कामिनी (भाग १०)

#कामिनी
#भाग१०
©️ अंजली मीनानाथ धस्के

    श्रेया घरी आली नाही म्हणून सगळीकडे तिची शोधाशोध सुरू झाली. बाबांनी ऑफिसच्या लोकांना फोन करून विचारल्यावर कळलं की ऑफिस मधून तर ती लवकर गेली होती.  पण  घरी मात्र पोहचली नव्हती. आई बाबांना काका काकूंना तिची फारच चिंता सतावू लागली. गाव नवीन.... कोणाला मदतीला बोलवायचं म्हटलं तरी इथले लोक नवीन. श्रेयाच्या आईचा धीर सुटला  त्यांच्याकडे बघून श्रेयाच्या बाबांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. तिथे तक्रार नोंदवून झाली पण त्यांचं समाधान झालं नाही.
श्रेया भेटली की एकमेकांना आणि घरी  फोन करून कळवायचे ठरवून काका आणि श्रेयाचे बाबा तिला शोधण्यासाठी बाहेर पडले.  अचानक बिघडलेले वातावरण. त्यात रिमझिम पडणाऱ्या पावसाने जोर धरायला सुरवात केली. श्रेयाच्या काळजीने बाबांचा जीव घाबरा घुबरा झाला. इतक्यात त्यांना मागून कोणीतरी आवाज दिला," इतक्या पावसात कुठे निघालात?". त्यांनी मागे वळून पाहिले पिंपळाच्या झाडाखाली एक वृद्ध त्याच्या लेकीला घेवून बसलेले त्यांना दिसले. त्यांनी सांगितलं ," माझ्या मुलीला शोधायला निघालो आहे " झाडा खालच्या वृद्धाने आपल्या लेकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत श्रेयाच्या बाबांना सांगितलं," या बाजूने जा सरळ ... जुन्या बस थांब्यापाशी  मिळेल तुम्हाला तुमची लेक ".
       श्रेयाच्या काळजीने कसलाच विचार न करता त्यांनी सरळ पुढे चालायला सुरुवात केली.  जुन्या बस थांब्यापाशी त्यांना ती बेशुद्ध पडलेली दिसली. त्यांनी श्रेयाच्या आईला फोन करून श्रेया मिळाल्याच कळवल . थोड्याच वेळात त्यांनी काही लोकांच्या मदतीने तिला गावातल्या दवाखान्यात दाखल केलं.  काकूंना अजूनही खूप थकवा जाणवत होता म्हणून काका आणि काकू घरीच थांबले श्रेयाची आई एकट्यानेच दवाखान्यात गेली.
          श्रेया शुद्धीत आली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास काकाही दवाखान्यात येवुन श्रेयाला बघून गेले. श्रेयाच्या आई बाबांचा तर डोळ्याला डोळा लागला नव्हता. पहाटे पहाटे पावसाचा जोर जरा कमी झाला. थोड्याच वेळात पाऊस पूर्णपणे थांबला. तिला भेटायला तिच्या ऑफिसचे काही जण आणि पोलिसही  दवाखान्यात आले.
उन्हाची किरणं खिडकीतून श्रेयाच्या चेहऱ्यावर पडली तशी तिला शुद्ध आली.
     तिला शुद्धीत आल्यावर सगळ्यांना आनंद झाला. तिला मात्र आश्चर्य वाटलं की ,ती दवाखान्यात कशी पोहचली ? तिने सगळ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं. सगळ्यांनी तिला शांत केलं. बाबांनी तिला सांगितलं की काल रात्री  ती त्यांना जुन्या बस थांब्याजवळ बेशुद्ध पडलेली सापडली.

           श्रेयाला एकदम सदाशिव खरात यांची आठवण झाली. तिने त्यांच्याबद्दल सगळ्यांना सांगितलं. कामिनीची पेटी परत देण्यासाठी म्हणून त्यांना सोबत घेवून  ती घाईतच ऑफिसच्या बाहेर पडली होती. पेटी फाटकातच दिसल्याने ती बाहेरच्या बाहेरचं जुन्या बस थांब्याकडे गेली. तिथे तिला पेटीत ती स्प्रिंगची बाहुली दिसली आणि मग ती बेशुद्ध पडली. असं ती पोलिसांना सांगत असतांनाच ऑफिस मधल्या लोकांना हे ऐकुन नवल वाटलं कारण ऑफिस मधून बाहेर पडतांना तिच्या सोबत कोणीच नव्हतं. ती स्वत:शीच बडबडत बाहेर पडली होती? त्यांनी लगेच पोलिसांना तसे  सांगितले . ते ऐकुन पोलीस बुचकळ्यात पडले तर श्रेया खात्रीने सांगू लागली. सदाशिव खरात यांना श्रेयाने तिकीट लावून पाठवायला सांगितलेली कामिनीची चिठ्ठी मिळाली होती म्हणून ते  तीला भेटायला ऑफिसमधे आले होते.
           ऑफिसच्या स्टाफ पैकी एकाने परत तिचे बोलणे चुकीचे आहे असे सांगितले, कारण तिने तिकीट लावून पाठवलेली चिठ्ठी त्या पत्यावर सध्या कोणीच रहात नसल्याने कालच परत आली होती.
          ती विचार करून थकली . ताण जाणवून परत बेशुद्ध पडली.  पोलिस तिला शोधण्यासाठी केलेली तक्रार ती सापडली म्हणून बंद करण्यासाठी तिला भेटायला आले होते. मात्र इथली सगळी हकीकत ऐकल्यावर हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही याची जाणीव होवून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं त्यांनी ठरवलं.

क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1





No comments:

Post a Comment