चीनूने दिली बाबांना शिकवण

#१००शब्दांचीगोष्ट
' मी असते तर ' या विषयावर लिहिलेली ही गोष्ट

#चीनूने_दिली_बाबांना_शिकवण

सोफ्यावर पाय पसरून बातम्या बघण्यात गुंग असलेल्या राहुलला दारावरची बेल वाजली तेव्हा उठून दरवाजा उघडण्याचा कंटाळा आला . पण पर्याय नव्हता आताच अवघडलेली सुरभी सोनोग्राफी करता दवाखान्यात गेली होती .
वैतागूनच त्याने दरवाजा उघडला . शाळेतून आलेली  छोटी  चिनू धावत घरात शिरली.  आईला शोधत असलेली तिची नजर बाबावर खिळली .
आई कुठे आहे ?
दवाखान्यात गेली .
शी .. मी घरी असायला हव होत.
काय झालं ?
मी असते तर तिच्या सोबत गेले असते . पोटातलं बाळ खूप त्रास देतंन .  माझी मदत झाली असती.
राहुलचा चेहराच पडला
 चल  जावू दवाखान्यात .
म्हणत सुरभिकडे जावून त्याने त्याची चूक सुधारली

  • ©️ अंजली मीनानाथ धस्के


No comments:

Post a Comment