कामिनी (भाग ४)

#कामिनी
#भाग४
©️अंजली मीनानाथ धस्के
     दिवसभरात ती त्या बाहुलीला विसरूनही गेली.
नवीन जागा , नवीन कार्यालय, कामाचा व्याप हे समजून घेण्यातच तिचे काही दिवस गेले. त्यात तिला डिपार्टमेंटल परिक्षेचा अभ्यास करायचा होता तेही राहून गेलं.
‌ आज तिला जरा  निवांत वेळ मिळाला होता.
 संध्याकाळी काकू स्वयंपाक करत गप्पा मारत होत्या . श्रेयाही  दिवाणखान्यातल्या जेवणाच्या टेबला जवळ बसून त्यांच्या गप्पा ऐकत  कॉफी पीत निवांत बसली होती.
 बोलता बोलता त्या सहज बोलून गेल्या ," ताई तुम्ही बसल्या आहात न तिथे शेजारीच ते कपाट आहे ना छोट त्यावरच  ती स्प्रिंगची बाहुली कायम ठेवलेली असायची. दारातून हलकीच हवा आली तरी ती मस्त डूलायची" त्यांनी तस बोलतच दिवाणखान्यात हवेची झुळूक आली आणि श्रेयाच्या अंगावर काटा आला. ती काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्याकडे बघून काकूंनी विचारलं ,"
  आज रात्रीही मी येवू का सोबतीला " त्यावर श्रेया  नेहमीप्रमाणे बोलली ," नाही .... राहीन मी एकटी. गरज वाटली तर बोलावून घेईन "
           सगळं आवरून काकू खोलीकडे जायला निघाल्या . श्रेयाची काळजी वाटून त्या दारातच थबकल्या . वळून श्रेयाकडे पाहिलं तर ती टीव्ही वरचा कार्यक्रम बघण्यात गुंग होती. गरज लागलीच तर ती फोन करेल असं वाटून त्या तिला," उद्या सकाळी येते ग " सांगून निघून गेल्या.
          टीव्ही वरचा कार्यक्रम संपला . तिने जेवण ही केलं. जेवल्यावर जरा पाय मोकळे करावे म्हणून ती समोरच्या अंगणात फिरायला गेली. श्रेयाला बाहेरची  दाट झाडी दिवसा बघायला छान वाटायची पण रात्री हिच झाडं अंधारात भीतीदायक वाटू लागली. ती माघारी फिरणार इतक्यात  बंगल्याच्या फटकाजवळ काका बसलेले तिला दिसले . तिला धीर वाटला. ती त्यांच्या जवळ चालत गेली." काही हवंय का?" म्हणून काकांनी तिची चौकशी केली. "इतक्या उशिरापर्यंत तुम्ही फटकाजवळ का बसले आहात" असं श्रेया ने त्यांना विचारलं तेव्हा ते बोलले , " मी रोज रात्री इथेच बसून असतो . अधून मधून बंगल्याभोवती चक्कर ही मारतो. हा बंगला मध्यवस्तीत असला तरी बंगल्या भोवतीच्या दाट झाडीने जरा एकटा पडल्यासारखा आहे. मालक रहात होते तेव्हापासून चोरांची भीती नको म्हणून मी फटकाजवळ बसून रात्र पाळी करतो आहे. आता तर इतकी सवय झाली आहे या कामाची की खोलीत झोपायला गेलो तरी झोप येत नाही. रात्रीचा मी जागीच असतो म्हणून इतक्या वर्षात इकडे चोर कधी फिरकले नाही." बोलता बोलता ते सहज बोलून गेले," काकूंनी सांगितलं मला अडगळीच्या खोलीत पेटी खाली पडली म्हणून काल तुम्हाला आवाज आला होता. उंदीर, नाहीतर मांजर खुड बुड करत असतील म्हणून खाली पडली असेल ती पेटी . आज त्या खोलीत छोटा लाईट लावून आलोय . उजेड बघून उंदीर किंवा मांजर नाही येणार . तुम्ही बीनघोर झोपा".
      त्यांनी वरच्या अडगळीच्या खोलीत छोटा लाईट लावला हे ऐकुन श्रेयाच लक्ष वरच्या खोलीकडे गेलं. फटकापाशी उभं राहीलं की वरची खोली स्पष्ट दिसत होती. त्या खोलीला छोटी काचेची खिडकी होती. तिच्यातून मंद प्रकाश बाहेर पडलेला श्रेयाला दिसला. तिच्या डोळ्याची पापणी लवते न लवते तिथल्या छोट्या लाईटाचा उजेड दिसेनासा झाला. श्रेयाने  काकांना तसं सांगितलं . त्यांनीही बघितलं तर तिथे अंधार होता. "आता तर थोड्या वेळापूर्वी  लाईट सुरू होता आता अंधार कसा झाला?" म्हणून त्यांनाही आश्चर्य वाटलं. जुनी वायरिंग असल्याने लूज कनेक्शन झालं असावं असं वाटून ते त्या खोलीकडे कडे जायला निघाले.
     काकांचं वय बघता श्रेयानी  त्यांना रात्रीच्या अंधारात त्या खोलीकडे जाण्यापासून रोखले," इतक्या अंधारात कशाला जाताय.  तसंही तिथे अंधार असला तरी आपलं काही अडत नाही. उद्या एका चांगल्या इलेक्ट्रिशियनला बोलावून ते काम करून घ्या. आता राहू द्या "
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1





No comments:

Post a Comment