रनर-अप (भाग २)


#रनरअप
  ©️ अंजली मीनानाथ धस्के
 #भाग२

     आता डोळ्यांची हालचाल करत तो  गार्गीशी बोलू शकत होता. हे छोटंसं यश गार्गीला आशावादी ठेवायला पुरेस होत.
संपूर्ण शरीराची हालचाल पूर्ववत होण्यासाठी चेता पेशींचे प्रत्यारोपण करणेच फायद्याचे ठरणार होते. त्या अनुषंगाने ती संशोधन करत होती. पण ठोस असं काहीच हाती लागत नव्हतं.
  आता रोहन अधिकच निराश झाला . असच वर्ष दीड वर्ष निघून गेलं होत. शरीरात अजून कसलीच सुधारणा दिसत नव्हती.  उलट सतत झोपून असल्याने आतल्या अवयवांची कार्यक्षमता ही कमी होवू लागली होती.
प्राण्याच्या शरीरातील
 एकाच वेळी  सगळ्या मृत चेता पेशींचे प्रत्यारोपण शक्य आणि यशस्वी झाले तरच गार्गी ला हवा असलेला बदल घडून येणार होता. वारंवार  चेता पेशी बदलण्याचे प्रयत्न केले तर प्राण्याच्या मेंदुलाही धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. गार्गीच्या प्रयत्नांना मर्यादा येत होत्या. तरी ती हार मानायला तयार नव्हती. तिला हे संशोधन यशस्वी व्हायलाच हवे होते. तिला
तिचा रोहन पूर्वी सारखाच महत्त्वाकांक्षी हवा होता. आताचा दीन रोहन तिच्या मनाला टोचणी देत होता. त्याच्या डोळ्यातली वेदना तिच्या काळजाचा ठाव घेत होती.
      एक दिवस ती विचारांच्या तंद्रीत असतांना रोहन तिला डोळ्यांनी काही सांगू पाहतोय असं तिला वाटलं. रोहन डोळ्यांनी शेजारच्या कपाटाकडे ईशारा करत होता. तिने कपाट उघडून अनेक वस्तू त्याला दाखवल्या पण त्याच समाधान होत नव्हतं.
           कपाटातील छोटा ड्रॉव्हर उघडून तिने एक छोटी कंपास पेटी सारखी पेटी बाहेर काढली. तसे रोहनचे डोळे चमकले. तिने ती पेटी उघडून बघितली त्यात दोन छोट्या छोट्या चीप होत्या. एक छोटं सर्किट होत. या सगळ्यांच्या खाली एका कागदावर यांची जोडणी कशी करायची हे लिहून ठेवलेलं होतं.
  यातील दोन चीप दोन वेगवेगळ्या  मेंदूत बसवण्यासाठी होत्या तर छोट सर्किट हे संगणकात बसवण्यासाठी होत . छोट सर्किट वापरून इंटरनेटच्या सहाय्याने एक मेंदू दुसऱ्या मेंदूला  करत त्याला हवे ते काम करून घेवू शकत होता.
    जे जे विचार नियंत्रित करणाऱ्या मेंदूत येतील ते सगळे विचार  दुसऱ्या मेंदूला जसेच्या तसे जात होते. गरज पडल्यास संगणकाद्वारे ही दुसरा मेंदू नियंत्रणात करता यावा म्हणून रोहनने यात एक अधिकची संगणकीय प्रणाली तयार केली होती. ही प्रणाली नियंत्रित करणाऱ्या मेंदू कडून निघालेल्या सूचना दुसऱ्या मेंदूकडे जाण्यापूर्वी त्या सगळ्या सूचनांची नोंद संगणकातील रोहनच्या मेल अकाउंटला मेल रूपाने देणार होती. काही कारणाने नियंत्रित करणाऱ्या  मेंदूची सूचना  दुसऱ्या मेंदू पर्यंत नीट पोहचत नसेल तेव्हा या मेल मधली सूचनेत रोहनला आवश्यक ते बदल करता यावे आणि हे केलेले बदल   दुसऱ्या मेंदूला पोहचवता यावे. यासाठी रोहनने ही अधिकची संगणकीय प्रणाली विकसित केली होती.


      आधी रोहनच्या मनात नेमक काय सुरू आहे हे गार्गीच्या लक्षात आले नाही पण जेव्हा तिला रोहनच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली तेव्हा तिला त्याच्या खाणाखूणांचा अर्थ कळला.
     ती पुरती हादरून गेली. त्याचं हे संशोधन पूर्ण झालेलं नव्हतं. या संशोधनाची चाचणी ही घेण्यात आली नव्हती.
  तरी त्याला या संशोधनाचा वापर स्वतःवर करायचा होता. तिला ही कल्पनाच जीवघेणी वाटली. तिने स्पष्ट नकार नमूद करत . त्याच मन वळवण्याचा प्रयत्न केला. महिनाभर ती त्याच मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. तो माघार घ्यायला तयार नव्हता. त्याने खाणंपिणं सोडलं. तो तिला कसलेच सहकार्य करत नव्हता. त्याच्या डोळ्यातून अश्रू फक्त ओघळत होते. त्याची घालमेल तिला कळत होती पण तो जे म्हणत होता ते करणही तिला कठीण होत. त्याचं समाधान व्हाव म्हणून तिने  त्याच्या संशोधनाबद्दल सगळी माहिती मिळवायला सुरवात केली. त्याच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली.
क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
सोबतीला कथेला साजेशी रांगोळी ही आहेच
#AnjaliMinanathDhaske
इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com उपलब्ध आहे.
टिपः
लिखाण आवडल्यास शेअर करताना नावासहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_19.html?m=1

भाग ४:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_48.html?m=1

भाग ५: शेवटचा भाग

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_16.html?m=1




No comments:

Post a Comment