कामिनी (भाग १२)

#कामिनी
#भाग१२
 ©️अंजली मीनानाथ धस्के

          तो फोन नंबर सचिन काशिनाथ खडसे युवकाच्या नावावर होता. याच सचिन खडसे चा काही दिवसापूर्वी खून झाला होता. त्याच्या खूनाच गूढ अजून कायमच होते.
आता मात्र पोलिसांना शंका यायला लागली की  प्रेम प्रकरणातून तर त्याच्या खून झाला नव्हता. कोणताच पुरावा परिपूर्ण नव्हता.  शोध कार्यात  धागे दोरे मिळत होते पण कशाचा कशाशी पट्कन संबंध लागत नव्हता.
         श्रेयाच्या बदलीचा अर्ज मंजूर झाला होता. श्रेयाची बदली तिच्या मुळ गावी करण्यात आली होती.    ती आई बाबांना घेवून तिच्या स्वत:च्या गावी... घरी जाणार होती.
         ती जायला निघाली त्याच दिवशी त्यांच्या बंगल्यावर  पोलीस आले. त्यांनी गुलाबाच्या वाफ्यात खोदून बघण्याचा निर्णय घेतला होता. तिथे अजून काही पुरावे मिळतील अशी त्यांना आशा होती.
            एकीकडे श्रेयाच सामान ट्रक मधे चढविल्या जात होते तर दुसरीकडे पोलिसांनी वाफ्याच खोदकाम वेगाने सुरू केलं होत. आता काही अमंगल बघण्याची वेळ आपल्या मुलीवर येवू नये म्हणून श्रेयाच्या आई वडिलांनी तिथून निघण्याची घाई सुरू केली. श्रेयाची नाजूक तब्येत आणि मानसिकता बघता तिच्या माघारी हे सगळं होण अपेक्षित होतं.
         आज सकाळ पासूनच काका काकूं त्यांच्या खोली बाहेर पडले नाही.  काय होणार आहे याची कल्पना त्यांना आली असावी. त्यांच्या डोळ्यात दुःख दाटून आलं होतं. ते दुःख श्रेयाच्या जाण्याच आहे असंच श्रेयाला  वाटलं. त्यांना समजावण्यासाठी ती बोलली ," लवकरच पुन्हा भेटू आपण ". त्यांचा निरोप घेतला.
 जो काही शोध लागेल तो कळवण्याचे पोलिसांनी श्रेयाच्या वडीलांना कबूल केले . श्रेयाच्या वडिलांनी घाईतच  सगळ्यांचा निरोप घेतला.
              श्रेया जावून फार वेळ झाला नाही. पोलिसांना त्या वाफ्यात  एका स्त्रीचे मृत शरीर सापडले. चेहरा ओळखू येत नव्हता. त्या शवाच्या कपड्यावरून काका काकूंनी ओळखले की हे मृत शरीर कामिनीचे आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
            पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी शेजारच्या काही लोकांना बोलावलं. तेव्हा ते मृत शरीर कामिनीच असल्याची खात्री पटली. सापडलेल्या सगळ्या वस्तूही कमिनीच्याच होत्या. तिथे जमलेल्या अनेकांनी सांगितलं की कमिनीचे वागणे सगळ्यांशी चांगले होते.  तिच्याकडे कायम एक तरुण तिला भेटायला यायचा. तो आला की परत जातांना कायम नाक्यावरच्या ए.टी.एम मधून कामिनी त्याला पैसे काढून द्यायची.
           शव विच्छेदन करतांना त्यांना पुढील बाबी कळाल्या.
मरण्यापूर्वी झालेल्या झटापटीत मृत स्त्री व्यक्तीच्या मुठीत  काही  केस अडकलेले होते.
मृत व्यक्ती गर्भवती होती .
 गळा दाबून तिला मारण्यात आले होते.
 कुदळीचे घाव घालून चेहरा विद्रूप करण्यात आला होता. पोटातला  गर्भ मृत असूनही खराब अजूनपर्यंत खराब झाला नव्हता.
           तपास कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला काही शंका आल्या . खात्री करून घेण्यासाठी त्यांनी मृत शरीराच्या मुठीत सापडलेले केस सचिन खडसेंच्या केसांशी जुळतात का ते बघितले.
केस हुबेहूब जुळत होते. मृत गर्भाची डी एन ए चाचणी घेतली तीही सचिन खडसे शी जुळली.
       कामिनीला कोड असल्याने सचिन खडसेला
 तिच्यासोबत लग्न करायचे नव्हतेच. तिच्या पगारावर फक्त मजा मारायची होती. ती गर्भवती राहिली आणि लग्नासाठी मागेच लागली. काका काकू नसतांना तो भेटायला आला . क तेव्हा कामिनी दिवाणखान्यातील छोट्या टेबलजवळ  बसून डायरीत नोंद करत होती.
 तो लग्नाला नकार देतो आहे म्हंटल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. म्हणून त्याने तिचा खून केला. बंगल्याच्या मागच्या बाजूला एक वाफा रिकामा होता . त्याने तिथेच मोठा खड्डा करून तिला पुरलं. तिच्यासोबत तिची डायरीही पुरली. कोणी त्या वाफ्यावर खोद काम करू नये म्हणून त्यावर काकांनी आणून ठेवलेली गुलाबाची रोपं ही लावून टाकली.
इथपर्यंत  पोलिस अधिकाऱ्याने बरोबर अंदाज बांधला .

            गुलाबाची रोप लावल्यानंतर पुढे तो घरात आला तर टेबल वर कामिनीने तिच्या वडिलांना लिहिलेलं पत्र , त्याने दिलेल्या काही भेट वस्तू त्याला दिसल्या. जवळच एक पेटी होती. त्यात त्याने सगळं समान भरल . घाई घाईत टेबलावर असलेली स्प्रिंग ची बाहुलीही त्याने पेटीत टाकली. तिथेच ठेवलेले कुलूप लावले. चावी स्वतःच्या खिशात टाकली. पेटी सोबत नेणं शक्य नसल्याने ती घरतल्या माळावर मागे सरकुन ठेवून दिली.
या सगळ्याची  पोलिसांना काहीच कल्पना नव्हती .  कामिनी मात्र या सगळ्याची साक्षी होती.

क्रमशः
 ©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे.
साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1





    

No comments:

Post a Comment