छोटी व सुबक गालिचा रांगोळी

  #गालिचा_रांगोळी 

ही छोटी रांगोळी गालिचा सारखी आकर्षक दिसेल जेव्हा तुम्ही ती रांगोळी व्हिडिओ मध्ये दाखविल्या प्रमाणे काढाल. संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇👇👇👇

https://youtu.be/KHB4TVHWuug

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)






आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२२

 #आंतरराष्ट्रीय_योग_दिवस_२०२२

व्हिडिओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
Thank you for watching this video.
धन्यवाद
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे)

ईथे दिलेली रांगोळी अगदी झटपट काढलेली असून आकर्षक दिसते.  एका मिनिटात पूर्ण होणारा हा video नक्की बघा 👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtube.com/shorts/25NlDZNmzlA?feature=share



गुळाचा शिरा, आठवणी आणि बरेच काही

 #गुळाचा_शिरा 

#आठवणी_आणि_बरेच_काही 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

पहाटेच्या घाईत डबा बनविण्यात गुंग असतांना अचानक लक्षात आले आज  नाष्ट्याला काय बनवायचे याचा विचारच आपण करून ठेवलेला नाही.  कमी वेळात तयार होणार्‍या सगळ्या पदार्थांची उजळणी मनातल्या मनात झटपट करून झाली.  गुळाचा शिरा या पदार्थाची निवड झाल्यानंतर एकीकडे चपाती लाटणे व शेकणे, एकीकडे भाजी चिरत असतांना फोडणीचे तयारी करणे यातच साजूक तुपात रवा भाजण्याच्या कसरतीला सुरूवात झाली. रवा खरपूस भाजून झाल्यावर त्यात गरम पाणी घातले तसा रवा मस्त फुलून आला. रव्यातील पाणी आटले तसे त्यात किसलेला गूळ घातला.  गूळ व्यवस्थित मिसळल्यानंतर वेलदोड्याची पूड त्यावर भुरभुरत काजू बदामाच्या छोट्या तुकड्यांची पेरणी केली. तुपाचा वापर सढळ हाताने केल्याने मिश्रणाला तूप सुटायला लागल्यावर चिमूटभर मीठ टाकले. मिश्रण पुन्हा एकदा हळवून घेतले. हळूच गॅस बंद करून पुन्हा चपाती बनविणे आणि भाजी परतण्याच्या कसरतीला लागले.

              तेवढ्यात नवरोबा स्वयंपाक घरात प्रवेश करत म्हणाले, " आज काय खास बनविले आहे, एखाद्या सुगरण आजीने पारंपारिक पदार्थ बनवावा तसा दरवळ घरभर पसरला आहे "

 सकाळच्या घाईत शर्यतीतल्या घोड्याप्रमाणे माझी अवस्था असते. जराही लक्ष भटकू न देता डबा बनविणे, नंतर तो नीट भरून नवरा व मुलाला आनंदाने घराबाहेर पाठविणे या अंतिम रेषेवर वेळे आधी पोहोचण्याचा ध्यास असतो . त्यामुळे नवरोबा जे काही बोलले त्याला उत्तर देतांना ते द्यायचे म्हणून दिल्या गेले ," आज सुगरणी सारखे काही खास केलेले नाही झटपट होतो म्हणुन गुळाचा शिरा केलाय "

             आमचे बाळराजे घरातल्या कोणत्याही कोपर्‍यात कितीही कामात व्यग्र असले तरी कान मात्र आमच्या संवादाकडेच असतात.  बाळराजेंनी क्षणाचाही विलंब न करता आमच्या संवादात उडी घेतली, " आई तु गैरसमज नको करून घेवूस की ते तुला सुगरण म्हणतात आहे, उलट तू आजीबाई सारखी म्हातारी झाली आहेस असे सुचवायचे आहे त्यांना " 

          मीही लगेच बोलले, " त्यांना काय म्हणायचे ते म्हणु दे नंतर बघेन त्यांच्याकडे "

         टाळायचा प्रयत्न केला तरी स्त्री सुलभ मनात शंका आलीच की  नवर्‍याने आपल्याला खरेच आजीबाई म्हंटले असेल का? 

      ईकडे नवर्‍याच्या मनात ही पुढच्या संकटाची चाहूल लागली म्हणुन त्याने बाळराजेंच्या बोलण्याला लगेच स्पष्टीकरण दिले ," अग... तुला आजीबाई म्हंटलेलं नाही .घरभर जो खमंग दरवळ पसरला आहे त्यावरून मला तुझ्या आजीची आठवण झाली. पहाटेची वेळ, तुझी आजी आणि गुळाचा शिरा ..... या तू सांगितलेल्या प्रसंगाची आठवण झाली. "

       माझ्या तोंडूनही निघून गेले," खरच की.... आजीची आठवण येईल असा दरवळ आहे खरा "

        नवर्‍याने सांगितल्यावर प्रकर्षाने  जाणवलं की ,'जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर असले की असेच अनेक दरवळ अनुभवायचे राहून जातात.' मन क्षणात भूतकाळात गेले. 

           माझ्या लहानपणी आमचे आजी आजोबा (वडिलांचे आई वडील)वर्षात बरेचदा आमच्याकडे  दहा पंधरा दिवसांसाठी रहायला येत. 

 मी साधारण दुसरी किंवा तिसरीत असेल. तेव्हाची ही गोष्ट.

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले होते. पहाटेची चार, साडेचारची वेळ होती. हवेतला गारवा आणि सोबतीला दुलईची ऊब अत्यंत सुखदायक होती.  गावी असले की आजोबांना पहाटेच्या वेळी ब्रम्ह मुहूर्तावर मंदिरात जावून काकड आरती म्हणण्याची सवय होती.  आमच्या घराजवळ मंदिर नसल्याने ते अंगणात तुळशी वृंदावनाजवळ बसुन काकड आरती म्हणत. साधारण तासभर तरी त्याचा हा कार्यक्रम चाले.  दिवसभर आई काम करून थकलेली असे.  तिला पहाटेच्या कामात अधिक त्रास नको म्हणून फक्त याच वेळी आजी स्वयंपाक घरात काहीतरी बनवायला म्हणुन येत असे. आजोबांची आरती झाल्यावर नैवेद्य म्हणून  कधी गोड कधी तिखट पदार्थ बनवले जात . 

            मी साखर झोपेचा आनंद घेत असतांना रोजच्या सारखे काकड आरतीचे मंद स्वर कानावर पडत होते. आई बहुदा खराट्याने घराचे मागील अंगण झाडत असावी कारण त्या झाडण्याच्या आवाजातील  लयही कानांना जाणवत होती. पक्ष्यांचा किलबिलाट नुकताच सुरु झाला होता. स्वयंपाक खोलीतील भांड्यांची कीणकीण त्यात मिसळली होती. 

 सवयीने  थोडी चुळबुळ करत पुन्हा झोपेच्या आधीन होण्याचे कसब येव्हाना घरातील ईतर सदस्यांना चांगले जमू लागले होते.  पहाटेला स्वतःचा असा एक सुखद गंध असतो. आपल्या आधी उठणाऱ्या व्यक्तीने दारे,  खिडक्या उघडल्यावर तो गंध श्वासात साठवून थोडा वेळ लोळायला मला आजही फार आवडते.  

 तेव्हाही या सगळ्या आवाजाचा  गुंगीतच कानोसा घेत पुन्हा झोपेच्या आधीन होत असतांनाच  एक दीर्घ श्वास घेतला .  नेहमी या दीर्घ श्वासानंतर निद्रा  देवी पुन्हा पापण्यांवर विराजमान होत असे. तेव्हा मात्र त्या श्वासा बरोबर जो  खमंग दरवळ आला होता त्याने पोटातील भूक चाळवली.  त्या जाणिवेने निद्रा देवीने तिचे काम करण्यास नकार दिला. तोपर्यंत या खमंग दरवळाचे उगम स्थान शोधण्याचा आदेश मेंदूने सुस्तावलेल्या शरीराला दिलाही होता. अंगावर पांघरलेली दुलई अंगाभोवती गुंडाळून घेत मी डुलत डुलत शोध सुरू केला आणि स्वयंपाक घरात जावून पोहोचले. आजीला ओट्यावर असलेल्या शेगडीचा वापर जमत नसे म्हणुन तिने गॅसची शेगडी खाली फाशीवर ठेवली होती.  पाटावर बसुन ती कढईत एक एक जिन्नस टाकत होती.  मला आलेलं बघून तिला थोडे आश्चर्य वाटले . ती हसून म्हणाली, " काय झालं ग, ईतक्या लवकर उठलीस आज." मीही तिच्या जवळ फतकल मारून घेत लाडात येवून बोलले, " उठली बिठली काही नाही, तूम्ही रोज मस्त मस्त पदार्थ बनवून खाता. आज मीही तुमच्या बरोबर खाणार आहे आणि मग पुन्हा जावून झोपणार आहे ". त्यावर आजीने हसत लाडाने माझ्या तोंडावरून हात फिरवून माझा मुका घेतला.

नैवेद्य दाखवून झाल्यावर तिने मला बशीमधे गरमागरम साजूक तुपातील शिरा खायला दिला.

मी विचारले, " आजी... आज हे काय बनवले आहे?". आजी म्हणाली, " शिरा आहे.  कसा  बनला आहे?" 

मी ही बोलले, " मस्त लागतोय पण हा आज असा काळा कसा झाला " त्यावर आजीला हसू आले ," अग हा गुळाचा शिरा आहे, नेहमीसारखा दुधातलं नाही.  "

तितक्यात आई ही तिथे पोहोचली.  मला ईतक्या पहाटे उठलेले बघून तिलाही आश्चर्य वाटले. आजीच्या शिर्‍याचा खमंग दरवळ मला झोपेतून खेचून घेवून आलाय हे समजल्यावर माझ्या हावरट पणाचे तिलाही हसू आले. 

       शिरा खावून झाल्यावरच मी तिथेच आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेले.  पहाटेचा अंगणातील उजेडाचे स्वागत करायला उत्सुक असलेला अंधार, अंगणात सडा शिंपण्याचा येणारा आवाज ,पक्ष्यांचा किलबिलाट, स्वयंपाक खोलीच्या मागच्या दारातून येणारी गार हवा , सबंध वातावरणात पसरलेला गुळाच्या शिर्‍याचा खमंग दरवळ, मला थोपटतांना आजीच्या बांगड्यांची होणारी कीणकीण आणि गुळाचा शिरा खावून सुखावलेला माझा आत्मा  या सगळ्यांनी मिळून ती पहाट माझ्यासाठी अविस्मरणीय झाली होती.  

       त्यानंतर मात्र रोज रात्री मी आजीला "उद्या काय बनविणार आहेस" हे विचारूनच झोपी जात होते.  मी पहाटे कधी उठले नाही तरी आजी माझ्यासाठी वाटीभर खाऊ बाजूला काढून ठेऊ लागली होती. 

मी आठवणीत रमले होते  तेवढ्यात गुळाचा शिरा खाणार्‍या नवरोबाचे शब्द कानी पडले, " एक नंबर..... काय अप्रतिम चव आहे. एकदम मेंदू पर्यंत जाते. तू आजीची आठवण सांगितली तेव्हा असाच खमंग दरवळ माझ्या कल्पनेत व्यापून राहिला होता .आज ईतक्या दिवसांनी तू वर्णन केलेल्या  सुगंधाला, चवीला आणि पहाटेला मी प्रत्यक्ष अनुभवतो आहे. वाह वाह आज मजा आली...." 

       रोज भल्या पहाटे सोसायटी स्वच्छ करायला येणार्‍या दादांनी खराट्याने झाडतांना मस्त लय पकडली होती. सोबतीला पक्षांचा किलबिलाटही होताच. शरीराला हवेतील गारवा सुखावत होता. सोबतच साजूक तुपातील गुळाच्या शिर्‍याचा खमंग दरवळ आणि जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव या सगळ्यांच्या एकत्र येण्याने नवरोबाला कधीही न बघितलेल्या माझ्या आजीची आठवण झाली होती याचे मला फार नवल वाटले. 

त्याच्या या कृतीने मी सुखावले आणि आजीच्या गोड आठवणीने आजची सकाळही प्रसन्न झाली. 

      तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी भल्या पहाटे उठावे लागेल.  साजूक तुपातला गुळाचा शिरा करावा लागेल. अंगणात, खिडकीत किंवा गॅलरीत बसुन पक्षांचा किलबिलाट ऐकत गरमागरम गुळाचा शिरा खातांना ज्या स्वर्ग सुखाची अनुभुती येईल त्याने तुमची ही एक पहाट नक्की अविस्मरणीय बनेल याची मला खात्री आहे.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

टिप: लिखाण आवडल्यास नावासहित शेयर करण्यास हरकत नाही. ईतर लिखाण 'आशयघन ' रांगोळी या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे . लिंक खाली देत आहे. 

anjali-rangoli.blogspot.com 

अनेक सुंदर व सोपे कलाविष्कार पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. Link 👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg








बाल गणेशाची पोस्टर रांगोळी

  #बाल_गणेश_रांगोळी 

अतिशय सोप्या पद्धतीने काढलेली आकर्षक अशी ही बाल गणेशाची रांगोळी तुम्हाला नक्की आवडेल.  रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇👇👇

https://youtu.be/H_AxtOT4mmY

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)






वटपौर्णिमा २०२२ (3D Rangoli)

 #वटपौर्णिमा २०२२ 

वटपौर्णिमेनिमित्त खास घेवून येत आहे अगदी झटपट होणारी पण तितकीच सुंदर दिसणारी रांगोळी. पूजेसाठी झाडाची फांदी तोडून आणणे म्हणजे #निसर्गाची हानी करणे होय. घरा बाहेर न पडता .... निसर्गाचे कोणतेही नुकसान न करता #आनंदाने आणि #समाधानाने वट पूजा करता यावी म्हणून  #वडाची रांगोळी काढून त्याची मनोभावे पूजा करावी असा एक छान पर्याय  सुचला आहे.
त्याचं पार्श्वभूमीवर सगळ्यांना काढता येईल अशी अगदीच साधी सरळ सोपी पण तितकीच #आकर्षक वडाच्या झाडाची रांगोळी घेवून आली आहे. हा #व्हिडिओ बघून तुम्हीही रांगोळी नक्कीच काढू शकता हा विश्वास तुमच्यात निर्माण होईल. या व्हिडिओ मुळे एका स्त्रीने जरी  वडाच्या झाडाची फांदी तोडून न आणण्याचा निर्णय घेतला तर  हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश साध्य होणार आहे.
तेव्हा आपल्या जुन्या संस्कृतीचे जतन थोड्या वेगळ्या अंदाजाने करण्याचा प्रयत्न नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
Thank you for watching this video.
धन्यवाद
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे)

link for other videos, please do watch 👇👇👇👇

link 1:
https://youtu.be/nbgOLkemgIs

link 2:
https://youtu.be/zObZAruTHnk


खालील रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇

https://youtu.be/xEsHX63J1ZQ





वट पौर्णिमा (कथा व पोस्टर रांगोळी)

 #वट_पौर्णिमा

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

सुनील लहानपणापासून निसर्ग वेडा होता. निसर्गाविषयी त्याला प्रचंड आदर होता.  निसर्ग सानिध्याची ओढ त्याच्यात जन्मापासून होती. तो पोटात असतांना आई शेतात राबायची. जरा जीव दमला की ती बांधावरच्या झाडाच्या सावलीत विसावा घ्यायची.  परिस्थितीने, कष्टाने दमलेल्या तिला झाडाच्या सावलीत शांत, तृप्त वाटायचे.  सुनीलच्या जन्मानंतर त्याच झाडाच्या सावलीत तिने साडीचा झोका बांधला होता.  जाग आली की पानांची सळसळ ,  हळूच पानांमधून डोकावणारे आकाश, तर कधी सूर्याची कोवळी तिरीप बघण्यात सुनीलचा वेळ मस्त जाई. सोबतीला पक्षांची किलबिल कानावर पडत असे. त्याचे पहिले बोबडे बोल , त्याने टाकलेले पाहिले पाऊल,आईच्या दुधाव्यतिरिक्त त्याने अन्नाचा घेतलेला पहिला घास,  मातीत पहिल्यांदा गिरवलेली आद्याक्षरे, या सगळ्या क्षणांचे साक्षीदार शेताच्या बांधावरची झाडे होती. शाळेत जायला लागल्यावर शाळेतून घरी न जाता आईला सोबत करण्यासाठी शेतावर जात असे.  बांधाच्या झाडांखाली कधी गृहपाठ पूर्ण करत बसे ,कधी वाडाच्या पारंब्याचा झोका खेळत बसे, कधी कधी तर शाळेच्या ग्रंथालयातून आणलेल्या गोष्टीच्या पुस्तकाचा फडशा पाडत बसे. अनेकदा याच झाडांच्या सावलीत तो आईशी मनसोक्त गप्पाही मारत असे. आई देखील तिच्या बालपणीच्या आठवणी पासून ते त्याच्या बाल लीला पर्यंतचे अनेक किस्से अगदी रंगवून रंगवून सांगत असे. 

