जिज्ञासू_प्राणी

 

#जिज्ञासू_प्राणी
#Curious_Animal
©️ अंजली मीनानाथ धस्के
        कसल्यातरी गहन विचारात बाळराजे गढून गेलेले पाहून मी त्यांच्या आजूबाजूला उगाच लुडबुड सुरू केली. बाळराजेंची तंद्री भंगली तसा त्यांचा प्रश्न आला," मम्मी जगातला सगळ्यात जिज्ञासू ( curious) प्राणी  कोणता? सांग बरं?"
मी ही लगेच  सध्या कामात नसलेल्या .... किंबहुना कामातून गेलेल्या माझ्या मेंदूवर ताण देत आठवतील तेवढ्या सगळ्या प्राण्यांची नावे घेतली.
      मला उत्तर येत नाही त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनातल्या उत्तराशी माझे उत्तर जुळत नाही म्हंटल्यावर  बाळराजेंची कळी खुलली आणि ते आगदी खुशीत येवुन बोलले ," तू सांगितलेली सगळी उत्तरे चुकीची आहेत. खरं उत्तर आहे कोल्हा (wolf🐺)"
मी आश्चर्याने चकित होऊन बघता त्यांनी स्वतःहून स्पष्टीकरण ही दिले ," wolf च जिज्ञासू प्राणी आहे कारण तो सतत .... *Hoooow*
( कोल्हे कुई च्या सुरात ) ओरडत असतो."
बाळराजेंनी दिलेले स्पष्टीकरण कितपत योग्य आहे याची पडताळणी करून पाहण्यासाठी मी ही *Hoooow* असे दोन तीन वेळा कोल्हे कुईच्या तालात म्हणून बघितले. माझ्या या प्रयोगानंतर बाळराजेंचे उत्तर योग्य की अयोग्य याचा निर्णय झालाच नाही उलट बराच वेळ शांत असलेले आमचे घर अचानक आमच्या  "कूई" ने आणि त्यानंतरच्या हास्याने दुमदुमले .
थोडा वेडेपणा भी जरुरी होता हैं रे बाबा .... बोअरिंग नेस को भागाने का शास्त्र असतं ते.....😂😂😝😝😝
©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.



No comments:

Post a Comment