थेंबाची रांगोळी

ही रांगोळी माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. बालपणीच्या  ब-याच आठवणी या रांगोळीशी निगडीत आहेत. माझ्या रांगोळ्यांचा प्रवास याच रांगोळीने सुरू झाला . मी ही  रांगोळी  काढण  शिकावं म्हणून  आजी  सांगायची ," ही  रांगोळी दर सोमवारी दारात  काढणा-याला एक गहु सोनं देवाला वाहिल्याचं पुण्य मिळतं ". खर  तर  तेव्हा या रांगोळीत थेंबांच्या जोडणीचा  क्रम लक्षात ठेवला की, रांगोळी आपोआप तयार होत जाते ही गोष्टचं मला खुप आवडायची. आजही रांगोळी काढतांना मजा येते. दिलेल्या    पाय-यांनुसार रांगोळी काढून बघा , तुम्हालाही खुप मजा येईल.                                                     
 
 
तयार झालेली रांगोळी: 

पायरी क्र.१ :


पायरी क्र. २ : कुठल्याही रांगेतील थेंब १  दुस-या रांगेतील थेंब ३ ला जोडणे. मग  तिस-या रांगेतील थेंब ५ ला जोडून चौथ्या
रांगेतील थेंब २ ला जोडणे. शेवटी पाचव्या रांगेतील थेंब ४ जोडणे, पुन्हा सहाव्या रांगेपासून १-३-५-२-४ हाच थेंब जोडणीचा  क्रम सुरू ठेवणे.
 

पायरी क्र. ३ : थेंब जोडणीचा १ - ३ - ५ - २ - ४ हाच क्रम ठेवणे.


पायरी क्र. ४ :  ज्या थेंबापासून सुरूवात केली त्या थेंबावरच रांगोळीचा शेवट येतो आणि रांगोळी पूर्ण होते.


पायरी क्र. ५ : रांगोळीची थोडी सजावट करणे. रंग न भरताही रांगोळी छान दिसते.


पर्यावरण दिन

उन्हाळ्यात लाल फुलांनी बहरलेले गुलमोहराचे झाड बघून मनाला जी प्रसन्नता लाभते, त्या पासून प्रेरीत होवून काढलेली ही एकदम साधी रांगोळी आहे. झाड काढण्यासाठी केवळ हिरवा रंग न वापरता अनेक रंगांचा प्रभावी पणे केलेला वापर फुलांनी बहरलेल्या झाडाची अनुभूती ही रांगोळी  तर देतेच ,पण पर्यावरणाची गरज लक्षात घेता " झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेशही नकळत आपल्याला देवून जाते.


थेंबाची रांगोळी


थेंबाच्या या रांगोळीत मी एकात रंगाच्या छटा वापरल्या आहेत. परंतु तुम्हाला हवे ते रंग तुम्ही या रांगोळीत वापरू शकता.
रांगोळी काढायला सोपी जावी या उद्देशाने रांगोळी काढतांनाच्या काही पाय-या दिलेल्या आहेत. पाय-यांच्या साह्याने रांगोळी 
काढून बघा तर खर, तुम्हाला ही नक्की जमेल. 
                                               तयार झालेली रांगोळी:     

पायरी क्र : १ 

पायरी क्र : २ 


पायरी क्र : ३ 

पायरी क्र : ४ 

पायरी क्र : ५ 

पायरी क्र : ६ 

ही रांगोळी  रंग न भरताही छान दिसते.

फुलपाखरुची रांगोळी

                                          १० ते १० थेंबाची  फुलपाखरुची  रांगोळी 

आपण नेहमी पांढऱ्या रंगाने रांगोळी काढतो ,त्या  ऐवजी पांढऱ्या रंगाने संपूर्ण चौकोन काढून तसेच  या रांगोळीला काळ्या रंगाने बॉर्डर केल्याने ही  रांगोळी अधिक खुलली आहे. रंग भरण्याच्या या पद्धतीमुळे ही  रांगोळी थेंबाची असूनही गालीच्या पद्धतीची रांगोळी असल्यासारखी भासते.


ही रांगोळी थेंबाची असली तरी या रांगोळीचे वैशिष्टय हे आहे की , यात थेंबांना एकमेकांना  जोडायचे नसून थेंबांना सोडून रांगोळी पूर्ण करायची असते.  ही रांगोळी काढतांना आपण ज्या ठीकणा पासून सुरुवात करतो त्याच ठिकाणावर या रांगोळीचा शेवट होतो. (ही रांगोळी अखंड असते. )

या पद्धतीने थेंबांची रचना करून वर दाखवल्या प्रमाणे रांगोळी काढावी.

अरुणा शानबाग यांना भावपुर्ण श्रद्धांजली


परिचारिके च व्रत घेणाऱ्या अरुणा  शानबाग या आज आपल्यात नाहीत . माणसाच्या दुष्ट प्रवृत्तीला  बळी पडून आयुष्याची ४२ वर्षे काळोखात , असह्य वेदनेत त्यांनी घालवलीत. "एका वेदनेची अखेर " संपूर्ण समाजाला चटका लावून गेली.  त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झालेली असली तरी आपण आपल्या मनात अन्याया विरुद्ध लढण्याची ठिणगी पेटती ठेवली पाहिजे.  झालेल्या घटनांना आपण बदलू शकत नही , तरी अश्या  वाईट घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता नक्कीच घेऊ शकतो.   अरुणा शानबाग यांना माझी  भावपुर्ण श्रद्धांजली …………

                                                   [१८/५/१५ ]

तुम्हालाही काढता येतील अश्या सोप्या रांगोळ्या





रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन

या रांगोळीला बघून दिवळीतल्या भुई चक्राची आठवण होते. तुम्हाला ही रांगोळी काढता यावी यासाठी काही पायऱ्या दिलेल्या आहेत. जरी  ही रांगोळी गोलाकारात आहे तरी  या पायऱ्यांच्या सहाय्याने तुम्ही  तुम्हाला हवा तो आकार आणि हवे ते रंग वापरून  नविन डिझाइन बनवू शकता. कारण कल्पना शक्तीला  मर्यादा नसतात . रांगोळीला तुम्ही जसे सजवाल तशी ती खुलते.                                                                                               
                                                                                     
पुर्ण झालेली रांगोळी 
 


                                           पायरी क्र : १ आवडीच्या रंगांमधे गोलाकार काढले.
 
                                           पायरी क्र : २ बोटांच्या सहाय्याने आतून बाहेर येणाऱ्या रेषा काढल्या.

 
                                          पायरी क्र : ३ मध्यभागी रिकाम्या जागेत रंग भरला.
 
                                          पायरी क्र : ४  बोटांच्या सहाय्याने तयार केलेल्या रेषांमधे पांढरा रंग भरला.
 
                                          पायरी क्र : ५ प्रत्येक टोकावर लाल रंगाचा टिपका दिला.
                                       
 

जागतिक कुटुंब दिनानिमित्त

जागतिक  कुटुंब  दिनानिमित्त काढलेली  साधी , सोपी  रांगोळी असली तरी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. वारली कलेत ज्या प्रमाणे मनुष्याकृती काढतात त्याचाच वापर मी या रांगोळीत केला आहे. मध्यभागी आपली वसुंधरा आणि तिच्या सभोवती आनंदाने नृत्य करणारे स्त्री -पुरुष  " अवघे विश्वची माझे घर " हा संदेश आपल्याला देतात. आपल्या देशाच्या विविधतेत असलेली सुंदरता दर्शवण्यासाठी सगळे  स्त्री -पुरुष एकाच रंगाने न काढता मुद्दामच मी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला आहे. खरतर त्यामुळेच ही रांगोळी बघणाऱ्याच्या मनाला अधिक भावते .

 

                            वसुधैव कुटुंबकम 



 

मदर्स डे निमित्त

मदर्स  डे  निमित्त काढलेली ही रांगोळी आपल्या आयुष्यातील आई चे महत्व सांगते . बाळाचा  पहिला शब्द 'आई ' हाच असतो. पहिला गुरु ही आईच असते . पहिल पाऊलही आईच्या मदतीनेच टाकायला शिकतो. आईच्या हृदयात सदैव  तिच्या बाळाच इवलस हृदय  धड़धड़त असत. अंबरा पेक्षाही अफाट आईची माया असते. म्हणूनच माझ्या आईला समर्पित असलेली  ही रांगोळी तुम्हालाही  खूप आवडेल.

                                 
 

रोजच्या काढायच्या साध्या सोप्या रांगोळ्या






 

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

चतुर्थी निमित्त काढलेली  गणपतीची ही  रांगोळी तुम्हालाही खुप आवडेल. नारंगी ,पिवळा आणि लाल रंगाच्या छटांच्या साह्याने   आणि पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने गणपतीच्या आकृतीला उठावदार केलेले आहे. अनेक  रंगांचा वापर टाळून  फक्त ठराविक  रंगांच्या छटांचा वापर प्रभावी पणे करून तुम्हाला हवा असलेला आकार तुम्ही उठावदार  शकता.