      याच गप्पा दरम्यान त्याला आईला बोचणारी गोष्ट तिच्याही नकळत समजली होती. त्याच्या आईचे एक स्वप्न होते की  तिच्या लग्नानंतर तीही तिच्या आईसारखी वट पौर्णिमेला नटूनथटून वडाला पुजायला जाईल.  परंतु लग्नानंतर जेव्हा ती वट पौर्णिमेच्या दिवशी छान तयार झाली तेव्हा आजी तिच्यावर चिडली होती.  आजोबांना नेमकी वट पौर्णिमेच्या दिवशीच मोठा अपघात झाला होता आणि त्यातच ते नंतर वारले होते. आजीचा संसार उघड्यावर पडला.  त्यांच्या माघारी चार मुलांची जबाबदारी तिच्या एकटीवर पडली. तिला लिहिता वाचता येत नव्हत. आजोबांची मिळकत फार नव्हती त्यामुळे साठवलेले पैसेही नव्हते. तिला मोलमजुरी करावी लागली.  तिच्या मुलांनाही ती चांगले शिक्षण देवू शिकली नाही. तिला तिच्या दोन्ही  मुलींची लग्ने तर त्यांच्या लहान वयातच करावी लागली. या सगळ्याचा राग तिने वट पौर्णिमेवर काढला. मोठी सून घरात आली तेव्हा तिने घरात सगळ्यांना खडसावून सांगितले की, " आपल्या घराला वट पौर्णिमा निषिद्ध आहे.  इथून पुढच्या  पिढीतील सुनांनाही  वट पौर्णिमा साजरी करता येणार नाही." आजीला विरोध करण्याची कोणाची हिम्मत नव्हती. कारण मुलांसाठी तीच घरातील कर्ती धरती होती. सगळ्यांनी तिचे म्हणणे निमुटपणे मान्य केले.

 मोठ्या जाऊकडून हे सगळे समजल्यावर सुनीलच्या आईचा हिरमोड झाला.  माहेरी  गरिबी, कष्ट तर पाचवीलाच पुजले होते परंतु सासरीही सौभाग्य लेणं मिरविण्याचा साधा सण आपल्या नशिबात नाही याची रुखरुख तेव्हापासून तिच्या जिवाला लागली होती.   

हे समजल्यावर सुनीलनेही आडून आडून आजीशी ,त्याच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता परंतू कोणीही त्याच्या बोलण्याला दाद दिली नाही.  शाळेत तर तो अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे घेत होता परंतू त्याच्या घरातील  तिढा त्याला सुटत नव्हता. 

        जेव्हा जे घडायचे असते तेव्हा ते घडतेच असे आजी नेहमीच म्हणायची परंतू  वाईट घटनांचा संबंध मात्र दिवस, वार, सण, वेळ  या सगळ्यांशी  जोडायची याची जाणीव त्याला प्रकर्षाने झाली.

वट पौर्णिमा निमित्त  शाळेत पर्यावरण पूरक असे अनेक कार्यक्रम घेतले जात. निसर्ग माणसाला निरंतर देत आलाय. त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून वड पूजन करत वट पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा निर्माण झाली आहे असे सांगण्यात येत असे. 

सगळ्यात जास्त प्राणवायू देणार्‍या झाडांमध्ये वडाच्या झाडाचा समावेश होत असून सुद्धा या दिवशी शहरी भागात वडाच्या झाडाची फांदी तोडून घरच्या घरी वड पूजा करण्याची नवी पद्धत रुजू पाहते आहे.  निसर्गाचे संवर्धन, संरक्षण व्हावे म्हणून साजरा केला जाणारा हा सण असून देखील त्याच दिवशी घाईच्या दिनक्रमाची सबब सांगत वेळ नसल्याचे कारण देत अत्यंत पूजनीय व उपयुक्त झाडाची फांदी तोडून आणतो. ही चुकीची प्रथा मोडून काढण्यासाठी शाळेतील शिक्षक या दिवशी "आईला झाडाची फांदी तोडून आणू देवू नका" असे मुलांना आवाहन करत. तसेच वट पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी गावातील वडाच्या झाडांखाली जमलेले निर्माल्य साफ करण्याची आणि झाडांना गुंडाळलेला दोर काढून टाकण्याची मोहीमही राबवत असत. 

           सुनील या सगळ्यात हिरीरीने भाग तर घेत होता परंतु आईला वट पौर्णिमा साजरी करता येत नाही याचे त्याला वाईटही वाटत असे. 

जस जसा तो मोठा होवू लागला तस तसा आजूबाजूला सतत होणारी निसर्गाची हानी तो उघड्या डोळ्यांनी बघू लागला. गावातील विहिरी आटू लागल्या. पाणी टंचाई तर रोजची बाब झाली.  पावसाचे प्रमाण कमी झाले .उन्हाळा मात्र चांगलाच कडक जाऊ लागला. शहरातील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती.  यंदा तर महाविद्यालयाने दर वर्षीच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईला लक्षात घेता वार्षिक परीक्षा लवकर उरकून घेतल्या. जेणे करून  वसतिगृहातील मुलां मुलींच्या रोजच्या पाणी वापरात कपात होवून पाणी टँकर वर होणारा खर्च ही टाळता येईल. सुनील सुट्टीला गावात आला तेव्हा ज्याच्या त्याच्या तोंडी 'उन्हाळा यंदा फारच कडक आहे ' हेच  ऐकु लागला.  मान्सूनचा महिना सुरू होवून आठवडा झाला तरी गरमी कमी होण्याचे नाव घेईना.  वट पौर्णिमा आठवड्यावर आली तसे त्याचे विचार चक्र जोरात फिरू लागले. 

     अखेर  वट पौर्णिमेचा दिवस उगवला.  तो घरातील सगळ्यांना गावच्या माळ रानावर घेवून गेला. त्याचे  सगळे मित्रही आपल्या आई , बहीण व आजीला घेवून आले होते. 

 तिथे त्याने व त्याच्या मित्रांनी झाडाची पन्नास रोपे आणि खड्डे तयार ठेवले होते. त्यातील वडाच्या झाडाचे एक रोप जमिनीत लावण्यासाठी त्याने आईच्या हाती दिले आणि म्हणाला, " आजीचा वडाची पूजा करायला विरोध आहे.  लागवड करायला नाही.  तसही सध्या फक्त वडाचे पूजन न करता वड लावण्याची गरज जास्त आहे. आई ग.... स्वतः नटूनथटून सण साजरे करणे ही आपली प्रथा असली तरी सध्या आपल्या या धरती मातेला हिरवा कंच शालू नेसविण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या दिवशी सौभाग्य लेणे मिरवण्यासोबतच आपल्या काळ्या आईला हरित लेणे बहाल करायला हवे. झाडाला झोके बांधुन खेळण्यासोबतच पुढच्या पिढीलाही हे सगळे खेळ खेळता यावे म्हणून झाडाची लागवड व त्यांचे संवर्धन करणे फार महत्त्वाचे आहे. " आईला हे बोलत असतांना त्याने हळूच आजीकडे इशारा केला. 

आजी वडाचे रोप एका खड्यात व्यवस्थित लावत होती.  

रोप लावून झाल्यावर आजी आपल्या दोन्ही सुनांना म्हणाली, " पोरानं माझे डोळे उघडले , इथून पुढे आपल्या घराण्यात आजच्या दिवशी सुनांच्या, लेकिंच्या हस्ते वृक्षारोपणाची प्रथा सुरू करुया "

आज सुनीलच्या घरच्यांना एक व्यापक दृष्टिकोन मिळाला तर माळ रानावर गावकर्‍यांनीही  खऱ्या अर्थाने वट पौर्णिमा साजरी केली .  मुलांच्या या कृतीने शिक्षकांचे मन ही अभिमानाने भरून गेले होते.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

टिप: या लेखाचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नसून  " झाडे लावा झाडे जगवा " हा संदेश देण्याचा आहे. तेव्हा चूक भूल माफ असावी.  लिखाण आवडल्या नावानिशी शेयर करायला काहीच हरकत नाही. 

अशाच सुंदर रांगोळ्यां शिकण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske  हे YouTube Channel सबस्क्राइब  करा. 

खालील रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇

https://youtu.be/15oBq7Tpul0



खालील रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇







स्पर्श, कन्यादान आणि मातृत्व (100 शब्दांची गोष्ट)

 'हात ' या शब्दावर आधारित लिहिलेल्या या तीन कथा तुम्हाला आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा. 


#स्पर्श

#100शब्दांचीकथा 

मुलांनी हाताला धरून घराबाहेर काढलेल्या बहिणीला शामरावांनी स्वतःच्या घरी आणले.  तारुण्यात सासुरवास सहन करणारी ती वडिलांच्या धाकामूळे कधी हक्काने माहेरी आली नाही. या वयात मुलांचा जाचही मुकाट्याने सहन करत होती. 

आज मात्र  शामरावांनी अंगणातील एक खोली खास तिच्यासाठी तयार करून घेतली. बहिणीच्या थरथरत्या हाताला धरत त्यांनी तिला त्या खोलीत नेले," आज पासून ही खोली फक्त तुझी आहे ताई. कोणीही तुला ईथून बाहेर काढणार नाही अगदी माझ्या माघारी देखील " असे त्यांनी सांगताच बहिणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच आपला हात आपल्या भावाच्या हातावर ठेवला. आज त्या स्पर्शात अगतिकता नसून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात का होईना हक्काचे माहेर मिळाल्याचे समाधान होते. 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

*********************************************

#कन्यादान

#100शब्दांचीकथा

कन्यादानाच्या वेळी मेहंदीने रंगलेला रियाचा नाजूक हात  राहुलच्या हातात देतांना तिच्या आई बाबांना गहिवरून आले. राहुलने  रियासोबतच तिच्या आई बाबांचा हातही प्रेमाने धरला व बोलला, " या विधीने तुम्हाला तुमची मुलगी परकी होणार नाही,तिला तिचे माहेर दुरावणार नाही तर  मी व माझे कुटुंब तुमच्या परिवाराशी कायमचे जोडले जाणार आहोत. दोन्ही कुटुंबांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन व माझ्या या प्रवासात मला रियाची मोलाची साथ लाभावी म्हणुन आपण हा विधी करतोय " त्याचे असे समजुतदार बोलणे ऐकून रियाच्या आई बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर 

राहुलच्या आईबाबांनीही अलगद त्या चौघांचे हात आपल्या हाताच्या ओंजळीत घेतले.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

**********************************************

#मातृत्व 

#100शब्दांचीकथा

उपेक्षित जिणे जगतांना पूजाच्या सगळ्याच भावना जणू मेल्या होत्या. नेहमी प्रमाणेच ती यांत्रिकपणे टाळ्या वाजवत, पुरुषी हातांचे किळसवाणे स्पर्श टाळत रेल्वे स्टेशनवर फिरत होती. भूक लागली म्हणुन घेतलेल्या ताटलीतील समोसा खाण्यासाठी हात उचलला तसा तिच्या हाताला चिमुकल्या हातांचा स्पर्श जाणवला. "थोड्या वेळात परत येतो" सांगून गेलेल्या बापाची सकाळपासून वाट बघणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातील अगतिक भूकेने पूजाच्या   कठोर काळजालाही मायेचा पाझर फोडला. पोलिसात तक्रार देवूनही चिमुरडीचे आई वडील न मिळाल्याने पूजाने चिमुरडीला दत्तक घेतले. निसर्गाने स्त्रीत्व बहाल केले नसले तरी चिमुरडीचा हात कायद्याने हातात घेवून पूजाने मात्र मातृत्वाला कायमचे कवटाळले. पूजाच्या टाळ्यांनाही आता चिमुरडीच्या उज्ज्वल भविष्याचा ध्यास लागला.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)


कथे सोबत हाताची Rangoli post करते आहे 



ठिपक्यांची गालिचा रांगोळी

  #ठिपक्यांची_गालिचा_रांगोळी 

रांगोळीचा फोटो बघून विश्वास बसणार नाही की ही ठिपक्यांची रांगोळी आहे. ठिपक्यांची रांगोळी गालिचा सारखी आकर्षक दिसेल जेव्हा तुम्ही ती रांगोळी व्हिडिओ मध्ये दाखविल्या प्रमाणे काढाल. संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇👇👇👇

https://youtu.be/oEKkKv5U9zs

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



शुभ चिन्हे असलेले रांगोळी

 #शुभ_चिन्हे_असलेले_रांगोळी 

अतिशय सोप्या पद्धतीने शुभ चिन्हे असलेली ही रांगोळी झटपट रेखलेली आहे. 

संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇👇👇👇https://youtu.be/uHNbxMEM_oU


व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)