दिवाळी \ लक्ष्मी पूजन निमित्त (२०१७)

दिवाळी निमित्त (२०१७ ) :          

दिवाळी हा सण दिव्यांचा आहे. या दिवशी आपण लक्ष्मी देवतेचे पूजनही करतो. लक्ष्मीची विविध रूपे  आहेत. गजलक्ष्मी हे ही लक्ष्मीचेच रूप. गजलक्ष्मी उंबरठ्यावरचे माप ओलांडून घरात प्रवेश करते आहे. हे चित्र जेव्हा मी बघितले तेव्हाच मी या चित्राच्या मोहात पडले . कमळ कळयांचा मुकुट ल्यालेली , चेहऱ्यावर सात्विक भाव असलेली आणि माप ओलांडून घरात धनधान्याची भरभराट घेवून येणारी ही गजलक्ष्मी आपण सर्वांना प्रसन्न होवो........
दिवाळीच्या सर्व वाचकांना  खूप  खूप  शुभेच्छा........
( रांगोळी आवडल्यास कॉमेंट बाॅक्स मध्ये कॉमेंट करायला विसरू नका.)
(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के

      पुणे, चिंचवड ३३













दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत बॉर्डर

दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत बॉर्डर :

                                                             बॉर्डर प्रकार : १




 बॉर्डर प्रकार : २ 


मोराचे डिझाइन

दिवाळीसाठी दारात काढायचा साधी सोपी मोराची रांगोळी :

मोर......  काळ कीतीही पुढे गेला तरी स्त्री मनाला मोर... मोरपीस यांची पडलेली भुरळ काही कमी होत नाही. स्त्रीला अगदी साडीच्या पद्रावर ही मोर हवाच असतो. तिला आनंद झाला की मन ही मोर बनून नाचू लागते. ती प्रेम करते तेही मोर पिसासारखं हळुवार सुखावणारं..... तिच्या मनातल्या भावनाही विविधरंगी अगदी मोर पिसासारख्याच . जसे  मोरपीसात एकाच रंगाच्या  अनेक छटा असतात.....तसे एका स्त्रीची अनेक रूपे असतात आणि प्रत्येक रूप तितकच लोभसवाणं.
मोरपीसाकडे बघीतल्यावर डोळ्यांना सौंदर्य  दिसते तर मनाला ऐश्वर्याचा भास होतो म्हणूनच  मनाने सुंदर आणि ऐश्वर्यसंपन्न  असणाऱ्या स्त्री व्यक्तीमत्वाला मोर आणि मोरपीस यांचे वेड कायम आहे. अशाच वेडावलेल्या क्षणी मी  काढलेल्या मोराच्या काही रांगोळ्या इथे पोस्ट करते आहे.

anjali-rangoli.blogspot.com




कोजागीरी (२०१७ ) निमित्त

कोजागीरीच्या सर्व वाचकांना शुभेच्छा.