दसरा/विजयादशमी 2023

#दसरा

#विजयादशमी 2023

विजयादशमीच्या आपणास व आपल्या कुटूंबास हार्दिक शुभेच्छा.... 

या रांगोळी मागची संकल्पना आणि प्रत्येक प्रतिकांचा अर्थ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे👇👇👇👇👏👇

https://youtu.be/jLCv-h9oXF4?si=B3ArriabrwlN_JIa




काली माता ( Navratri 2023)

 #Navratri Special #Rangoli  

प्रसन्न भाव असलेली काली माता ....तुमच्याही मनाला प्रसन्न करेल......

तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐


https://youtu.be/S2jYQutummc?si=9Ay1BFV9Frg-xelY





नऊ दिवस नऊ रांगोळ्या 2023

 #नवरात्र२०२३

#पारंपारिक_रांगोळ्या 

#ठिपक्यांची_रांगोळी 

#एकमिनीटरांगोळी 


नवरात्री Day 1 colour Orange 👇

https://youtube.com/shorts/u0py_D8UNIo?si=jsiwAKKIhAGdHBCa

नवरात्री Day 2 colour white 👇🏻

https://youtube.com/shorts/s9V_uxKGUWA?si=MEZrzt9gSPjf4AYN


नवरात्री Day 3 colour Red 👇🏻

https://youtube.com/shorts/YncS09KinK8?si=lcXGNeT4IzOcMDwi


नवरात्री Day 4 colour Royal blue 👇🏻

https://youtube.com/shorts/yQeXXZ6pP0k?si=EBOh_t-64FWBe3Jy


नवरात्री Day 5 colour Yellow 👇🏻

https://youtube.com/shorts/T_rbsb6xIqg?si=E6VLgnQ5CQzFlof4

नवरात्री Day 6 colour Green 👇🏻

https://youtube.com/shorts/ljBm7n2KprM?si=G4m7TOc0BdrT-OkD


नवरात्री Day 7 colour Grey 👇

https://youtube.com/shorts/CY4RjGjbRbI?si=jlelhU8VdThV-qKS


नवरात्री Day 8 colour  Purple 👇🏻

https://youtube.com/shorts/Q2H5vXpHZB0?si=_SaZPHHq-5xyrw5H

नवरात्री Day 9 colour peacock green   👇🏻

https://youtube.com/shorts/VMfUw5YIjLw?si=Bsyx-Nb7cGQhNsg7


चॅनल Subscribe करून 🔔 icon चे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्यां videos चे notification येईल. Videos आवडल्यास like comment जरूर करावे 

Thank you 😊 

@Anjali Minanath Dhaske



         





































छोट्या रांगोळ्या ( भाग 15)

  #छोट्या_रांगोळ्या @anjalimdhaske

#shorts  

     एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 


गणेश रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/4hblRdk_ANA?feature=share


छोटी रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/jmcJJ55IBfU?feature=share


कुयरी रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/-JXalnLHe2o?feature=share


चौकोन छोटी रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/-JXalnLHe2o?feature=share


चाफ्याची फुले रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/MUDr6llnSRQ?feature=share

©️Anjali Minanath Dhaske 




गुरू पौर्णिमा 2023

#गुरू_पौर्णिमा 2023

निमित्त काढलेली अत्यंत सोपी आणि मन प्रसन्न करणारी ही रांगोळी माझ्या समस्त गुरू चरणी अर्पण आहे.  व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

 https://youtu.be/4C9MsLlVFRU

©️Anjali Minanath Dhaske 



आषाढी एकादशी 2023 (2)

 


#आषाढी_एकादशी

 निमित्त विठ्ठल रुक्मिणीची मन प्रसन्न करणारी रांगोळी ईथे पोस्ट करते आहे.  विठ्ठल आणि रखूमाईच्या चेहर्‍यावरील शांत, प्रसन्न भाव आपल्या मनात देखील सात्विक आनंद निर्माण करतात.  खाली दिलेल्या लिंकवर संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. 

तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 💐


विठ्ठल रुक्मिणीची मन प्रसन्न करणारी रांगोळी (2023) link 1👇

https://youtu.be/gnrkpen2OFw


व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M हे👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

 YouTube Channel subscribe करायला विसरू नका.

आपला अभिप्राय जरूर नोंदवा.

सकारात्मक रहा .... आनंदी रहा... आनंद पसरवा ❤️

धन्यवाद🙏

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)







आषाढी एकादशी 2023 (1)

 #आषाढी_एकादशी

 निमित्त मन प्रसन्न करणारी रांगोळी तरीही काढायला अत्यंत सोपी अशी ईथे पोस्ट करते आहे.   खाली दिलेल्या लिंकवर संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. 

तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 💐

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रांगोळी link 👇

https://youtu.be/nd6Jfmxosw8

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M हे👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

 YouTube Channel subscribe करायला विसरू नका.

आपला अभिप्राय जरूर नोंदवा.

सकारात्मक रहा .... आनंदी रहा... आनंद पसरवा ❤️

धन्यवाद🙏

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



छोट्या रांगोळ्या ( भाग 14)

 

 #छोट्या_रांगोळ्या

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

गणेश रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/vEExVFuAvkg?feature=share4

छोटी रांगोळी  link 1  👇🏻

https://youtube.com/shorts/_EK3VGfXPys?feature=share4

छोटी रांगोळी  link 2  👇

https://youtube.com/shorts/giziVzSVuxs?feature=share4

छोटी रांगोळी  link 3👇  

https://youtube.com/shorts/pxU02uI5bOE?feature=share4


छोटी रांगोळी link 4 👇  

https://youtube.com/shorts/u98IMBgdNNQ?feature=share4

©️Anjali Minanath Dhaske 





आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023

 #आंतरराष्ट्रीय_योग_दिवस 2023 

तुम्हा सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 निमित्त काढलेली अतिशय सोपी अशी ही रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल. दिलेल्या लिंकवर संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे 👇 

https://youtu.be/CH01blwCMAY

©️Anjali Minanath Dhaske 




छोट्या रांगोळ्या ( भाग 13)


 #छोट्या_रांगोळ्या

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

ठिपक्यांची चौकोनी रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/wBL3rq562Vo?feature=share


ठिपक्यांची मोर रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/43HoxHOr4_g?feature=share

ठिपक्यांची रांगोळी link 👇

https://youtube.com/shorts/JttCKHSMpYY?feature=share4


छोटी रांगोळी design link 👇🏻

https://youtube.com/shorts/8Xpo9wBIft0?feature=share


ठिपक्यांची समई रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/Q5GZUUTISM4?feature=share

लक्ष्मी पाउले link 1👇🏻

https://youtube.com/shorts/CGovdPZLEWk?feature=share


लक्ष्मी पाउले link 2 👇🏻

https://youtube.com/shorts/jCQ_Xz00GIw?feature=share

©️Anjali Minanath Dhaske 



वट पौर्णिमा 2023

 #वट_पौर्णिमा 2023

अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही आकर्षक रांगोळी तुम्ही ही नक्की काढून बघा.  दिलेल्या लिंकवर रांगोळीचा video उपलब्ध आहे.

 https://youtu.be/Y9tnnQ6QG94

©️Anjali Minanath Dhaske 





बॉर्डर रांगोळ्या

चार #बॉर्डर_रांगोळ्या 


 रंगांची आकर्षक रचना आणि त्यापासून फुल, पाने असे आकार तयार करत या चार बॉर्डर रांगोळ्या खूपच सोप्या पद्धतीने काढल्या आहेत. नक्की काढून बघा. रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇


https://youtu.be/ejkZGdpf97I


©️Anjali Minanath Dhaske 





देवी ( कथा )

  #देवी 

©️Anjali Minanath Dhaske 

           वर्षभरापूर्वीच रखमाचे विष्णूशी लग्न होवून ती दाभाडे घराण्याची सून झाली होती. लग्नाच्या वेळी सासुबाईंनी रखमाचे ' लक्ष्मी ' असे नामकरण करून घेतले. तिच्या पायी हुंड्याच्या रुपात घरात लक्ष्मी आलीच होती. तिचे फक्त नाव लक्ष्मी ठेवण्यात आले होते. परंतू तिला वागणूक मात्र तशी दिल्या जात नव्हती. सासरी आर्थिक परिस्थिती बरी असली तरी सासरच्या लोकांना रखमाच्या माहेराहून सतत पैशाचा , भेटवस्तूचा ओघ कायम सुरूच असावा असे वाटत होते.  रखमा मन लावून संसार करत होती. सासू, सासरे,नणंद मात्र रोज तिच्या कामात चूका काढत होते. दिवसभर रखमा कामातच गुंतून राहील यासाठीचे सगळेच प्रयत्न ते आवर्जून करत होते. 

           आपल्या बायकोने शेतावर खास आपल्यासाठी डबा घेवून यावे. आपण घरी आल्यावर  हसून स्वागत करावे.  आपल्याला काय हवे नको ते प्रेमाने विचारावे. असे सुरुवातीला विष्णूला फार वाटत असे.  प्रत्यक्षात मात्र रखमाला कामातून क्षणाचीही उसंत मिळत नसल्याने विष्णूसाठी शेतावर सासरेच डबा न्यायचे. नाके डोळी निटस असलेल्या  रखमाला आरशात बघायलाही वेळ मिळत नसल्याने संध्याकाळपर्यंत तिचा अवतार होवून जायचा.

      कामावरून विष्णू घरात आला की लगेच सगळे त्याला तिच्या तक्रारी सांगत. शेतातल्या कामाने आधीच वैतागलेला विष्णू त्यांच्या बोलण्याने अधिकच कंटाळून जात असे. त्याच्या स्वप्नांचा होत असलेला चुराडा आणि घरच्यांच्या तक्रारी यांचा एकत्रित परिणाम होवून तो रखमावर  चिडचीड करत असे.  रखमा विष्णूला उलट उत्तर देत नसल्याने विष्णूचा रागही फार विकोपाला जात नसे. 

        रखमाला विष्णूने  मारहाण केली तरच तिच्या माहेरची माणस आपण मागू ते आणून देतील अशी सासुबाईना खात्री असल्याने त्यांनी रखमाला त्रास देण्यासोबत विष्णूच्याही खर्चात कपात केली. विष्णू शेतात राबत असला तरी सुरवातीपासून आर्थिक व्यवहार सासू सासर्‍यांच्या हातात होता. त्याचाच फायदा विष्णूचा राग विकोपाला नेण्यासाठी त्यांनी करून घेतला.  

      विष्णू घरी आल्यावर सहज जरी आईला बोलला , ' आज विहिरीवरचा पंप बिघडला ' तरी त्याची आई त्याला सांगे, ' तुझ्या सासर्‍याकडून पैसे घेवून ये पंप दुरुस्तीला ' . विष्णूचा शर्ट जरा मळलेला किंवा फाटलेला दिसला की त्याला त्याच्या सासर्‍याकडून कपडे मागून घेण्याचे सुचविले जात.  त्याची मोटारसायकल बिघडली तेव्हा त्यांनी रखमाच्या माहेरी नव्या मोटरसायकलची मागणी करायला सांगितली. स्वतः कष्ट करणार्‍या विष्णूला हे थोडे विचित्र वाटत होते. 

            विष्णूच्या मित्र परिवारात देखील बिनधास्त सासरी मागण्या केल्या जात होत्या. त्यातल्या अनेक मान्य होत होत्या तर अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ मागून घेतला जात होता.  ज्या मित्रांच्या सासरी मागण्या पूर्ण होत नव्हत्या ते बायकोला मारहाण करायचे. बर्‍याचदा  मारहाण केल्यावर त्यांच्याही मागण्या पूर्ण व्हायच्या. 

       आपल्या गरजांसाठी सासरी मागणी करण्यात नंतर विष्णूलाही सवयीने गैर असे काही वाटणे बंद झाले 

      रखमाच्या माहेरी ती एकुलती एक मुलगी असल्याने विष्णूच्या छोट्या मोठ्या मागण्या त्याने सांगण्याआधीच पूर्ण केल्या जात होत्या. 

           सासूबाईंची हाव काही कमी होत नव्हती. त्या रोज नवी मागणी रखमा समोर ठेवायच्या आणि तिने नकार दिला तर विष्णू तिला मारहाण करायचा.  गेले वर्षभर ती असाच त्रास सहन करत होती. आपला मुलगा सुनेच्या आहारी जावू नये  हाच सासुरवास करण्याचा मुख्य उद्देश होता. रखमा आणि विष्णू यांचा संसार सुरळीत सुरू झाला तर घरातील आपले महत्व कमी होईल या भीतीने  रखमाला रोजच सासुरवास केला जाई. रखमाला माहेरी जाण्याची बंदी असली तरी तिच्या नंदा मात्र त्यांना हवे तेव्हा येत आणि रखमाच्या साड्या, दागिने घेवून जात. तिला त्यांच्या जुन्या साड्या देवून जात. घरातल्या लक्ष्मीची अवस्था लंकेच्या पार्वती पेक्षाही खराब झाली होती. 

         एक ना एक दिवस सगळ्यांना आपल्या चांगुलपणाची जाणीव होईल आणि आपला संसार ही सुखाचा होईल अशी आशा रखमाला होती. 

      वर्षा मागून वर्षे गेली परंतू रखमाची परिस्थिती बदलली नाही. उलट लग्नाला इतकी वर्षे होवून देखील घरात पाळणा हलला नव्हता म्हहणू  आता तर तिचा त्रास अधिक वाढला होता. 

          विष्णूच्या सगळ्या मित्रांना मुले झाली होती. खरे तर रखमा अत्यंत गुणी बायको होती. रोजच्या भांडणाचा त्याला आता कंटाळा येवू लागला होता. रखमाचा त्रास त्याला दिसत असून देखील विष्णूला कधीच तिच्यासाठी काही करता येत नव्हते. घरच्यांना विरोध करण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. त्यात आता मूल होत नाही या त्रासाची भर पडल्याने त्याने दारू पिण्यास सुरवात केली होती. 

         दोघांचे संबंध सुधारण्याऐवजी अधिक बिघडत जावू लागले. रखमाच्या लग्नाच्या आधीपासून दर महिन्याच्या पौर्णिमेला सासुबाई देवकी बाईला भेटायला जायच्या. देवकी बाईच्या अंगात साक्षात देवी यायची. आपल्या घरावर देवीची अखंड कृपा रहावी म्हणून अनेक जणी तिची खण नारळाने ओटी भरायच्या. नेहमी देवकी बाईला भेटून आल्यावर दोन तीन दिवस रखमाच्या घरातले वातावरण जरा शांत असायचे. रखमाच्या सासुबाईंना नातवंडाचे तोंड बघण्याची घाई झाली होती. म्हणून या वेळी त्यांनी रखमाला देवकी बाईच्या पायावर डोके टेकविण्यासाठी नेले. रखमाला देवकी बाईच्या हातून देवीचा आशिर्वाद मिळवा आणि आपल्या घरातही पाळणा हालावा. असा त्यामागचा हेतू होता. देवी अंगात संचारलेल्या देवकी बाईंनी रखमाला बघितले तेव्हा तिच्या डोळ्यातली वेदना त्यांना ओळखीची वाटली . देवकी बाईंनी सासुरवासाने पिचलेल्या रखमाला लवकरच मूल होईल असा आशिर्वाद दिला. परंतू या आशीर्वादाचा काहीच फायदा होणार नाही हे त्या ओळखून होत्या. त्यानंतर दर पौर्णिमेला रखमा मोठ्या आशेने त्यांच्या दर्शनाला येत होती. त्यांची खण नारळाने ओटी भरत होती. असेच सहा महिने निघून गेले. येवढे करूनही घरात पाळणा हलत नाही म्हणता तिच्यातच दोष आहे असे वाटून तिच्या सासुरवासात वाढ झाली.

        अशातच एक दिवस बाजारहाट करतांना तिची भेट देवकी बाईंशी झाली. नेहमी देवी अंगात असतांना केस मोकळे, कपाळावर भंडारा, गळ्यात कवड्यांची माळ असा त्यांच्या स्वतःभोवती घुमणारा अवतारच तिने बघितला होता. आज मात्र त्या अगदी सामान्य स्त्री सारख्या बाजारात खरेदी करत होत्या.

        देवकी बाईनी रखमाला बघितले आणि सुहास्य वदानाने तीची विचारपूस केली. एरवी देवी आणि भक्त या नात्यातून प्रश्न आणि उत्तर फक्त याचाच संबंध त्यांच्याशी असल्याने आज त्यांच्या या मायेच्या चौकशीने रखमाचे डोळे टचकन पाणावले. 

         त्यांनी तिला जवळच झाडाखालच्या पारावर बसविले. तीला मायेने स्वतः जवळचा खावू खायला दिला. तिनेही मग घरातल्या त्रासाबद्दल सगळे त्यांना मोकळेपणाने सांगून टाकले. रखमाने भावनेच्या भरात त्यांना जाबही विचाराला ," मी घरच्यांचे करायला कमी पडत नाही. मग काय असे पाप घडले माझ्याहातून की माझा सासुरवास कमी होत नाही की मला मूल बाळही होत नाही. तुमच्यातल्या देवीला माझी दया येत नाही का कधी? हल्ली तर मला जेवायलाही देत नाहीत. माहेराची माणस सगळे माहित असून कानाडोळा करतात. आज ना उद्या सासू थकली की माझा संसार सुखाचा होईल अशी आशा दाखवतात. माझा नवरा वाईट नाही तरी रोज दारू पितो. मी शिकलेली असून सुद्धा अडाणी नवर्‍याचा मार खाते. अजून किती सोसायचे? कधी पाझर फुटणार तुमच्या देवीला ?"

त्यावर देवकी बाई बोलून गेल्या, "देवी प्रत्येकीत असते. तुझ्या अडचणी सोडविण्यासाठी माझ्यातली देवी फार उपयोगाची नाही. आता तू तुझ्यातल्या देवीला जागे कर."

          त्यांच्या या बोलण्याने रखमा गोंधळून गेली. तेव्हा त्यांनीच सगळे उलगडून सांगायला सुरुवात केली. " माझा नवरा मला खूप त्रास द्यायचा. जुगार खेळण्याचा त्याला नाद होता.  काहीच काम न करता घरात बसून रहायचा. मी कष्ट करून चार पैसे घरात आणले तर तेही तो घेवून जायचा. सासूसासरे स्वतःच्या मुलाला समजावून सांगण्याऐवजी मलाच दोष द्यायचे. त्यात भरीस भर मुलाने दारू सोडावी म्हणून आपल्या ऐपती बाहेर असलेले नवस बोलायचे. गावात आलेल्या प्रत्येक भोंदू बाबांना ते मागतील ते द्यायचे. त्यांची अंधश्रद्धा इतकी होती की देवीला बोकड दिला की त्यांच्या मुलाची जुगार खेळण्याची सवय नक्की सुटेल अशी त्यांना खात्री होती. बोकड घेण्यासाठीचे पैसे मी माझ्या माहेराहून आणावे म्हणून मला खूप त्रास देवू लागले. माझ्या माहेरी फारच गरिबी होती.ते बोकडासाठीचे पैसे कुठून आणणार. बोकडाचा बळी दिला तरी उघड्या डोळ्यांनी दिसणारी वास्तव परिस्थिती नाकारून घरच्या लक्ष्मीला त्रास देवून मंदिरातल्या देवीला प्रसन्न करू पाहणार्‍या बुद्धीहीन अंधश्रध्दाळू लोकांना देवी कशी प्रसन्न होईल? मी शिकलेली नसले तरी बुद्धीने तल्लख होते. शेवटी हिंमत करून मीच माझी समस्या सोडविण्यासाठी सज्ज झाले. 

        पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवघराजवळ बसले. थोड्याच वेळाने सासूने कामासाठी आरडाओरडा सुरू केला. मी हळूहळू घुमू लागले. सासूचा आरडाओरडा ऐकुन नवर्‍याच्या अंगात नेहमीसारखाच उत्साह संचारला. आजही मला मारहाण करून त्याला माझ्याकडचे पैसे हिसकावण्याची संधी आपसूक चालून आली आहे असे वाटून त्याने मागून माझी वेणी जोरात ओढली. त्या वेदनेने मी कळवळले. हाताच्या मुठीत देवघरातील गुलाल बुक्का घेवून त्याच्या डोळ्यात फेकला. त्याच्यासाठी माझी ही प्रतिक्रिया अनपेक्षित   असल्याने त्याला आश्चर्य वाटले. डोळ्यात गुलाल बुक्का गेल्याने त्याला मला उलटून मारता येत नव्हते. याचाच फायदा घेवून मी जवळ असलेल्या काठीचे दोन चार फटके त्याला मारले. त्याच्या आवाजाने सासू सासरे धावत आले तसे मी आवाज बदलून बोलत अधिक जोरात घुमू लागले. ' देवीला मारतोस हरामखोर.... मार खावून घ्यायला मी काय तुझी बायको आहे. तुझ्या आईवडिलांच्या लाडाचा असशील तू.... खबरदार पुन्हा माझ्या वाट्याला गेलास तर ' 

     या सगळ्या गोंधळात शेजारी पाजारीही गंमत बघायला जमले होते.  घरातल्या सगळ्यांनाच माझे आक्रमक रूप नविन होते. गर्दीतल्या दोघी तिघी देवी कोपली म्हणून मला शांत करायला लागल्या तशा मी त्यांच्याही घरातल्या ज्या बाबी इतर लोकांना माहीत नव्हत्या त्या बोलून दाखविल्या. कारण त्यांच्या घरातल्या सुनाही त्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या होत्याच. नदीवर धुणे धुतांना क्वचित आमच्या गप्पा होत त्यात आम्ही आपली दुःखे एकमेकींना सांगून मन हलके करत होतो. त्याचाच फायदा घेवून सगळ्यांना मी खात्री पटवून दिली की मी देवकी नसून देवी बोलते आहे. या सगळ्या नव्या अवताराने थकून मी झोपी गेले थोड्यावेळाने मी जेव्हा जागी झाले तेव्हा जणू झोपण्यापूर्वी काय घडले त्याची मला काहीच कल्पना नाही असे भासविले. त्या रात्री नवरा भीतीने घरात आला नाही. थोडे दिवस जरा नीट गेले. पुन्हा सासूने त्रास द्यायला सुरुवात केली. नवरा पैसे घेवून जावू लागला. मीही पौर्णिमेपर्यंत थोडी कळ सोसली. पुन्हा एकदा देवी अंगात आली. या वेळी पूर्वीपेक्षा जास्त हाणले नवर्‍याला. ' जो पर्यंत तू जुगार सोडून नीट संसार करत नाही तोपर्यंत पौर्णिमेला येवून तूला शिक्षा करणारच ' असे देवीच्या आवाजातून सांगितले. त्याला पाठीशी घालणाऱ्याच्या पुढच्या बारा पिढ्या नष्ट करेन असा  दम सासू सासर्‍यांनाही दिला. एकदा सासूने चोरून माझ्या नवर्‍याला जुगार खेळायला पैसे दिले. नेहेमी शांत सोशीक रूप घेवून वावरत असले तरी माझे सगळ्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष होतेच . नवर्‍याला पैसे दिल्याचे कळल्यावर मी सासूच्या अंथरुणावर खाज कुयरीची पावडर टाकली.  आणि माझ्या कामाला गेले. सासूला दिवसभर त्रास झाला. सासर्‍यांना त्यांनी त्रासाबद्दल सांगितले.  तसे ते म्हणाले.   'तू काही चूक केले असशील म्हणून देवीने तूला शिक्षा केली आहे.'  त्यानंतर मात्र सासूने माझ्या नवर्‍याला पाठीशी घालणे सोडून दिले. त्यांच्या सगळ्या महिनाभराच्या चुकीच्या वागण्याचा हिशोब मी देवी बनून पौर्णिमेला घेत होतेच.    

       आमच्या घरातल्या वातावरणात बदल होवू लागला. खरच साक्षात देवी आपल्या घरी येते असे वाटून सासू सासरे ही खरेच भक्ती मार्गाला लागले. देवकीला समस्या सांगितल्या तरी पौर्णिमेला देवी त्यावर उपाय सांगते असे वाटून माझ्या मैत्रिणी मला अधिक मोकळ्या मनाने त्यांचा त्रास सांगू लागल्या. मीही माझ्या मैत्रिणीच्या समस्या सोडविण्यासाठी माझ्यातल्या देवीची मदत घेऊ लागले. केस मोकळे सोडून, कपाळावर भंडारा लावून, गळ्यात कवड्यांची माळ घालून समाजातील अंधश्रद्धेचा फायदा घेत माझ्या सोबतच मी इतरांनाही मदत करू लागले होते. माझा नवरा कामावर जावू लागला. त्याचा जुगार सुटला.  लोक माझी ओटी भरत, कधी पैसे देत त्याचा वापर करून माझ्या गाठीशी चार पैसे जमू लागले. त्याचा वापर करत मी सासर्‍यांना  पिठाची गिरणी सुरू करून दिली. चार पैसे सासूच्या हातात यायला लागल्यावर सासूनेही त्रास देणे बंद केले. आता नंदा घरी आल्या तरी माझा योग्य मान ठेवू लागल्या. आमची मुले मोठी होवू लागली. घरात सुख शांती समाधान नांदू लागले. सुरुवातीला हलाखीचे दिवस होते म्हणून भक्त देतील ते घेत होते. नंतर गरिबाला/ गरजूंना मदत करता यावी म्हणून पैसे न घेता धान्य ,कपडे घेवू लागले आणि त्याचे लगेच वाटपही करू लागले.

    नंतर घराला, मुलांना योग्य वळण लागल्याने देवी बनण्याची गरज राहिली नव्हती पण समाजातील अनेक सुनांना देवीची गरज होतीच. मग काय मी अजूनही देवी बनते आहे.  तुझ्या सासूलाही अनुभवाने चार सल्ले दिले होते. तिचा स्वभाव बघता तीर्थ यात्रेला जाण्याचा सल्ला देवीच्या मुखातून तिला दिला होता परंतू मुलगा हातचा जावू नये म्हणून सुनेला घरी ठेवून ती बाहेर गावी जायला तयार नसते. माझ्यातल्या देवीला कोणालाच सक्ती करता येत नाही. सगळ्यांना मी त्यांच्या समस्येवर उपाय फक्त सांगू शकते. उपाय पालनाची सक्ती केली तर उपाय यशस्वी होण्याची खात्रीही द्यावी लागते.  स्वार्थी माणसांना तर खरा देवही कशाचीच खात्री देणार नाही. मी तर देवीचे फक्त सोंग घेते.  माझी मलाच खात्री नसते तेव्हा मी असल्या माणसांना खात्री कशी देवू ?  तुझी सासू माझ्यासमोर हात जोडून मानभावीपणा करते आणि घरी गेल्यावर तिला जे करायचे तेच करते. माझ्या भेटीसाठी तुला घेवून येण्याचे सांगूनही ती तुला घेवून येत नव्हती. आता नातवंडाचे तोंड बघण्याची घाई झाली म्हणून तूला घेवून आली. मुल होण्याआधी घरातले वातावरण प्रसन्न करणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरकडे जावून तपासण्या करणे गरजेचे आहे .तू शिकलेली आहेस ना? मग तुला हे समजायला हवे नुसत्या देवीच्या आशीर्वादाने मुले होत नाहीत. अंधश्रद्धा कितीही श्रद्धेने जपली तरी ती अंधश्रद्धाच असते. तुझ्या बाबतीत माझे वरवरचे सगळेच उपाय थकले आहेत. आता तुलाच देवी बनून तुझा त्रास कमी करून घ्यावा लागेल "

 त्यावर रखमा पट्कन बोलून गेली, " देवी अंगात आल्याचे नाटक केले तर मला पाप लागेल, नाही... नाही... माझ्याच्याने होणार नाही " 

देवकी बाईने हे ऐकले आणि मायेने तिचा हात हातात घेतला, " ज्या घरात स्त्रियांना मान मिळतो तिथे देवी कधीच कोणाच्या अंगात येत नाही. मात्र ज्या घरात घरच्या लक्ष्मीला छळले जाते त्या घरातील लक्ष्मीने कडक लक्ष्मीचे रूप धारण केले नाही तर तिच्या आयुष्याची माती होते. अंधश्रद्धेच्या बाजारात खरी श्रद्धा ठेवून शुद्ध हेतूने जर देवी अंगात येण्याचे सोंग केलेस तर तुझ्या सोबतच तू इतरांचेही संसार सुखाचे करू शकते. या पुंण्याच्या कामात सहभाग घेतलेल्या कोणालाच कधीच पाप लागणार नाही याची मी तूला नक्कीच खात्री देऊ शकेन. बेटा...मी तूलाही फक्त उपाय सांगू शकते. त्याचे पालन करावेच अशी सक्ती करणार नाही. तुझ्या मनाची तयारी झाली की देवीचा दिवस ठरवितांना अमावस्येच्या दिवसाची निवड कर. येते मी " असे म्हणून देवकी बाईने उठतांना रखमाच्या डोक्यावर मायेने थोपटले.

रखमाने उत्सुकतेने विचारले, " अमावस्याच का?" त्यावर देवकी हसून बोलली, " अमावस्येला तुझ्यात देवी आली याची बातमी मला कळली तर पौर्णिमेला येणार्‍या माझ्यातल्या देवीला कायमची निवृत्ती देता येईल आणि सगळ्या गावाला आता तुझ्यात खरेच देवी येत आहे याची खात्री होईल " असे बोलून ती बाजाराच्या गर्दीत दिसेनाशी झाली. 

          घरी परतायला नेहेमीपेक्षा उशीर झाला म्हणून रखमाच्या सासूने तिच्याशी भांडण उकरून काढले. नवरा दारू पिऊन आल्यावर त्याच्या मनात तिने संशयाचे बीज पेरले. रोजच्या प्रमाणे या सगळ्याचा शेवट रखमाच्या मार खाण्यात झाला. आता तर रखमाला उठता बसता त्रास देण्यासाठी संशयाचे कारण पुरेसे होते.

   असेच अजून काही दिवस गेले. नातवंडाचे तोंड बघण्यासाठी उत्सुक असलेली सासू उघडपणे रखमाला टाकून दुसरी सून आणण्याची भाषा करू लागली. तेव्हा मात्र रखमाला देवकी बाईच्या बोलण्याची आठवण प्रकर्षाने झाली. दुसर्‍या दिवशी अमावस्या होती. तिने मनाशीच काहीतरी पक्के केले. सकाळ होताच ती नेहमीप्रमाणे कामाला लागली. आंघोळ करून तुळशीला पाणी घालतांना तिने मटकन खाली बसून घेतले. नवरा, सासू आणि सासरे यांनी कितीही आवाज दिले तरी ती जागची हलली नाही. दगडी मूर्ती सारखी नजर स्थिर करून बसुन राहिली. तिच्या अशा वागण्याने घरात एकच गोंधळ मजला. ती मात्र शांतपणे स्वतः भोवती घुमू लागली. 

©️Anjali Minanath Dhaske 

टिप: सदर कथा  काल्पनिक असून वास्तविकतेशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. लिखाण आवडल्या नावासहित शेअर केल्यास काही हरकत नाही.

(शब्दचाफा या face book page वरील स्पर्धेत विजयी ठरलेली कथा )

 



बॉर्डर रांगोळ्या

 

तीन #बॉर्डर_रांगोळ्या 

 ठिपक्यांची आकर्षक रचना आणि त्यापासून शंख, फुल, पाने असे आकार तयार करत या तीन बॉर्डर रांगोळ्या खूपच सोप्या पद्धतीने काढल्या आहेत.  नक्की काढून बघा 

https://youtu.be/y_B5mvQ3p_k

©️Anjali Minanath Dhaske 



छोट्या रांगोळ्या ( भाग 12)

  #छोट्या_रांगोळ्या


#shorts 


एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 


लक्ष्मी पाउले रांगोळी link 1 👇🏻


https://youtube.com/shorts/e5LFQQ9JbXI?feature=share


लक्ष्मी पाउले रांगोळी link 2 👇🏻

https://youtube.com/shorts/e5LFQQ9JbXI?feature=share


लक्ष्मी पाउले रांगोळी link 3 👇🏻

https://youtube.com/shorts/HDhssankhC0?feature=share


कलश, केळी खांब, धन कलश रांगोळी link 👇🏻


https://youtube.com/shorts/ipOkY7yZFVM?feature=share


बुद्ध रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/NP1GyVw_LFw?feature=share


ठिपक्यांची रांगोळी link 1👇🏻

https://youtube.com/shorts/NcU8hMFYAZ4?feature=share


ठिपक्यांची रांगोळी link 2👇🏻

https://youtube.com/shorts/43HoxHOr4_g?feature=share


©️Anjali Minanath Dhaske



छोट्या रांगोळ्या (भाग ११)

 #छोट्या_रांगोळ्या

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 


©️Anjali Minanath Dhaske 


गुढीपाडवा रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/O8PKH4GDqCo?feature=share


हनुमान जयंती निमित्त रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/dh69pYiX0KM?feature=share


मोराची रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/e8OiAzg1fqQ?feature=share


कुयरी आकार असलेली रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/2k2KdFIc5es?feature=share


नाजूक नक्षी link 👇🏻

https://youtube.com/shorts/P7qc_C7kTKM?feature=share



राम नवमी २०२३

 #राम_नवमी_२०२३

अत्यंत सुंदर आणि सोपी अशी ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇 

https://youtu.be/fP6KcLQM8iw

©️Anjali Minanath Dhaske 



गुढीपाडवा 2023

 #गुढीपाडवा 2023 निमित्ताने ही सुंदर रांगोळी काढलेली आहे. 

रांगोळी आवडल्यास ही रांगोळी कशी काढली आहे हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

https://youtu.be/cSCYb0tefpc

©️Anjali Minanath Dhaske 




छोट्या रांगोळ्या ( भाग १०)

  #छोट्या_रांगोळ्या 


#shorts 


एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

©️Anjali Minanath Dhaske 


रोजची रांगोळी link 1👇🏻

https://youtube.com/shorts/cxSWj6KfeGI?feature=share


रोजची रांगोळी link 2👇🏻

https://youtube.com/shorts/9kB8XAGkhGg?feature=share


रोजची रांगोळी link 3👇🏻

https://youtube.com/shorts/WglgqfN2dkE?feature=share


रोजची रांगोळी link 4👇🏻

https://youtube.com/shorts/0LhXcO4bYe0?feature=share


रोजची रांगोळी link 5👇🏻

https://youtube.com/shorts/sx7TmuL1ZE8?feature=share






संकष्टी चतुर्थी ( मार्च 2023 )

 #संकष्टी_चतुर्थी

#गणेश_रांगोळी 

ही मन प्रसन्न करणारी गणेश रांगोळी आहे. श्री या शुभ अक्षराचा मुकुट गणेशाच्या डोक्यावर शोभून दिसत आहे.  रंग संगतीने मनात एक सकारात्मकता झिरपत जाते. याचा अनुभव रांगोळी बघितल्यावर तुम्हालाही नक्की येईल.  संपूर्ण रांगोळीचा व्हिडीयो खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇 

https://youtu.be/H_5qu_cu97I

©️Anjali Minanath Dhaske 








छोट्या रांगोळ्या (भाग ९)

 #छोट्या_रांगोळ्या 

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 


 रांगोळी link 1 👇🏻

https://youtube.com/shorts/jLoeO6AYTbM?feature=share

रांगोळी link 2 👇🏻

https://youtube.com/shorts/7YWrzOcm1oA?feature=share


रांगोळी link 3 👇🏻

https://youtube.com/shorts/AE9o6fXUEIs?feature=share


©️Anjali Minanath Dhaske 



होलिका प्रदीपन २०२३

 #होलिका_प्रदीपन २०२३ 

ही रांगोळी काढायला सोपी असून सुंदर दिसते.  होलिका प्रदीपन आणि धूलिवंदन या दोन्ही दिवसांची मिळून ही एक रांगोळी काढलेली आहे.  संपूर्ण व्हिडिओ दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇 

https://youtu.be/8koKtlg2x3M

©️Anjali Minanath Dhaske 





छोट्या रांगोळ्या ( भाग८ )

 

#छोट्या रांगोळ्या 

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 


गजलक्ष्मी रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/lDbKjWc0DVg?feature=share

आकर्षक रंगसंगतीत नाजूक फुलांचा आयात असलेली रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/S4n0XEoE-5U?feature=share


स्वस्तिक रांगोळी link1 👇🏻

https://youtube.com/shorts/J8vEvk1sKes?feature=share


पांढरे स्वस्तिक असलेली रांगोळी link 2👇🏻

https://youtube.com/shorts/sOP9h1jaZFg?feature=share

©️Anjali Minanath Dhaske 



होळी 2023

#होळी 

निमित्त अत्यंत आकर्षक रंगसंगतीत काढलेली ही रांगोळी पाहताक्षणीच आपल्याला मोहात पाडणारी आहे .

संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇 

 https://youtu.be/d70zoNnoo4E

या रांगोळीचे वैशिष्ट्य असे आहे की ही रांगोळी कोणत्याही सणाला शोभून दिसणारी आहे . तुम्ही ज्या सणानिमित्त ही रांगोळी काढता  त्या सणाचे नाव मध्यभागी गोलात लिहिल्यास ही रांगोळी त्या त्या सणाची शोभा वाढवणारी ठरते.  गोलात काहीच न लिहिता तुम्ही छोटी दिव्याची थाली त्यात ठेवल्यासही  चालते.  दिवाळीला तर हमखास दिवे ठेवल्या रांगोळी अधिक खुलून दिसते. होळी हा रंगाचा सण मानला जातो म्हणुन या रांगोळीत सगळेच रंग वापरलेले आहेत. 

मोर, मोठी फुले आणि दिवा यांच्या सोबतीला मधला चौकोन आणि त्या आतील गोल या रचनेमुळे ही रांगोळी कोणत्याही सणाला चालते. 

व्हिडीओ आवडल्यास जरूर कळवा 

©️Anjali Minanath Dhaske 






तळहातावरिल फोड, मी आणि बरेच काही

 *तळहातावरिल फोड, मी  आणि बरेच काही* 

©️Anjali Minanath Dhaske 

मुलीची पाठवणी करते वेळी भाऊक झालेला बाप नवीन जावयला सांगत असतो, "आम्ही आमच्या मुलीला तळहातावरच्या फोडा सारखे जपले आहे"

 हे दृश्य टीव्हीवर बघत असलेली मी मात्र या वाक्याने विचारांच्या गोंधळात पडले. तेथूनच विचार चक्र सुरु झाले..... तेच तुमच्या समोर मांडत आहे. 


"आम्ही आमच्या मुलीला तळहातावरच्या फोडा सारखे जपले आहे " असे मुलीचे पालक कधी अभिमानाने,  कधी भावनिक होवून तर कधी आपल्या मुलीचा सांभाळ तिच्या सासरच्यांनी नीट करावा या अपेक्षेने बोलतात. 

                   वरवर ऐकता आपले पालक आपल्या वर किती प्रेम करतात असे वाटून सगळ्याच मुली या वाक्यावर भावनिक होतात. त्याला कारणही तसेचआहे. ' तळहातावरच्या फोडा सारखे जपणे' या वाक्यात आपण नेहमी जपणे या शब्दाला महत्व देतो.  

याच वाक्यातील 'तळहातावरच्या फोडा' चा विचार केला तर.......

मुळात 'तळहातावर फोड' कुणालाही का हवा आहे किंवा असेल?

फोड यावा आणि आपण त्याला जिवापाड जपावे म्हणुन कोणीही काही विशेष करत नाही.

 तो फोड अपघाताने येतो.  फोड आल्यावर फोडण्याचा प्रयत्न केला तर वेदना देतो म्हणुनच  त्या फोडात लक्ष असे पर्यंत आपण त्याला जपतो. या उलट कामाच्या घाईत किंवा इतर वेळी तो आपोआप फुटतो तेव्हा त्याला जपण्याच्या प्रक्रियेतून आपल्याला मोकळे झाल्यासारखे वाटते. 

पूर्वीच्या काळी देणार्‍याने मुलीसाठी अगदी समर्पक उपमा दिली आहे. त्या काळी बहुदा मुली पालकांना नकोच होत्या. गर्भपात केल्याने मनुष्य हत्येचे पाप लागेल या कल्पनेने मुलींना जन्म दिल्या जात असावा. घरात अपघाताने कितीही मुली जन्मल्या तरी 'वंशाला वारस हवा' हेच अंतिम ध्येय होते. 

मुलींच्या वागण्यावर लावलेल्या अनेक बंधनांना   'जपणे ' असे नाव दिल्या गेले असावे. 

मुळात त्या काळी मुलींना जपण्यापेक्षा सासरी जावून माहेरचा उद्धार होवू नये म्हणून घर कामाला लावत भविष्यातील जबाबदार्‍यासाठी तयार केले जायचे.  तर मुलांना मात्र प्रत्येक वस्तू हातात देण्याची प्रथा होती. मुलांच्या खाण्यापिण्याला ,अभ्यासाला अधिक महत्व दिले जात होते.  मोठा झाल्यावर मुलगा हाताशी येईल असा त्यातही पालकांचा स्वार्थी हेतू होताच.  मुलीला परक्याचे धन  मानून लग्न होईपर्यंत सांभाळायचे हाच मुलींच्या पालकांचा विचार असे. 

मुळात मुलगा असो की मुलगी... पालक म्हणुन आपण त्यांना जपण्यापेक्षा कणखर आणि स्वावलंबी बनवले तर ते त्यांच्या भविष्यासाठी अधिक फायद्याचे आहे. 

जनुकीय बाबतीत विचार केला तर मुलगा असो वा मुलगी.... त्यांच्या कडून पुढच्या पिढीला दिल्या जाणार्‍या गुणधर्मांच्या टक्केवारीची शक्यता सारखी आहे. 

अजून एक विचार असा येतो की आपल्या याच समाजात 'मुलगा मातृमुखी' आणि 'मुलगी पितृमुखी ' असणे चांगले मानले जाते.  याचाच अर्थ  'वंशाचा दिवा' घडविण्यात आईच्या जनुकीय आणि स्वभाव गुणधर्माला महत्व आहे. 

म्हणजेच एक मुलगी लग्न झाल्यावर तिच्या मुलाला जनुकीय आणि स्वभाव गुणधर्म देवू शकते.  ती त्या मुलाला देवू शकत नाही ते म्हणजे तिच्या वडिलांचे  आडनाव आहे. 

या उलट  आईचे गुणधर्म घेवून सुद्धा मुलाला त्याच्या वडिलांचे आडनाव पुढे न्यावे लागते.  

एखादे अडनाव पिढी दर पिढी पुढे जात असले तरी त्याला विशिष्ट अशा जनुकीय गुणधर्माचे बंधन नाही.  

प्रत्यक्षात मनुष्य जीवनात किंवा व्यक्तिमत्त्व घडविण्यात मात्र जनुकीय आणि स्वभाव गुणधर्माचा वाटा फार महत्वाचा आहे.  परंतू आपण आडनाव पुढे नेण्याच्या निरर्थक शर्यतीत डोळे झाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. 

मानवी व्यक्तिमत्त्व हे संपूर्णपणे त्याच्या गुणधर्मावर आधारित आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव आपण विसरण्याची शक्यता असतांना त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची चांगली वाईट छाप दीर्घकाळ आपल्या लक्षात राहते . तरीही आडनावाला महत्व देत ते पुढे नेण्याचा आग्रह धरणारा समाज  किंवा तसे विचार करणारी व्यक्ति खऱ्या अर्थाने समाज कंटक आहे.  तेव्हा ' मुलींना परक्याचे धन' मानून त्यांच्या कडे दुर्लक्ष करू नका कारण दुसर्‍याचे (दुर्लक्षित)धन तुमच्या वंशाला पुढे नेण्यासाठी आपले जनुकीय आणि स्वभाव गुणधर्म देणार आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वतःचे 'धन' नुसते जपून ऊपयोग नाही तर उत्तम जनुकीय आणि स्वभाव गुणधर्म देवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास करायला हवा. 

अगदी हाच नियम मुलांच्या पालकांना देखील लागू होतो.  नुसते आडनाव पुढे नेण्याचा अट्टहास करण्यापेक्षा  मुलांवर दर्जेदार संस्कार करत चांगला माणुस घडविण्यावर भर दिल्यास भावी आयुष्यातील पन्नास टक्यांची जनुकीय आणि स्वभाव गुणधर्माची  भागीदारी सफल होईल. 

सर्वोत्कृष्ट मानव समाज निर्मितीसाठी मुलगा, मुलगी असे भेद न बाळगता दोघांच्या उत्तम जडणघडणीत समान प्रयत्न अपेक्षित आहेत. तिला /त्याला सर्वार्थाने स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जावा. 

मुलींना तळहातावर असलेल्या 'फोडा' प्रमाणे जपण्यापेक्षा किंवा सासरच्यांनी तिचा 'सांभाळ ' नीट करावा या अपेक्षा ठेवण्यापेक्षा मुलींना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याकरिता योग्य प्रयत्न करायला हवेत. स्त्री संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. ती स्वतः सोबत अनेकांचा  सांभाळ नीट करू शकते तेव्हा 'तिचा सांभाळ कोणी करावा'  असे कमकुवत विचार तिच्या मनात चुकूनही बिंबविल्या जाणार नाही याची काळजी घ्या. 

"आम्ही आमच्या मुलींना मुलाप्रमाणे वाढविले आहे " 

"आम्हाला दुसरी 'ही'  मुलगीच हवी होती आणि देवाने आमचे ऐकले"

" हल्लीचे मुलगे ही आईवडिलांना कुठे सांभाळतात त्यापेक्षा मुलीच बर्‍या "

" आमचे नाव आमच्या मुलीनी इतके  मोठे केले की मुलगा नसण्याची उणीवही भासत नाही "

" आम्ही आमच्या मुलींमधे मुलगा पाहतो आणि आनंदी राहतो "

 स्वतः स्वतःच्या मुलींना दुय्यम ठरविणारी ही आणि अशीच अनेक निरर्थक वाक्ये समजता मिसळताना स्पष्टीकरणासाठी बोलण्याआधी त्यांचा नक्की काय अर्थ निघतो आहे.  त्याचा आपल्याच मुलींवर  काय दूरगामी परिणाम होणार आहे. याचा सखोल विचार करायला हवा. 

