दिवाळी बलिप्रतिपदा २०२०

 दिवाळी बलिप्रतिपदा निमित्त २०२० काढलेली ही रांगोळी

        बलिप्रतिपदा ही बळीराजाची उत्सव म्हणुन साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सिंधू संस्कृतीतील बैलाचे चित्र रांगोळीत रेखाटून धान्याच्या राशीने ही रांगोळी सजविण्याची पद्धत आहे.

या दिवशी थोडे धान्य एकमेकांना दिले जावे  आणि ते देताना " इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो" असे म्हणावे अशी प्रथा आहे.

त्याला अनुसरून काढलेली माझी ही रांगोळी आहे.

या रांगोळीला "सत्यशोधक प्रबोधन महासभा" यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.

याच स्पर्धेत माझ्या मुलाने ही सहभाग नोंदवला होता. त्याच्या रांगोळीला  विशेष उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.

©️ अंजली मीनानाथ धस्के 

माझी रांगोळी: प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले


 
मुलाची रांगोळी: विशेष उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले


परिक्षेचे भूत

      #परिक्षेचे_भूत
©️ अंजली मीनानाथ धस्के
  ही कथा आहे आदित्य आणि त्याच्या आई बाबांची.
त्यांच्या मानगुटीवर बसलेल्या परीक्षेच्या भुताची .
               आदित्य जेव्हा आठवीत शिकत होता तेव्हाच
 त्याच्या घरात  दहावीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला एकाच जागी बसून अभ्यास करतांना  कंटाळा येवू नये, एकाच जागी बसण्याची सवय व्हावी म्हणून  आठवीत असूनही त्याच्या अभ्यासाचं वेळापत्रक हे दहावीच्या विद्यार्थ्यांना शोभेल असं तयार करण्यात आले होते. खरं तर त्याचे आई वडील आभ्यासाच्या बाबतीत जागरूक असले तरी त्याला सक्ती करणारे नव्हते. मुलांनी मैदानी खेळ खेळावे. शिक्षण हसत बागडत व्हावे या मताची ती दोघे होती परंतू आठवी पासूनच दहावीची तयारी गरजेची असते नाहीतर पुढे मुलांचे भविष्य कठीण होवुन बसते अशी भीती त्यांना आदित्य सातवीत असल्यापासूनच घरी येणाऱ्या पाहुण्यांनी आणि शाळेत भेटणाऱ्या शिक्षक, काही अती जागरूक पालकांनी घातली होती त्यामुळे त्यांची इच्छा आणि गरज नसूनही लोकलाजे करिता त्यांनी आदित्यला खासगी शिकवण्या लावल्या होत्या.
    त्याच्या वर्गातल्या प्रत्येक मुलाची अवस्था जवळ पास अशीच होती. अभ्यासाचे वेळापत्रक जरी दहावीतल्या मुलांसारखे असले तरी  प्रत्यक्षात तो आठवीत होता . त्यामुळे अनेकदा आईबाबंकडून त्याला वेळापत्रकात बदल करण्याची मुभा मिळत होती म्हणून सुरवातीला आदित्यने या सगळ्याची फारशी दखल घेतली नाही. त्याचे आई वडील  जागरूक राहून त्याचा अभ्यास घ्यायचे पण तो कंटाळतो आहे असं जाणवल्यावर त्याला सक्ती करत नव्हते.
          जेव्हा तो प्रत्यक्षात दहावीत गेला तेव्हा मात्र असच एखाद्या क्षणी तो अभ्यासाला कंटाळुन मैदानात खेळण्यासाठी  गेला असता तिथे ओळखीचे लोक भेटले की ," दहावीत न रे तू? दहावीत तर खूप अभ्यास असतो तुला खेळायला वेळ मिळतो का?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडत.  तो हुशार नसला तरी अभ्यासात चांगला होता परंतु पुस्तकी किडा बनणे त्याला पसंद नव्हते. समाजात मात्र तोंडासमोर कायम पुस्तक घेवून बसणाऱ्यालाच हुशार मानलं जात होतं.
   हे कमी म्हणून की काय हे ओळखीचे लोक घरी आले किंवा आईवडिलांना इतर कुठे भेटले तर  जमेल तसे आणि तितके सल्ले देत होते. "मुलाकडे लक्ष द्या. अमक्याचा अमका / तमक्याच्याची तमकी बघा कसे अभ्यास करतात. त्यांनी बघा कसली भारी अमुक अमुक शिकवणी लावली आहे. त्यांच्या मुलाचे अभ्यासाचे वेळापत्रक बघा कसे आदर्श आहे . तुम्ही  आदित्यला वेळीच अभ्यासाला लावलं नाहीतर पुढे खूप कठीण जाईल" असे बोलून कळत नकळत स्पर्धेची भावना त्याच्या आणि त्याच्या पालकांच्या मनात रुजवत होते. याचा परिणाम म्हणून अखेर त्यांच्या मानगुटीवर परिक्षेचे भूत अगदी आरामात विसावले.
  आदित्यला सारखं वाटे  , "आपल्याला काय करायचे आहे, याचा निर्णय आपण घेण्याचं स्वातंत्र्यच राहिलं नाही . कायम इतरांना काय वाटतं , काय करणं समाज मान्य आहे , इतरांच्या अपेक्षांच्या यादीलाच महत्त्व आहे. रोज एक जण तरी आपल्या पालकांना आपण दहावीत असल्याची आठवण करून देतं. आपण काय करावे म्हणजे फायद्याचे ठरेल याबद्दल सल्ले देवुन जातं. आम्हाला भविष्यात काय करायचे आहे याचा विचार आम्हाला आणि आमच्या पालकांना करू न देता समाजच सगळं ठरवू पाहतो. आमचं अपयश हे समाजाच्या यशाबद्दल च्या निकषांवर ठरवलं जातं. दहावी.... बारावीला अवास्तव महत्त्व देवुन  समाज  नकळत किती त्रास देतो आम्हा मुलांना .... पर्यायाने त्यांच्या पालकांनाही. प्रत्येकाने डॉक्टर, इंजिनियर आईआईटी केलंच पाहिजे असा आग्रह का? यशस्वी होण्यासाठी आभ्यासक्रमात इतरही अनेक उत्तम पर्याय उपलब्ध असताना केवळ लोकांना दाखवायला म्हणून आपल्या बुद्धीला, मानला न झेपणारे क्षेत्र का निवडायचे?
 असे निराश करणारे विचार त्याच्या मनात रुंजी घालू लागले. मनावर अभ्यासाचा ताण जेवढा आला नव्हता त्यापेक्षा कैक पटीने अधिक लोकांच्या वागण्याचा, बोलण्याचा , त्यांच्या अपेक्षांचा ताण त्याला जाणवू लागला. परिक्षेच्या भुताने त्याला पार जेरीस आणले. त्याचं खेळकर व्यक्तिमत्व बदलून तो गंभीर झाला. 
            त्याची जी परिस्थित झाली होती 
 तीच त्यांच्या पालकांचीही झाली होती. त्यांना काय वाटतं याला फारस महत्वाचं उरलं नव्हतं.  मुलगा दहावीत शिकायला असलेल्या पालकांनी जसे वागणे अपेक्षित असते तसेच त्यांनी वागावे असा समाजाचा आग्रह  महत्त्वाचा ठरत होता. आदित्यने शिकावं, मोठं व्हावं ही त्यांचीही इच्छा होतीच परंतू त्यासाठी कोणता मार्ग निवडावा हे सर्वस्वी आदित्यने ठरवावं असं त्यांचं मत होतं परंतु मिळणाऱ्या सल्ल्यांनी ते कळत नकळत स्पर्धेत सहभागी झाले.
त्यांनी आदित्यसाठी कोणत्या शिकवण्या लावाव्या इथपासून आदित्यचा आहार कसा असावा इथपर्यंत सगळं काही इतर पालकांच्या अनुकरणातून केलं जावू लागलं. अनेकदा मनात नसताना केवळ सगळे करतात आपणही केलेच पाहिजे या भावनेतून ते स्वतः ला आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या न परवडणाऱ्या गोष्टी करत होते. ते इतरांचे बघून बघून स्वतःला नालायक पालक समजून घेत होते. परिक्षेच्या भूताने
