नूतन वर्ष २०१६

नूतन वर्ष २०१६ च्या आगमनानिमित्त :  उगवता  सूर्य हा नेहमीच सकारात्मक ऊर्जा घेवून येतो.  तरीही  आजचा सूर्य नव्या नवलाईचं  तेज घेवून येतो......  नव नव्या संकल्पनांचा नजराणा......  सोबतीला  आशेच्या   नव्या किरणांची झळाळी........ आणि  सर्वात विशेष म्हणजे नवीन वर्षाची नव्हाळी.... म्हणूनच आजचा सूर्य काही खास असतो...... नव्या वर्षाचा आरंभ..... तर नव्या स्वप्नांचा प्रारंभ असतो. नव वर्षाच्या सूर्याचे स्वागत करतांनाची प्रसन्न  पहाट रेखाटण्याचा माझा हा प्रामाणिक  प्रयत्न आहे. माझ्या सर्व वाचकांना नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा......... 



दारात कढ़ावयाची बॉर्डर

                                                                    १ : बॉर्डर प्रकार

 
 
                                                                      २ : बॉर्डर प्रकार

 
 ३  : बॉर्डर प्रकार
 
 
 
 ४  : बॉर्डर प्रकार
 


 ५   : बॉर्डर प्रकार
 
 
६ :  बॉर्डर प्रकार  
 

 
 

दिव्याभोवती काढावयाची रांगोळी

दिव्याभोवती काढावयाची रांगोळी

 

दिवाळी \ लक्ष्मी पूजन निमित्त ( २०१५ )

दिवाळी हा सण खऱ्या अर्थाने दीपोत्सव आहे,   दिव्यांचा प्रकाश अंधाराला दूर करून  मंगलमय वातावरणाची  अनुभूति देतो. दिवाळीच्या पाच दिवसांपैकी दिवाळी पहाट विशेष   महत्त्वाची असते.  म्हणूनच अभ्यंग स्नानाच्या  सोबतीने  दिव्यांच्या पवित्र प्रकाशात न्हावून निघालेल्या पहाटेला रांगोळीत चित्रित करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आकाश दिवा आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही. ही दिवाळी सर्व वाचकांना  आणि त्यांच्या  कुटुंबीयांना  आनंदाची आणि भरभराटीची जावो .......



( रांगोळी आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरु नका. )

धनत्रयोदशी निमित्त काढलेली मोराची रांगोळी

धनत्रयोदशी निमित्त काढलेली मोराची ही  रांगोळी तुम्ही कोणत्याही सणाला काढू शकता.

 

दिवाळीसाठी काढायच्या साध्या सोप्या रंगीत रांगोळ्या

दिवाळीसाठी  काढायच्या साध्या सोप्या रंगीत  रांगोळ्या :

                                                                          डिझाइन क्र. १

 
   डिझाइन क्र. २ 
 
 
                                                                 डिझाइन क्र. ३

 
   डिझाइन क्र. ४ 
 
 

फुलांचे प्रकार

दिवळीसाठी रंगीत फुलांचे रांगोळीतील  काही प्रकार देत आहे. याचा वापर देवघरासमोरील रांगोळीत किंवा दारात कढ़ावयाच्या तोरणात करता येतो.

                                                             फुलांचे प्रकार क्र. १

 
फुलांचे प्रकार क्र. २ 
 
 
फुलांचे प्रकार क्र. ३ 
 
 
फुलांचे प्रकार क्र. ४ 
 
 
 
 
 

रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन

रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन

 

 

रोजच्या काढायच्या साध्या सोप्या रांगोळ्या

 रोजच्या काढायच्या साध्या सोप्या रांगोळ्या



 

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी
 
साधी , सोपी  व झटपट होणारी ही रांगोळी तुम्हीही नक्की काढून बघा. 
 

दारात कढ़ावयाची बॉर्डर

दिवाळीत आपण दाराला रंगीत रांगोळीची बॉर्डर करतो. म्हणूनच बॉर्डरचे काही प्रकार खास दिवाळीसाठी देत आहे. 
 
१ : बॉर्डर प्रकार 
 
 
२ : बॉर्डर प्रकार
 
 
३  : बॉर्डर प्रकार
 
 
४ : बॉर्डर प्रकार
 
 
५ : बॉर्डर प्रकार

 
 

थेंबांच्या रंगीत रांगोळ्या

थेंबांच्या रंगीत  रांगोळ्यांचे काही  प्रकार  येथे दिलेले आहेत.
                                             
                                                            ९ ते ९ थेंबाची रांगोळी 

९ ते ९ थेंबाची रांगोळी  

९ ते ९ थेंबाची रांगोळी  

कोजागीरी निमित्त


पौर्णिमेचा चंद्र संपुर्ण सृष्टीवर जादू करतो. चंद्राचा शीतल प्रकाश आणि त्याची निळसर आभा आपल्या मनाला नेहमीच प्रफुल्लीत करते . तसेच  आयुर्वेदात कोजागीरी पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशाला विशेष महत्त्व आहे. चला तर मग चंद्र प्रकाशाचा हा उत्सव साजरा करूया.....कोजागीरीच्या सर्व वाचकांना शुभेच्छा.


विजयादशमी निमित्त (२०१५ )

दसरा या सणाला अनेक ऐतिहासिक गोष्टींची पार्श्वभूमी आहे. या दिवशी आपट्याच्या पानांना  आणि झेंडूच्या फुलांना  विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोन्यासारखा मान असतो . " सोनं घ्या , सोन्यासारखं रहा " असे म्हणून लहानांनी मोठ्यांना  आपट्याची पाने देण्याची पध्दत आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावून सुशोभित करतात. पहाटेच्या मंगलमय वेळी दाराला झेंडूच्या फुलांचे लावलेले तोरण आणि आपट्याच्या पानाची केलेली पुजा दस-याच्या सणाची जाणीव मनाला देवून प्रसन्न करतात. सर्व वाचकांना दस-याच्या खुप खुप शुभेच्छा .(२०१५ )

 

नवरात्र उत्सव निमित्त

नवरात्र म्हंटल की , देवीचा जागर आला … आणि  जागर म्हंटला की , गरबा आला. म्हणून संगीताच्या तालावर बेधुंद होवून गरबा खेळणाऱ्या जोडीला रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे. ही रांगोळी बघून तुम्हालाही गरबा खेळण्याची इच्छा नक्कीच होईल. गरबा  खेळण्याच्या सोबतीला दारात  रांगोळी काढायला विसरु नका.


नवरात्र उत्सव निमित्त

नवरात्र उत्सव निमित्त  दुर्गा देवीचे मुख रेखाटले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे वेगळेपण हे आहे की, प्रत्येक दिवसाचा स्वतंत्र रंग आहे. प्रत्येक रंग हा देवीच्या एका रुपाच प्रतिक आहे. म्हणूनच नऊ दिवसांच्या नऊ रंगांचा वापर मुखवट्याला बॉर्डर करण्यासाठी प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा…

 

गणेश उत्सव ( अष्टम दिन )

महड येथील गणपतीला श्री वरद विनायक म्हणतात. गुत्समद  ऋषींनी  या गणपतीची स्थापना केली.

  

गणेश उत्सव ( सप्तम दिन )

 रायगड जिल्ह्यात पाली येथे कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा बल्लाळ हा मुलगा  होता. त्याला गणपती  प्रसन्न  झाला . त्या वेळी बल्लाळाने गणपतीला मूर्ती रूपात प्रकट होण्यास संगितले. म्हणून या गणपतीचे नाव बल्लाळेश्वर आहे.

 

गणेश उत्सव ( षष्ठ दिन )

ओझर येथील गणपतीला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर म्हणतात. विघ्नसुराचा नाश करण्यासाठी सर्व देवतांनी याची स्थापना केलेली आहे .

 

गणेश उत्सव ( पंचम दिन )

लेण्यांद्री येथील गणपतीला " श्री गिरिजात्मज " असे म्हणतात. या मूर्तीची स्थापना पार्वती मातेने केली आहे. पार्वतीचे  दुसरे नाव गिरिजा आहे. गिरिजा मातेचा आत्मज म्हणजे पुत्र म्हणून त्याला गिरिजात्मज  म्हणतात.

गणेश उत्सव ( चतुर्थ दिन )

थेऊरचा गणपतीचे  नाव  " श्री चिंतामणी " आहे. या मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली  आहे.

 
( जागा जास्त असल्यास बॉर्डर मधे असाही  बदल करता येतो  )
 
 
 

गणेश उत्सव ( तृतीय दिन )

रांजणगाव येथील गणपतीला " श्री महागणपती " असे म्हणतात. या मूर्तीची स्थापना श्री शंकरांनी केलेली आहे.

 
(जागा जास्त असल्यास  बॉर्डर चा एक वेगळा प्रकार )
 

गणेश उत्सव ( व्दितीय दिन )

सिद्धटेक येथे गणेशमूर्तीची स्थापना केल्यावर भगवान विष्णूला  सिद्धी प्राप्त झाली.  म्हणून  येथील  गणपतीस " सिद्धिविनायक "  म्हणतात. ही मूर्ती स्वयंभू असून अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची  एकमेव मूर्ती आहे.  सिद्धिविनायकाकड़े, " सर्व भक्तांना  सुख , समृद्धी आणि समाधान लाभो  " ही प्रार्थना करुया.


गणेश उत्सव ( प्रथम दिन )

स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धीदम । 
बल्लाळो मुरुडम विनायक मढम चिंतामणी : थेउरम ॥ 
लेण्याद्री गिरिजात्म्जम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरम । 
ग्रामे रांजण संस्थितो विजयताम कुर्यात सदा मंगलम ॥ 
गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरण मंगलमय झालेले आहे. त्यांच्या सेवेसाठी लहान -थोरांची तयारी ही जय्यद झालेली आहे. तर मग मंगलमय रांगोळ्यांना विसरून कसे चालेल.  माझ्या या रांगोळ्या आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी  सप्रेम भेट ……

गणेश उत्सवासाठी अष्टविनायक रंगोळीत रेखाटण्याच्या माझ्या प्रयत्नाला मोरगांव च्या मोरेश्वराला नमन करून सुरुवात करत आहे.  तुम्हालाही या रांगोळ्याच्या प्रवासात सामिल व्हायला आवडेल न.…  , तर मग तुमचा  अभिप्रय कळवायला  विसरु नका. ब्रम्हा, विष्णू , महेश ,शक्ती आणि सूर्य या पाच देवतांनी मोरेश्वर  गणपतीची  स्थापना  केली  आहे.  याच ठिकाणी सिंधू व कमलासूर दैत्यांचा संहार करतांना गणपतीचे वाहन मोर होते. त्यामुळेच या गणपतीला मोरेश्वर किंवा मयूरेश्वर  म्हणतात. येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली आहे. 
(गणेश  मंडळाच्या मंडपात  कमी  रंग वापरून  तयार  केलेल्या  या गालीच्यामधेही  तुम्ही श्री गणेशाची ही  रांगोळी प्रभावीपणे काढू शकता. )



( ४) श्रावण सोमवार २०१५

महादेव हे लोकांना  अध्यात्मिक  भक्तीसाठी सदैव प्रेरीत करत आलेले आहेत. " संसारात राहुनही संन्यासी बनतां येतं" हे आपल्याला त्यांच्याकडुन शिकतां येत. संन्यासाच प्रतिक म्हणजे , ' मस्तकावर रेखाटलेल्या विभूतीच्या तीन रेषा ' .  महादेवाचे त्रिशुल हे  ' मद , मत्सर आणि मोह '  या तीन वाईट गुणांवर नियंत्रण करण्याचे सुचवते . म्हणूनच विभुतीचे तीन पट्टे आणि त्रिशुल असलेले गंध  शिवभक्तांच्याच मस्तकावर शोभून दिसते. आज  श्रावणातला शेवटचा सोमवार तेव्हा शिवाला आणि  शिवभक्तांना माझे शत् शत् प्रणाम.