 पालक म्हणुन आपण आपल्या लेकींचा मनापासून स्विकार आणि आदर करायला हवा. तेव्हाच सासरची मंडळीही तिचा स्विकार करत तिला योग्य तो आदर देतील. 

मुलीच्या बाबतीत शहरातील चित्र बदलत असले तरी सामाजिक विचारांचा पाया अजूनही म्हणावा तसा भक्कम झालेला नाही. याची जाणीव वेळोवेळी मनाला टोचणी देणारी ठरते. 

मुलगा, मुलगी यांचे ' पालक' या विषयाला अनेक कंगोरे आहेत.  तरीही पालक म्हणुन जबाबदारी समान आहे.  तेव्हा आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या जिवाच्या लिंगाला महत्व न देता आपण आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडायला हवी . 

असे माझे प्रामाणिक मत आहे. 

©️Anjali Minanath Dhaske 

टिप: "तळहातावरिल फोड........" या एका वाक्याने डोक्यात अनेक विचार सुरू झाले. त्यात तिसर्‍यांदा मुलगीच झाली म्हणुन दुःख करणार्‍या आईचे मनोगत वाचण्यात आले आणि मग न रहावून हा शब्द प्रपंच मांडल्या गेलाय.

*विचार आवडल्या नावासहित शेअर करावे*. न आवडल्यास तुमच्या विचारांचा ही आदर आहे.



छोट्या रांगोळ्या ( भाग ७)

  #छोट्या रांगोळ्या 


#shorts 


एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

रोजची रांगोळी ( लक्ष्मी पाउले )  link 1 👇👇

https://youtube.com/shorts/5JC8cxV1Pqc?feature=share

रोजची रांगोळी ( कमळ) link 2 👇👇

https://youtube.com/shorts/z_gBKg7D6XE?feature=share

रोजची रांगोळी ( जाळीदार ) link 3 👇👇

https://youtube.com/shorts/NuOFTVqKnew?feature=share

रोजची रांगोळी (कुयरी) link 4 👇👇

https://youtube.com/shorts/E8zMetxgWjw?feature=share

©️Anjali Minanath Dhaske 





महाशिवरात्री2023

#रांगोळी 

#महाशिवरात्रीला काढावी अशी अत्यंत सोपी आणि आकर्षक शिवलिंग रांगोळी आहे . पहाटेच्या समयी जेव्हा सूर्य उगवलेला नसतो तेव्हा दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळून निघालेल्या शिवलिंगावर बेल पानांवरील  दवबिंदूंचा  अभिषेक होतोय असे रम्य मन प्रसन्न करणारे चित्र महाशिवरात्रीला आपल्या अंगणात रेखाटला तुम्हालाही नक्कीच आवडेल.  

रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जरूर क्लिक करा 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/QDAJ-ddFB7A

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske 




छोट्या रांगोळ्या (भाग ६)

 #छोट्या रांगोळ्या 


#shorts 


एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

गणेश रांगोळी link 1 👇👇

https://youtube.com/shorts/lBgfDaykjWk?feature=share


गजानन महाराज प्रकट दिननिमित्त रांगोळी link 2 👇👇

https://youtube.com/shorts/bxeiwrG_byw?feature=share


महाशिवरात्री निमित्त शिवलिंग रांगोळी link 3 👇👇

https://youtube.com/shorts/r-n4HC67qdU?feature=share

महाशिवरात्री निमित्त शिवलिंग रांगोळी link 4 👇👇

https://youtube.com/shorts/qlVi0KVvTro?feature=share


©️Anjali Minanath Dhaske 






प्रेम दिवस 2023

 #प्रेमदिवस 2023 #valentineDay special Rangoli 

प्रेम दिवस निमित्त दोन सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या काढल्या आहेत. या रांगोळ्या लग्नाचा वाढदिवस असल्यास ही काढू शकता. 

रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇 

https://youtu.be/jZkPW1oBr_0

©️Anjali Minanath Dhaske 



 





छोट्या रांगोळ्या (भाग ५)

  #छोट्या रांगोळ्या 


#shorts 


एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

स्वस्तिक रांगोळी link 1 👇👇

https://youtube.com/shorts/Qqvr3sO6XBU?feature=share

चटई रांगोळी link 2 👇👇

https://youtube.com/shorts/kyeDaEcSB0k?feature=share

कमळ रांगोळी link 3 👇👇

https://youtube.com/shorts/O60EQxBUTnc?feature=share


फुलांची design रांगोळी link 4 👇👇

https://youtube.com/shorts/_sRUn5Ef1YE?feature=share

 बदाम असलेली ठिपक्यांची रांगोळी link 5 👇👇

https://youtube.com/shorts/DLO5TdmGsIA?feature=share

©️Anjali Minanath Dhaske 



गजानन महाराज प्रकट दिन 2023

 #गजानन_महाराज_प्रकट_दिन निमित्त रांगोळी 

अत्यंत सोपी आणि सुंदर अशी ही रांगोळी तुम्हीही अगदी सहज काढू शकता.  दिलेल्या लिंकवर व्हिडिओ उपलब्ध आहे 👇

https://youtu.be/aq3eltawOXE

©️Anjali Minanath Dhaske 



चतुर्थी निमित्त गणेश रांगोळी

 #Ganesh_rangoli 

चतुर्थी निमित्त गणेश रांगोळी काढलेली आहे. रांगोळी काढायला अगदीच सोपी आहे. दिसायला ही रांगोळी अत्यंत आकर्षक ही दिसते. 

दिलेल्या लिंकवर रांगोळी कशी काढली हे बघता येईल 👇

https://youtu.be/zTy9wSN3-0g

©️Anjali Minanath Dhaske 



छोट्या रांगोळ्या  ( भाग ४)

 #छोट्या रांगोळ्या 


#shorts 


एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

चटई रांगोळी link 1👇🏻👇🏻


https://youtube.com/shorts/tJvdeZOCBsk?feature=share


छोटी डिझाईन link 2👇🏻👇🏻

https://youtube.com/shorts/73cQ0-tgxlk?feature=share


लक्ष्मी पाउले रांगोळी link 3 👇👇

https://youtube.com/shorts/Sp6Rq_JG-CA?feature=share


छोटीशी ठिपक्यांची रांगोळी link 4👇👇

https://youtube.com/shorts/KclI-EuM1Ps?feature=share

©️Anjali Minanath Dhaske