रनर-अप (भाग ४)

 #रनरअप
©️ अंजली मीनानाथ धस्के

 #भाग४

   टॉमी बागेतल्या झाडांना तोंडात पाण्याचा पाईप धरून पाणी घालू लागला की त्या कामाचा आनंद रोहनच्या चेहऱ्यावर दिसू लागायचा. थकून घरी आलेल्या गार्गीला टॉमी
 बागेतल लाल गुलाबाचे फूल तोडून  आणून द्यायचा तेव्हा रोहन आपली किती वाट बघतो याची तिला जाणीव व्हायची.
 स्वयंपाक घरातही टॉमी रोहनसारखाच गार्गीसोबत लुडबुड करायचा. गर्गीच स्वतःच चेतपेशींवरच संशोधनही सुरूच होत.
   तिचा प्रयोग यशस्वी झाला तरच रोहन पूर्वीसारखा होण्याची शक्यता होती. तिच्यासाठी टॉमीचा मेंदू नियंत्रित करण्याचा रोहनचा हा प्रयोग तिला तिच्या संशोधनाला यशस्वी करण्यासाठी जो  वेळ लागत होता तो मिळवून देणारा   फक्त एक पर्याय  होता.
     
      गार्गीही घर, रोहन आणि संशोधन अशी तारेवरची कसरत करत होती.  घर कामात मदत व्हावी म्हणून तिने  कामाला एक मावशीही ठेवल्या . दिवसामागून दिवस जात होते.
रोहनला टॉमी च्या मदतीने व्यक्त होता येत होत म्हणून त्याचे दिवस जरा बरे जात होते.  आता  गार्गीचे संशोधन यशस्वी होण्याची तोही मनापासून वाट बघू लागला होता.
रोहन टॉमी कडून अनेक काम लीलया करून घेवू लागला.
      काम करणाऱ्या मावशींना अनेकदा टॉमी बद्दल नवल वाटायचं ती त्याबद्दल गार्गीला अनेक प्रश्न विचारायची पण तिला खरं काय ते सांगणं धोक्याच असल्याने गार्गी वर वर काहीतरी सांगून तिची समजूत काढायची.
            एक दिवस गार्गी नेहमीप्रमाणे आंघोळ करून बाहेर आली होती. तिने रोहनच्या आवडीची साडी घातलेली होती.  रोहन तिच्याकडे डोळे भरून बघत होता. गार्गी आरशात बघून तयार होत होती . बेसावध असताना अचानक टॉमी तिच्या मागे येवुन उभा राहिला आणि तिच्या पाठीला चाटू लागला.
तिच्या अंगाशी लगट करू लागला.
त्या क्षणी तिला लक्षातही आलं नाही की टॉमी जे काही करतो ते रोहनच्या आदेशावरून. रोहनच्या मनातल्या भावना टॉमीच्या कृतीत असतात. टॉमीच्या त्या वागण्याची तिला किळस आली तिने पटकन त्याला स्वतः पासून दूर ढकलल. इकडे रोहन हिरमुसला. तिच्या लक्षात आल्यावर तिने रोहन ला समजावलं की तिच्यासाठी हे असं सगळं स्वीकारणं कठीण आहे. तिच्यासाठी टॉमी रोहनला पर्याय कधीच होवु शकत नाही. तो फक्त रोहनला व्यक्त होण्याचं तात्पुरतं साधन आहे.
 ती तिच्या संशोधनात एक ना एक दिवस यशस्वी होणार आणि रोहनला त्याच्या मूळ रूपात आणणार . तेव्हा त्याला त्याच्या या भावना व्यक्त करण्यासाठी  टॉमीच्या मदतीची गरज लागणार नाही. असं आश्वासन तिने त्याला दिलं.
तेवढ्यापुरता रोहन शांत झाला. पण आजकाल हा प्रकार वाढायला लागला. गार्गीच रोहनवर प्रेम होत पण त्याच्या भावना टॉमीच्या माध्यमातून स्वीकारणं तिला मंजूर नव्हतं.
         गार्गीने रोहनला खूप समजावलं पण काही गोष्टी त्याच्या नियंत्रणाबाहेर जात होत्या. एकदा का डोक्यात विचार आला की त्या विचारांना घालवणं त्याला कठीण जात होतं.
क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
सोबतीला कथेला साजेशी रांगोळी ही आहेच
#AnjaliMinanathDhaske
इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com उपलब्ध आहे.
टिपः
लिखाण आवडल्यास शेअर करताना नावासहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_91.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_19.html?m=1

भाग ५: शेवटचा भाग

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_16.html?m=1





No comments:

Post a Comment