चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी
 
साधी , सोपी  व झटपट होणारी ही रांगोळी तुम्हीही नक्की काढून बघा. 
 

दारात कढ़ावयाची बॉर्डर

दिवाळीत आपण दाराला रंगीत रांगोळीची बॉर्डर करतो. म्हणूनच बॉर्डरचे काही प्रकार खास दिवाळीसाठी देत आहे. 
 
१ : बॉर्डर प्रकार 
 
 
२ : बॉर्डर प्रकार
 
 
३  : बॉर्डर प्रकार
 
 
४ : बॉर्डर प्रकार
 
 
५ : बॉर्डर प्रकार

 
 

थेंबांच्या रंगीत रांगोळ्या

थेंबांच्या रंगीत  रांगोळ्यांचे काही  प्रकार  येथे दिलेले आहेत.
                                             
                                                            ९ ते ९ थेंबाची रांगोळी 

९ ते ९ थेंबाची रांगोळी  

९ ते ९ थेंबाची रांगोळी  

कोजागीरी निमित्त


पौर्णिमेचा चंद्र संपुर्ण सृष्टीवर जादू करतो. चंद्राचा शीतल प्रकाश आणि त्याची निळसर आभा आपल्या मनाला नेहमीच प्रफुल्लीत करते . तसेच  आयुर्वेदात कोजागीरी पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशाला विशेष महत्त्व आहे. चला तर मग चंद्र प्रकाशाचा हा उत्सव साजरा करूया.....कोजागीरीच्या सर्व वाचकांना शुभेच्छा.


विजयादशमी निमित्त (२०१५ )

दसरा या सणाला अनेक ऐतिहासिक गोष्टींची पार्श्वभूमी आहे. या दिवशी आपट्याच्या पानांना  आणि झेंडूच्या फुलांना  विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोन्यासारखा मान असतो . " सोनं घ्या , सोन्यासारखं रहा " असे म्हणून लहानांनी मोठ्यांना  आपट्याची पाने देण्याची पध्दत आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावून सुशोभित करतात. पहाटेच्या मंगलमय वेळी दाराला झेंडूच्या फुलांचे लावलेले तोरण आणि आपट्याच्या पानाची केलेली पुजा दस-याच्या सणाची जाणीव मनाला देवून प्रसन्न करतात. सर्व वाचकांना दस-याच्या खुप खुप शुभेच्छा .(२०१५ )

 

नवरात्र उत्सव निमित्त

नवरात्र म्हंटल की , देवीचा जागर आला … आणि  जागर म्हंटला की , गरबा आला. म्हणून संगीताच्या तालावर बेधुंद होवून गरबा खेळणाऱ्या जोडीला रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे. ही रांगोळी बघून तुम्हालाही गरबा खेळण्याची इच्छा नक्कीच होईल. गरबा  खेळण्याच्या सोबतीला दारात  रांगोळी काढायला विसरु नका.


नवरात्र उत्सव निमित्त

नवरात्र उत्सव निमित्त  दुर्गा देवीचे मुख रेखाटले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे वेगळेपण हे आहे की, प्रत्येक दिवसाचा स्वतंत्र रंग आहे. प्रत्येक रंग हा देवीच्या एका रुपाच प्रतिक आहे. म्हणूनच नऊ दिवसांच्या नऊ रंगांचा वापर मुखवट्याला बॉर्डर करण्यासाठी प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा…