विजयादशमी निमित्त (२०१५ )

दसरा या सणाला अनेक ऐतिहासिक गोष्टींची पार्श्वभूमी आहे. या दिवशी आपट्याच्या पानांना  आणि झेंडूच्या फुलांना  विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोन्यासारखा मान असतो . " सोनं घ्या , सोन्यासारखं रहा " असे म्हणून लहानांनी मोठ्यांना  आपट्याची पाने देण्याची पध्दत आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावून सुशोभित करतात. पहाटेच्या मंगलमय वेळी दाराला झेंडूच्या फुलांचे लावलेले तोरण आणि आपट्याच्या पानाची केलेली पुजा दस-याच्या सणाची जाणीव मनाला देवून प्रसन्न करतात. सर्व वाचकांना दस-याच्या खुप खुप शुभेच्छा .(२०१५ )

 

No comments:

Post a Comment