त्यांच्या मनाचाही कोंडमारा केला होता.
          खोडकर, खेळकर असलेला आदित्य अचानक अबोल, गंभीर झाला . त्याला  घरच्यांच्या , शिक्षकांच्या आणि समाजाच्या अपेक्षांचे ओझे जाणवू लागले. त्याला सतत आपण
 नापास झालो तर... याची भिती वाटू लागली. त्याच्यात झालेला हा बदल आदित्यच्या आईला जाणवल्या शिवाय राहिला नाही.
              त्यांनी याबाबत आदित्यच्या वडिलांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. 
   रोज एक जण तरी आपल्याला आदित्य दहावीत असल्याची आठवण करून देतं. आपण काय करावे म्हणजे फायद्याचे ठरेल याबद्दल सल्ले देवुन जातं.  दहावीला बारावीला अवास्तव महत्त्व देवुन आपल्या आणि आदित्यच्या मनात परीक्षेची भिती निर्माण करतं. हे त्यांना प्रकर्षाने जाणवलं. याबद्दल चर्चा झाल्यावर दोघांनीही "समाजाच्या जीवघेण्या स्पर्धेत सहभागी न होता.... समाजाच्या दृष्टीने आदर्श पालक होण्यापेक्षा , मारून मुटकून संस्कारी मुल घडवण्यापेक्षा आपल्या मुलाला  समजून घेवुन... योग्य मार्गदर्शन  करून त्याचा उत्तम विकास करू . आपल्या व आदित्यच्या मानगुटीवर बसलेले परिक्षेचे भूत हाकलून लावू " असा संकल्प केला.
      आदित्यला विनाकारण अभ्यासाचा ताण दिला जावू नये . शिक्षण हे आयुष्यातील आनंद गमावण्याचा मार्ग न होता   अधिकाधिक उत्तम ज्ञान मिळवण्याचे साधन बनायला हवे.  शिक्षणाने मुलांच्या मुळ जिज्ञासू वृत्तीला आळा न बसता अधिकाधिक  पोषण मिळायला हवे. भविष्यातील यशापयशाचे आराखडे हे मुलांच्या परीक्षेतील गुणांवर नसावे. 
       यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी मुलाला योग्य मार्गदर्शन करावे . स्वत:च्या आवडीनिवडी  मुलांवर लादू नये. आपल्या मुलाच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावे समाजाच्या दबावाला बळी पडून इतरांचे अंधानुकरण करू नये. 
        याबाबत दोघांचेही एकच मत झाले. आदित्यवर असलेला अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते ते सगळं करण्याचा निर्णय घेतला.  सर्वप्रथम  आदित्यला विनाकारण सल्ले देवून हैराण करणाऱ्या प्रत्येकाला स्पष्टपणे समज द्यायची. ते करत असलेल्या सक्तीला बळी न पडता आदित्यच्या बाजूने ठामपणे उभे रहायचे. आपण घेतलेल्या निर्णयाबाबत आदित्यशी मोकळेपणाने संवाद साधायचा. आदित्यची मते जाणून घेवून त्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन मिळवून द्यायचे. त्याला परीक्षेची भिती न वाटता तो खुल्या मनाने परिक्षेला सामोरा जायला हवा. त्याने परिक्षेकडे एक संधी म्हणून बघायला हवे. या मतापर्यंत दोघेही येवुन पोहचले.
               आधीच खूप वेळ अनुकरण करण्यात वाया गेला होता अधिक वेळ न घालवता त्यांनी आदित्यशी बोलण्यासाठी त्याच्या खोलीत प्रवेश केला.
तो चिंताक्रांत चेहऱ्याने अभ्यास करत असतांनाच आई बाबांनी
  त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्यानें वळून मागे बघताच त्यांनी सांगुन टाकलं  ," आदी ..... तुला जे हवं तेच कार्यक्षेत्र  निवड आमचा पुर्ण पाठिंबा आहे . परिक्षेत गुण किती मिळतील याला महत्त्व नाही . तू काय शिकलास याला  महत्त्व आहे. उत्तम कार्यक्षेत्र निवडून भरपूर  पैसा कमावणे येवढेच आयुष्याचे ध्येय नाही. आधी उत्तम नागरिक, उत्तम व्यक्तिमत्व असलेला माणूस म्हणून जगायला शिक. जे शिकशील ते मनापासून शिक. जे करशील ते मन लावून कर."
त्याने उठून आई बाबांना मीठीच मारली व म्हणाला "असे आई बाबा असतील तर  जीवनात मी १०० टक्के यशस्वी होईलच".
           त्यानंतर कधीही त्याच्या आईवडिलांनी इतर जागरूक पालकांचे अंधानुकरण केले नाही की समाजाचा दबाव ही आदित्यच्या  मनावर  लादला नाही.
         आज या घटनेला बरीच वर्षे झाली. आदित्य दहावी, बारावी उत्तम गुणांनी  उत्तीर्ण झाला. कॉमर्समधे  पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. स्वतःची सुटका टॅक्स कन्सल्टन्सी फर्म सुरु केली. मेडिकल, इंजिनियरिंग, आयआयटी  हे क्षेत्र न निवडता त्याच्या खेळकर स्वभावाला झेपेल असे क्षेत्र निवडले. 
      समाज ज्यांना यशस्वी मानतो अशा मुलांमधे त्याची गणना होत नसली तरी तो आत्मनिर्भर आहे. त्याच्या आवडीच्या
 क्षेत्रात काम करत असल्याने आनंदी आहे. स्पर्धेच्या धावपळीतून मुक्त होवुन समाधानी आयुष्य जगत आहे . अनेक मोठ्या कंपन्या मधे त्याला " तणाव मुक्त जीवन पद्धती"  या विषयावर समुपदेशन करण्यासाठी बोलावण्यात येतं . आपल्या सामुपदेशनात तो नेहमी  त्याच्या आनंदी आयुष्याचे श्रेय  आई बाबांना देतो. 
  त्याच्या उत्साही तणाव मुक्त चेहऱ्याकडे बघून आई बाबांनाही त्यांनी आदित्य दहावीत असतांना  केलेल्या संकल्पाचे  समाधान वाटते.
          अनेक पालक कळत नकळत आदित्यच्य  आईबाबां सारखे समाजाच्या स्पर्धेला बळी पडतात. इतर पालकांचे अंधानुकरण करत आपल्या मुलाच्या आवडी निवडी, बौध्दिक क्षमतेचा विचार न करता धोपट मार्ग अवलंबतात. अनेकदा या प्रक्रियेमधे मुलं नैराश्यात जाते. मुलाला अपेक्षित यश मिळाले नाही तर पालकही निराश होऊन जातात. 
प्रत्येक मूल वेगळे असते त्याची बौध्दिक क्षमता वेगळी असते. त्यांच्यावर सक्ती न करता त्यांच्या आवडीनुसार कार्यक्षेत्र निवडण्यास प्रेरित केले तर ते स्वतःहून यशाचा मार्ग शोधतात.
परिक्षेत मिळणारे गुण हे केवळ तो विषय मुलांना कितपत समजला आहे हे जाणून घेण्याचे साधन आहे. त्यांना अवास्तव महत्त्व देवू नये.आदित्यच्या आई बाबांनी परीक्षेच्या भुताला जसे हाकलून लावले तसेच प्रत्येक पालकाने करायला हवे. मुलांच्या मनातील परीक्षेची भिती घालवून त्यांना खुल्या मनाने परिक्षेला सामोरे जाण्याची सवय लावायला हवी.
         ©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः  लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहीत करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.   


नात्यातला दुरावा झाला दुर


#नात्यातला_दुरावा_झाला_दुर
©️ अंजली मीनानाथ धस्के
सई  ही एक  घर, मुलं आणि नोकरी योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता असलेली महत्त्वाकांक्षी मुलगी.
अर्थातच तिच्या सासरच्या माणसांची तिला खूप मदत मिळत होती म्हणून ती ऑफिसच्या कामातही स्व:तला झोकून देत होती. नवरा तिच्या बरोबरीने घरची जबाबदारी घेत होता. सासू सासरे ही त्यांना झेपेल तशी मदत करत होते.
ऑफिसच्या कामा निमित्त तिला बाहेर गावी किंवा परदेशात जावं लागलं तरी तिच्या वाचून घरचं काही अडत नव्हतं. मुलांचही सासू सगळं आनंदाने करत होती.
सगळं कसं सुरळीत सुरु होत.
सईची चीडचीड होण्यासाठी  रुपलच लग्न कारणीभूत ठरलं.
रुपल तिची मावस नणंद. रुपल सासूची लाडकी. तिच्या  लग्नासाठी १० दिवस मस्त वेळ काढून जाण्याचं त्यांनी ठरवलं होतं. तशी सासू सासऱ्यांची तयारीही सुरू होती. सईला इतके दिवस जमणार नाही म्हणून सई, आदित्य, बंटी आणि बिल्लू वेळेवर पोहचणार असं ठरलं होतं.
नेमकी नको ती अडचण आली. त्याच दरम्यान सईला कंपनीच्या कामा करिता पंधरा दिवस परदेशी जावं लागणार होत. लग्नाला सासऱ्यांनी एकट्यानेच हजेरी लावावी अस तिचं मत होत. जेणे करुन सासू घरी राहिल्या तर घराचे आणि मुलांचे आबाळ होणार नाही.
तिने जेव्हा सासूबाईंना तसे सुचवले तेव्हा त्या तयार झाल्या नाहीत.
बहिणीच्या घरचं शेवटचं लग्न .  रुपलच्या लग्नानिमित्त सगळे नातेवाईक भेटतील .  गप्पा गोष्टींची मस्त मैफिल रंगेल. एकमेकांवर विनोद केले जातील . पोटभरून हसणं होईल. त्या निमित्ताने चार दिवस आनंदात जातील . त्यामुळे लग्नाला गेलच पाहिजे असं सासूबाईंना वाटतं होत.

सासूबाईंच्या बहिणीच्या घरचं हे शेवटचं लग्न आहे म्हंटल्यावर  त्यांनी लग्नाला जाण्याचा हट्ट करणे योग्य ही होते. निदान  सासऱ्यांनी घरी रहावं म्हणजे सासूबाईंना लग्नाला जाता येईल असं सईला वाटू लागले पण सासूबाई त्यालाही तयार नव्हत्या.
शेवटी सईने तिच्या आईला बोलावून घेतलं. तिच्या आईलाही सईकडे करमायचं नाही. नवीन घर त्यामुळे सोपी वाटणारी कामही त्यांच्यासाठी अवघड होवून जायची. नातवंडांचे लाड पुरवता पुरवता नाकी नऊ यायचे. सईचा चौकशीचा फोन आला की त्या सतत कुरकुर करायच्या. आईची ही भुणभुण सईला नकोशी होवुन सासूबाईनी केलेल्या हट्टीपणाची अधिक चीड यायची.
आईनेही कुरकुरतच तिचे अडचणीचे दिवस काढून दिले.
सासूबाईही १० दिवस ठरले होते त्याप्रमाणे १० दिवसात परत आल्या. पुन्हा सगळं सुरळीत सुरु झालं.
सईच्या मानत मात्र अढी राहिली.
वर्षातून दोनदा सहलीला जातात. शक्य तितक्या वेळेस लग्न समारंभांनाही हजेरी लावतात. घरचं सगळं आम्ही दोघं बघतो. ऑफिसला जातानांही मी बरीचशी काम करूनच जाते. या वयात घरकामात गुंतून न घेता त्यांना त्यांच्या आवडीची कामे करता यावी म्हणून जास्तीत जास्त कामे  कामाला येणाऱ्या मावशींना करायला सांगतो.  यांचा  दिवस मस्त आरामात जातो. तरी थोडं समजून घेता येत नाही. असं वाटून सईच मन खट्टू झालं होतं.
तिच्या मनातली अढी सासूबाईंनाही जाणवली पण त्यांनाही वाटलं की," मी कसली तक्रार न करता आनंदाने मुलांचं करते. तीही ऑफिसला जाताना जमतील तेवढी काम करून जातेच पण ती जातेच मुळी सकाळी ८:३० ला. आपण पुढे संपूर्ण दिवस  कामाचा डोंगर उपसत असतो. बंटीला शाळेच्या बसमधे चढवून परत यायचं. नंतर बिल्लुच सगळं आवरायचं. त्याला शाळेत सोडायचं. आमची जेवणं होत नाही की,
बिल्लुच्या मागोमाग बंटीही घरी येतो. दोघांनाही सकाळचं खाणं नको असतं . रोज काहीतरी चमचमीत लागतं . चार वर्षाचा बिल्लु तर खातांना खूप दमावतो. घर भर पळत असतो. दोघांचा अभ्यास घ्यायचा असतो.  सई येईपर्यंत पोरांचा पसारा अवरता आवरता नाकी नऊ येतात. घरी येणारा पै पाहुणा. काम करणाऱ्या मावशींच्या होणाऱ्या सुट्या. हेही बिन तक्रार पार पडतो.

रोज संध्याकाळी स्वयंपाक करायला त्राण रहात नाही. सईलाही आल्यावर मुलांना वेळ देता यावा म्हणून स्वयंपाकाला बाई ठेवली. वर्षातून दोनदा सहलीला जातो. पण बाकी दिवस मंदिरात जायचं झालं तरी पोरांच्या वेळा सांभाळूनच जावं लागतं. कधी सईला सांगावं की आईला चार दिवस बोलावून घे  तर त्याही इथे रहायला तयार नसतात . "या वयात स्वतः च्या घरीच बरं असतो आपण  " असं सांगून यायचं टाळतात. शनिवार रविवार सईला  आणि आदित्यला सुट्टीचे असले तरी त्यांच्या वैयक्तीक कामासाठी राखीव असतात. पार्लरला जाणे , मैत्रिणींना भेटणे, कधी दोघं विरंगुळा म्हणून चित्रपट बघायलाही किंवा लाँग ड्राईव्हलाही जातात. आदित्य आणि ती बाहेर फिरायला गेले तरी बिल्लू लहान म्हणून तो कायम आमच्याकडेच असतो . त्याच्या बाललीला बघतांना आमचे दिवसही मजेत जातात परंतु शरीर आता पूर्वीसारखी साथ देत नाही.
कधी तरी लग्नाला किंवा छोट्या कार्यक्रमांना जातो तेही फक्त हजेरी लावायला. कधी कोणाशी निवांत बोलून होत नाही. रुपलच्या लग्नानिमित्त सगळी भेटली . त्यांच्या संगतीने १० दिवस मजेत गेले. त्या आठवणींच इंधन आता वर्ष भर पुरेल. सई आणि आदित्यच्या ऑफिसमुळे तसेच बंटीच्या शाळेमुळे होणारी सततची धावपळ असते . घड्याळाच्या काट्यावर नाचायला आता जमत नाही. दिवसामागून दिवस निव्वळ रूटीन सांभाळण्यात जातात.
एक ना एक दिवस सईच्या मानतली अढी आपोआप दूर होईल या आशेवर त्यांनीही या विषयावर बोलणे टाळले.
झालंही तसंच ....
कोरोना व्हायरसने सगळीकडे हाहाकार माजविला.

लॉक डाऊन ची बातमी आली.

सगळ्यांनाच घरी राहावं लागलं.

कामवाल्या मावशी कामाला येत नव्हत्या. घरातली कामे सई आणि सासूबाईंनी वाटून घेतली. आदित्य आणि सासरेही जमेल तशी मदत करत होते.

सुरवातीची काही दिवस या सक्तीच्या सुट्टीची  मजा वाटली. मग मात्र आठवड्यातले सगळे दिवस सारखेच झाले. शनिवार रविवार या दिवसांची पुर्वी जितकी उत्सूकता वाटायची ते निवांत दिवसही उदर भरण आणि घरकामात व्यस्त जावू लागले.

छोट्या बिल्लूला जेवू घालतांना सई रडकुंडीला येवू लागली.  सासूबाईंनी आयते जेवण दिले तरी मुलांच्या खेळण्याचा पसारा आवरून आवरून तिला पाठदुखी सुरू झाली. कामवाल्या मावशी जी कामे आधी करायच्या ती कामे सोडली तरी घरातली इतर बारीक बारीक कामे दिवसभर पुरायची. सईला या दिवसांमध्ये पुरते कळून चुकले की धुणे, भांडी, फारशी आणि पोळ्याच्या मावशी आधी जरी कामाला येत होत्या तरी घरात इतर वेळ खावू कामे बरीच असतात. रोज घर नीटनेटके ठेवणे, फर्निचर पुसणे, बिल्लुचे आवरणे, दोरीवरचे कपडे काढून आणणे , त्या कपड्यांच्या नीट घड्या  करणे, भांडे ट्रॉली मधे लावणे, कुंड्याना पाणी देणे , मुख्य म्हणजे जेवणाचा टेबल कायम रिकामा ठेवणे कारण या टेबलावर सगळेच येता जाता वाट्टेल ते सामान आणून टाकतात. सामानाची इतकी गर्दी होते की जेवायला बसण्या आधी  त्याला रिकामा करण्यासाठीच जास्त वेळ वाया जात असे.

सईला सासूबाईंची रोज किती धावपळ होत असेल याची पूर्ण कल्पना आली. याआधी

आपण  ऑफिसच्या   रूटीनला  कंटाळुन शनिवार रविवारचा जास्तीत जास्त  वेळ  "Me time" साठी राखीव ठेवत होतो. बंटीच्या शाळेच्या आभ्यासाची तर आपण कधी काळजी करत नव्हतो . सगळं सासूबाई आवडीने करायच्या.   घराची जबाबदारी, बिल्लूचे सगळे करणे आणि बंटीचा अभ्यास  यातून सासूबाईंना स्वतःसाठी कितीसा वेळ मिळाला असेल ? या वयात त्यांनी त्यांच्या आवडीची कामे करावी . निवांत रहावं अशी आपली इच्छा पण प्रत्यक्षात घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलायला

आपल्या नोकरीतून वेळ कुठे मिळतो .


अनेक दिवस त्या घराबाहेरही पडत नाही पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. बाहेर जायचे म्हंटले की आपल्या सगळ्या वेळा सांभाळूनच बाहेर जातात. सासूबाई रुपलच्या लग्नाला गेल्या ते एका अर्थी बरंच झालं .... आता कोरोनामुळे बाहेर पडणे केवळ अशक्य.

तिच्या मनातली अढी आपोआप दूर झाली.

वर्क फ्रॉम होम असल्याने तिला घरून काम करावं लागतं होते.

तिच्या कामाचे स्वरूप , त्यासाठी खर्ची पडणारा वेळ , श्रम यांची जाणीव सासूबाईंना झाली. त्यांनाही वाटून गेलं रुपलच्या लग्नासाठी दहा दिवस न जाता दोन ते तीन दिवसात परत येता आलं असतं. आपण उगाच हट्टी पणा केला . सईची खूपच धावपळ झाली असेल.

तिच्या कामा बद्दल असलेला आदर अधिक द्विगुणित झाला.

कोरोनाचे संकट आले पण दोघींच्या मनातली अढी दूर होवुन आता दोघींमधे पूर्वीपेक्षाही  अधिक समंजस संवाद घडू लागला.

अर्थातच हे वाटतं तितक्या सोप्या पद्धतीने झाले नाही. आधी थोडी धुसपुस , किंचित आदळ आपट, टोमणे मारत बोलणे .... या सगळ्या पायऱ्या पार पडल्या. तरी हे सगळं घडताना दोघींनी आपला संयम कायम राखला. निर्माण झालेल्या परिस्थितीचा सारासार विचार केला आणि मोठ्या मनाने स्वतःची चूक मान्य केली.

कोविड१९ मुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते तरी त्यांनी त्याच्याकडे आत्मचिंतन करण्याची संधी या दृष्टिकोनातून बघितले याचाच परिणाम म्हणून दोघींचा संवाद अधीक मोकळे पणाने होवू लागला

आपल्या सगळ्यांच्या बाबतीतही

अनेकदा असेच घडते. वाईट वाटणारी परिस्थिती आपल्यात अनेक चांगले बदल घडवून आणत असते. परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. आपण या कठीण काळात परिस्थितीला नावे न ठेवता सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवे छोट्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याकडे योग्य संधी म्हणून बघायला हवे. जसे कोरोनामुळे मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीचा फायदा  सई आणि तिच्या सासूबाईंच्या मनातली अढी दूर होण्यासाठी झाला तसेच आपल्या बाबतीतही घडत असते फक्त आपण या छोट्या छोट्या सकारात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करून नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करायला हवे.

वाईटातून काही ना काही चांगले घडतेच . हा विश्वास कायम बाळगायला हवा. एकमेकांच्या योग्य साथीने कठीण काळही सहज निघुन जाईल.

©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहीत करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे






२६ जानेवारी २०२०

       २६ जानेवारी निमित्त काढलेली रांगोळी:
तिरंग्याच्या तीन रंगापासून बनवलेले फुलपाखरू.
   
         




विजया_दशमी२०२०

 #दसरा

#विजया_दशमी२०२०

या सणाला पाटी पूजन करण्याची पद्धत आहे. सरस्वती पूजन करतांना सरस्वती चिन्ह पाटीवर काढून पूजन केले जाते.

म्हणून सरस्वती चिन्ह काढलेली ही साधी सोपी सुंदर छोटी रांगोळी.

©️ अंजली मीनानाथ धस्के



ती... एक लढवय्या

 #ती_एक_लढवय्या

#१००शब्दांचीगोष्ट

लावण्या नावाप्रमाणेच सुंदर. चाळीशीत येवूनही ती महाविद्यालयीन तरुणीप्रमाणे कमनीय बांधा राखून होती.

एक दिवस आंघोळ करतांना काखेत गाठ जाणवली आणि  सगळच बदलून गेलं. 

              आईचं काळीज ते.... पोरांच्या कोवळ्या वायाकडे बघून खंबीर झाली. सगळे उपचार न कंटाळता पूर्ण केले.  किमोने तिचा रंग काळवंडला. डोक्यावरचे काळे भोर केस गायब झाले. कमनीय बांधा जावून हाडांचा सापळा राहिला. वय अचानक तिपटीने वाढल्यासारखा चेहरा झाला. मात्र आत्मविश्वासाला कधीच तिने साथ सोडू दिली नाही.

        आरशात बघतांना कधी डोळ्यातून पाणी काढलं नाही.  पूर्वीसारखीच आत्मविश्वासाने वावरत राहीली. ती खरी लढवय्या होती.

तिच्या खंबीर साथीने नवरा, मुलंही सावरली. 

आयुष्याची लढाई फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर जिंकता येते हे तिने सिद्ध केले.

©️ अंजली मीनानाथ धस्के

टीप: लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहीत करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.



दिव्याभोवती काढायच्या रांगोळ्या

 

Simple Beautiful #Diwali
#Festive_Rangoli
#दिवाळी #दिव्याभोवती काढायच्या #Diya #रांगोळी
सणांची शोभा द्विगुणित करणारी सोपी आकर्षक आणि झटपट होणारी रांगोळी
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
👆👆👆👆 दिवाळी सणाला दिव्या भोवती कोणती रांगोळी काढू??  रांगोळी काढता येत नाही???
असे  प्रश्न सतावत असतील तर  मग   एकदा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघाच.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇👇👇👇👇

https://youtu.be/IQej33700V4

या रांगोळ्या  अगदी #सोपी #Easy तरी   #सुंदर #Beautiful दिसणाऱ्या आहेत
तुमची #प्रतिक्रिया तुम्ही काढलेल्या या रांगोळीच्या #फोटो रूपाने कमेंट box मधे आवर्जून नोंदवा.
व्हिडिओ आवडल्यास #लाईक #like #कमेंट #Comment  #शेअर #Share  नक्की करा. अशाच सोप्या आणि नव नवीन कलाविष्कारांसाठी  #Rang_Majha_Vegala या माझ्या #YouTube #Channel ला सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका.
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)

प्रकार १:


प्रकार २:




अधिक महिन्यात काढल्या जाणाऱ्या विशेष रांगोळ्या

 #अधिक_महिन्यात #Adhik_Mas काढल्या जाणाऱ्या विशेष #रांगोळ्यांचे

#Rangoli तीन सुंदर सोपे प्रकार इथे देत आहे. अधिक महिना हा #भगवान #शंकर/#महादेव तसेच #श्री_हरी_विष्णू यांचा मानला जातो. या महिन्यात त्यांची विशेष भक्ती केली जाते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची भक्ती रांगोळीच्या माध्यमातून ही केली जाते. 

एकूण काय तर घराच्या अंगणापासून ते देवघरापर्यंत सकारात्मक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने या प्रथा कार्यरत असतात.

इथे दिलेल्या रांगोळ्या अतिशय सोप्या सुंदर आहेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीही रांगोळी काढू शकता हा आत्मविश्वास निर्माण होईल हे मात्र नक्की.

व्हिडिओ आवडल्यास like comment share करून अभिप्राय नोंदवायला विसरु नका. असेच नव नवीन कलाविष्कार पाहण्यासाठी रंग माझा वेगळा यू ट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन चे बटन ही दाबा👇👇👇https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

वातींचे विविध प्रकार पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://youtu.be/DjWRb4_t5PQ

thank u

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

१) ३३ गोपद्म असलेली  महादेव पिंड रांगोळी


२) ११ गोपद्म असलेली कासव रांगोळी

३) ११ गोपद्म असलेली साधी रांगोळी







दिवाळी धनतेरस/ नवरात्री घटस्थापना रांगोळी

 

#Diwali
#Festive_Rangoli
#दिवाळी (२०२०)#धनतेरस #घटस्थापना #अक्षयतृतीया #गृहप्रवेश #रांगोळी

सोपी सुंदर आकर्षक अशी ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल.

या रांगोळीचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास Rang Majha Vegala YouTube Channel सबस्क्राइब करायला विसरू नका.👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg






दिवाळी(२०२०) दिवा रांगोळी प्रकार २

 

#Diwali #Diya
#Festive_Rangoli
#दिवाळी #दिवा #रांगोळी प्रकार २
सणांची शोभा द्विगुणित करणारी सोपी आकर्षक आणि झटपट होणारी रांगोळी
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
👆👆👆👆 सणाला कोणती रांगोळी काढू??  रांगोळी काढता येत नाही???
असे  प्रश्न सतावत असतील तर  मग   एकदा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघाच.
#Covid19 च्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्या सणांवर होवू न देता घरातल्या घरात सोप्या  सुटसुटीत पद्धतीने सण साजरे करून #आनंद मिळवता येईल.
ही रांगोळी  अगदी #Simple #सोपी #Easy तरी   #सुंदर #Beautiful दिसणारी अशी आहे.
तुमची #प्रतिक्रिया तुम्ही काढलेल्या या रांगोळीच्या #फोटो रूपाने कमेंट box मधे आवर्जून नोंदवा.
व्हिडिओ आवडल्यास #लाईक #like #कमेंट #Comment  #शेअर #Share  नक्की करा. अशाच सोप्या आणि नव नवीन कलाविष्कारांसाठी  #Rang_Majha_Vegala या माझ्या #YouTube #Channel ला सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका.
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)










दिवाळी दिवा रांगोळी २०२० प्रकार १

 

#दिवाळी_दिवा_रांगोळी २०२०

Simple Beautiful #Diwali #Diya
#Festive_Rangoli
#दिवाळी #दिवा #रांगोळी
सणांची शोभा द्विगुणित करणारी सोपी आकर्षक आणि झटपट होणारी रांगोळी
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
👆👆👆👆 सणाला कोणती रांगोळी काढू??  रांगोळी काढता येत नाही???
असे  प्रश्न सतावत असतील तर  मग   एकदा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघाच.
#Covid19 च्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्या सणांवर होवू न देता घरातल्या घरात सोप्या  सुटसुटीत पद्धतीने सण साजरे करून #आनंद मिळवता येईल.
ही रांगोळी  अगदी #सोपी #Easy तरी   #सुंदर #Beautiful दिसणारी अशी आहे.
तुमची #प्रतिक्रिया तुम्ही काढलेल्या या रांगोळीच्या #फोटो रूपाने कमेंट box मधे आवर्जून नोंदवा.
व्हिडिओ आवडल्यास #लाईक #like #कमेंट #Comment  #शेअर #Share  नक्की करा. अशाच सोप्या आणि नव नवीन कलाविष्कारांसाठी  #Rang_Majha_Vegala या माझ्या #YouTube #Channel ला सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका.
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)






शिक्षक दिन/ संकष्ट चतुर्थी २०२०

#शिक्षक दिन
#संकष्टी चतुर्थी
On occasion of Teacher's Day and Sankashta Chathurti Simple Beautiful Special Rangoli 
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
👆 रांगोळीचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Rang Majha Vegala YouTube Channel सबस्क्राइब करायला विसरू नका.
यंदा शिक्षक दिन आणि संकष्ट चतुर्थी एकाच दिवशी आल्याने त्या निमित्त सोपी आकर्षक रांगोळी
आयुष्याच्या पाटीवर प्रत्येक वळणावर ज्यांचा हात धरून आपण नव नवीन ज्ञान मिळवण्याचा श्री गणेशा केला त्या समस्त शिक्षक वृंदांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...
त्यांचा शुभ आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहो हिच ईश्र्वर चरणी प्रार्थना
व्हिडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया like comment share रूपाने आवश्य नोंदवा.
धन्यवाद


सहजच सुचलेले शब्द: शायरी

 #शायरी (सोबत रांगोळी आहेच)

सपनों की स्याही से लब्जो को हैं भिगोया

उम्मीद की किरण से जस्बातो को हैं पिरोया

अफसानों की दुनिया से कुछ लम्हों को हैं चुराया

क्या कहूं यारो बड़ी मुश्किल से

खयालो कें शहर में मैंने घर हैं बसाया।

©️ अंजली मीनानाथ धस्के



लक्ष्मी पूजन रांगोळी२०२०

 

#लक्ष्मी_पूजन  #रांगोळी #लक्ष्मीची_सोन_पाऊले

सणांची शोभा द्विगुणित करणारी सोपी आकर्षक रांगोळी

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

👆👆👆👆 सणाची तयारी सुरू आहे???? मग   एकदा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघाच.

#Covid19 च्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्या सणांवर होवू न देता घरातल्या घरात सोप्या  सुटसुटीत पद्धतीने सण साजरे करून #आनंद मिळवता येईल.

#लक्ष्मी_पूजन निमित्त

ही #लक्ष्मी ची #सोन #पाऊले यंदा आपल्या घरी ही पडतील. ही  पाऊले काढायला  अगदी #सोपी #Easy तरी   #सुंदर #Beautiful दिसणारी अशी आहेत. या आधी तुम्ही तयार पावलाचे #ठसे वापरत असाल तर ते विसरून जाल. 

 तुमची #प्रतिक्रिया तुम्ही काढलेल्या या रांगोळीच्या #फोटो रूपाने कमेंट box मधे आवर्जून नोंदवा.

व्हिडिओ आवडल्यास #लाईक #like #कमेंट #Comment  #शेअर #Share  नक्की करा. अशाच सोप्या आणि नव नवीन कलाविष्कारांसाठी  #Rang_Majha_Vegala या माझ्या #YouTube #Channel ला सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका.

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)






बॉर्डर रांगोळ्या २०२०

#Border_Rangoli for Beginners (4 Types)  #सुंदर सोप्या #बॉर्डर रांगोळ्यांचे #Beautiful चार प्रकार जे खूप #Easy #Simple #Quick   होणारे आहेत. #Diwali #गणेश_उत्सव #गौरी_गणपती #दसरा अशा 

सणांची शोभा रांगोळीने वाढते म्हणूनच अगदी सहज सुंदर सोप्या अशा दारातील/ देवघरा समोरील  बॉर्डर रांगोळीचे प्रकार इथे देत आहे. तुम्हीही काढून बघा. #कमी वेळात #झटपट होणाऱ्या या रांगोळ्यांनी  तुमच्या घराची/ #सणांची #शोभा नक्कीच वाढेल. तुम्हाला #सकारात्मकत #वातावरण निर्मितीचा अनुभव घेता येईल. तुम्हाला #रांगोळी शिकण्यासाठी या #व्हिडिओ चां फायदा होतो आहे का? हे जाणून घ्यायला नक्की आवडेल.
व्हिडिओ आवडल्यास #like #comment and #share करून *Rang Majha Vegala* या YouTube channel ला #subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
Thank you for watching this video.
धन्यवाद
#Stayhomestaysafe
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

                             प्रकार १:


प्रकार२:

प्रकार ३:

प्रकार ४:

सगळे प्रकार एकत्रित करून





गणेश_चतुर्थी २०२०

#Ganesh _Chaturti #4to4 Dots #Simple #Beautiful #Unique

#गणेश_चतुर्थी 

#सोपी 

#सुंदर 

#गणेश 

#रांगोळी 

#प्रकार४

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

👆👆👆Rang Majha Vegala YouTube Channel वर संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत.

गणेश चतुर्थी निमित्त कोणती रांगोळी काढू? असा प्रश्न पडला असेल तर एकदा हा व्हिडिओ बघा आणि निश्चिंत व्हा.

४ ते ४ ठीपक्यापासून साकारलेली गणेश मूर्ती रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल.

 ही #गणेश #रांगोळी #४ते४ ठिपक्यांची असून  #झटपट होणारी आणि #सुंदर दिसणारी आहे. 

४ ते ४ थेंबी गणेश रांगोळी प्रकार १ , प्रकार २ व प्रकार ३ आधी व्हिडिओमधे दिलेले आहेत.  

गणेश प्रकार १ चा व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक देत आहे 👇👇

https://youtu.be/DXJB8xfxHxk

 गणेश प्रकार २ चा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा . गणेश प्रकार २ ची लिंक 👇👇👇👇

https://youtu.be/XDgQ02EUVdk

प्रकार ३ साठीची लिंक 👇👇👇

https://youtu.be/capGq6Dlf_g

सगळेच प्रकार एकाहून एक सोपे आणि सुंदर आहेत.

    रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हे व्हिडिओ नक्की बघा आणि रांगोळी शिकण्याचा #श्री #गणेशा कराच. #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त.

 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून

 #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

असेच सुंदर सोपे  कलाविष्कार बघण्यासाठी आणि 

चॅनल subscribe करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे)




गौरी आवाहन २०२०

#लक्ष्मी_पाऊले 

#गौरी_आवाहन 

#लक्ष्मी_पूजन

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

👆👆👆👆 गौरी आवाहन ची तयारी सुरू आहे???? मग   एकदा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघाच.

#Covid19 च्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्या सणांवर होवू न देता घरातल्या घरात सोप्या  सुटसुटीत पद्धतीने सण साजरे करू #आनंद मिळवता येईल.

#लक्ष्मी_पूजन निमित्त

ही #लक्ष्मी ची #सोन #पाऊले यंदा आपल्या घरी ही पडतील. ही  पाऊले काढायला  अगदी #सोपी #Easy तरी   #सुंदर #Beautiful दिसणारी अशी आहेत. या आधी तुम्ही तयार पावलाचे #ठसे वापरत असाल तर ते विसरून जाल इतकी ही सोपी पद्धत आहे.

हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा आणि तुमची #प्रतिक्रिया तुम्ही काढलेल्या या रांगोळीच्या #फोटो रूपाने कमेंट box मधे आवर्जून नोंदवा.

व्हिडिओ आवडल्यास #लाईक #like #कमेंट #Comment  #शेअर #Share  नक्की करा. अशाच सोप्या आणि नव नवीन कलाविष्कारांसाठी  #रंग_माझा_वेगळा या माझ्या #YouTube #Channel ला सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका.

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे)









हरतालिका२०२०

  #Hartalika

 #Shivling Teej 

#Portrait 

#Rangoli  

सोपी सुंदर हरतालिका शिवलिंग रांगोळी

        रांगोळी काढायची इच्छा असते पण काय काढावं सूचत नाही. म्हणूनच अगदी #सोपी #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी रांगोळी खास तुमच्यासाठी घेवून येत आहे.

#हरतालिका निमित्त हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर साधे तरी #आकर्षक असे #शिवलिंग रेखाटले आहे.

 #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही ही रांगोळी काढू शकता. कुठलीही #भीती न बाळगता पुढच्या पिढीने  रांगोळीचा #वारसा जपावा म्हणून केलेला हा #प्रयत्न. रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हा व्हिडिओ नक्की बघा  

 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. Rangoli शिकण्यासाठी या व्हिडिओ चा फायदा होतो आहे का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)








श्रावण सोमवार ४ शिवामूठ जवस रांगोळी (२०२०)

 #श्रावण_सोमवार४

#शिवामूठ

#जवस #Falx_seeds

#रांगोळी   

   #Step_by_step #Simple #Beautiful #Unique #Easy #Shravan #Somvar4 #Rangoli 

ही रांगोळी काढायला जितकी #सोपी तितकीच दिसायला #सुंदर आहे.

          असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.

स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहण्यासाठी आणि 

"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Thank you 

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

टिपः दुसऱ्या दिवशी रांगोळीतले जवस अलगद उचलून घ्यायचे. चाळणीने चाळून घेतल्यास ते खाद्य पदार्थात पुन्हा वापरू शकतो.





स्वातंत्र्य_दिन १५ऑगस्ट २०२० ४ते४ठिपक्यांची शांतीदूत रांगोळी

 #स्वातंत्र्य_दिन

#१५ऑगस्ट२०२०

#सोपी 

#सुंदर

#४ते४ठिपक्यांची

#शांतीदूत (दोन प्रकार)

#रांगोळी 


स्वातंत्र्य दिना निमित्त  #15August खास तुमच्यासाठीच घेवून येत आहे  4to4Dots #४ते४ठिपक्यांची #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी #Dove #रांगोळी.

४ ते ४ ठीपक्यांच्या रचनेत #शांतीदूत ( पांढरे शुभ्र कबुतर) काढण्याच्या प्रयत्न केला आहे.

💐 तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून

 #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

असेच सुंदर सोपे  कलाविष्कार बघण्यासाठी आणि 

चॅनल subscribe करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे)

प्रकार १:


प्रकार २:




जिज्ञासू_प्राणी

 

#जिज्ञासू_प्राणी
#Curious_Animal
©️ अंजली मीनानाथ धस्के
        कसल्यातरी गहन विचारात बाळराजे गढून गेलेले पाहून मी त्यांच्या आजूबाजूला उगाच लुडबुड सुरू केली. बाळराजेंची तंद्री भंगली तसा त्यांचा प्रश्न आला," मम्मी जगातला सगळ्यात जिज्ञासू ( curious) प्राणी  कोणता? सांग बरं?"
मी ही लगेच  सध्या कामात नसलेल्या .... किंबहुना कामातून गेलेल्या माझ्या मेंदूवर ताण देत आठवतील तेवढ्या सगळ्या प्राण्यांची नावे घेतली.
      मला उत्तर येत नाही त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनातल्या उत्तराशी माझे उत्तर जुळत नाही म्हंटल्यावर  बाळराजेंची कळी खुलली आणि ते आगदी खुशीत येवुन बोलले ," तू सांगितलेली सगळी उत्तरे चुकीची आहेत. खरं उत्तर आहे कोल्हा (wolf🐺)"
मी आश्चर्याने चकित होऊन बघता त्यांनी स्वतःहून स्पष्टीकरण ही दिले ," wolf च जिज्ञासू प्राणी आहे कारण तो सतत .... *Hoooow*
( कोल्हे कुई च्या सुरात ) ओरडत असतो."
बाळराजेंनी दिलेले स्पष्टीकरण कितपत योग्य आहे याची पडताळणी करून पाहण्यासाठी मी ही *Hoooow* असे दोन तीन वेळा कोल्हे कुईच्या तालात म्हणून बघितले. माझ्या या प्रयोगानंतर बाळराजेंचे उत्तर योग्य की अयोग्य याचा निर्णय झालाच नाही उलट बराच वेळ शांत असलेले आमचे घर अचानक आमच्या  "कूई" ने आणि त्यानंतरच्या हास्याने दुमदुमले .
थोडा वेडेपणा भी जरुरी होता हैं रे बाबा .... बोअरिंग नेस को भागाने का शास्त्र असतं ते.....😂😂😝😝😝
©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.



श्रावण_सोमवार३ शिवामूठ मूग रांगोळी


 #श्रावण_सोमवार३(2020)

#शिवामूठ

#मूग

#रांगोळी   

 यंदा घराबाहेर पडून मंदिरातील महादेवाचे दर्शन घेवून शिवामूठ वाहाने शक्य नसले तरी घरच्या घरी सुरक्षित वातावरणात शिवामूठ मूग पासून मनमोहक  रांगोळी साकारून ती रांगोळी शिव चरणी अर्पण करून भक्तीमय वातावरणाची निर्मिती नक्कीच करू शकता.  घरी मनोभावे पूजा करून मन आणि घर प्रसन्न ठेवू शकता.

ही रांगोळी काढायला जितकी सोपी तितकीच दिसायला सुंदर आहे.

ही रांगोळी बघणाऱ्याला  क्षणात बेलाची तीन पाने तर क्षणात  महादेवाचे तीन डोळे  भासते.

          असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि "रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Thank you 

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

टिपः दुसऱ्या दिवशी रांगोळीतले मूग अलगद चाळणीत उचलून घ्यायचे. रांगोळी चाळणीतून खाली येते व मूग   खाद्य पदार्थात पुन्हा वापरू शकतो.



श्रीकृष्ण जन्माष्टमी२०२०

 #श्रीकृष्ण

#जन्माष्टमी

#गोकुळाष्टमी

#सोपी 

#सुंदर

#४ते४ठिपक्यांची

#रांगोळी 


Shree Krishna #Janmashtami    #श्रीकृष्ण

#जन्माष्टमी निमित्त खास तुमच्यासाठीच घेवून येत आहे   #४ते४ठिपक्यांची #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी #रांगोळी.

ही रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल. 

    रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि रांगोळी शिकण्याचा #श्री #गणेशा कराच. #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त.

💐 तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा 💐

 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून

 #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

असेच सुंदर सोपे  कलाविष्कार बघण्यासाठी आणि 

चॅनल subscribe करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे)





संकष्ट चतुर्थी निमित्त सुंदर गणेश रांगोळी


#संकष्ट_चतुर्थी 
#सोपी 
#सुंदर 
#गणेश 
#रांगोळी 
#प्रकार३
         #४ते४ ठिपक्यांची #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी रांगोळी खास तुमच्यासाठी.
४ ते ४ थेंबी गणेश रांगोळी प्रकार १ , प्रकार २ आधीच्या व्हिडिओ मधे दिलेले आहेत.  ४ ते ४ थेंबी गणेश रांगोळी प्रकार ३ इथे देत आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. प्रकार २ चा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा . गणेश प्रकार २ ची लिंक 👇👇👇👇
https://youtu.be/XDgQ02EUVdk
  आकाराने #अतिशय #छोटी असल्याने ह्या रांगोळीला जास्त #जागा लागतं नाही. कुठलीही #भीती न बाळगता  रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि रांगोळी शिकण्याचा #श्री #गणेशा कराच. #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त.
 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून
 #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
असेच सुंदर सोपे  कलाविष्कार बघण्यासाठी आणि 
चॅनल subscribe करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे)








श्रावणसोमवार२ शिवामूठ तीळ रांगोळी (२०२०)

#श्रावण_सोमवार२
#शिवामूठ
#तीळ
#रांगोळी 
 यंदा घराबाहेर पडून मंदिरातील महादेवाचे दर्शन घेवून शिवामूठ आणि बेल पाने वाहाने शक्य नसले तरी घरच्या घरी सुरक्षित वातावरणात शिवामूठ तीळ पासून मनमोहक  रांगोळी साकारून ती रांगोळी शिव चरणी अर्पण करून भक्तीमय वातावरणाची निर्मिती नक्कीच करू शकता.  घरी मनोभावे पूजा करून मन आणि घर प्रसन्न ठेवू शकता.
ही रांगोळी काढायला जितकी सोपी तितकीच दिसायला सुंदर आहे.
          असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि
"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
Thank you
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
टिपः दुसऱ्या दिवशी रांगोळीतले तीळ अलगद उचलून घ्यायचे. ते खाद्य पदार्थात पुन्हा वापरू शकतो.

मैत्री दिवस (२०२०)

#मैत्री_दिवस(२०२०)
     प्रत्येक मैत्रीण वेगळी असते, तरी ती हवी असते कारण" हर एक फ्रेंड जरुरी होता हैं" त्यांच्यामुळेच आपल्या आयुष्यात सोनेरी क्षणांचे रंग भरले जातात म्हणूनच
     माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्य प्रमाणे मैत्रीचे रंग भरणाऱ्या प्रत्येक मित्र मैत्रीणीला मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा
©️ Anjali Minanath Dhaske

रक्षाबंधन स्पेशल छोट्यारांगोळ्या भाग३ (४ते४ थेंबी)


#रक्षाबंधन_स्पेशल
#४ते४ठिपक्यांच्या
#छोट्या_रांगोळ्या
#भाग३
#कमळ
#मोर
#स्वस्तिक
#दिवे
खास तुमच्यासाठीच घेवून येत आहे. मोर ,कमळ, स्वस्तिक दिवे अशी चिन्हे असलेल्या अगदी सोप्या आणि सुंदर रांगोळ्या .
रांगोळ्या बघितल्यावर तुम्हालाही रांगोळी काढून बघण्याचा मोह अनावर होईल.
सुंदर  रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर छोट्या रांगोळ्यांचे तीन प्रकार (भाग ३) हा व्हिडिओ नक्की बघा. याचेच भाग १  आणि भाग २ हे व्हिडिओ ही बघायला विसरु नका.
सगळ्या रांगोळ्या बघण्यासाठी *रंग माझा वेगळा* या यू ट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे )

                          प्रकार १:


प्रकार २:



प्रकार ३: