रोजच्या वाराप्रमाणे काढायच्या रांगोळ्या

             फार पूर्वी जेव्हा  रोज काढायच्या रांगोळीचे तयार साचे मिळत नव्हते तेव्हा माझी आई हाताने त्या रांगोळ्या काढायची. आजही ती या रांगोळ्या हातानेच काढणे पसंत करते. हाताने काढलेल्या रांगोळीची सर तयार साचे वापरून काढलेल्या रांगोळीला येत नाही असेच तिचे मत आहे. तिला ते छोटे छोटे साचे वापरणे क्लेश दायक वाटते. सवईने हाताला वळण लागले आहे तेव्हा हाताने लवकर काढून होतात या रांगोळ्या असे तिचे म्हणणे असते. असो.....
तर वारा प्रमाणे काढायच्या रांगोळ्या  इथे देत आहे. फक्त मंगळवार ( Tuesday ) च्या दोन रांगोळ्या आहेत. एक मंगळवारची आणि एक ' राहू ' ची.
तसेच शनिवारी ( Saturday ) ही दोन रांगोळ्या काढायच्या आहेत. एक शनिवारची आणि एक ' केतू ' ची  यातील प्रत्येक रांगोळीला, तिच्या आकाराला व त्यातील शब्दाला विशेष असे महत्व आहे. रंग तुम्हाला हवे ते वापरा किंवा नका वापरू.... त्याचे बंधन नाही. तुम्हालाही हाताने रांगोळी काढायला आवडत असेल तर नक्की काढून बघा..... या सर्व रांगोळ्या. 
        श्री गणेशा ने सुरुवात होते म्हणून गणपती ची खास रोज काढण्याची रांगोळी ही इथे देत आहे.


सोमवार 

मंगळवार 

राहूची रांगोळी 

बुधवार 

गुरूवार 

शुक्रवार 

शनिवार

केतूची रांगोळी 

रविवार 


एकादशी(२३/७/२०१८ )

हि रांगोळी अगदी साधी रांगोळी तरी सुंदर दिसते.
विठ्ठलाचा टिळा रांगोळीच्या मधोमध काढून त्या भोवती अगदी सोपी फुल काढली आहेत.

कोलम : थेंबांच्या रांगोळीचा एक प्रकार

   या रांगोळया जर पायरी पायरी ने समजुन घेतल्या तर काढायला सोप्या वाटतात. नेमक्या कोणत्या थेंबांच्या भोवती गिरक्या  घ्यायच्या आहेत, कोणत्या थेंबांना टाऴुन पुढे जायचे आहे, हे एकदा समजले की.... रांगोऴी पूर्णत्वाला जातांनाचा प्रवास  एक वेगळीच अनुभूती देवुन जातो. या रांगोऴीमुळे  बुद्धिला भरपूर खाद्य तर मिऴतेच परंतु पूर्ण झालेली रांगोळी बघतांना मिऴणारा आनंद शब्दात सांगता येत नाही.

                           तयार रांगोळी 

पायरी क्र. १

                         पायरी क्र. २



पायरी क्र. ३



                        पायरी क्र. ४


पायरी क्र. ५
                     
                         
                         पायरी क्र. ६

                        पायरी क्र. ७

                       पायरी क्र. ८


                       पायरी क्र. ९ 






कोलम : थेंबांच्या रांगोळीचा एक प्रकार

या  रांगोळया नुसत्या बघुन काढ़णे तितकेसे सोपे नाही. म्हणूनच ही रांगोऴी काढ़तांनाच्या प्रत्येक पायरीचे फोटो ही इथे देत आहे.
आता तुम्ही ही अगदी सहज काढ़ू शकता...... या सुरेख रांगोळया.
 तुम्हाला आवडेल तशी सजवा..... त्याचे बंधन नाही.
         तयार रंगोऴी:


पायरी क्र . १


पायरी क्र . २


पायरी क्र . ३


पायरी क्र . ४


पायरी क्र . ५


पायरी क्र . ६


पायरी क्र . ७


पायरी क्र . ८



कुयरी / आंबा आकाराचे डिझाइन

कुयरी / आंबा आकाराचे विविध डिझाइनस्‌ इथे देत आहे. काढायला अगदी सोपे तरी सुंदर असे  आहेत .
                                प्रकार क्र. १


प्रकार क्र. २


प्रकार क्र. ३