कामिनी (भाग ९)

#कामिनी
#भाग९
©️ अंजली मीनानाथ धस्के

    त्यांनी ती बाहुली घरात आणली. श्रेयाच्या आईला दाखवली. ती बाहुली चिखलाने माखलेली होती. बाहुलीची ती अवस्था बघून त्यांना ती बाहुली अजिबात आवडली नाही त्या रागातच म्हणाल्या ," शी घाण कशाला आणली उचलून . आधी फेका तिला बाहेर" . श्रेयाचे वडिलांनी मात्र ती बाहुली फेकून न देता मागच्या अंगणातील नळावर  नेवून तिला धुवून स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं. जसं जसं तीच्यावरची माती वाहून जावू लागली तिचं सुंदर रूप दृष्टीस पडू लागलं. त्यांनी स्वच्छ केलेली ती बाहुली नेमकी काकूंच्या नजरेस पडली. श्रेयाच्या पायाखाली येवुन तुटलेली, कचऱ्यात फेकून दिलेली बाहुली पुन्हा नव्यासारखी सुंदर झालेली बघून त्यांची दात खीळीच बसली .
     काकांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. श्रेयाच्या वडीलांना काहीच कळायला मार्ग नव्हता. या बाहुलीला बघून ही दोघं एवढी का घाबरली. संध्याकाळ व्हायला थोडाच वेळ राहिला होता .   काकांनी मनाशीच काहीतरी विचार केला आणि ते मागच्या लोखंडी जिन्याने वर गेले. वरच्या खोलीत ठेवलेली कामिनीची पेटी घेवून आले. श्रेयाच्या वडिलांकडून ती स्प्रिंग ची बाहुली ते नको नको म्हणत असताना काढून घेतली आणि
"नसती ब्याद नकोच घरात म्हणत" ती बाहुली त्या पेटीत ठेवली. त्यांनी ती पेटी उचलून फटकाबाहेरच्या कचरा पेटीत टाकायला नेली. इतक्यात काकूंची तब्येत अधिकच बिघडली. श्रेयाच्या वडिलांनी श्रेयाच्या आईला मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली. त्या हाका ऐकुन काकांनी ती पेटी फाटकाजवळच ठेवली आणि काकूंकडे धाव घेतली.
     काकूंच्या तोंडावर पाण्याचे हबके मारले. श्रेयाची आई काकुंसाठी लिंबू सरबत बनवून घेवून आली. ते पील्यावर काकूंना जरा बरं वाटलं. काकांना पेटीची आठवण झाली. त्यांना ती पेटी संध्याकाळच्या आत दूर फेकून यायचं होतं. ते फाटकाजवळ गेले तिथे ती पेटी नव्हती. कुठल्या तरी भुरट्या चोराने ती उचलून नेली असावी असं वाटून ते माघारी परतले.
त्यांना एकट्याने येतांना बघून श्रेयाच्या आईने विचारले, " श्रेया आली ना ... मला तिच्या गाडीचा आवाज आला " काकांनी नकारार्थी मान हलवली तसे श्रेयाचे बाबा म्हणाले ," आज सगळंच विचित्र घडतंय.... एकाएक वातावरण काय बिघडलं आहे ...   बहुलीला बघून काकू काय  घाबरल्या.... तुला श्रेया आल्याचा भास काय झाला "
काका समजुतीच्या सुरात म्हणाले," इथून पुढे हा बाहुलीचा विषय बंद करा.... त्यातच आपलं हीत आहे".


     एकाएक वातावरण बिघडल्याने   घाईत घरी आलेल्या श्रेयाला फाटकातच कामिनीची पेटी ठेवलेली दिसली. तिला वाटलं वेळ वाया जायला नको म्हणून काका काकूंनी फाटकातच   पेटी आणून ठेवली. तिने मागचा पुढचा विचार न करता ती पेटी उचलून घेतली आणि जुन्या बस थांब्याकडे तिची टू व्हीलर वळवली.
   तिने पेटी सदाशिव खरात यांच्याकडे सुपूर्त केली. काळोख पडायला सूरवात झाली. तरी  त्यांनी पेटी उघडली. ते त्यातली एक एक वस्तू निरखून बघू लागले. त्यातील कामिनी आणि त्यांच्या एकत्रित  फोटोवर मायेने हात फिरवू लागले. मनाशीच पुटपुटले," पोरी तुझ्या भेटीसाठी जीव अडकला आहे बघ" असं म्हणत असतांनाच त्यांची नजर पेटीतल्या स्प्रिंगच्या बाहुलीवर पडली. त्यांनी बाहुली उचलून घेतली तशी  गार हवेची झुळूक आली. श्रेया डोळे फाडून त्या बहुलीकडे बघत राहिली. ती पूर्वीसारखीच सुंदर दिसत होती. सदाशिव खरात यांनी ती बाहुली उचलून हृदयाशी धरली. त्यांच्या डोळ्यात लेकीच्या भेटीचा आनंद दिसत होता. वीज कडाडली ... त्या प्रकाशात सदाशिव खरात यांनी जणू कामिनीलाच हृदयाशी धरले आहे असा भास श्रेयाला झाला.
          रिमझिम सुरू झाली. बाहुलीच्या डोळ्यातही बापाची भेट झाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. ते दृश्य बघून श्रेयाच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. तुटलेली बाहुली पुन्हा पूर्वीसारखी कशी झाली? फेकून दिल्यावर ती या पेटीत कशी आली? काका काकूंना कसलीच कल्पना दिली नसतांना त्यांनी पेटी फाटकाजवळ कशी आणून ठेवली? तिच्या डोक्यावर ताण वाढत गेला आणि श्रेया चक्कर येऊन खाली पडली.

क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1





No comments:

Post a Comment