवडी निवडी जपत होता . हे ही मी सहन करायला तयार होते.
 पण तिचा माझ्या प्रतीचा अविश्वास  .... मला रोज रोज सहन करणं जड जात होतं.
न रहेगा बास न बजेगी बांसुरी..... या उक्तीप्रमाणे अखेर
 मी स्वयंपाक घराची खिडकी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.
       नवऱ्याला शंका आली होतीच. त्यात स्वयंपाक करतांना सतत  खिडकी उघडीच ठेवणारी मी आता खिडकी बंद करून बसले होते. नवरा आता माझ्याकडे वेळात वेळ काढून लक्ष देत होता. मला काय हवं नको ते जातीने बघत होता. वेळोवेळी त्याच माझ्यावर असलेलं प्रेम आवर्जून व्यक्त करत होता.
 'तो' ही न चुकता खिडकीत येत होता. सोबतीला तिलाही घेवून येत होता.  जणू काही आमच्या नात्यात काहीच बदल झाला नाही हे मला दाखवू पाहत होता. 
मी लक्ष देत नाही म्हंटल्यावर रविवारी सकाळी तर त्याने इतका गोंधळ घातला की नवऱ्यालाही जाग आली. मी धावतच नवऱ्याच्या मागे गेले.
 नवऱ्याने आधी स्वयंपाक घराची खिडकी उघडली. नवऱ्याने खिडकी उघडताच तो जरा बावरला पण त्याचा निर्धार पक्का होता. त्याच्या सोबत तीही होतीच.
 त्याचं तिच्यावर प्रेम होतं पण त्याला मीही हवी होती. स्वयंपाक घराची ती खिडकी म्हणजे त्याच हक्काचं दाणा पाणी मिळण्याच ठिकाण होतं. दिवसभर भटकून थकल्यावर खिडकीतल्या झाडावर बसून तो माझ्याशी आणि आता तिच्याशी गप्पा मारायचा ते त्याचे विसव्याचे क्षण होते. त्याला ते गमवायचे नव्हते. तो मोठ मोठ्याने चिवचिवाट करून  मला त्याच्या मनातली तगमग  सांगत होता.
     खरं तर आम्हा दोघांना स्वतःचे स्वतंत्र आयुष्य असले तरी आता एकमेकांची सवय झाली होती. मलाही खिडकी बंद करून रहाणं जड जात होतंच ..... मग काय... मी माझा हट्ट मागे घेतला. चहा करता करता मी हळूच तांदळाचे दाणे त्याला खायला दिले आणि नवऱ्याला आमच्यातल्या तिसऱ्याचा अलगद शोध लागला.
       माझ्यासाठी .... माझ्यावरच्या प्रेमासाठी..... नवऱ्याने आम्हाला थोडा एकांत मिळावा म्हणून "चालू द्या तुमचा संवाद ... मी  जावून फ्रेश होतो  म्हणत काढता पाय घेतला".
    तांदळाचे दाणे बघताच त्यानेही लगेच तिला आवाज दिला. दोघांनी मस्त पोटभरून न्याहारी केली. आज ती लगेच उडून गेली नाही. दोघंही जरा वेळ मागेच रेंगाळले .
             झाडाच्या फांदीवर बसलेला तो पूर्वी सारखाच चिवचिवाट करत होता.  तीची  मात्र शांत राहून  चुळबुळ सुरु होती. त्याच्यासाठी तिने मला  भित भित का होईना स्विकारलं.
 एक ना एक दिवस तिला माझ्याबद्दल विश्वास वाटेल आणि ते दोघं आपल्या पिल्लांनाही विश्वासाने माझ्याकडे घेवून येतील. अशी मला आशा होती. तेवढ्यात चहाची वाट बघणाऱ्या नवऱ्याने त्यांच्याकडे बघत मला  चिडवल...." त्यांचे लाड पुरवून झाले असतील तर मलाही एक कप चहा हवाय?" असं म्हणतच नवऱ्याने हळूच भरलेला पाण्याचा पेला त्यांच्या रिकाम्या मडक्यात ओतला. तो चिवचिवाट करायचा थांबला. हळूच खाली उतरून दोघेही पाणी प्यायले . तृप्त होवून भुरकन उडून गेले. 
 मी मात्र नवऱ्याच्या या छोट्याश्या कृतीने वयाच्या या नाजूक वळणावर नव्याने त्याच्या प्रेमात पडले.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबतीला रांगोळी आहेच. इतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. ब्लॉग ची लिंक anjali-rangoli.blogspot.com हि आहे.




महाराष्ट्रीय बेंदुर / बैल पोळा / वसू बारस २०२०(४ ते ४ ठीबक्यांची रांगोळी)


 #महाराष्ट्रीय
#बेंदूर
#बैल_पोळा
#वसुबारस
 #रांगोळी
        रांगोळी काढायची इच्छा असते पण हाताला वळण नसल्याने #रांगोळी नीट जमत नाही. #ठिपक्यांची_रांगोळी ही हाताला वळण देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. म्हणूनच #महाराष्ट्रीयन_बेंदुर निमित्त  #४ते४ ठिपक्यांची #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी #बैल_पोळा रांगोळी खास तुमच्यासाठी घेवून येत आहे. या रांगोळीचे वैशिष्ट्य म्हणजे याच रांगोळीचा वापर तुम्ही #दिवाळीतील #वसू_बारस या सणाला ही गाय आणि वासरू काढण्यासाठी करू शकता.
 #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आकाराने #अतिशय #छोटी असल्याने ह्या रांगोळीला जास्त #जागा लागतं नाही. कुठलीही #भीती न बाळगता पुढच्या पिढीने  रांगोळीचा #वारसा जपावा म्हणून केलेला हा #प्रयत्न. रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि रांगोळी शिकण्याचा #श्री #गणेशा कराच. #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त.
 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
#Stay_home #stay_safe
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे )
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://youtu.be/39_LCPftpfg