कामिनी (भाग ३)

#कामिनी
#भाग३
©️अंजली मीनानाथ धस्के
    त्या पसाऱ्यात एक कुलूप बंद पेटी होती . तिला अनेक ठिकाणी पोचे आले होते. पण हे पोचे बाहेरून बसलेल्या माराने आलेले नव्हते तर आतून कोणीतरी सर्व शक्तिनिशी मारल्यावर जसे फुगवटे येतील तसे ते दिसत होते. काकुही तिच्या मागोमाग त्या खोलीत आल्या.  त्या पेटीकडे आश्चर्याने बघत ओरडल्याच ," काल परवाच  मी माझ्या हाताने ही पेटी उचलून ठेवली होती . तेव्हा तर एकदम चांगली होती. ही खाली कशी पडली आणि खराब कशी झाली ?"
श्रेयाने उत्सुकतेपोटी विचारलं ," कोणाची आहे ही पेटी ?"
काकू सांगू लागल्या ," तुमच्या आधी इथे कामिनी ताई होत्या रहायला. या पेटीत त्याच त्यांचं  काही सामान भरून ठेवायच्या. त्या  अचानक इथून गेल्या. त्याचं सगळं सामान तर त्यांच्या वडिलांनी नेले आहे. घाईत असल्याने पेटी तेव्हा त्यांना दिसली नसेल. विसरून  इथेच राहिली . तुम्ही येणार म्हणून  घराची  आवराआवर करतांना शिडी  घेण्यासाठी काका माळावर चढले तेव्हा तिथे ही पेटी ठेवलेली दिसली.
     या पेटीला कुलूप आहे. घरात चावीही सापडली नाही.  तुमचं सामान येणार आहे म्हंटल्यावर मीच ही पेटी इथे आणून या कपाटावर उचलून ठेवली होती. कामिनी ताई आल्या कधी तर त्यांना देता येईल ना.... ही  पेटी खाली पडली त्याचाच रात्री आवाज झाला होता रात्री  म्हणूनच कोणी दिसलं नाही आपल्याला."
     तिच्या वरच्या पोच्यानी ती पेटी खराब झाली होती तरी
  श्रेया त्या पेटी कडे ओढल्या गेली. काही कळायच्या आत तिने जवळच्या लोखंडी दांडूने पेटीवरच कुलूप तोडल.
आत काही पुस्तकं, काही भेट वस्तू , भेट कार्ड आणि काही पत्र होती. पेटीच्या एका कोपऱ्यात एक छोटी स्प्रिंग ची बाहुली होती. बाहुलीच्या पायात छोटे छोटे घुंगरू बांधलेले होते.
        खूपच नाजूक , सुंदर अशी ती बाहुली होती. श्रेयाने ती बाहुली उचलून घेतली तस काकू बोलून गेल्या ," कामिनी ताईंना ही बाहुली खूप आवडायची . ही कायम दिवाणखान्यातल्या  टेबलावर ठेवलेली असायची. जाता येता त्या हिला टिचकी मारून डुलायला लावायच्या . त्यांना कथक नृत्य आवडायचं म्हणून हिलाही त्यांनी तसेच कपडे घातले . पायात पैजण घातले. हिला नटवायची भारी हौस होती त्यांना . त्या अचानक निघून गेल्या त्या दिवसापासून ही बाहुली दिसली नाही . मला वाटलं की त्यांनी सोबत नेली त्यांच्या पण ही तर या पेटीत कुलूप बंद होती. ठेवून द्या तिला परत . ही इथे कुलूप बंद आहे म्हणजे त्या नक्की येतील हे सामान घ्यायला."
         श्रेयाही त्या बाहुलीच्या प्रेमात पडली होती. पण दुसऱ्याची वस्तू त्याच्या माघारी घ्यायला तिचं मन धाजावल नाही.  ती बाहुली परत ठेवून पेटी बंद करून जिथे होती तिथे ठेवून त्या दोघीही खोलीचं दार लावून घेत खाली आल्या.
      श्रेया रोजच्या कामाला लागली. तयार होवून ऑफिसलाही गेली.
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1





No comments:

Post a Comment