मी, तू आणि बरेच काही*
मखमली रात्र मी
तू सुगंधी पहाट आहे
अंधाराचा शालू नक्षत्रांनी सजला माझा
तुझ्या धुक्याच्या शेल्यावरही दवबिंदूची नक्षी आहे
चंद्राची टिकली जरी भाळी माझ्या
तुझ्या केशरी रंगात सौभाग्य आहे
कधी लपतो हुंकार वेदनेचा माझ्यात
तुझ्यात किलबिल कायम आहे
थकलेले जीव आश्रयाला माझ्या
तुझ्यामुळे सृष्टीत उत्साह आहे
गाठ शालूची माझ्या
तुझ्या शेल्याला बांधली आहे
सात दिवसांची सप्तपदी मी
तुझ्यासोबत चालत आहे
परस्पर विरोधी भासतो जरी आपण
संसार सुखाचा करतो आहे
म्हणुनच
माझ्या गर्भात तुझा अंश रोज नव्याने वाढतो आहे
©️ Anjali Minanath Dhaske
No comments:
Post a Comment