#होळी
निमित्त अत्यंत आकर्षक रंगसंगतीत काढलेली ही रांगोळी पाहताक्षणीच आपल्याला मोहात पाडणारी आहे .
संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇
या रांगोळीचे वैशिष्ट्य असे आहे की ही रांगोळी कोणत्याही सणाला शोभून दिसणारी आहे . तुम्ही ज्या सणानिमित्त ही रांगोळी काढता त्या सणाचे नाव मध्यभागी गोलात लिहिल्यास ही रांगोळी त्या त्या सणाची शोभा वाढवणारी ठरते. गोलात काहीच न लिहिता तुम्ही छोटी दिव्याची थाली त्यात ठेवल्यासही चालते. दिवाळीला तर हमखास दिवे ठेवल्या रांगोळी अधिक खुलून दिसते. होळी हा रंगाचा सण मानला जातो म्हणुन या रांगोळीत सगळेच रंग वापरलेले आहेत.
मोर, मोठी फुले आणि दिवा यांच्या सोबतीला मधला चौकोन आणि त्या आतील गोल या रचनेमुळे ही रांगोळी कोणत्याही सणाला चालते.
व्हिडीओ आवडल्यास जरूर कळवा
©️Anjali Minanath Dhaske
No comments:
Post a Comment