आषाढी एकादशी २०२०



#अवघा_रंग_एक_झाला
#आषाढी_एकादशी
हार्दिक #शुभेच्छा
भक्तांच्या भक्तीचा आणि पांडुरंगाच्या कृपेचा जिथे मिलाप होतो असा आजचा सोहळा .... अवघा रंग एक झाला .
        आपल्या संस्कृतीत वारी आणि वारकरी यांना अनन्य साधारण महत्व आहे. वारकरी टाळाच्या गजरात विठू नामाचे स्मरण करत वारीत चालत असतात. भक्तीने  भारावलेल्या वातावरणात विठू माउलीच्या दर्शनाची   ओढ अधिक तीव्र होत जाते.
      यंदा वारी नसली तरी रांगोळीच्या माध्यमातून अगदी साधी सोपी विठू माउली रेखाटून आषाढी एकादशीच्या भक्तीमय वातावरणाची अनुभूती मिळवता येईल.
       
व्हिडिओ आवडल्यास लाईक,like कमेंट comment आणि शेयर share करायला विसरु नका. अशाच सोप्या रांगोळ्या आणि नव नवीन कलाविष्कार  बघण्यासाठी  हे चॅनल subscribe करायला ही विसरु नका.
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://youtu.be/t0QElKTPP2E







विठू माउली (४ ते ४ ठीबक्यांची रांगोळी)

#विठू_माउली
©️ अंजली मीनानाथ धस्के

        रांगोळी काढायची इच्छा असते पण हाताला वळण नसल्याने #रांगोळी नीट जमत नाही. #ठिपक्यांची_रांगोळी ही हाताला वळण देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. म्हणूनच #आषाढी #एकादशी निमित्त #४ते४ ठिपक्यांची #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी विठू माउलीची रांगोळी खास तुमच्यासाठी. #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आकाराने #अतिशय #छोटी असल्याने ह्या रांगोळीला जास्त #जागा लागतं नाही. कुठलीही #भीती न बाळगता पुढच्या पिढीने  रांगोळीचा #वारसा जपावा म्हणून केलेला हा #प्रयत्न. रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि रांगोळी शिकण्याचा #श्री #गणेशा कराच. #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त.
 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून रंग माझा वेगळा या #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे )
रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://youtu.be/Ju5KnMbGi_E
विठू माउली रांगोळी


तुळशी वृंदावन


 #तुळशी_वृंदावन
 #रांगोळी
#आषाढी_एकादशी
 #तुळशी_विवाह
       रोजच्या जीवनात दारात रांगोळी काढण्यासाठी आपल्याला फारसा वेळ मिळत नाही. पण कोणत्याही सणाची   चाहूल ही दारातल्या रांगोळीवरून अधिक जाणवते. सण समारंभ हे हे रांगोळी शिवाय अपूर्ण वाटतात. तेव्हा विठू माउलीच्या वारीची चाहूल असो की तुळशी विवाह  अगदी झटपट तयार होणारी आणि तितकीच सुंदर दिसणारी ही साधी सोपी रांगोळी खास तुमच्यासाठी घेवून येत आहे. या रांगोळीने तुमच्या अंगणाची ही शोभा थोडी अधिक वाढू शकते. तेव्हा नक्की काढून बघा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक,like कमेंट comment आणि शेयर share करायला विसरु नका. अशाच सोप्या रांगोळ्या आणि नव नवीन कलाविष्कार  बघण्यासाठी रंग माझा वेगळा  हे चॅनल subscribe करायला ही विसरु नका.
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
या रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
   https://youtu.be/8XtrAQvIpMg

पार्टी बलूनस रांगोळी

#वाढदिवस
#नूतनवर्ष
#पार्टी
#बलूनस्
#रांगोळी
        मुलांना त्यांच्या वाढदिवसाची प्रचंड उत्सुकता असते. Birthday party ची इतर सगळी तयारी करत असतांना दारात रांगोळी काढण्यासाठी आपल्याला फारसा वेळ मिळत नाही. पण कुठलेही celebration हे रांगोळी शिवाय अपूर्ण वाटते. तेव्हा वाढदिवस असो की new year किंवा असो #बालदिन children's Day   अगदी झटपट तयार होणारी आणि तितकीच सुंदर दिसणारी ही साधी सोपी रांगोळी खास तुमच्यासाठी घेवून येत आहे. या रांगोळीने तुमच्या पार्टी सेलिब्रेशनची ही शोभा थोडी अधिक वाढू शकते. तेव्हा नक्की काढून बघा.
या रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/8JQOr-Hbdg0
रंग माझा वेगळा या यू ट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

आयुष्याची पाटी

#आयुष्याची_पाटी
कुठे थांबायचे ते कळले पाहिजे...... या विषयावर लिहिलेली ही कथा.
#१००शब्दांचीकथा


हरीश धडाडीचा, कर्तृत्वाच्या जोरावर संघर्षावर मात करणारा.  भविष्याची वाटचाल करतांना भूतकाळातील वाईट अनुभवांना कवटाळूनच त्याने लोकांशी वागण्याची पद्धत ठरवली. त्यानादात त्याने कधी मित्रांना, आप्तगणांना जवळ केले नाही.
 प्रत्येकाला तो त्याच  अनुभवातून तोले.
भूतकाळाने त्याचा वर्तमान  नष्ट केला. त्याच्यात 'मीपणा' वाढीस लागला.
        तारुण्यात तर काही वाटले नाही पण आता उतार वयातही तो नवीन अनुभवांचा आनंद घेण्यापेक्षा त्याच्या मीपणाच्या गोष्टीच  सगळ्यांना सांगतो. परिणामत: आज तो एकाकी पडला आहे. एकटेपणाचा भावनेने त्याला ग्रासले.
         वाईट अनुभव कितीही खरे असले तरी ते किती कवटाळायचे हे ठरवायला हवं. वाईट अनुभवानंतरही नवीन अनुभवासाठी आयुष्याची पाटी कोरी ठेवता यायला हवी.
भूतकाळात रमतांना  कुठे थांबायचं हे कळले पाहिजे.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबतीला रांगोळी ही आहेच. इतर लिखाण आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहे. anjali-rangoli. blogspot.com


आंतरराष्ट्रीय योग दिन (२०२०)

#आंतरराष्ट्रीय_योग_दिन
निमित्ताने काढलेली ही साधी सोपी सुंदर रांगोळी.
या रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/2uyPMt-u45A
©️ अंजली मीनानाथ धस्के



पाऊस, कांदा भजी आणि कॉफी

#पाऊस_कांदा_भजी_आणि_कॉफी
©️ अंजली मीनानाथ धस्के
        सकाळी घरातुन बाहेर पडताना कडक ऊन होतं आणि आता घरी परततांना अचानक ढग दाटून आले. पाऊस सुरू झाला. अशा पावसात कांदा भजी खायला मिळाली तर..... अशी सुखद कल्पना त्याच्या मनात चमकुन गेली.
        बसमधे बसल्या बसल्या मात्र त्याच्या  डोक्यातही दाटून आलेल्या विचारांचा पाऊस सुरू झाला.
        लग्नाआधी ती  चांगल्या पगाराच्या नोकरीवर होती माझ्याशी  लग्न झाल्यामुळे तिने तिची ती चांगली नोकरी सोडली आणि इथे कमी पगाराची नोकरी पत्करली. तिच्याशी लग्न करून मी तिच्यावर अन्याय तर केला नाही ना? मी तिच्या उत्तम करीयर च्या आड तर आलो नाही ना?
      त्याला ही बोचणी लागली त्याला कारणही तसंच होतं. त्याच्या बरोबरीच्या मित्रांच्या बायका नोकरी करणाऱ्या . सगळे कंपनीच्या उपहारगृहात जेवायचे. नवीन लग्न झालेलं असूनही  घरून डब्बा आणणारा हा एकमेव. त्यातही तिला रोज नव नवीन पदार्थ बनवून डब्यात देण्याची हौस. त्याचा डबा बघितला की सगळे चिडवायचे ," साल्याने नशीब काढलं.... आमच्या वहिनी बिचाऱ्या.... चांगली नोकरी सोडून याचे लाड पुरवत बसल्या आहेत. "
       गंमतीचा विषय पण याला गंमतीने घेणं जड जावू लागल.
नुकतंच लग्न झालेलं. ती ही नोकरी करणारी तरी आवर्जून त्याच्या आवडीच काहीतरी बनवणारी . तिला काय आवडतं ते ही बनवून हौसेने करून खावू घालणारी. तिच्या उत्तम करीयर ला ब्रेक लागल्याची कधी खंत व्यक्त केली नाही की घर कामाचा ताण ही सांगितला नाही. ती स्वयंपाक खोलीत काही तरी बनवत असली की तिला मदत करण्याच्या बहाण्याने यालाही तिच्या भोवती घुटमळायला आवडायचं.
पण आपल्या साठी तिने करीयर मधे मागे राहणं योग्य नाही.
 काही झालं तरी आज घरी गेल्यावर तिला स्पष्ट सांगायचं," स्वयंपाकाला मावशी ठेवू.... उत्तम डबा देण्याच्या नादात तुझं करीयर मागे पडता कामा नये. "
     त्याचा स्टॉप आला. छत्री होती ... तरी तो थोडा भिजला होता.
      तिने हसून स्वागत केलं. तो फ्रेश होवून येईपर्यंत मस्त कांदा भजी तळायला घेतली. तिला असं स्वयंपाक खोलीत बघून त्याची अवस्था अधिकच वाईट झाली. इतक्यात "कशी झालीत... खावून सांग पाहू?" म्हणत तिने भज्यांची ताटली त्याच्या पुढे धरली. भज्यांच्या नुसत्या वासानेच त्याला भूक लागली होती पण  त्याला आता बोलणं गरजेचं वाटू लागलं. तिला मधेच थांबवत तो म्हणाला ," आपण स्वयंपाकाला मावशी ठेवू या का? म्हणजे तुला तुझ्या करीयरकडे नीट लक्ष देता येईल. या कामात तुझा महत्त्वाचा वेळ वाया जायला नको."
तिला त्याच्या बोलण्याच आश्चर्य वाटलं,"आज हे काय नवीन ? स्वयंपाक घरात काम करणं म्हणजे वेळ वाया जाणं असं मी मानत नाही. कोणतीही परिस्थिती उद्भवली तर स्वतःच पोट स्वतः ला भरता यावे म्हणून आईकडून हट्टाने मी सगळा स्वयंपाक शिकले. मावशी काय कधीही ठेवता येईल पण सध्या मला कंपनीच्या कार्यालयात तितकसं काम नाही. मला सध्या जास्त कामही नको आहे ".
   " जास्त काम का नको आहे? तुझी आधीची नोकरी खूप चांगली होती तुला पुन्हा तशी किंवा त्याहून चांगली नोकरी मिळवायची नाही?" त्याने न राहून विचारलं.
  खट्याळपणे त्याच्याकडे बघत   तिने मग सांगून टाकलं," तशी किंवा त्यापेक्षा चांगली नोकरी नक्कीच मिळवायची आहे पण सध्या त्यापेक्षा महत्त्वाचे तुझ्यासोबत वेळ घालवणे आहे. नोकरी काय .... ती मी मिळवेनच पण सध्या आपल्या नात्याला वेळ देणं मला जास्त गरजेचं वाटतं. कंपनीतीलं काम वाढलं की स्वयंपाकाला मावशी ही ठेवेन.  आपल्या माणसाच्या मनाचा मार्ग त्याच्या पोटातून जात असतो असं म्हणतात. मला तुझ्यासाठी हे सगळं बनवतांना जो आनंद मिळतो तो असा शब्दात सांगता येणार नाही..... पण माझं ठरलंय आधी तुझ्या हृदयात स्थान मिळवायचं . आता लवकर खावून सांग .... भजी कशी झालीत? " असं म्हणत तिने एक भजा त्याच्या तोंडात टाकला.
त्याने भजा खाल्ला आणि लगेच किचन ट्रॉली उघडून छोटे पातेले बाहेर काढले. तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं तसा तो बोलला ," भजी खूपच मस्त झालीत . या भज्यांच्या चाविसोबत तू माझ्या हृदयात प्रवेश करू पाहतेय तर मलाही तुझ्या हृदयात प्रवेश करण्यासाठी मस्त कॉफी बनवायची आहे " .त्यानेही तिला मिश्किलपणे डोळा मारला तशी ती लाजून गेली.
खिडकी बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता. त्याच्या डोक्यातला विचारांचा पाऊस थांबून प्रेमाचा इंद्रधनुष्य फुलला होता.
 खिडकी बाहेर बघता बघता गरमा गरम भजी आणि वाफाळलेल्या कॉफीच्या चवीसोबत त्या दोघांचीही मनही एकमेकांत हळुवार गुंतली जावू लागली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
इतर लिखाण आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहे या ब्लॉग ची लिंक anjali-rangoli.blogspot.com


अनोळखी वागणूक

#अनोळखी_वागणूक
#१००शब्दांचीकथा
©️अंजली मीनानाथ धस्के
    काही दिवसांपूर्वी रोहनचा अपघात झाला. तो मृत्यूच्या दाढेतून परतला. आईवडिलांची काळजी, भविष्याची चिंता, समाजाचे बंधन फाट्यावर मारून तो बेदरकार, बिनधास्त, मुक्त आयुष्य जगत आला होता. सुंदर चेहरा इतरांना दिसावा म्हणून हेल्मेट  टाळत होता.
आज आरशात त्याला त्याचाच चेहरा अनोळखी वाटला. ठीक ठिकाणी जखमांचे व्रण उमटले होते. जगण्यामरण्यातील एका श्र्वसाच्या अंतराने त्याला खूप काही शिकवलं होतं. आईने सक्तीने हेल्मेट घातले नसते तर आज तो स्वतःला आरशात बघूही शकला नसता.  दिसण्यापेक्षा असण्याची किंमत त्याला कळली होती. आरशातल्या अनोळखी प्रतिबिंबात जबाबदारीने वागण्याचा संकल्प त्याला जाणवला .
        कामावर जातांना त्याने स्वतःहुन हेल्मेट घातलेलं बघून त्याच्या आईला मात्र त्याची ही अनोळखी वागणूक निश्चिंत करून गेली.
©️अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.



#सकारात्मकता_हेच_औषध

#सकारात्मकता_हेच_औषध
#१००शब्दांचीकथा
©️अंजली मीनानाथ धस्के
    रुहीचा कोरोना चाचणी निकाल सकारात्मक आला. ती पुरती हादरून गेली. आता पुढचे १४ दिवस दवाखान्यात काढावे लागणार.  आपण बरे होवू याची काही खात्री नाही. आपण मेलोच तर कोणी बघायलाही येणार नाही. अशा नाना कल्पना करून ती अजून निराशेच्या आहारी जात होती. त्यात भर म्हणजे तिच्या  मुलाने  रडून एकच गोंधळ घातला. इच्छेविरुद्ध  ती दवाखान्यात दाखल झाली.
      तिचा  निस्तेज चेहरा बघून शेजारच्या खाटेवरचे  अनोळखी काका बोलले,"पोरी काळजी करू नकोस. इथे आयुष्य संपत नाही. फक्त थोड्या दिवसांची विश्रांती घेतं.  इथल्या अनुभवाने ते अधिक खंबीरपणे नवीन सूरवात करेल" या शब्दांनी तिला जगण्याची नवीन ऊर्जा मिळाली. त्यांचे शब्द तिने खरे केले. ती करोनाविरूद्ध लढाई जिंकली. 
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.


कल्याणी


#कल्याणी
©️अंजली मीनानाथ धस्के

     कल्याणी तशी आधीपासूनच सोशिक. मुली म्हणजे परक्याच धन मानण्याचा तो काळ त्यामुळे फार शिकवण्याच्या फंदात न पडता आई वडिलांनी लहान वयातच तिचं लग्न करून दिलं. संसाराची जबाबदारी अंगावर पडली आणि होत नव्हतं ते बालपणही मागे पडलं. तिची अल्प समाधानी वृत्ती असल्याने  आयुष्याकडून फार मागण्याही नव्हत्या.
      वर वर सगळं बरं चाललं होतं. जसं जसे दिवस जायला लागले तिला सासर कडच्यांचे खरे स्वभाव कळू लागले. सासूबाई तर त्या काळाला शोभेल अशीच म्हणजे ललिता पवार सारखीच भूमिका बजावत होत्या. नवराही संसारात फार गुंतून पडला नव्हता . त्याच्यासाठी लग्न म्हणजे निव्वळ एक व्यवहार होता. बाकी सदस्य फार कशावरही प्रतिक्रिया देत नव्हते . देवू शकत ही नव्हते. सगळा कारभार सासूबाईच्या हाती होता.
       सासरे गेले. दिराच लग्न झालं. त्याने चूल वेगळी मांडली. वर्षा मागून वर्ष जात होती . कल्याणीची परिस्थिती बदलत नव्हती. आज नाही तर उद्या निदान नवऱ्याला आपल्याबद्दल प्रेम वाटेल या आशेवर ती दिवस काढत होती.
         सासूबाई नुसता छळ करत होत्या. नवऱ्याला काही सांगायला जावं तर त्याचही एकच टूमणं असायचं," आधी माहेराहून पैसे आणन .... मग माझी आईच काय.... सगळ्या जगाशी तुझ्यासाठी भांडायला मी तयार आहे".
         गावातच माहेर पण माहेरचे लग्न करून देवून आपल्या जबाबदारीतून मोकळे झालेले. त्यांना काही सांगण्याची सोय नव्हती. वडील होते तो पर्यंत ते अनेकदा कल्याणीच्या नवऱ्याला छोटी मोठी रक्कम देवून खुश करण्याचा प्रयत्न करत होते . आईला काही सांगितलं तरी ," मुलं झालीत की होईल सगळं नीट" असं सांगून कल्याणीची बोळवणं केली जायची. नवऱ्याला पैसे द्यावे असं तिला कधीच वाटत नव्हतं पण निदान समज द्यावी असं तिला कायम वाटायचं पण कोणालाच स्वत:ला त्रास करून घ्यायचा नव्हता त्यामुळे आधी पैसे देवून आणि नंतर दुर्लक्ष करून तिचा प्रश्न होता तसाच ठेवल्या गेला होता. वडील गेल्यावर तर तिचा माहेरचा भक्कम आधारच गेला.
         निसर्गही तिच्या बाबतीत कठोर होता . काही केल्या कुस उजवत नव्हता. सासूबाई दिवस दिवस उपाशी ठेवायच्या. जीव जाईल इतकी काम सांगायच्या. ऑफिस मधून नवरा परत आला की नवऱ्याचे नको नको ते सांगून कान भरायच्या . नवराही नको ते संशय घेवून मारहाण करायचा .
       तिला अनेकदा तर जीव देवून टाकावा असच वाटायचं पण आशा खूप वाईट असते . मुल झालं की सासूबाईला पाझर फुटेल या आशेवर ती जगत होती.
      याच दरम्यान नवऱ्याची नोकरी गेली. आता नोकरी करायचीच नाही. स्वत:चा उद्योग सुरू करायचा असच त्याच्या मनाने घेतलं होतं. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कल्याणीने माहेराहून पैसे आणावे म्हणून त्याने तिचा मानसिक शारीरिक छळ अजुनच वाढवला.
       कल्याणीने परोपरीने समजावून सांगितलं," पडेल ते काम करू , तुम्ही कमवाल तितक्या पैशात मी घर चालवून दाखवेन. कधी कशाचीच मागणी करणार नाही पण माहेराहून पैसे आणणे म्हणजे आपला स्वाभिमान गहाण टाकल्यासारखं आहे".
         ती पैसे आणायला तयार होत नाही म्हणून सासूबाई आणि नवरा दोघांनी "तिला मुल होत नाही त्यात नवऱ्याची प्रगती व्हावी असं वाटतं नाही" असे कारण सांगत घराबाहेर काढलं.
         दिराने जावेनेही सासूबाईंना व नवऱ्याला खूप समजावलं पण पालथ्या घड्यावर पाणी . ती जावून जाईल कुठे? माहेरी गेली . मिळेल ते काम करून आपण आपलं पोट भरावं पण पुन्हा नवऱ्याकडे जावू नये हाच विचार तिच्या मनात सुरू होता.
          मुलीचा संसार मोडण्यापेक्षा तात्पुरती काही रक्कम जावयाला देवून तिची पाठवणी करावी. एकदा का उद्योग सुरळीत सुरु झाला की आपले पैसे परत मागता येतील असा विचार करून  आईने मन मोठ करून जावयाला पैसे दिले.
     इच्छा नसतांनाही कल्याणीला पुन्हा तिच्या सासरी पाठवण्यात आलं. पैसे मिळताच नवऱ्याने भागीदारीत नवीन कंपनी काढण्याचे  काम सुरू केले. इकडे कल्याणीला दिवस गेले. तब्बल बारा वर्षांनी तिला मातृत्वाची चाहूल लागली होती. आता आपले दिवस नक्कीच बदलतील याची तिच्या मनाला खात्रीच पटली होती.
       नवऱ्याचा विक्षिप्त आणि संशयी स्वभाव . सासूबाईंचा पराकोटीचा छळ सहन करतच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
        गेल्या अनेक वर्षात तिला एकदाही एकट्याने कधी घराबाहेर पडता आलं नव्हतं . सतत सासूबाईंना पहारा असायचा तरी नवरा संशय घेत होता याची तिला प्रचंड चीड होती. इतकी कशी कोणाची वाईट बुध्दी  असते. बीन बुडाचे आरोप करायला यांची हिंमत तरी कशी होते. असे तिला प्रश्न पडायचे  पण आजपर्यंत कितीही वाटलं तरी प्रत्यक्षात मात्र ती सगळेच अन्याय करत आली होती. हे दिवस ही जातील म्हणत जगत आली होती.

बाळाच्या जन्मानंतर सुखच सुख आपल्या वाट्याला येईल अशी तिची खात्री होती पण प्रत्यक्षात मात्र तस काहीच घडल नाही.
अन्याय सहन करण्याची जशी तिला सवय झाली होती तशीच तिला छळण्याची सासूबाईंना आणि नवऱ्यालाही सवय झाली होती.
       छळ कमी झालाच नाही पण आता तिच्या कुशीत तीच मुलं होत सोबतीला . त्याच्याकडे बघून तर तिला अधिक बळ मिळत होत सगळं सहन करण्याच. आयुष्य जगण्याला ध्येय मिळालं होत.
   
         नवऱ्याने गुंतवणुक करून भागीदारीत  सुरू केलेली कंपनी चांगली चालायला लागली तशी तिने आईकडून आणलेले पैसे परत करावे म्हणून नवऱ्याच्या मागे तगादा लावला. सासूबाईंनी तर ते पैसे परत करायला दिलेच नव्हते कल्याणीला घरात घेण्यासाठी दिले होते असं नवऱ्याच्या डोक्यात भरवून ठेवलं होतं. त्यामुळे पैसे परत करा म्हणताच तो कल्याणीला मारहाण करी.
        नंतर नंतर तर तिनेच नवऱ्याकडे पैसे परत करावे हा तगादा बंद केला. मुलाच्या जन्मानंतर नवऱ्याने कधीच मुलाला जवळ घेतले नाही की त्याचा लाड केला नाही. नवऱ्याला प्रेम व्यक्तच करता येत नसावे अशी स्वत:ची समजूत घालून तीच मुलाला वडिलांचीही माया देत होती.
         जेव्हा मुलाला शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हाही ," तुझ्या आईकडून पैसे आण आणि मग घाल त्याला किती घालायचं ते शाळेत " असं तिला ऐकावं लागलं तेव्हा मात्र ती उफाळून आली.
   माहेराहून पैसे आणले तरी  इतक्या वर्षांच्या संसारात कधी साडी घेतली नाही की माझा कोणताच खर्च केला नाही. हौस मौज तर खूपच दूरची गोष्ट. राब राब राबवून घेतलं तेव्हा एकवेळेच जेवण दिलं. माझ्या आईने दिलेले पैसेही परत करण्याचं नाव घेतलं नाही. माझा छळ करता तेवढा पुरे नाही का? कसली ही दुष्ट वृत्ती. आता स्वतःच्या मुलाचीही  जबाबदारी नाकारता . बारा वर्षानी मुल झालं त्याच कौतुक तर झालंच नाही आता निदान त्याच्या शिक्षणाची तरी हेळसांड करू नका."
       एरवी कधी उलटून न बोलणारी कल्याणी चिडून पोटतिडकीने बोलली म्हणून की काय कुरकुर करत का होईना मुलाला शाळेत घातलं. पैशावरून जे कल्याणीला ऐकावं लागतं होत तेच आता तिच्या मुलाला ऐकावं लागतं होत, " जा तुझ्या आईकडून पैसे आण".
          स्वतःचा नातू पण..... सासूबाईंनाही कधी त्याच्याबद्दल पाझर फुटला नाही.
          तोही याच वातावरणात मोठा होत होता. आपल्या आईला विनाकारण मार खातांना बघत होता. इवलसं पोरं पण आईसाठी वडिलांशी भांडत होता . त्यांचा मार खात होता.
      नवऱ्याने भागीदारीत सुरू केलेली कंपनीही बंद पडली. प्रचंड आर्थिक नुकसान झालं. आता तर या अपयशच खापर कल्याणी आणि तिच्या मुलावरच फोडण्यात आले.
       आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास असं वाटायला लागलं.

सासूबाई कल्याणी आणि नातवाला उठता बसता टोमणे मारू लागल्या . कल्याणी सोशिक होती पण मुलाला मिळणारी वागणूक तिच्या सहन शक्तीच्या पलीकडे होती.
      नवऱ्यालाही मुलाबद्दल माया नव्हती. आता तर मुलाचा
सगळा खर्च कल्याणीच्या माहेरच्यांनी करावा असा त्याने हट्टच धरला . इतकचं नाही तर नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अजून पैसे आणून द्यावेत यासाठीही तो   मुलालाच छळू  लागला. कारण त्याला माहित होत नुसतं कल्याणीला त्रास देवून ती माहेरी जायला, पैसे आणायला तयार होणार नाही.  मुलाला त्रास दिला की कल्याणीला सगळं त्यांच्या मनाप्रमाणे करावे लागेल.
        कल्याणी माहेराहून पैसे आणायला तयार होत नव्हती . उलट ती नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करी की ," अनेकदा पैसे आणले पण काही ना काही कारणाने धंद्यात यश हाती आलं नाही. यावेळी स्वतः कष्टावर करू काही तरी ....
हवं तर मी डबे बनवण्याच काम करते . तुम्ही ही छोट मोठं काम करा ... जे मिळेल त्यात सुखाने राहू. मुलाला शिकवू . त्याला मोठा करू. देवाच्या कृपेने आपलं स्वतःच घर आहे. मुलं ही आहे . सासूबाईंना पेंशन आहे. त्यामुळे त्यांची काळजी नाही. मी कधीच काही मागितलं नाही तुमच्याकडे ... यापुढेही काहीच मागणार नाही. दोघं मिळून मेहनत घेवू . मला कोणत्याच कामाची लाज नाही. आपल्या संसारासाठी मी चार घरची धुणभांडी करायलाही मागे हटणार नाही. पण या वेळी मात्र मी माहेराहून पैसे आणणार नाही."
     नेहमीप्रमाणे याही वेळी समजावण्याचा काहीच फायदा झाला नाही.
         मारहाणीची परिसीमा झाली . मुलाचं शाळेत जाणं ही बंद केल्या गेलं. ती हे सगळं का सहन करत होती ?? तर... नवऱ्याला सोडून राहणाऱ्या स्त्री बद्दल   समाज काय म्हणेल ? कसाही असला तरी मुलाला बापाचं छत्र हवंच. सासुरवास सगळ्यांनाच असतो त्यात नवल ते काय ? या रुढीवादी मताचा समाज  असतांना तिने नवऱ्याला विरोध करणे म्हणजे समाज विरोधी वर्तन ठरलं असतं. महेरच्यांनाही वाटायचं की ," इतक्या वर्षांनंतर नवऱ्यापासून वेगळं होणं म्हणजे समाजात हसं होईल. सासू एक ना एक दिवस थकेलच ना .... तेव्हा सासुरवास बंद होईल. एकदा का मुलगा मोठा झाला की नवऱ्याचाही  फार त्रास सहन करावा लागणार नाही"
       खोट्या आशेवर ती दिवस ढकलत होती.
  एक दिवस कल्याणीला मार खातांना बघून मुलगाच म्हणाला ," काय होईल ते होवू दे .... आता आपण इथे रहायचं नाही. असला बाप असण्यापेक्षा मी माझा एकट्याने रहायला तयार आहे. मिळेल ते काम करू पण इथे रहायचे नाही ".
           सगळं जग एकीकडे आणि मुलाचे धीराचे शब्द एकीकडे. तसही त्याच शिक्षण पुन्हा सुरू करणं फार गरजेचं होतं. या सगळ्यात त्याचं वर्ष वाया गेलं होतं.  २१ वर्षात सासूबाईंना आणि नवऱ्याला कधी पाझर फुटला नव्हता . भविष्यातही पाझर फुटण्याची शक्यता नव्हती . कल्याणीच्या जगण्याचा उद्देशच तिचा मुलगा होता . त्याने सांगितल्यावर तिनेही मन खंबीर केलं . हा अन्याय सहन करण्यापेक्षा आता त्याच्यासाठी या घराबाहेर पडणच योग्य ठरणार होत.
        ती मुलाला घेवून घराबाहेर पडली. तिच्या मनात माहेरी  जायचं नाही हे पक्क होत. तिची पावलं दिरजावेच्या घराकडे वळली. खरं तर त्यांच्यावरही तिला भार बनायचं नव्हतं. मिळेल ते काम करण्याची तिची तयारी होती. ती मुलाला घेवून स्वतंत्रच रहाणार होती पण तोपर्यंत तिला त्यांचा आधार हवा होता.
       तिची ती अवस्था बघून दिराने खूप प्रयत्न केले आईला आणि भावाला समजावून सांगण्याचे पण त्यांना खात्री होती की कल्याणी स्वतःहुन परत येईल.
कल्याणीच शिक्षण जास्त नव्हतं त्यात पदरी पोर घेवून ती जाणार कुठे?
      पण या वेळी मुलाची साथ तिला मिळाली होती म्हणून तीही जिद्दीला पेटली होती. काही झालं तरी परत जायचं नाही हे तिने पक्क ठरवलं होतं.
         लवकरच तिने स्वयंपाकाची कामं धरली. छोटी खोली भाड्याने घेवून त्यात संसार मांडला. मुलगाही तिला मदत करत होता. तिने त्याला सरकारी शाळेत घातलं. त्याच वय तस लहानच तो करून करून किती मदत करणार. एकट्या कल्याणीवर आर्थिक भार पडला. घरभाड शाळेचा खर्च , घरखर्च तिच्या एकटीच्या कमाईत भागात नव्हता. मुलाला घेवुन वेगळं रहाते म्हणून समाजाचाही तिच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता.
       वहिनीच आणि भावजयीच अजिबातच पटत नव्हतं. आई भवाजवळ न राहता एकटी राहू लागली तेव्हा
  कल्याणीच्या भावाने सुचवलं की " आईचं वय झालंय, ती एकटीच रहाते. तू तिच्याजवळ रहायला गेलीस तर दोघींना एकमेकींचां आधार होईल. चार घरची कामं करतेस त्यापेक्षा आईजवळ रहा तिची सोय होईल. तिथे राहून जे करता येईल ते काम कर. नवरा घ्यायला येईल ... नाही येईल ते पुढचं पुढे बघू"
      तिलाही ते पटलं . आईची सेवा करता येईल . घराच भाड वाचेल असा विचार करून ती आईकडे रहायला आली.
        तिथे राहून तिने डबे देण्याचं काम स्वीकारलं. आईची परिस्थिती चांगली होती पण आता कल्याणीला कोणाचेच उपकार नको होते. आईही पक्की व्यवहारी होती. कल्याणी आपल्या घरात फुकटात रहाते म्हणून तीही स्वत:ची सगळी कामं कल्याणीलाच सांगत होती. कल्याणीचा मुलगा तर ' जावयाचं पोर अन् हमारमखोर ' असं वाटून आईच्या डोळ्यात खुपायचा. आपल्या आईने मुलाला टाकून बोललं की कल्याणीची घुसमट व्हायची. मुलगा मोठा झाला तस त्याला रोज रोज आजीचे ते बोलणे ऐकून घेणे जड जावू लागले. आईसोबत वेगळं रहावं येवढं त्याच वय नव्हतं की कमाई नव्हती. मुलाच्या आवडीचा पदार्थ बनवून तो त्याच्यासाठी घुवून जायचं ठरवलं तरी तिला तिच्या आईच्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागायची. मुल स्वतःच, पैसे स्वतः चे, पदार्थ बनवण्यासाठी कष्ट तिचे स्वतःचे तरी तिला स्वतः च्याच मुलाला मोकळेपणाने भेटण्याचे  स्वातंत्र्य नव्हते. कमाई फारशी नव्हती . काही झालं तरी सासरी जायचं नाही हे कल्याणीने ठरवलं होतं तसं च तिच्या मुलाचाही पक्का निश्चय झाला होता.
पण त्याला इथे आजी सोबत राहणं ही कठीण जात होत. आर्थिक कोंडी इतकी होती की शेवटी त्याने एकट्यानेच घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या मित्राच्या घरी राहू लागला. शिक्षण घेत घेत तो मिळेल ते काम ही करू लागला. सुरवातीला कल्याणीला भेटायला तो आजीच्या घरी येत होता पण तो दिसता क्षणी आजीचा तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा . कल्याणीला ते अजिबात खपायच नाही पण इथेही तिची "आपलेच दात अन आपलेच ओठ" अशीच गत झाली होती. शेवटी उपाय म्हणून तीच मुलाला भेटायला त्याच्या घरी जावू लागली.  मुलाच्या आवडीचा पदार्थ बनवून तो त्याच्यासाठी घुवून जायचं ठरवलं तरी तिला तिच्या आईच्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागायची. मुल स्वतःच, पैसे स्वतः चे, पदार्थ बनवण्यासाठी कष्ट तिचे स्वतःचे तरी तिला स्वतः च्याच मुलाला मोकळेपणाने भेटण्याचे  स्वातंत्र्य नव्हते.
      मुलासोबत समाधानाने राहण्याचं सुख तिच्या वाट्याला कधी येणार होत काय माहित.  मुलाला बाहेरगावी नोकरी मिळाली . मुलाकडे जाण्याची इच्छा असून त्याचा पगार जास्त नसल्याने ती आईकडेच राहिली. वय झालं तशी आई अंथूरणाला खिळली. आता तर भावालाही वाटू लागलं की तिने आईजवळच रहावं. दिवसभर आईची देखभाल करण्यासाठी बाई ठेवणे परवडणारे नव्हते. मुख्य म्हणजे आईने सूनांशी पटवून घेतलं नाही कधी म्हणून मुलं गावात असून सुद्धा ती एकटी वेगळी रहात होती. ती आई काम करणाऱ्या बाईशी काय पटवून घेणार?
कल्याणी इतके दिवस सहन करत आली म्हणून सगळ्यांची सोय झाली होती.  कल्याणीला मुलाकडे आठवडाभर जाण्याचीही सोय नव्हती. आईसाठी तिला सकाळी सगळं करून जावं लागायचं आणि रात्री उशीर झाला तरी परत यावा लागायचं.
      कल्याणीच स्वतःच वय ६२ झालं होतं . तरी तिला तिच्या मनाचे निर्णय घेता येत नव्हते.
    आधी समाजाच्या धाकाने नवऱ्याचा, सासूचा त्रास सहन केला. नंतर परिस्थिती चांगली नव्हती म्हणून आईचा त्रास सहन केला.
      आता मुलाला वाटू लागलं की  कल्याणीने आपल्याकडे येवुन रहावं. इकडे भावू भावजय यांना काळजी लागली . कल्याणी मुलाकडे गेली तर आईला आपल्या घरी आणावं लागेल. तिचा छळ सहन करावा लागेल. आई झोपून होती तरी तोंड अखंड सुरू असायचं. तिचे शब्द कानात विष ओतायचे. तिच्या सानिध्यात फक्त कल्याणीच टिकली होती.
       असच एकदा आठ दिवस तरी मुलाकडे राहून यायचंच म्हणून कल्याणीने हट्ट धरला . भावावर सगळं सोपवून ती मुलाकडे रहायला गेली.
उणे पुरे चार दिवस झाले नसतील तर  आईला आय सी यू मधे अडमिट करावं लागलं. कल्याणीला गेल्या पाऊली परत यावं लागलं. आईसोबत तीच दवाखान्यात  राहिली. या वयातही कल्याणी दुसऱ्यांचा विचार करून स्वतः ची गैरसोय करत होती. त्यातही आता भावाकडून "गरज होती तेव्हा राहिलीस न आईकडे आता आईला गरज आहे तर तुला मुलाकडे जायचं आहे " अस ऐकवलं जावू लागल.
      खरंच तेव्हा तिला गरज होती आधाराची म्हणून ती आईकडे राहिली होती. पण खरंच आईने, भावाने निस्वार्थ भावनेने मदत केली होती ?? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे कधीच नव्हते. सगळ्यांनी तिच्या मजबुरीचा फायदाच घेतला होता. ती आईकडे रहात होती पण तीच घरातला सगळा खर्च भागवत होती. आईने कधीच तिला घरखर्च करायला पैसे दिले नव्हते. ती रहाते म्हणून घरकामाला बाई लावली नव्हती . सगळ्याचा हिशोबच मांडला तर कल्याणीचच् नुकसान जास्त झालं होतं. कमावत असलेले पैसेही  गाठीला बांधून ठेवणं झालं नाही की मुलाला स्वतः जवळ ठेवून घेता आलं नाही.
तिच्या वाट्याला काय आलं तर .... ज्यांच्यासाठी झटलो , राबलो त्या सगळ्यांनी तिला स्वार्थी ठरवलं.
     दवाखान्यातील आईच्या खोली बाहेरच्या बाकावर बसून संध्या सगळ्याचा विचार करत होती. तेव्हा तिला प्रकर्षाने जाणवल की योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप  गरजेचं असतं . स्वतःच्या अस्तित्वासाठी अन्यायाला वाचा फोडण महत्त्वाचं असतं. इतरांच्या मानाचा विचार न करता जेव्हाच्या तेव्हा " नाही " म्हणायला ही यायला हवं.
       आयुष्याने खूप शिकवलं . पण २१ वर्षाच्या संसारात नवऱ्याने सामावून घेतलं नाही की ६२ वर्षाच्या आयुष्यात माहेरच्यांनी समजून घेतल नाही. तरी इथे का आहोत आपण ? या प्रश्नाचं उत्तर ..... तिच्यात कोणी गुंतल नव्हतं पण वेड्या आशेने तिला मात्र सगळ्यात गुंतवून ठेवले होते. आपल्या कष्टाचं चीज होईल . दगडातला देवही पावतो ही तर सगळी आपली माणसं .... त्यांच्यात ही बदल होईल एक ना एक दिवस . आशा .... आशा आणि फक्त आशा ....
तेवढ्यात तिचा फोन वाजला .
त्यावरच तिला बातमी कळाली की ," तिचे सौभाग्य अनंतात विलीन झाले आहे " .
काय? कसं ? कधी ? असा एकही प्रश्न तिने विचारला नाही. मुलाला ताबडतोब बोलावून घेतले. सगळे विधी नीट पार पाडले. त्यामुळे ९२ वर्षाच्या सासूबाईंना आशा लागली की कल्याणी आता त्यांच्या जवळ राहून त्यांचं सगळं नीट करेल.
     १४ दिवसांनी भाऊ घ्यायला आला. आईसोबत दवाखान्यात रहातांना त्याचीही फजिती होत होती.
 तिची बॅग ही भरून तयार होती. भावाने बॅग उचलून गाडीमध्ये ठेवण्यासाठी  हातपुढे केला.
त्याचा हात तसाच हवेत ठेवून तीने ती बॅग मुलाच्या हातात दिली. तिचा निर्णय झाला होता. एका वेदनेचा अंत देवाने केला . दुसऱ्या वेदनेचा अंत होण्याची वाट बघण्यात तिला आता गुंतून पडायचं नव्हतं. आपल्यावर मुलाचा प्रथम हक्क असून गरजेपोटी त्याला कायम आपल्यापासून दूर ठेवलं .  इतरांचा विचार करण्यात आयुष्य निघून गेलं. आता तिला थोडं स्वार्थी बनून बघायचं होत. तिने आयुष्यात अन्याय सहन करण्याची चूक केली होती. खूप उशीर झाला होता पण उशिरा का होईना तिला तिची चूक सुधारायची होती.
तिच्यातल्या सोशिकतेचा उशिरा का होईना पण तिने अखेर अंत केला .काही झालं तरी ती तिच्या मुलासोबतच राहणार होती. आता ती फक्त आणि फक्त त्याची ' आई' म्हणून जगणार होती.
 ती मुलासोबत त्याच्या नोकरीच्यागावी निघाली. खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली होती. ज्यात समाज काय म्हणेल? या पेक्षा ती  तिच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा यांना प्राधान्य देणार होती. अनेक अडचणीमुळे मुक्त उपभोगायच राहून गेलेलं   " आईपण " ती आता   भरभरून अनुभवणार होती.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
आशावादी वृत्तीचा ... सहनशीलतेचा .... चेहरा नसतो ....  असते ती फक्त अनुभूती म्हणून चेहरा नसतांनाही एका सुंदर स्त्रीची अनुभूती करून देणारी ही  रांगोळी..... कल्याणी

कथेतल्या कल्याणीला अन्याय विरूद्ध उभ राहण्याच धाडस  खूप उशिरा सुचल पण वयाचा, समाजाचा विचार न करता तिने प्रयत्न पूर्वक ते धाडस केलं हे खूप महत्त्वाचे आहे. पूर्वी समाजाची अनेक बंधन जाचक होती . म्हणून तिने अन्याय सहन करण्याचा मार्ग निवडला होता. तिच्या काळात प्रत्येक घरात थोड्या फार फरकाने तिचीच कहाणी होती म्हणूनही तिने अन्यायाला  विरोध केला नव्हता.
 कारण ती जात्याच सहनशील आणि प्रचंड आशावादी होती . एक ना एक दिवस परिस्थिती बदलेले अशी तिला आशा वाटत होती. आयुष्याच्या दुसऱ्या पर्वात मात्र तिने स्वतः ला अधिक खंबीर करत निर्णय घेतला.
तिची ही कथा म्हणजे सहन सक्तीची सीमा बघणारी आहे पण या कथेतून नवीन पिढीला ती संदेश देवू पाहते की ," अन्याय सहन करणं हे कायम चूक असतं ...... तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प बसू नये . वेळीच योग्य निर्णय घ्यावे. समाज तुमच्या समस्या सोडवायला येत नाही. तेव्हा तुमच्यासाठी काय योग्य हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे. इतरांचा विचार करावा पण इतका नक्कीच करू नये की ते तुम्हाला गृहीत धरू लागतील. तुमच्या आयुष्याचे निर्णय घेतांना  तुम्ही मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर असणंही खूप गरजेचे असते. तुम्हाला गृहीत धरणाऱ्याना तुम्ही वेळीच "नाही " म्हणायला शिकलं पाहिजे.
     





महाविद्यालयाचे_पाहिले_वर्ष


#महाविद्यालयाचे_पाहिले_वर्ष
©️अंजली मीनानाथ धस्के

मी देवगिरी कॉलेज औरंगाबाद इथे पदवीच्या पहिल्या वर्गाला होते . विज्ञान शाखा असली तरी अभ्यासक्रमात  एक भाषा विषय घेणं अनिवार्य होतं. तेव्हा मी मराठी भाषेची निवड केली.  अभ्यासक्रमा व्यतिरिक्त मराठी साहित्याची पुस्तके महाविद्यालयाच्या वाचनालयातून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना फारशी दिली जात नव्हती कारण सगळ्यांना अशी पुस्तके सहज दिली तर ज्यांना अभ्यासाला आहेत त्यांनाही मग ती उपलब्ध होत नसत. त्यामुळे मी पदवीच्या पहिल्या वर्षाला मराठी भाषेची निवड ही केवळ लायब्ररीतून मराठी साहित्याची  पुस्तकं वाचायला मिळावी एवढाच उद्देश ठेवून केली होती. वडिलांची नुकतीच या शहरात बदली झाल्याने माझ्यासाठी हे शहर नवीन .... महाविद्यालयाचे वातावरण नवीन .... अजून माझ्या वर्ग मैत्रिणीही  बनल्या नव्हत्या. त्यामुळे वाचनालयातली पुस्तकं वाचणासाठी मिळवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते.
            मराठी भाषा घेतल्याने मला घरच्या घरी अभ्यास करून परीक्षेला बसता येईल असा माझा अंदाज होता.
  पण नंतर असं कळलं की त्या विषयाच्या प्रत्येक तासाला उपस्थित राहणं आवश्यक आहे . नाईलाजाने का होईना पण मी मराठीच्या तासिकेला जावून बसले.  कोण प्राध्यापक शिकवायला येणार याचीही उत्सुकता होतीच. पहिल्याच वर्गाला शिक्षक नाही म्हणून सुट्टी मिळाली . आनंदी आनंद झाला . कारण एकतर तिथले हे माझे  पाहिलेच वर्ष असल्याने माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी कोणी नव्हत्या आणि ज्या नुकत्याच ओळखीच्या झाल्या होत्या त्यांनी इंग्रजी भाषेची निवड केली होती. तारुण्य सुलभ अवस्थेतही नवीन वातावरणात आपल्या ओळखीचं कोणीच सोबत नसतांना वर्गात बसून राहणं म्हणजे निव्वळ काळ्या पाण्याची शिक्षाच असते.
      दुसऱ्या तासिकेला आम्ही एकूण १३ जण हजर होतो. त्यात मुली फक्त तीन बाकी १० मुल होती. मी पटकन् सगळ्यात शेवटच्या बाकावर जावून बसले. प्राध्यापक वर्गात आले . त्यांनी आमच्या निरुत्साही चेहऱ्यांकडे बघितले. मी एकटीच बसलेली असल्याने की काय कोण जाणे त्यांनी मला पहिल्या बाकावर येवुन बसण्यास सांगितले. मीही नाईलाजाने जोडी जोडीने बसलेल्या  इतरांकडे बघत अगदीच अवघडल्यासारखी पहिल्या बाकावर येवुन बसले. माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून प्राध्यापकांनी ही मग सगळ्यांनाच पुढे बसण्याची विनंती केली.
तासाची सुरुवात अगदी ठरल्या प्रमाणे झाली . सर्व प्रथम एकमेकांचा परिचय करून घेण्याचे ठरले.
त्यांनी स्वतःचा परिचय करून देतांना अगदी आनंदाने आणि आत्मविश्वासाने विचारलं , " तुम्ही मला ओळखत असालच .... मी फ.मु. शिंदे " त्यावर कदाचित त्यांना आमच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव बघायचे असतील पण आम्ही अगदीच ढ .... कसलेच भाव चेहऱ्यावर न  देता फक्त ऐकण्याचे काम करत मख्ख बसून  होतो . त्यावर त्यांनीच सांगितलं की माझी कविता तुमच्या अभ्यासक्रमात होती .  मला ती कविता आठवली नाहीच पण त्यांचं नाव मात्र परिचयाचं वाटू लागलं.
बहुदा विज्ञान शाखेचे विद्यार्थी थोड्या फार फरकाने अशीच प्रतिक्रिया देत असावे ... कारण त्यांनाही आमच्या प्रतिक्रिया आणि एकंदरीत आमचे साहित्याचे  ज्ञान बघून फारसे आश्चर्य वाटले नाही.
त्यांनी आमची नाव विचारण्याची औपचारीकताही मग , " वर्गात नियमीत हजर रहाल तर मला तुमची ओळख आपोआपच होईल  आणि हजर नाही राहिलात तर त्याची फारशी गरज ही पडणार नाही " असा विनोद करून टाळली .
तास संपला .... जेव्हा मी घरी आल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला त्यावर आईने मला असं काही रागावलं की बाप रे बाप ..... गाढवाला गुळाची चव काय? .... साधी कविता आठवू नये म्हणजे काय? .... तुमचं भाग्य थोर फ. मु. शिंदे तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहेत . वैगेरे..... वगैरे
 बाकी मला फारस आठवत नाही पण इथून पुढे सगळ्या तासिकांना हजर राहणे फार गरजेचे आहे याची जाणीव झाली.
मला लहानपणीही कधीच मराठी विषयात कवींचे नाव .... त्यांचे टोपण नाव .... किंवा त्यांची कविता ... धडा... यांच्या योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न आला तर त्याचे उत्तर ठामपणे देता येत नसे. मी तो प्रश्न बुद्धीवर जोर देवून नाहीतर , अक्कड बक्कड बंबे बो .... म्हणूनच सोडवत असे. वाचनाची आवड असूनही मला काही केल्या लेखकांची आणि पुस्तकांची नाव लक्षात राहत नाही. याच दुर्गुणा मुळे मी एकच पुस्तक अनेक वेळा वाचले आहे .... नेमकी शेवट वाचल्यावर आठवत की हे पुस्तक आपण आधी वाचलेलं आहे. आता तर वाचनालयात ले लोकच त्यांच्या कडे असलेली माझ्या वाचलेल्या पुस्तकांची यादी बघून सांगतात ," मॅडम हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे दुसरं  शोधा ...."
मी खूप मार आणि बदाम खावूनही इतरांना जी माहिती अगदी सहज लक्षात राहते ती कधीच लक्षात ठेवू शकले नाही  आणि आता ही मला ते जमत नाही हे मात्र खरं.
असो....

नंतरच्या तसिकेला त्यांनी राधा आणि कृष्ण यांच्या बद्दल खूप गहिरा अर्थ सांगणारी कविता शिकवायला सुरुवात केली. त्यांनी चार ओळी वाचल्या आणि आम्हाला त्याचा अर्थ विचारला . त्यावर एक मुलगा म्हणाला ही मराठी भाषेतली कविता आहे एवढेच कळले बाकी काही कळलं नाही. त्याच उत्तर ऐकुन सरांनी डोक्यालाच हात लावला.. मला उठवले आणि मला जे काही समजल ते माझ्या शब्दात मांडायला सांगितलं. मला ती फारच थोडी कळली होती पण आता गप्प बसून चालणार नाही याची जाणीव होवून मी अगदी प्रामाणिकपणे जे समजलं ... जेवढं समजलं तेवढं सांगितलं. काय झालं कुणास ठावूक .... पण या घटने नंतर मास्तर पूर्ण वेळ फक्त मला एकटीलाच कविता शिकवत होते.

तिथून पुढे वर्गात कोणताही प्रश्न हा फक्त मलाच विचारला जात होता . आता वर्गातल्या इतर दोघी ही माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या तरीही त्या मराठीच्या तासाला माझ्या जवळ बसण्याच टाळू लागल्या. मलाही मराठी विषयाचा अभ्यास करणं आवडत नव्हत..... आवंतर वाचनासाठी मात्र जीव कासावीस होत होता.
मी अनेक जागा बदलल्या तरी काही फरक पडला नाही.
महाविद्यालयाच्या  परिसरात फिरतांना .... वाचनालयात असतांना चुकून कधी सरांची भेट झाली तर ते अभ्यासाची  आवर्जून चौकशी करायचे. त्यांच्या वागण्यात मोकळे पणा होता. ते वयाने आणि अनुभवाने मोठे होते तरी त्याचं दडपण त्यांनी कधीच विद्यार्थ्यांना दिलं नाही.
थोड्याच अवधीत बाकी १२ जण ही त्यांच्या तासिकेला मोकळेपणी चर्चा करू लागले. सर नेहमी सांगायचे ,"  लेखकाला काय सांगायचं आहे हे महत्वाच असतंच पण वाचकाला त्यातून काय बोध होतो हे ही महत्वाचे आहे . दोघांची विचारधारा जुळली तर गाडी योग्य रस्त्यावर आहे असं समजायचं आणि नाही तर ती योग्य रस्त्यावर आणण्याचं काम आमच्या सारख्या शिक्षकांना करावं लागत. त्याचाच आम्ही पगार घेतो . तेव्हा तुम्ही बोला ... व्यक्त व्हा.... म्हणजे माझे कष्ट वाचतील . " अगदी हसत खेळत विनोद करून ते शिकवायचे त्यामुळे अर्थातच एक कविता अनेक दिवस शिकवल्या गेली.
आमच्या महाविद्यालयाचा वार्षिक अंक निघत असे. त्यात विज्ञान शाखा विभागातूनआम्हीही आमचे काही लिखाण केले असेल ते देवून सहभागी व्हावे  अशी सरांची इच्छा होती. कोणी तयार होईना तेव्हा मला सांगण्यात आले की ," तुला तर काही तरी लिहून द्यावेच लागेल .... विज्ञान शाखेचे कोणीच सहभाग घेणार नाही . मग मी शिकवण्याचा काय फायदा..... तू काही तरी लिखाण करत असावी असा माझा अंदाज होता ... तू काहीच लिखाण करत नाहीस का? "
 त्यावर  मी ," थोड थोड करते ...पण माझ्या पुरतेच ते मर्यादित असावे असे मला वाटते . कारण  त्यात फार काही विशेष नाही ... जेव्हा जे मनात आलं ते लिहून ठेवते पण त्या कविता तुम्ही वाचाव्या किंवा मासिकात प्रकाशित व्हाव्या अशा मुळीच नाहीत " . त्यावर ते ठाम पणे म्हणाले
" ते माझं मला ठरवून दे ... उद्या येतांना  तुझ्या कविता आण .... त्यातल्या ज्या मला बऱ्या वाटतील त्याचं देतो मासिकासाठी ... मग तर झालं ".
मी खूप सांगून पाहिलं पण ते ऐकायला तयार नव्हते तेव्हा माझा नाईलाज झाला.
मला माझ्या त्या कविता प्रकाशित व्हाव्या असे मुळीच वाटत नव्हते. कारण मी लिहिते हेच मला मुळी कोणाला सांगायचे नव्हते. माझ्या कोणत्याच खास मैत्रिणींनाही मी लिहिते हे माहीत नव्हतं. फक्त १२ वीतली  मैत्रीण प्रीती  ही आता पर्यंतची एकमेव माझी वाचक होती . तीच आणि माझं ते गुपित होतं. रिकामा वेळ मिळाला आणि फक्त ती आणि मीच असलो की मी कविता वाचन करायचे . ती फारच मन लावून ऐकायची . खूपच खुश व्हायची. तीच माझ्यावर खूप प्रेम होत (आताही आहे ) म्हणून मी काहीही लिहिलं तरी तिला ते ऐकुन खूप भारी वाटायचं. त्यामुळेच कदाचित तिच्याजवळ  मी जे काही लिहिते ते वाचायला मला हिंमत मिळायची.
पण आता हे असं मासिकात लिहून येणं म्हणजे  जरा अती धाडसच काम होत. एकतर विज्ञान शाखेचे मी विद्यार्थिनी त्यात मला कोणी कवयित्री म्हणून ओळखावे असे मला मुळीच वाटत नव्हते . मुख्य म्हणजे घरी समजले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल याचीच मला काळजी लागून राहिली होती. वडिलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कशातही फारसा रस नव्हता या उलट आईला मराठी विषया बद्दल असीम आदर ... प्रेम... तेव्हा माझ्या  सुमार कविता वाचून तिने डोक्याला हात लावला तर ....याची भीतीही होती . त्याला कारण ही तसेच होते . मी तिसरीत असतांना...... बाई वर्गात शिकवत होत्या . बाहेर मस्त पाऊस पडत होता . मी  खिडकीच्या बाहेर रिमझिम पाऊस बघण्यात गुंग झाले . मनात भराभर विचार आले . मी माझ्या  कवितांच्या वहीत ते पटापट लिहू लागले
    मला लिखाणाचा सुर गवसला होता इतक्यात  माझ्या पुढची वही बाईंनी काढून घेतली . मुख्याध्यापिका बाईंकडे मला नेण्यात आले. माझी वही जप्त झाली . माझ्या पालकांना बोलावून घेतल्या गेलं. त्यानंतर खर तर मला  शाळेत काय किंवा घरी काय कोणी ओरडले नाही पण माझ्या कविता हा घरी थट्टेचा विषय  झाला होता. अर्थात त्या कविता होत्याही तशाच मजेशीर . आपल्या सुप्त गुणांचा असा बोभाटा व्हावा हे मनाला रूचल नाही . लिखाण सुरूच राहील पण आता ते सहजा सहजी कोणाच्या हाती लागणार नाही इतपत काळजी घेतल्या गेली...... असो.
मी माझी जपून आणि लपवून ठेवलेली डायरी सरांना दाखवली. त्यांनी वर्गातच काही कविता वाचल्या आणि त्यातल्या तीन कविता माझ्याकडून वेगळ्या कागदावर माझ्या नावा सहित लिहून घेतल्या .
माझ्यासाठी तो विषय तिथेच संपला ..... मी मासिक घेवून कधी बघितलं नाही की माझी कविता त्यात आहे का? ... किंवा कोणती आहे ?
          दोन वर्षांनी जेव्हा एका नवीन मैत्रिणीने विचारल की तू आपल्या महाविद्यालयाच्या मासिकात कविता लिहिली होती का? मी तुझ्या कविता वाचल्या आहेत. तुझं नाव होत कवितेच्य  खाली.....  त्यावरून मी मात्र अंदाज बांधला की आपण सरांना दिलेल्या कविता मासिकात छापून आल्या आहेत.
 खरं तर हे ऐकुन मला आनंद होईल अशी तिची अपेक्षा होती पण माझ्या लिखाणाचं गुपित हिने इथे सगळ्यांसमोर असं उघडं करू नये याचीच मला चिंता सतावत होती. तेव्हा विज्ञान शाखा आणि कला शाखा यात फारसे सख्य नव्हते . विज्ञान शाखेतील शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे कल असलेला फारसे रुचत नव्हते. " इतकीच आवड आहे साहित्याची तर विज्ञान शाखेत प्रवेश कशाला घेतला? .... उगाच विज्ञान शाखेची एक जागा वाया घालवली"..... हेही ऐकुन घ्यावं लागलं असतं.
 तो विषय तिने अधिक वाढवू नये म्हणून मी त्याबद्दल कसलीही चौकशी न करता विषय बदलला.

त्यानंतर एवढं मात्र झालं की कधी तरी वेळ प्रसंगी मी माझ्या कविता काही खास मैत्रिणींना वाचून दाखवू लागले . पण हे प्रमाण फारच कमी होत . इतकं कमी की आजही अनेक मैत्रिणी ,' तू लिहितेस हे माहिती नव्हतं .... याचा नव्यानेच शोध लागला'  असं म्हणतात.   हे ऐकुन मला आजही आनंद व्यक्त करावा की आपलं लिखाणाचं गुपित आता गुपित राहील नाही याचं दुःख करावं काही कळत नाही.
  तेव्हा महाविद्यालयात मित्र मैत्रिणीं कडून त्यांची आवड निवड जाणून घेण्यासाठीची प्रश्न पुस्तिका भरून घेण्याची पद्धत आली होती. आईला साहित्याची प्रचंड आवड होती. तिला  फ. मू. शिंदे सरांची स्वाक्षरी भेट करावी म्हणून मी
एक नवी कोरी पुस्तिका घेवून ती सरांना माहिती लिहण्यासाठी दिली.
त्यात आवडता रंग ..... इथे त्यांनी ..." पांडुरंग " असे लिहिले . तुमच्या मित्र/ मैत्रिणी साठी काही लिहा .... तिथे त्यांनी ..., " आयुष्याचे सगळे रंग तिने अनुभवावे .... मोकळ्या मनाने व्यक्त व्हाव... पुढच्या वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा" असं माझ्यासाठी लिहिले.
त्यांनी तेव्हा प्रेमाने दिलेला सल्ला..... मोकळ्या मनाने व्यक्त हो..... आज त्याचा अर्थ कळतो आहे. खरं तर त्यांच्या सनिध्याचा फायदा करून घेत लिखाणाची उंची गाठण्याचा संधी मिळाली होती पण मनातल्या संकोचाने ती गमावली.
महाविद्यालयाचे पाहिले वर्ष तसे माझ्या लेखी फारच दुर्लक्षित राहिले. आज मात्र भूतकाळातील आठवणींचे गाठोडे उघडले तेव्हा जाणवलं..... शिक्षक म्हणून सरांचे जे सानिध्य मला लाभले त्याचा माझ्या   लिहिण्यावर कळत नकळत परिणाम झाला . त्यांनी मी बरं लिहू शकते हा आत्मविश्वास निर्माण केला होता.
त्याच्या जोरावरच आज मी इथपर्यंतचा प्रवास केला आहे.
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.



मीही शाळेत जाते



     #मीही_शाळेत_जाते
©️ अंजली मीनानाथ धस्के
कोणी न जन्माची वाट बघत
होते आयुष्याचे दोरही कापत
कधी विटा होते उचलत
उन्हा तान्हात गुर राखत
कधी भावंडांना सांभाळत
धुणे भांडीही होते  करत
स्वप्ने नव्हती कधी मला पडत
जगले होते वास्तव स्विकारत

आता मात्र...
मीही शाळेत जाते
डोळ्यांनी नवी स्वप्न बघते
ज्या हातांनी थापल्या गवर्‍या
त्याच हातांनी नशीब बदलते
नुसती अक्षर नाही गिरवत
माझे उज्ज्वल भविष्य घडवते
आता मीही शाळेत जाते
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.




ती आणि तिचा मानसिक ताण

#ती_आणि_तिचा_मानसिक_ताण
©️ अंजली मीनानाथ धस्के
       सगळेच गेले अनेक दिवस घरात .... सक्तीने घरात थांबव लागतंय म्हणून कंटाळलेले.
     दिवसभराच्या कामात तिला तिचा नेहमी मिळणारा निवांतपणाही मिळेनासा झालेला.
        काळजीने आप्तस्वकियांची चौकशी करण्यासाठी फोन हातात घ्यावा तर त्यावर ढीगभर संदेश आलेले.
काही खरे , काही खोटे , काही पुरुषांच्या घर कामावर विनोद करणारे तर काही स्त्रियांच्या वाढलेल्या घर कामाबद्दल दुःख व्यक्त करणारे . काही मानसिक संतुलन राखण्यासाठीचे उपाय सांगणारे तर काही शारीरिक आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त माहिती देणारे. काही मन गुंतवून रहावं म्हणून गंमतीदार आव्हान देणारे तर काही अनेक प्रकारच्या स्पर्धा जाहीर करणारे.
       तिने फोन बाजूला ठेवला . डोळे बंद केले. विचार मनात घोंगावू लागले.
     
वाढलेल्या कामाचा ताण शरीरावर जाणवतो आहे. घरबसल्या मिळणाऱ्या खऱ्या खोट्या माहितीने मनावरचा ताण ही वाढतो आहे.
नेमके काय करावे म्हणजे मनावरचां ताण कमी होईल?
ही रोज रोज येणारी गंमतीदार आव्हाने स्वीकारण्यात दिवस कमी पडतोय. मुलांनाही वेळ द्यायचा आहे. त्यांनाही नवीन काही शिकवता आलं तर शिकवायच आहे.
        घरातल्या कामात नवरा मदत करतोय पण त्याच्यावरही तर वर्क फ्रॉम होम चा ताण वाढतोय.
        भविष्यात येणाऱ्या आर्थिक मंदीचा... त्या अनुषंगाने येणाऱ्या बेरोजगारीचा विचार ही त्याला सतावत असेलच.
     आपण आपला आज मजेत जावा म्हणून शक्कल लढवतोय तर तो भविष्य सुरक्षित रहावे म्हणून घरून जमेल तेवढी काम करतोय ...  झटतोय.
त्याला विरंगुळा लागत नसेल का? तो त्याचे मन रमावण्यासाठी कोणती गंमतीदार आव्हाने स्वीकारत असेल? त्याच्या मनावरचा ताण तो कशा प्रकारे कमी करत असेल?
        खरं तर सामाजिक अंतर ठेवून वागायला शिकवणारी ही परिस्थिती प्रत्यक्षात मात्र कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणणारी आहे. पण एकत्र वेळ घालवण्या ऐवजी जो तो नेहमी प्रमाणे किंबहुना नेहमीपेक्षा जास्तच वेळ मोबाईल हातात घेऊन त्यात स्वतः चां आनंद शोधतोय.
     खरं तर केवळ   स्वतःच्या मानसिक ताणाचा  विचार न करता कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचा एकत्रित प्रयत्न करायला हवा.
बाकीचे कामं आपण नेहमीच करतो. पण इच्छा असूनही एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नव्हता. आता तो वेळ मिळतोय तर चांगल्या आठवणी तयार करायला हव्या. मुलांसाठी तर हा काळ फार महत्वाचा आहे. या काळातील भीतीची , एकटेपणाची जाणीव त्यांना आयुष्यभर लक्षात राहील पण याच जाणीवेला आपण आनंदात ,  उत्तम संस्कारात , सृजनशीलतेच्या शोधात बुडवल तर ..... तर मात्र  हा काळ " सुवर्ण आठवणींचा  काळ " म्हणून कायम त्यांच्या  स्मरणात राहील.
  भविष्यात  बिकट परिस्थिती आली तरी घरच्यांच्या साहाय्याने आपण तिच्यावर मात करू शकतो असा विश्वास आपल्या मुलांमधे निर्माण करण्याची हीच संधी चालून आली आहे..
     आलेल्या परिस्थिती बद्दल आपण तक्रार केली तर मुलंही तोच तक्रारींचा पाढा वाचायला लागतात.
     सगळ्यांच्या तुलनेत  स्त्री मानसिक दृष्ट्या सबळ आहे . जर आपण ठरवलं तर ही परिस्थितीच एक वेगळं आव्हान म्हणून स्वीकारू शकतो. आपल्यासोबत  घरातल्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राखू शकतो.
         असे अनेक विचार डोक्यात सुरू असताना तिला एक कल्पना सुचली.
       एरवी जे करण्याचं धाडस होत नाही किंवा जे करण्याची फारशी गरज पडत नाही ते आता करायचं.
     " दिवसातले काही तास कुटुंबातल्या सगळ्यांनी फोन बंद ठेवायचं" .... या वेळात विविध खेळ खेळायचे, गप्पा मारायच्या, आपले आवडते छंद जोपासायचे .
एरवी ही आपण हे सगळं करत असतो पण फोन सुरू असल्याने त्यावर काम करत करत बाकी कामं करतो.
    फोन बंद असल्याने आपलं पूर्ण लक्ष आपण करत असलेल्या कामावर केंद्रित होईल. हा वेळ फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा असेल. या निमित्ताने आपल्याला एकमेकांना नव्याने जाणून घेता येईल.
 काही दिवस सोशल डीस्टासिंग पळायचं आहे ... त्या निमित्ताने सोशल मीडिया पासूनही जरा दूर राहू. चुकीची माहिती वाचणं नको की त्यावर तर्क वितर्क करणं नको. योग्य माहिती आधीच मिळालेली आहे. त्या आधारे आपण भल आणि आपलं कुटुंब भल.
 ठरलं तर मग .....
तिने फोन हातात घेऊन बंद केला.
कार्टून बघत बसलेल्या मुलांना आवाज दिला . वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नवऱ्याला थोडा वेळ ब्रेक घ्यायला सांगितला. फोन वर आपल्या मित्र मंडळीशी त्याच त्याच गप्पा मारून कंटाळलेल्या  सासू सासऱ्यांनाही बोलावून घेतलं. सगळ्यांना फोन थोडा वेळ बंद करायला सांगितले.
         कोणता खेळ खेळायचा किंवा काय काम करायचं असेल ते सगळ्यांनी मिळून ठरवायचं अस तिने जाहीर केले.
            आजी आजोबांनी सुचवलेले खेळ  ऐकुन मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
   खेळ खेळतांना मुलांचां आनंद ओसंडून वाहत होता तर मोठ्यांनाही त्यांचे बालपण नव्याने गवसले होते. आजी आजोबा ही मुलांचे आधुनिक खेळ प्रकार आवडीने शिकून घेत होते. सगळ्यांना नवं ज्ञान मिळत होत . त्या सोबत एकमेकांना अधिक समजूनही घेता आलं. फोन वारंवार हातात न घेणाऱ्या पालकांच्या संगतीने घालवलेला हा वेळ मुलांसाठी  संस्मरणीय झाला . सोबतच घरातल्या मोठ्यांनाही मुलांसारखा उत्साह अनुभवायला मिळाला.
तिलाही  तिचा पर्यायाने कुटुंबाचा मानसिक ताण कमी करण्यासाठीचा खात्रीशीर उपाय मिळाला .
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः
 हा लेख आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावा .
आपल्या सगळ्यांच्याच मनात विचार चक्र सुरू आहेत. काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तर काहींची उत्तर  आपण आपली शोधायची असतात. प्रश्न एकच असला तरी प्रत्येकाचं उत्तर मात्र वेग वेगळं असू शकत. या लेखातल्या ' तिच्या ' सारखेच अनेक उपाय तुम्ही ही शोधून काढले असतील . ते उपाय
 नक्की शेयर करा.

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिना निमित्त

#वटपौर्णिमा
 #जागतिक_पर्यावरण दिना निमित्त
©️ अंजली मीनानाथ धस्के
#सोपी आणि #झटपट होणारी #रांगोळी
वटपौर्णिमेनिमित्तखास घेवून आली आहे अगदी झटपट होणारी पण तितकीच सुंदर दिसणारी रांगोळी. सद्य परिस्थितीत #social_distancing चे पालन करण्यासाठी घरातच वटपौर्णिमेची पूजा करावी असे आवाहन केले जात आहे. परंतु पूजेसाठी झाडाची फांदी तोडून आणणे म्हणजे निसर्गाची हानी करणे होय. घरा बाहेर न पडता .... निसर्गाचे कोणतेही नुकसान न करता आनंदाने आणि समाधानाने वटपूजा करता यावी म्हणून पाटावर वडाची रांगोळी काढून त्याची मनोभावे पूजा करावी असा एक छान पर्याय  सुचला आहे. त्याचं पार्श्वभूमीवर सगळ्यांना काढता येईल अशी अगदीच साधी सरळ सोपी पण तितकीच आकर्षक वडाच्या झाडाची रांगोळी घेवून आली आहे. #Covid19 आला तसा जाईलही पण सण साजरा करण्याची आपली परंपरा खंडित होता कामा नये म्हणूनच
 हा व्हिडिओ बघून तुम्हीही रांगोळी नक्कीच काढू शकता हा विश्वास तुमच्यात निर्माण होईल.
तेव्हा घरात रहा सुरक्षित रहा ...... सोबतच आपल्या जुन्या संस्कृतीचे जतन थोड्या वेगळ्या अंदाजाने करण्याचा प्रयत्न नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास रंग माझा वेगळा या YouTube channel la subscribe करायला विसरू नका. असेच नव नवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇👇👇👇
https://youtu.be/nbgOLkemgIs


गणेश चतुर्थी ४ ते ४ थेंबी रांगोळी प्रकार १

#संकष्ट_चतुर्थी
##गणेश_चतुर्थी
#४ते४थेंबी
#रांगोळी
#प्रकार१

 रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि रांगोळी शिकण्याचा #श्री #गणेशा कराच. #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठीही खूप #उपयुक्त.
 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून रंग माझा वेगळा या #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
४ ते ४ थेंबी गणेश रांगोळी प्रकार २ चा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://youtu.be/XDgQ02EUVdk
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे
गणेश रांगोळी प्रकार २ रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇👇👇👇
https://youtu.be/DXJB8xfxHxk

गणेश रांगोळी प्रकार १


उखाणा (वटपौर्णिमा निमित्त)

 #उखाणा

   सण येता घरी
यंदा करोना उभा दारी
तरी वडाला मी पूजणार
काढून त्याची सुरेख रांगोळी
नैवेद्याला करणार
साजूक तुपातली पुरणपोळी
झाडाची फांदी मी तोडत नाही
अशा परंपरा मी मानत नाही
घरातच मी राहणार
तरी सणांची परंपरा जपणार
वृक्षांचा वारसा पुढच्या पिढीला देणार
घेतला वसा मी नक्की पाळणार
घेवून सगळी खबरदारी
लावेन झाडं  घरी दारी
परसदारी माझ्या बाग फुलली
सासुबाईंची कळी खुलली
सासाऱ्यांना वाटे कौतुक भारी
अंगणातल्या फळभाज्यांची किमया न्यारी
 बागेत केले कष्ट खूप
आता लागतेय थोडी भूक
------- रावांनी भारावला  प्रेमाने घास
समाधानाने सोडते आजचा उपवास
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
इतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे.
anjali-rangoli.blogspot.com

इच्छा शक्ती

#इच्छा_शक्ती
               सदाशिवचा सेंद्रिय खत तयार करण्याचा व्यवसाय होता.  व्यवसायासाठीची जागा भाडे तत्वावर होती. तो पैं पै करून स्वतःच्या मालकीची जागा घेण्यासाठी भांडवल जमा करत होता. या व्यवसायाला जोड म्हणून खास देशी झाडांची अद्ययावत नर्सरी उभारण्याच त्याच स्वप्न होतं. या नर्सरीत झाडांची लायब्ररी असणार होती. अनेक छोट्या कार्यालयांना स्वतःची स्वतंत्र नर्सरी नसते. अशा कंपन्यांना, कार्यालयांना भाडे तत्वावर बहरलेल्या कुंड्या देण्याचा त्याचा मानस होता. सगळ्या कुंड्यांची देखभाल त्याच्याकडेच राहणार होती. कंपनीला दर आठवड्याला जुन्या कुंड्या ऐवजी नवीन प्रकारची झाडं असलेल्या नव्या कुंड्या ठेवता येणार होत्या.  त्यामुळे स्वतः झाडांची देखभाल न करताही कंपन्यांना त्यांच्या कार्यालयाचे रूप  टवटवीत राखता येणार होते. कार्यालयात पीस लिपीची खरी झाडे ठेवून हवा अधिक  शुद्ध राखणे सहज शक्य होते. त्याला खात्री वाटत होती की एक ना एक दिवस या सजीव रोपांच्या लायब्ररीची किंमत जगाला कळेल. सगळ्या बॅंकामधून, कार्यालयातून प्लॅस्टिकची झाडं हद्दपार होतील.
            कोरोना नावाचा विषाणू आला आणि सगळेच व्यवहार ठप्प झाले. या लॉक डाऊन मुळे सदाशिव आणि त्याच्या वडिलांनी ज्या कंपनीत काही वर्षांपूर्वी माळी काम केलं होतं तिचं  दिवाळं निघालं. कंपनीच्या मालकाने कंपनी विकायला काढली. सदाशिवला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने ही कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती अनुकूल नव्हती पण त्याने धाडस करण्याचे ठरविले.
         सद्य परिस्थितीत त्याने स्वतः जवळचे भांडवल जागा घेण्यात गुंतवणे धोक्याचे होते पण त्याच्या मनाने कौल दिला होता. सगळ्या कागद पत्रांची, पैशाची  जुळवा जुळव सुरू झाली. तसा सदाशिवला त्याचा भूतकाळ आठवू लागला.
           सदाशिव एक मेहनती माळ्याचा मुलगा होता. शिक्षणात बुध्दी चालली नाही म्हणून शिक्षण अर्धवट राहीले. घरची परिस्थिती बेताची असल्याने लहान वयातच वडिलांसोबत कामावर जायला लागला होता. वडील छोट्या कंपनीत माळी काम करायचे. सकाळी डबा घेऊन कामावर आलं की, संध्याकाळपर्यंत कंपनीतल्या झाडांची देखभाल करायचे. नवीन कलमं बनवायची, जुनी सुकलेली झाडं काढून नवीन झाडं लावायची, झाडाची छाटणी करायची, त्यांना खत पाणी द्यायचे, वाफे बनवायचे, कार्यालयाच्या आतल्या कुंड्या बाहेर काढून बाहेरच्या बहरलेल्या कुंड्या आत ठेवायचे, अशी एक ना अनेक कामं दिवसभर सुरू असायची.
           शाळेच्या अभ्यासात रमला नाही तो सदाशिव या कामात मात्र खूप रमयचा. वडील अशिक्षित होते पण झाड बघितलं की त्यांना नाव सांगता यायचं. मरायला आलेली अनेक झाड त्यांनी आपल्या कष्टाने पुन्हा डेरेदार केली होती. त्यांच्या तालिमीत सदाशिव तयार होत होता. वडीलांसारखी त्यालाही झाडांशी बोलायची सवय होती. झाडा भोवतीच्या जमिनीला उकरी देतांना तो झाडाच्या मुळांना जपायचा. त्यांच्याशी हळुवार गप्पा मारत काम करायचा. झाडाच्या वेड्या वाकड्या फांद्या तोडतांना तर त्याला फार वाईट वाटायचं पण झाडाच्या योग्य वाढीसाठी ते आवश्यक आहे हे तो स्वतःला तर समजवायचाच पण त्या झाडांनाही समजावून सांगायचा.
         एकदा घरी येता येता त्याला उकिरड्यावर टोमॅॅटोची रोपं आलेली दिसली. बाप ओरडत होता तरी त्याने ती अलगद कचऱ्यातून मोकळी केली. अन् घरी आल्या आल्या अंगणातली थोडी जागा भुसभुशीत करून तिथं लावली. त्या झाडांची खूप काळजी घेतली. त्याला टमाटे आले ते पाहून तर त्याचा बापही हरखून गेला अन् बोलला ," सद्या किती छान आहेत रं ही .... कोणी म्हणलं का उकिरड्यावरची उचलून आणलेली आहेत ही रोपं " सदाशिव सहज बोलून गेला ," झाडाला फक्त उगवण माहीत असतं बापू .... शेतात असलं काय अन् उकिरड्यावर असलं काय   " त्याचे ते शब्द  ऐकुन ,' अभ्यासात तेवढी बुध्दी चालली नाही पोराची पण  पोरग समजूतदार आहे ' असं बापाला वाटून गेलं.
          कंपनीच्या मागच्या बाजूला दोन खोल्यांचे पडके बांधकाम होते त्यातच ते सगळे रहायचे. अनेकांना रस्त्यावर अनाथ प्राणी दिसले की ते उचलून आणतात आणि त्यांचा सांभाळ करतात. सदाशिवला मात्र झाडं जवळची वाटायची. कायम बाहेर कुठे गेला आणि रस्त्याच्या कडेला एखाद मरगळेल रोप दिसलं की अलगद उपटून घरी आणायचा. ज्या झाडांना उपटून आणता येत नाही त्यांच्याभोवती तिथंच आळ करायचा. त्या झाडाला काठीचा आधार बांधून ठेवायचा. जवळची पाण्याची बाटली तिच्या आळ्यात रिकामी करायचा आणि मगच पुढे जायचा. त्याच घर मोडकं होत पण आंगण मात्र कायम देशी फुलझाडांनी, फुलांनी बहरलेलं असायचे.
         कंपनीतल्या  मोठ्या साहेबांना बाग कायम फुलांनी सजलेली लागायची. त्यासाठी ते कमी वेळात भरपूर फुलं देणारी परदेशी झाडं लावायला सांगायचे. सदाशिवला वाटायचं ,' विदेशी झाडांचे किती नखरे असतात. ऋतु जरा बदलला की लगेच खराब होतात. कंपनीतल्या मोठ्या साहेबांना तर जरा झाडं खराब झाली की बदलायची असतात. सारखी नवनवीन प्रकारची झाडं बाजारातून विकत आणायची आणि त्यांचा एक बहर संपला की उपटून टाकायची. साहेबांच्या डोळ्यांना बरं वाटावं म्हणून आणि ते पगार देतात म्हणूनही  झाडांची कत्तलच करतो आपण. त्यापेक्षा देशी फुल झाडं फळ झाडं लावली तर ..... ती इथं कायमची रुजतील,  फुलतीलव फळही देतील. त्यांची थंड छाया उन्हाने तापलेल्या, थकलेल्या प्रत्येक जीवाला आनंद देईल. कलम केलेला गुलाब दिसतो सुंदर पण त्याला कसलाच सुवास नसतो अन् आपल्या अंगणातील देशी  मोगरा सारा आसमंत दरवळून टाकतो. लाल जास्वंद .... त्याचं तर पान फुल सगळंच उपयुक्त. फाटकावरच्या कमानीवर चमिलीचा नाहीतर जुईचा वेल तर कसला भारी दिसेल. पण नाही..... आपल्याच मातीत, आपलीच झाडं लावली जात नाही.  त्या परदेशी झाडाचं कौतुक केलं जातं.' एके दिवशी अशा विचारांच्या तंद्रीतच तो होता इतक्यात नेमकी मोठ्या साहेबांनीच त्याला हाक मारली.  साहेब कार पार्क करायचे तिथल्या कोपऱ्यात  फारशीच्या फटीतून वडाचे झाड उगवलेले त्यांना दिसले होते. ते झाड ताबडतोब तिथून काढले जावे म्हणून सदाशिवला त्यांनी बोलावून घेतलं आणि काही सूचना दिल्या.
               सदाशिवने अलगद तिथली फारशी मोकळी केली. हळुवारपणे त्या झाडाची मुळ मातीतून बाहेर काढली. वडाच झाडं लावायच तर त्याला जागाही तेवढी मोकळी हवी अस वाटून त्याने ते रोप घरी नेवून माती भरलेल्या पोत्यात लावलं. मोठी झाड गार सावली देतात पण पान गळती सुरू झाली की त्यांचा खूप कचरा होतो म्हणून कंपनीच्या मुख्य आवारात एकही मोठं झाडं साहेबांनी लावू दिलं नव्हतं. या आधीही कडुलिंबाचं छोटं रोप सदाशिवला मुख्य आवारात उगवलेले दिसलं तेव्हा त्याने ते रोपही अलगद काढून घेतले होते. झाड जरा मोठी झालं की कंपनीच्या बाहेर दूर लावून येवू म्हणून तात्पुरती सोय म्हणुन अनेक मोठी झाडे तांदळाच्या रिकाम्या पोत्यात माती भरून त्यात लावलेली होती. यामुळे त्याच्या छोट्या अंगणात आंबा, फणस, शेवगा या मोठ्या झाडांची तर परसदारी अनेक फुलं, फळ भाज्या  यांची गर्दी झालेली होती.त्याचा प्रत्येक झाडांवर प्रचंड जीव होता.
             कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या खोल्या रहायला दिल्याने त्यांना हातात पगार फार मिळत नव्हता पण झाडांच्या सुखापुढे त्याला आणि त्याच्या बाला पगाराची चिंता नव्हती. रहायला खोल्या होत्या. परसदारी सगळ्या भाज्या लावलेल्या होत्या. वर्षाचं धान्य भरल की त्या सगळ्यांच आहे त्या पगारात  आरामात भागात असे.
     कंपनीला दहा वर्षे पूर्ण झाली म्हणून कंपनीत 'जागतिक पर्यावरण दिनी' वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा असं मोठ्या साहेबांच्या मनाने घेतले होते. आर्थिक दृष्ट्या कोलमडू पाहणारी कंपनी पुन्हा रुळावर आणण्यासाठी या उपक्रमाच्या प्रसिद्धीचा फायदा करून घेण्यासाठी त्यांनी शहरातल्या काही बड्या लोकांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला होता. फार काही करायचं नव्हते, 'नामवंत व्यक्तीच्या हातून चार दोन झाडे लावायची, काही बातमी दारांना बोलवायचं. दुसऱ्या दिवशी पेपरमधे कार्यक्रमाची विस्तृत बातमी देत काही फोटो प्रकाशित केले की, विस्मृतीत गेलेली कंपनी पुन्हा प्रकाश झोतात येणार होती. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली. कार्यक्रम दोन दिवसांवर येऊन ठेपला. या सगळ्यात शहराचे महापौर आणि वृक्ष प्रेमी असलेल्या दादासाहेबांनाही निमंत्रण गेले होते. त्यांनी कार्यक्रमाला येण्याचं आश्वासन दिले पण त्यांची काही अटही होत्या. 'वृक्षारोपण हे सगळ्या देशी झाडांचे असले पाहिजे आणि या झाडांमध्ये एक वडाचे झाड असलेच पाहिजे.' यासाठी ते आग्रही होते. ऐन वेळी या अटी कळल्याने साहेबांचा जरा हिरमोड झाला होता.
                कंपनीतील बागेच्या कामाची व्यवस्था बघणाऱ्या अधिकाऱ्याला साहेबांनी बोलावून घेतले. देशी झाडांची यादी त्याच्याकडे सुपूर्त करून ती सगळी झाडं कंपनीच्या नर्सरित उपलब्ध आहेत का? याची पाहणी करायला सांगितली. कंपनीच्या नर्सरित सगळी विदेशी झाडांची रोपं आहेत हे समजल्यावर, बाहेरच्या नर्सरितून ताबडतोब काही देशी झाडांची रोपे आणली जावीत ' अशी सूचना साहेबांनी केली. यादीतली काही झाडे मिळालीत परंतु वडाचे झाड कोणाकडेच मिळाले नाही. 'उद्या कार्यक्रम आहे आणि अजून वडाचे झाड उपलब्ध झाले नाही'  म्हणून साहेब चिंतेत होते. इकडे वडीलांना बरे नसल्याने सदाशिवनेच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षारोपणासाठी खड्डे खणून तयार करायला घेतले होते. नेहमीप्रमाणे त्याच्या मनात विचार सुरू झाले होते," आपल्याकडे पोत्यात लावलेली कडुलिंब, वड, आंबा, पिंपळ आणि आपटा ही झाडं लवकरच गावाबाहेर जावून लावायला हवीत. पावसाळ्यात मातीत रुजली की, पुढे त्यांना फारसा धोका राहणार नाही. जगण्याची ओढ घेवून भिंतीच्या काना कोपऱ्यात सिमेंट मधे उगवलेली ही झाडं ..... यांना त्यांच्या हक्काची मोकळी जागा मिळायला हवी.' या विचारातच त्याने त्याचे काम संपवले आणि बागेतल्या नळावर हात धुवायला निघाला होता. जाता जाता पार्किंगमधे फोन वर बोलणाऱ्या साहेबाचे बोलणे त्याच्या कानावर पडले," वडाचे  झाडं मिळत नाही म्हणजे ?उद्या कार्यक्रम आहे. मला ते  झाडं हवंच आहे. दाम दुप्पट द्या पण असतील तिथून देशी झाडांची रोप आणा "
          हे बोलणे ऐकून सदाशिव तिथेच घुटमळला. साहेबांचे फोन वरचे बोलणे झाले. त्यांचे लक्ष तिथेच घुटमळणार्‍या सदाशिव कडे गेले. त्यांनी त्याला विचारले ," माझ्याकडे काही काम आहे का?" सदाशिव घाबरत घाबरत बोलला," साहेब आता तुम्ही फो वर देशी झाडांबद्दल काहीतरी बोललात म्हणून थांबलो होतो " त्यावर साहेब बोलले ," उद्यासाठीच्या कार्यक्रमाला देशी झाडांची काही रोपे हवी आहेत.  वडाचे रोप तर कुठेच मिळत नाही आहे? "त्यावर सदाशिव लगेच म्हणाला ," माझ्याकडे आहेत काही रोपं,  तुम्हाला हवी असतील तर ......"
त्याचं हे बोलणं अर्ध्यावर तोडत साहेब आश्चर्याने ओरडलेच," काय? तुझ्याकडे रोपं आहेत? आपल्या नर्सरीत देशी झाडांची  रोपे नाहीत, असे मला सांगितल्या गेले होते. तू खरे बोलतोय ना "
सदाशिव लगेच म्हणाला ," साहेब आपल्या नर्सरीत नाहीत ही रोपं, माझ्या घराच्या अंगणातली आहेत. 
थोडा वेळ द्या .... मी आता घरून घेवून येतो."
तो घराकडे पळत गेला आणि ढकल गाडीत टाकून काही रोपं घेवूनही आला. त्या रोपांमध्ये वडाचे रोपही होते. ते पाहून तर साहेब आनंदाने हरखून गेले. 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशीच त्यांची स्थिती झाली होती.
          जेव्हा त्यांना सदाशिवने सांगितले,' ही सगळी रोपे त्याला कंपनीच्या आवारातच उगवलेली सापडली होती. यांना मोकळ्या जागी लावता यावे म्हणून त्याने अशी पोत्यातल्या मातीत लावून जतन केली होती.' तेव्हा तर त्यांना सदाशिवचे खूपच कौतुक वाटले.
      दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण कार्यक्रमाला ठरल्यावेळी सुरवात झाली. सदाशिवच्या मनातली इच्छा आज पूर्ण होणार होती. त्याने जमवलेल्या रोपांना त्यांची हक्काची जागा मिळणार होती. सदाशिवचे वडील सगळ्यांना रोप लावायला मदत करत होते. साहेबांनी शेजारीच उभ्या असलेल्या सदाशिवला आवाज दिला आणि महापौरांना सांगितले, " आम्ही एकही रोप बाहेरून विकत आणले नाही. ही सगळी रोपं आमच्या कंपनीचा छोटा माळी सदाशिव याने   स्वतः जमवली आहेत. म्हणूनच  ह्या छोट्या वृक्ष प्रेमीच्या मदतीने तुम्ही हे वडाचे झाड इथे लावावे. अशी मी तुम्हाला विनंती करतो." ते ऐकून सदाशिव पुरता गांगरून गेला. साहेबांनी पुढे होवून त्याच्या हाताला धरून त्याला आणले. साहेबांच्या जवळ सदाशिवला उभ बघून सदशिवच्या वडीलांना त्याचा अभिमान वाटला. वडाचे झाड त्याच्या मदतीने महापौरांच्या हस्ते कंपनीतील मुख्य आवारात लावले गेले.
        'काही दिवसांपूर्वी साहेबांनी ह्याच वडाच्या झाडाचे अस्तित्व नाकारले होते आणि आज तेच झाड मोठ्या आनंदाने महापौरांच्या हस्ते मुख्य आवारात लावले गेले' याचे सदाशिवला खूप नवल वाटले होते. त्या वडाच्या इवल्याशा रोपाने सदाशिवला शिकवण दिली होती,"उगवण्याची प्रचंड इच्छाशक्ती असली तर दिवस बदलायला वेळ लागत नाही." याच शिकवणीचा उपयोग त्याने त्याच्या पुढील वाटचालीत केला होता. आज त्याने सेंद्रिय खत निर्माता म्हणून स्वतची: ओळख निर्माण केली होती.
                 सदाशिव भूतकाळात रमला होता इतक्यात त्याचा फोन वाजला. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाली होती. कंपनीच्या खरेदी व्यवहारासाठी त्याला बोलावण्यात आले होते.
           काय सुंदर योगायोग जुळून आला होता. आजही 'जागतिक पर्यावरण दिन' होता. काही वर्षांपूर्वी याच दिवशी वडाच्या इवल्याश्या रोपाला त्याची हक्काची जागा मिळाली होती आणि आज सदाशिवच्या छोट्या स्वप्नालाही साकार करण्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा मिळणार होती.
     त्याने घरी फोन करून आई ,बाबा आणि बायकोला बोलावून घेतले. तो त्याच्या 'बालमित्राला' बघण्यासाठी खूप उत्सुक होता. सगळे कंपनीच्या आवारात पोहचले. त्याचा बाल मित्र मस्त डेरेदार वाढला होता. त्याचे ते भव्य रूप पाहून सदाशिव आनंदाने भारावला. सदाशिवचा छोटा मुलगा पळत गेला आणि पारंब्याना लटकला. झाडाने आनंदाने सळसळ केली. जणू ते  आशिर्वाद देत सदाशिवला सांगू पहात होते," आभिनंदन मित्रा .... उगवण्याची  इच्छाशक्ती असेल तर दिवस बदलायला वेळ  लागत नाही.  आज तुझ्या व्यवसायाचे इवलेसे रोप याच कंपनीत 'वटवृक्ष' म्हणुन रुजणार आहे ".

 ©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

 सोबतीला रांगोळी ही आहेच.
इतर लिखाण आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे.
रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇👇👇👇
https://youtu.be/nbgOLkemgIs