फादर्स डे निमित्त ( १९ \ ०६ \ २०१६ )

फादर्स डे निमित्त ( १९ \ ०६ \ २०१६ ) :

डैडी ते बाबा , पप्पा  आणि आबा आश्या  अनेक नावाने ज्यांना आपण संबोधतो ते म्हणजे आपले वडील. आपल्याला  ठेच लागल्यावर आपल्या तोंडून " आई ग .... " च निघतं  परंतु  जेव्हा एखादं मोठ्ठ संकट येतं तेव्हा आपण " अरे बाप रे ....... " असच म्हणतो  .  मोठ्ठ्या संकटांशी सामना करायचा असतो तेव्हा आपल्याला  बाबाच  हवे  असतात . स्पर्धेत जिंकल्यावर देवा समोर पेढा ठेवणारी आई आठवते आपल्याला पण गुपचुप मिठाईच्या दुकानात जाणारे बाबा  आठवत नाहीत. चुकल्यावर रागवणारे , प्रसंगी मारणारे  बाबा चटकन आठवतात  पण तेच बाबा  आपल्याला  हॉस्टेल वर सोडतांना कुशीत घेवून डोळे ओले करतात हे  मात्र आठवत  नाही. नेहमीच  कर्तव्य पूर्ण करणार-या  बाबांना , प्रेम मात्र   व्यक्त  करता येत नाही. नारळ जसे बाहेरून कठीण असते, तसेच आपले बाबा ही आपल्याला कड़क शिस्तीचे वाटत असले तरी ते मनाने फार हळवे असतात.  बाबांच  आपल्या  आयुष्यात खुप महत्व आहे , जसं जेवणातलं  मीठ डोळ्यांना दिसत नाही पण ते उत्तम स्वादासाठी असावं मात्र लागतं.    फादर्स डे निमित्त माझ्या व सर्व वाचक  वडिलांना खूप खूप  शुभेच्छा.

(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


No comments:

Post a Comment