आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त

विठू  माउलींची  मुर्ती  बघितली  की, "पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ।। अवघा होय पांडुरंग। राहे धरूनियां अंग ।।"  या  संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओव्यांची आठवण झाल्या खेरीज रहात नाही. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त  आकुर्डीतील पालखीच्या मुक्कामाचे औचित्य साधून काढलेली विठोबाची ही रांगोळी विठू माउलींच्या चरणी सादर अर्पण.


No comments:

Post a Comment