#नवरात्र विशेष #सुविचार
नऊ दिवस..... नऊ देवी..... नऊ रंग यांच्या सोबतीला प्रत्येक देवीच्या अंगी असलेल्या दोन गुणांवर आधारित आधुनिक सुविचार.
नक्की वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा.
Thank you
@Anali Minanath Dhaske
शैलपुत्री: स्थीर
स्त्रीचे चित्त स्थीर असल्यास संसारातील
आव्हाने सहज पेलता येतात.
शैलपुत्री: निग्रही
दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यास स्त्रीने निग्रही असणे गरजेचे आहे.
ब्रम्हचारिणी: निडर
आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्त्रीने निडर होवून काम करावे.
ब्रम्हचारिणी: सामर्थ्यशाली
सामर्थ्यशाली स्त्रियाच इतिहास घडवत त्यांच्या आयुष्याचा प्रवास अजरामर करतात.
च्रंदघंटा: सजगता
समाजात वावरतांना सजगता बाळगल्यास अनेक वाईट प्रसंग टाळता येतात.
च्रंदघंटा: खंबीरपणा
कोमल हृदयाची स्त्री कठीण प्रसंगी कुटुंबासाठी
खंबीरपणे उभी राहते.
कुष्मांण्डा : निर्मिती
कला, कल्पना, जीव निर्मिती क्षमता
स्त्री अंगी जन्मजात असते
कुष्मांण्डा : अस्तित्व
'स्त्री अस्तित्वाचा सन्मान करणारे मन'
ख-या पुरूषाची ओळख होय.
स्कंदमाता : निरागसता
बालपणीची 'निरागसता' कायम जपल्यास
मनुष्यप्राणी ख-या अर्थाने 'माणूस' होईल.
स्कंदमाता: करूणा
परदुःख पाहून करुणा जागृत होणार्या हृदयात साक्षात देवी वसते.
कात्यायनी: मातृत्व
केवळ गर्भधारणेतून नव्हे तर
'वात्सल्य' भावनेतून खरे 'मातृत्व' साकारते.
कात्यायनी: संगोपन
संगोपनाला 'संस्काराची' जोड दिल्यास बालमनाचा योग्य विकास साधता येईल.
कालरात्री : वेळ
वेळीच वेळेचे महत्त्व ओळखल्यास
माणसावर वाईट वेळ येत नाही.
कालरात्री : कार्यक्षमता
चांगल्या सवई, शिस्त, नियम यांच्या पालनाने कार्यक्षमता वाढीस लागते.
महागौरी: विद्वत्ता
पेहेराव क्षणभर 'नजरा', तर
विद्वता 'बुद्धीला' कायम आकर्षित करते
महागौरी: ज्ञान
पैसा, गाडी, बंगाला देण्यापेक्षा
मुलांना 'वारसा' म्हणुन 'ज्ञान' द्यावे.
No comments:
Post a Comment