Showing posts with label गुढीपाडवा. Show all posts
Showing posts with label गुढीपाडवा. Show all posts

गुढी पाडवा २०२५

 #गुढीपाडवा 

नवं वर्ष.... नवी सुरवात

धरून नवं विचारांची कास

चला उभारू आपल्या मनात

आज स्वयं प्रेरणेची गुढी खास

प्रवास आपला सत्याच्या शोधात 

मनाला आध्यात्मिक सुखाची आस 

सुख, समृद्धी आरोग्यात नको कपात 

तुमच्या आयुष्यात,

वृद्धिंगत होत राहो यांची रास 

गुढी पाडव्याच्या मनस्वी शुभेच्छा 🌹 

नूतन वर्षाभिनंदन 💐 

ही रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 







गुढी पाडवा २०२४

 #गुढी पाडवा २०२४

आपल्या मनात एक तरी अशी खिडकी असावी जिथे प्रत्येक भावना व्यक्त करता यावी. सुख- दुःख, राग - लोभ, इर्षा , मत्सर, प्रेरणा, दया, सगळया पासून विरक्तही होता यावे. अन्  या विरक्तीचाही उत्सव वाटावा.  मोकळे पणाने जगण्यासाठी अशी एक खिडकी हवीच. 

आजच्या रांगोळीतही  खिडकीत गुढी उभारलेली आहे. या खिडकीत फुलझाडांच्या कुंड्याही आहेत. बाहेरचा रंग जरा उडाल्या सारखा वाटत असला तरी आतल्या बाजूने मात्र प्रसन्न वातावरण असल्याची खात्री देणारा रंग आहे. खिडकी म्हंटली की पडदा ही आलाच पण आज त्याला बाजूला सारले आहे. 

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धी व आनंदाचे जावो हिच सदिच्छा.

रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/tzaOA9aIoAs?si=c_khJF-0OJdUAueX

चैत्रांगण... ही एक रांगोळी नसून आपली संस्कृती आहे.

 कसे काढावे? बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/Fug5nWsVy9g?si=AESFct1eXLH4-12e






छोट्या रांगोळ्या (भाग ११)

 #छोट्या_रांगोळ्या

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 


©️Anjali Minanath Dhaske 


गुढीपाडवा रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/O8PKH4GDqCo?feature=share


हनुमान जयंती निमित्त रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/dh69pYiX0KM?feature=share


मोराची रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/e8OiAzg1fqQ?feature=share


कुयरी आकार असलेली रांगोळी link 👇🏻

https://youtube.com/shorts/2k2KdFIc5es?feature=share


नाजूक नक्षी link 👇🏻

https://youtube.com/shorts/P7qc_C7kTKM?feature=share



गुढीपाडवा 2023

 #गुढीपाडवा 2023 निमित्ताने ही सुंदर रांगोळी काढलेली आहे. 

रांगोळी आवडल्यास ही रांगोळी कशी काढली आहे हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

https://youtu.be/cSCYb0tefpc

©️Anjali Minanath Dhaske 




गुढी पाडवा 2022

 #गुढी_पाडवा

 निमित्त अतिशय आकर्षक अशी रांगोळी ईथे देत आहे. 

ही रांगोळी सोप्या पद्धतीने कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

https://youtu.be/0_pUsqhEQIU

आवडल्यास like comment and share जरूर करा. 

ईतर सुंदर व सोप्या रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा 

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



गुढी पाडवा 2022

 #गुढी_पाडवा (छोटी रांगोळी )

 निमित्त अतिशय आकर्षक अशी छोटी रांगोळी ईथे देत आहे. रांगोळी काढण्यासाठी जागा कमी असेल तर हमखास अशी रांगोळी काढू शकतो 

ही रांगोळी सोप्या पद्धतीने कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

https://youtube.com/shorts/dPqPRox5ZD8?feature=share

आवडल्यास like comment and share जरूर करा. 

ईतर सुंदर व सोप्या रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा 

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)




गुढी पाडवा २०२१

 संपूर्ण व्हिडियो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे

https://youtu.be/qpl4CQTHfIE

#DIY Easy Beautiful #Gudhi_Padwa #Rangoli

ठिपक्यांचा वापर करत #गुढी_पाडव्याची #सोपी #सुबक #रांगोळी

हि रांगोळी काढायला सोपी आहे. दिसायला #आकर्षक दिसते तुम्हाला हा #व्हिडिओ नक्की आवडेल . 

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube Channel #subscribe करायला विसरू नका.

#like #comment #share करुन आपला सकारात्मक प्रतिसाद नक्की नोंदवा

धन्यवाद ❤️🙏❤️🙏

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



गुढी पाडवा २०२०



 
 
#गुढी_पाडवा_२०२०
देशासाठी ... आपल्या प्रियजनांसाठी....  स्वतःसाठी....
घरीच थांबुया... आनंदी राहू या .....
मला नेहमी वाटतं ..... पाणी गढूळ झालं की आपल्याला काहीच करता येत नाही. हे काहीच न करणं .... गढूळ पाण्यातील गाळ खाली बसायला मदत करत. थोडा वेळ गेला की पाणी आपोआप स्वच्छ दिसायला लागतं.
          सध्या आपण काहीच करू शकत नाही. पण आपलं हे घरी राहणं . घरातल्या घरात जे करता येईल ते करून आनंदी रहाणंच गरजेचं आहे.
        काही दिवस आपण घरातच थांबलो की ..... वातावरण पुन्हा पूर्ववत होईल.
        जेव्हा आपण एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करू शकत नाही तेव्हा आपण काय करतो....... किमान त्याच्या अडचणी वाढणार नाही याची काळजी घेतो.
       अगदी तसंच आहे .... सध्या आपल्या सारख्या  सामान्यांना मदत करता येणार नाही आहे तेव्हा बाहेर पडून प्रशासनाच्या अडचणी वाढवायच्या नाहीत. हा नियम पाळला पाहिजे.
            जिंदा रहने के लिए चीते की रफ्तार  उसकी जरूरत है। नुमाइश की जाय इसलिए पाला हुवा कोई शौक नहीं । हर रफ्तार के बाद वो कमजोर होता है इसलिए कुछ देर बाद उसे रुकनाही पड़ता है।
                 खुप धवलो आपण ... आता थोड थांबुया .... पुन्हा नव्या जोमाने धावण्यासाठी स्वतःला तयार करू या.

नवं वर्ष.... नवी सुरवात
धरून नवं विचारांची कास
चला उभारू मना मनात
आज संकल्पाची गुढी खास

           नूतन वर्षाच्या आभाळ भर शुभेच्छा .....
गुढपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा...
©️ अंजली मीनानाथ  धस्के
नेहमी प्रमाणे सोबतीला मी काढलेली रांगोळी ही आहेच .
आवडल्यास नक्की कळवा.
( पोस्ट शेयर करतांना नावासहित करावी.)

गुढी पाडवा (२०१९)

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतन वर्षाभिनंदन !!
आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !





नववर्ष ( गुढीपाडवा ) ८ /४ /२०१६

नववर्ष / गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !



 

नववर्ष ( गुढीपाडवा ) निमित्त रांगोळ्या

सणाच्या धामधुमीत रांगोळी काढायला जास्त वेळ मिळत नाही , तेव्हा घरात असलेल्या स्टेन्सिल च्या साह्याने  बॉर्डर घेउन  मध्ये छोटिशी गुढी काढल्यास ,तयार झालेली रांगोळी बघून तुमचा सणाचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल .