बोल लावण्याआधी समजून घेणे गरजेचे


'चूक ' या विषयावर लिहिलेली ही गोष्ट ..... तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा....
#१००शब्दांचीगोष्ट
#बोल_लावण्याआधी_समजून_घेणे_गरजेचे
                  दोन वर्षाचा आदित्य आईसोबत  लपंडाव खेळतांना पायरीवरून  पडला. डोक्याला जबर मार  लागला . रक्त येवू लागलं . त्याचं रडणं ऐकुन घरातले पाहुणे धावत आले. स्वतःच्या मुलालाही ही नीट सांभाळत नाही ... कधी शिकणार हे सगळ असं वाटून सगळ्यांना अनघाचाच राग आला . त्यांच्या डोळ्यातला हा राग पाहून अनघाला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले . लक्ष्मीबाई मात्र शांत होत्या .  सगळ्यांना जायला सांगून तिला हळद ... कापूस आणून दिले .
पाहुण्यांनी,'  सुनेला खडसावण्याची चांगली  संधी का सोडली ' अशी तक्रार केली तेव्हा त्या संयमी आवाजात म्हणाल्या , "चूक जरी तिची होती तरी लेकरूही तिचंच होत.   बोलून... तिला दुसऱ्यांदा जखमी करायचं नव्हतं "
©️ अंजली मीनानाथ धस्के
इथे ही रांगोळी का घेतली असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच... ही कथा जे सांगू पाहते आहे ते म्हणजे ......
* आपल्या लेकराला लागलंय म्हंटल्यावर इतर कोणापेक्षाही त्याचे दुःख आईलाच अधिक असते.
* प्रत्येक नात जर आपण लहान लेकरा प्रमाणे सांभाळलं तर अर्थातच नात अधिक घट्ट बनेल .
*या कथेतील सासूही चुकांना महत्व न देता  .... नात्यांना जपणारी ... समजून घेणारी आहे . या रांगोलीतल्या हाताप्रमाणे......
त्यामुळे ही रांगोळी अनेक अर्थाने या कथेला साजेशी वाटते म्हणून हिची निवड केली आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के

No comments:

Post a Comment