#कामिनी
#भाग७
©️अंजली मीनानाथ धस्के
रात्री तिच्या सोबतीला काकू थांबल्या. कामिनीच्या डोक्यात विचार सुरूच होता.... कोणालाही न सांगता एकाएक कामिनी बंगल्यातून निघून का गेली ? तिच्या जाण्याचं गूढ आपल्यासाठी कायमच आहे इतक्यात तिच्या आवडीच्या या बहुलीच गूढ निर्माण झालं आहे. या विचारातच काकूंना शांत झोपलेलं बघून त्यांच्या आधार वाटून तीही झोपी गेली.
काका बंगल्याबाहेर फटकापाशी बसून विचारात मग्न झाले होते. इतक्यात त्यांच्या कानावर खड खड खड खड असा आवाज गेला. आवाजाच्या दिशेने त्यांनी टॉर्चचा उजेड टाकला . कचऱ्याची मोठी टोपली जोरजोरात हलत होती. मांजर नाहीतर कुत्रा असेल म्हणून काका कचऱ्याच्या टोपलीजवळ गेले . तिच्यावर गच्च झाकण बसवलेलं होतं. काकांनी जोर लावून झाकण उघडलं तशी आतून एका काळ्या मांजराने त्याच्या अंगावर उडी मारली. काका घाबरून मागे पडले.
थोड्या वेळाने काका कपडे झटकत उठले आणि गालातल्या गालात हसत बोलले ," श्या .... एका काळ्या मांजरीला घाबरलो आपण "
खाण्याच्या शोधत मांजर कचऱ्याच्या टोपलीत पडली असावी, असा समज करून घेत ते फाटकाकडे परत गेले.
नेहमीप्रमाणेच सकाळ झाल्यावर सगळ्यांची कामाची घाई सुरू झाली. श्रेयाही जरा लवकरच आवरून कामावर जायला तयार झाली. नाष्टा संपवता संपवता पेपर चाळत असताना तिचं लक्ष एका बातमीने वेधून घेतले.
शेजारच्या गावात काही महिन्या पूर्वीच रहायला आलेल्या कुटुंबातील एका युवकाचा भयानक आणि गूढ पद्धतीने खून करण्यात आला होता. त्या तरुणाचे लग्न पंधरा दिवसांवर आले होते. नेमकी घरातले इतर सदस्य लग्नाच्याच कामानिमित्त बाहेरगावी गेले असतांनाच हा दुर्दैवी प्रकार घडला होता.
तो गाढ झोपेत असतांना कुदळीचे घाव घालत त्याचा खून करण्यात आला होता. चेहऱ्यावरही इतके घाव घातले होते की चेहरा विद्रूप झालेला होता. आश्चर्याची बाब म्हणजे त्या तरुणाच्या रक्ताच्या थारोळ्यात खूपच छोटे छोटे घुंगरू सापडले. हे घुंगरू नेमके कशाचे आहेत? याचा शोध घेणे सुरू आहे. लग्न घर असल्याने घरात पैसा , दागिने , भारी कपडे सगळंच सामान भरपूर असूनही एकही वस्तू चोरीला गेलेली नव्हती. त्यामुळे खून कोणी ? कसा ? आणि का केला हे प्रश्न अनुत्तरितच होते. गावातील काही लोकांची जमीन त्या तरुणाने बळकावली होती. त्या वादातून हे घडले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. नेमके काय झाले असावे या बद्दल तक्र वितर्क सुरू आहे पण सत्य काय आहे याचा अंदाज करणे अद्याप तरी शक्य झाले नाही.
या बातमीने तिच्या मनातले विचार मागे पडले. पैशासाठी माणूस राक्षसा सारखे कृत्य करायला मागे पुढे पहात नाही. ऐन लग्नाच्या पंधरा दिवस आधी कोणासोबत इतकं वाईट कसं घडू शकतं. असे वाटून तिचं मन अधिकच खिन्न झाल.
या विचारां पासून दूर जाण्यासाठी कामावर लवकर जाणे हा एकच उपाय आहे असे वाटून ती पट्कन कार्यालयाकडे रवाना झाली.
कचऱ्याची गाडी आली. काकांनी नेहमीप्रमाणे त्या गाडीत कचऱ्याची मोठी टोपली रिकामी करण्यासाठी उचलली. त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं पण नेमकं काय ते काही कळलं नाही.
मागून काकू ओल्या कचऱ्याची टोपली घेऊन आल्या. त्यांनी ओला कचरा कचऱ्याच्या गाडीत टाकला.
काकांना विचारात बघून काकूंनी विचारलं ," कसला विचार करताय." काका म्हणाले ," काही नाही ग..... काल खाण्याच्या शोधात एक काळं मांजर या मोठ्या टोपलीत अडकडल होत. त्याचे डोळे फार वेगळे आणि ओळखीचे वाटले. आता कचरा टाकतांना तेच डोळे आठवले अचानक . कोणासारखे डोळे होते ते.. हेच आठवण्याचा प्रयत्न करत होतो".
काकू सहज बोलून गेल्या," काहीही नवलच असतं तुमचं, म्हणे मांजरीचे डोळे ओळखीचे वाटले. काहीही .... कालच संध्याकाळी मी सगळे तुकडे गोळा करून या मोठ्या टोपलीत टाकले होते. तेव्हा पक्क झाकण बसवलं होतं. झाकण काढून मांजर त्यात पडली असं म्हणायचं आहे का तुम्हाला ? "
काकूंच्या बोलण्याकडे काकांचं लक्षच नव्हतं त्यांना मघाशी कचऱ्याची टोपली उचलताना काहीतरी वेगळं जाणवलं होत. आता काकूंच्या बोलण्यावरून त्यांना आठवलं की त्या टोपलीत बाहुलीचा एकही तुकडा नव्हता. रात्री श्रेया खूप घाबरली होती. ते आठवून काकांनी काकूलाही त्या टोपलीत सकाळी बाहुलीचा एकही तुकडा नव्हता याबद्दल काहीच सांगितलं नाही.
काकूंना ते फक्त इतकंच म्हणाले, "श्रेया घरापासून इतक्या दूर एकटीच रहाते. काल रात्री तिची अवस्था आठवते का? इथून पुढे बाहुलीचा विषय चुकूनही तिच्या पुढे काढायचा नाही.... समजली का? "
अचानक काकांनी विषय बदलेला बघून काकूंनी ही समजल्यासारखी मान डोलावली आणि रोजच्या कामाला लागल्या.
आईबाबांची आठवण आल्याने सकाळी सकाळीच ऑफिस मधूनच श्रेयाने घरी फोन लावला. आई वडीलांना काळजी नको म्हणून बहुलीबद्दल, तिच्या स्वप्ना बद्दल काहीच बोलली नाही फक्त खूप एकटं एकटं वाटतं आहे एवढंच सांगितलं. आई वडीलांना बोलून तिने फोन ठेवला आणि कामाला लागली.
मनात कोणतेच विचार येवू नये म्हणून घरी आल्यावरही तिने स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी श्रेयाचे आईबाबा दारात हजर. श्रेयाला त्यांना पाहून सुखद धक्का बसला. आईबाबाच ते..... न सांगताही तिची काळजी त्यांच्या पर्यंत पोहचली. तिच्या नवीन घराला भेट देण्याचं निमित्त करत ते काही दिवस तिच्या कडे रहायला आले होते.
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.
सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1
भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1
भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1
भाग ४:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1
भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1
भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1
भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1
भाग ८:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1
भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1
भाग १०:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1
भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1
भाग १२:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1
भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1
भाग १४: अंतिम भाग
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

No comments:
Post a Comment