Showing posts with label मोर. Show all posts
Showing posts with label मोर. Show all posts

होळी 2023

#होळी 

निमित्त अत्यंत आकर्षक रंगसंगतीत काढलेली ही रांगोळी पाहताक्षणीच आपल्याला मोहात पाडणारी आहे .

संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇 

 https://youtu.be/d70zoNnoo4E

या रांगोळीचे वैशिष्ट्य असे आहे की ही रांगोळी कोणत्याही सणाला शोभून दिसणारी आहे . तुम्ही ज्या सणानिमित्त ही रांगोळी काढता  त्या सणाचे नाव मध्यभागी गोलात लिहिल्यास ही रांगोळी त्या त्या सणाची शोभा वाढवणारी ठरते.  गोलात काहीच न लिहिता तुम्ही छोटी दिव्याची थाली त्यात ठेवल्यासही  चालते.  दिवाळीला तर हमखास दिवे ठेवल्या रांगोळी अधिक खुलून दिसते. होळी हा रंगाचा सण मानला जातो म्हणुन या रांगोळीत सगळेच रंग वापरलेले आहेत. 

मोर, मोठी फुले आणि दिवा यांच्या सोबतीला मधला चौकोन आणि त्या आतील गोल या रचनेमुळे ही रांगोळी कोणत्याही सणाला चालते. 

व्हिडीओ आवडल्यास जरूर कळवा 

©️Anjali Minanath Dhaske 






संकष्टी चतुर्थी निमित्ताने रांगोळी

 #संकष्टी_चतुर्थी

#गणपतीबाप्पा 

चतुर्थी निमित्ताने किंवा इतर कोणत्याही शुभ निमित्ताने तुम्ही काढू शकता अशी आकर्षक गणपतीबाप्पाची रांगोळी ईथे पोस्ट करते आहे. संपूर्ण व्हिडीयो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇 

 https://youtu.be/io7XPJIsyJo

©️ Anjali Minanath Dhaske 








मोराची आकर्षक रांगोळी


 #flowerrangoli

मोराची आकर्षक रांगोळी 

ही रांगोळी सोप्या पद्धतीने काढली आहे . तरीही ती फार आकर्षक दिसते आहे.  कशी काढली हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ईतर सोप्या सुंदर रांगोळ्या पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube चॅनल Subscribe करायला  विसरू नका. 

©️Anjali Minanath Dhaske ( Elgire)

https://youtu.be/OpJj235TTVc  👇👇👇👇





मोराचे डिझाइन (दिवाळी २०१८)


मोराचे डिझाइन आणि दिवाळीचा पहिला दिवा
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.........

मोराचे डिझाइन

दिवाळीसाठी दारात काढायचा साधी सोपी मोराची रांगोळी :

मोर......  काळ कीतीही पुढे गेला तरी स्त्री मनाला मोर... मोरपीस यांची पडलेली भुरळ काही कमी होत नाही. स्त्रीला अगदी साडीच्या पद्रावर ही मोर हवाच असतो. तिला आनंद झाला की मन ही मोर बनून नाचू लागते. ती प्रेम करते तेही मोर पिसासारखं हळुवार सुखावणारं..... तिच्या मनातल्या भावनाही विविधरंगी अगदी मोर पिसासारख्याच . जसे  मोरपीसात एकाच रंगाच्या  अनेक छटा असतात.....तसे एका स्त्रीची अनेक रूपे असतात आणि प्रत्येक रूप तितकच लोभसवाणं.
मोरपीसाकडे बघीतल्यावर डोळ्यांना सौंदर्य  दिसते तर मनाला ऐश्वर्याचा भास होतो म्हणूनच  मनाने सुंदर आणि ऐश्वर्यसंपन्न  असणाऱ्या स्त्री व्यक्तीमत्वाला मोर आणि मोरपीस यांचे वेड कायम आहे. अशाच वेडावलेल्या क्षणी मी  काढलेल्या मोराच्या काही रांगोळ्या इथे पोस्ट करते आहे.

anjali-rangoli.blogspot.com




रक्षाबंधन (२०१७)

 सगळ्या वाचकांना रक्षाबंधनच्या खूप  खूप शुभेच्छा.  


मोराचे डिझाइन

मोराचे डिझाइन :


रक्षाबंधन (२०१६)

 सगळ्या वाचकांना रक्षाबंधनच्या खूप  खूप शुभेच्छा.   

धनत्रयोदशी निमित्त काढलेली मोराची रांगोळी

धनत्रयोदशी निमित्त काढलेली मोराची ही  रांगोळी तुम्ही कोणत्याही सणाला काढू शकता.

 

मोराचे डिझाइन

या मोराच्या रांगोळीत रंग भरल्यास हीच रांगोळी अधिक सुंदर दिसेल.

 
 

मोराचे डिझाईन्स

रोज काढायचे साधे ,सरल मोराचे डिझाइन्स .
 
 
 
 
 

जागा कमी असल्यास काढ़ावयाचे मोराचे डिझाईन

 जागा कमी असल्यास पिसारा फुलवलेला मोर न काढता, पावसाच्या प्रतिक्षेत असलेला मोर तुम्ही नक्कीच कद्दू शकता.  दिमाखात पिसारा मिरवणारा हा मोर मनाला मोहित केल्याशिवाय रहात नाही.    

 

जागा आणि वेळ कमी असल्यास

विरोधी रंगसंगती वापरून काढलेला मोरही  घरी येणाऱ्यांचे लक्ष वेधतो. यात वापरलेल्या निळ्या रंगांच्या छटा मनाला आनंद देतात. तुमच्या आवडीच्या रंगाच्या छटा यात वापरून बघा . तयार होणारी रांगोळी तुमच्या मनाला प्रसन्नता देईल . 



जागा कमी असल्यास

मोर आणि मोराचे पिस यांचे सौंदर्य आजही मानवी मनाला  मोहित करते. रांगोळीत मोराचे  पिस काढल्यास नेहमीचे डिझाइन ही लक्षवेधी बनते . मोराचे  पिस असते तसे काढले किंवा  त्यात  तुम्हाला  हवे  असलेले  रंग ,त्याच्या  छटा वापरूनही  काढले तरी रांगोळी खुलते. जागा आणि वेळ  कमी असेल तेव्हा मोराचे पिस  काढून ही तुम्ही तुमची रांगोळी आकर्षक बनवू शकता.                                                                         

 
 
 

मोराचे डिझाईन्स

मोराचे डिझाईन  काढतांना ते काढण्यासाठी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या जागेचा आकर लक्षात घेऊनच आपण मोर कसा कढावा हे ठरवु शकतो . अंगणात मोर काढायचा असल्यास आपण त्याचा पूर्ण खुललेला  पिसारा काढू शकतो .  जागा कमी असल्यास पूर्ण पिसारा काढणे शक्य होत नाही तेव्हा  मेहंदी  मधे  काढतो  तसा मोर काढल्यासही  रांगोळी उठुन  दिसते . मोर न काढता  फक्त  त्याचे  एक  पिस  काढूनही  रांगोळीची  परिणाम कारकता  वाढवता  येते.