शिव जयंती ( २०१८ ) निमित्त काढलेली रांगोळी

 शिव जयंती ( २०१८ ) निमित्त काढलेली रांगोळी :
               शिवाजी महाराजांचा जन्म १९/२/१६३० ला झाला असला तरी त्यांच्या विचारांची गरज आजही आहेच. ते जीजाऊंसाठी शिवबा, बाळ संभाजींसाठी आबा साहेब, प्रजेसाठी जाणता राजा, मोघलांसाठी शिवा तर इतिहास कारांसाठी युग पुरुष आहेत.
              अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना,फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. त्यांच्या  ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल.
      पण दुर्दैव ' शिवाजी जन्मावा ते शेजारच्या घरी ' असं आपण म्हणतो. शिव राज्यातले फायदे हवेत पण त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या यातना नकोत. "भगवा " आपला तर मानतो पण महाराजांना अपेक्षित असलेले राज्य निर्माण करता येत नाही. मी इतिहासाची अभ्यासक नाही.....तरी मला वाटतं भगवा म्हणजे एकी....... भगवा म्हणजे सुखी प्रजा.... भगवा म्हणजे स्त्रियांचा आदर..... भगवा म्हणजे सगळे समान......भगवा म्हणजे विरक्ती...... भगवा म्हणजे रयतेचे हित आधी मग राजाचे...... भगवा म्हणजे राज्य विकासाचा ध्यास..... भगवा म्हणजे अन्यायाची चीड.....
            आज आपण फक्त रंगात गुरफटलो आहे. महाराजांचे विचार मात्र विसरत चाललो आहे. आज याच विचारांची आठवण ठेवून....... मना मनात शिव ज्योत लावू या....... ही रांगोळी शिव चरणी अर्पण.......
जय भवानी... जय शिवाजी.... 
 ©️ अंजली मीनानाथ धस्के 
      पुणे, चिंचवड ३३



2 comments: