Showing posts with label नवरात्री/.दसरा. Show all posts
Showing posts with label नवरात्री/.दसरा. Show all posts

विजया दशमी २०२५

 दसरा २०२५

निमित्त सरस्वती चिन्ह, श्री रामाचे धनुष्य, आपट्याची पाने झेंडू फुलांचे तोरण रांगोळीत साकारलेले आहे. तुम्हा सगळ्या विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

रांगोळी  कशी काढली बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/T-vfrPQltZQ?si=zVAPO0WBgxYYEaH2

©️ अंजली मीनानाथ धस्के



नवरात्र २०२५

 #नवरात्र२०२५

तुम्हा सगळ्याना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 

या वेळी तुळजा भवानी माता रांगोळीत साकारलेले आहे. मंदिरात प्रत्यक्षात देवीचा शृंगार करतांना पुजाऱ्यांना जेवढा आनंद मिळत असेल तेवढाच आनंद मला रांगोळीत देवीचा शृंगार करतांना येतो. ही रांगोळी काढताना मी निमित्त मात्र असते. देवी आपल्या कडून करावून घेते याची प्रचिती दर वेळी येते. तयार रांगोळी बघून मला मिळालेला आनंद, मनाला लाभलेली प्रसन्नता तुमच्या पर्यंत पोहचावी म्हणून इथे पोस्ट करते आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा.

रांगोळी कशी काढली हे बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇 

https://youtu.be/fkr8-jH_gp4?si=WKxa5UyqGwuYQP-r


©️ अंजली मीनानाथ धस्के 






दसरा २०२४

 दसरा निमित्त काढलेली पाटी, सरस्वती चिन्ह आणि आपट्याच्या पानाची सुरेख रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल. संपुर्ण रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,👇👇👇

https://youtu.be/Lga8fQeZSd0?si=TWoawTbwTmcoe6_I






नवरात्र २०२४

 नवरात्र निमित्त काढलेली रांगोळी.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल. संपुर्ण रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇

https://youtu.be/QELuupzREvU?si=7oBwbqaQfKsyeDzI


झटपट काढता येणारी छोटी रांगोळी 👇👇👇

https://youtube.com/shorts/kr06V4OUKao?si=LlhHGqOQ6F4DGnW2





छोटी रांगोळी 





दसरा/विजयादशमी 2023

#दसरा

#विजयादशमी 2023

विजयादशमीच्या आपणास व आपल्या कुटूंबास हार्दिक शुभेच्छा.... 

या रांगोळी मागची संकल्पना आणि प्रत्येक प्रतिकांचा अर्थ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे👇👇👇👇👏👇

https://youtu.be/jLCv-h9oXF4?si=B3ArriabrwlN_JIa




काली माता ( Navratri 2023)

 #Navratri Special #Rangoli  

प्रसन्न भाव असलेली काली माता ....तुमच्याही मनाला प्रसन्न करेल......

तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐


https://youtu.be/S2jYQutummc?si=9Ay1BFV9Frg-xelY





नऊ दिवस नऊ रांगोळ्या 2023

 #नवरात्र२०२३

#पारंपारिक_रांगोळ्या 

#ठिपक्यांची_रांगोळी 

#एकमिनीटरांगोळी 


नवरात्री Day 1 colour Orange 👇

https://youtube.com/shorts/u0py_D8UNIo?si=jsiwAKKIhAGdHBCa

नवरात्री Day 2 colour white 👇🏻

https://youtube.com/shorts/s9V_uxKGUWA?si=MEZrzt9gSPjf4AYN


नवरात्री Day 3 colour Red 👇🏻

https://youtube.com/shorts/YncS09KinK8?si=lcXGNeT4IzOcMDwi


नवरात्री Day 4 colour Royal blue 👇🏻

https://youtube.com/shorts/yQeXXZ6pP0k?si=EBOh_t-64FWBe3Jy


नवरात्री Day 5 colour Yellow 👇🏻

https://youtube.com/shorts/T_rbsb6xIqg?si=E6VLgnQ5CQzFlof4

नवरात्री Day 6 colour Green 👇🏻

https://youtube.com/shorts/ljBm7n2KprM?si=G4m7TOc0BdrT-OkD


नवरात्री Day 7 colour Grey 👇

https://youtube.com/shorts/CY4RjGjbRbI?si=jlelhU8VdThV-qKS


नवरात्री Day 8 colour  Purple 👇🏻

https://youtube.com/shorts/Q2H5vXpHZB0?si=_SaZPHHq-5xyrw5H

नवरात्री Day 9 colour peacock green   👇🏻

https://youtube.com/shorts/VMfUw5YIjLw?si=Bsyx-Nb7cGQhNsg7


चॅनल Subscribe करून 🔔 icon चे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्यां videos चे notification येईल. Videos आवडल्यास like comment जरूर करावे 

Thank you 😊 

@Anjali Minanath Dhaske



         





































दसरा२०२२

 #दसरा२०२२

सगळ्यांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा.

मंगलमय वातावरण निर्मितीसाठी....

अत्यंत सुंदर, मन प्रसन्न करणारी..... रांगोळी (link 👇)

https://youtu.be/3Q9P85BRObg

आपल्या स्वतःच्या वाईट विचारांवर, सवयीवर आणि कृतीवर आपण विजय मिळवून सकारात्मकता स्विकारायला हवी. असा संदेश देणारी ही रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल. 

Thank you 😊 








नवरात्र विशेष नऊ रंग नऊ रांगोळ्या

 #नवरात्र२०२२

#पारंपारिक_रांगोळ्या 

#एकमिनीटरांगोळी 


नवरात्री Day 1 colour white 👇🏻

https://youtube.com/shorts/oFIQVoFLxpo?feature=share


नवरात्री Day 2 colour Red 👇🏻

https://youtube.com/shorts/SVW3F09C6FY?feature=share


नवरात्री Day 3 colour Royal blue 👇🏻

https://youtube.com/shorts/3dj2lIM_v2Q?feature=share


नवरात्री Day 4 colour Yellow 👇🏻

https://youtube.com/shorts/fJe_ISIiJV4?feature=share


नवरात्री Day 5 colour Green 👇🏻

https://youtube.com/shorts/PrBu1LiN_l0?feature=share

नवरात्री Day 6 colour Grey 👇🏻

https://youtube.com/shorts/9lPnYHsseTw?feature=share


नवरात्री Day 7 colour Orange 👇🏻

https://youtu.be/4P24F3MBIpo


नवरात्री Day 8 colour peacock green 👇🏻

https://youtube.com/shorts/8yeQbB-6hyY?feature=share


नवरात्री Day 9 colour pink  👇🏻

https://youtube.com/shorts/uILS02eH6sM?feature=share


चॅनल Subscribe करून 🔔 icon चे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्यां videos चे notification येईल. Videos आवडल्यास like comment जरूर करावे 

Thank you 😊 

@Anjali Minanath Dhaske



         


















कालिका माता रांगोळी

 #कालिका_माता_रांगोळी 

कालिका देवी तिच्या उग्र रूपाने प्रचलित असली तरी तिचे शांत रूप हे अत्यंत प्रसन्न आणि वरदायी आहे.  

अत्यंत मंगलमय वातावरण निर्माण करणारी ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/BYhgkFMw-go

©️Anjali Minanath Dhaske 





 #नवरात्री2022

नवरात्र, नऊ रंग  आणि नऊ शुभ चिन्हे असलेली मंगलमय रांगोळी कशी काढावी हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇 

https://youtu.be/2CKUyI_ay-0




घट स्थापना 2022

 #घटस्थापना2022

अत्यंत साधी सोपी सुंदर अशी ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇👇👇

https://youtu.be/kIf4pLzKqYg

©️Anjali Minanath Dhaske 



तीन अत्यंत आकर्षक बॉर्डर रांगोळ्या

 #बॉर्डर_रांगोळ्या 

या सगळ्या रांगोळ्या दिसायला अत्यंत आकर्षक असून काढण्यास खूप सोप्या आहेत.  रांगोळ्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

https://youtu.be/YJil9Q71-PE

Rang Majha Vegala by Anjali M Dhaske

 YouTube Channel 

@Anjali Minanath Dhaske 

Thank you 






दसरा 2021

#दसरा2021

#Dussehra 

 " सोनं घ्या सोन्यासारखे रहा "


दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हा सोन्यासारख्या मित्रांना शुभेच्छा देताना आयुष्य तुमच्या मुळे खूप सुंदर आहे याचीच अनुभूती होते.


Let this Dussehra bring lot of happiness, joy, prosperity and health in your life ! 


दसऱ्याच्या निमित्त एक सोपी आणि सुन्दर कलाकृती. आज ही रांगोळी नक्की काढून बघा. 

Beautiful creation for today's occasion -


https://youtu.be/6CJ0vUZ55mk


Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube channel subscribe करून Bell icon चे बटन दाबा 😀🙏 लिंक देत आहे 👇👇


https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg


रांगोळी आवडल्यास चॅनल वर अभिप्राय जरूर नोंदवा

धन्यवाद

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



नवरात्री सिरीज आणि बरेच काही

 #नवरात्री_सिरीज_आणि_बरेच_काही

#रांगोळीचा _बाल_चाहता

#रांगोळीची_ज्येष्ठ_चाहती

 नवरात्र निमीत्त अगदी सोप्या रांगोळ्या आणि देवीच्या प्रत्येक रुपाबद्दल थोडक्यात महिती अशा स्वरूपाची व्हिडियो मालिका मी तयार केली . या मागचा उद्देश नवरात्रीचे यावर्षीचे नऊ रंग याची माहिती देता यावी तसेच अशा सोप्या रांगोळ्या असाव्यात की ज्या पाहून त्या काढून बघण्याचा मोह अनावर व्हावा. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे देवीच्या नऊ रूपाची नावे आणि त्या संबंधीच्या आख्यायिका ज्यांना माहित नाही त्यांनाही सहज माहिती व्हाव्या. 

             जेव्हा आपण प्रचंड मेहनत घेवून काही तरी सादर करतो तेव्हा त्याचे चीज व्हावे हेच ध्येय असते. नवरात्र सिरीज बनविण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अनेक टेक्निकल आणि वैयक्तिक अडचणी आल्या. टेक्निकल बाजू कमजोर असल्याने चुकांमधून मी शिकते आहे.  परंतू हे करत असताना वेळ आणि मेहनत खर्ची पडते. ...

         या खडतर प्रवासात दिलासा देणारी बाब घडली. माझ्या व्हिडियोचा  पहिला वहिला बाल चाहता मला गवसला. रांगोळी सोबत कथा असल्याने  त्याला रांगोळी मालिका बद्दल आवड निर्माण झाली. ही आवड इतक्या प्रमाणात होती की आवडलेली रांगोळी जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत हा चाहता गप्प बसला नाही . इतकेच नाही तर ," मी तुझ्या व्हिडियो ला लाईक, कमेंट subscribe करून बेल आयकॉन चे बटन दाबले . तू माझ्यावर खुश आहेस का? अरे

पण मोबाईल आईचा आहे  म्हणून 

मी तुझीलिंक शेअर करू शकलो नाही. तू खूश आहे ना ?"

असे फोनवर बोलून मला पुरते खूश नाही तर घायाळ केले.

आता या बाल चाहत्याला रांगोळी काढून बघण्याचे वेध लागले.

"आता नको नवरात्र सुरू झाले की काढ रांगोळी" असे सांगून त्याचा उत्साह थोपवण्यात आला . हार मानेल तो बाल चाहता कसला..... त्याने नवरात्र सुरू होण्याची वाट बघितली आणि अखेर रांगोळी मिळवून त्याने त्याला आवडलेली रांगोळी रेखाटलीच.

हा जिद्दी बाल चाहता म्हणजे माझा सहा वर्षाचा भाचा अंशुल असून त्याची रांगोळी मी इथे देत आहे. कारण जेव्हा त्याने मला माझी रांगोळी खूप आवडली , कथा आवडली असे सांगितले तेव्हा 

मला वाटलं रांगोळी, कथा आवडली इथपर्यंत ठीक आहे नंतर हा रांगोळी काढण्याची त्याची इच्छा विसरून जाईल. 

 परंतु आठवणीने त्याने मला ही रांगोळी पाठवली आणि सोबतीला गोड गोड आवाजात व्हॉईस मेसेज पाठवला तेव्हा ती रांगोळी बघून आणि त्याचा मेसेज ऐकून मला आकाश ठेंगणे झाले.

रांगोळी बघून अंदाज येईल की या वयात अशी रांगोळी काढली म्हणजे येत्या काही वर्षांत त्याने अशीच आवड टिकवली तर त्याच्या रांगोळीचा मोठा चाहता वर्ग नक्कीच निर्माण होईल. रांगोळीची परंपरा फक्त जोपासली जाणार नाही तर ती वृद्धिंगत होईल...

त्याने त्याची आवड जपावी आणि त्यात अधिकाधीक प्रावीण्य मिळवावे हिच सदिच्छा.

नवरात्री सिरीज बघून माझ्या आईलाही तिचे जूने दिवस आठवले. परंतू गेली अनेक वर्षे खाली बसून रांगोळी काढणे जमत नसल्याने तीची रांगोळीची आवड मागे पडली. परंतू नवरात्री येणार आहे निमित्ताने तीही रोज छोटया छोटया रांगोळ्या काढून बघू लागली. तिला ठिपक्यांच्या आणि फक्त पांढरी रांगोळी वापरून काढलेल्या रांगोळ्या अधिक आवडतात  परंतू आज तिने प्रथमच डिझाईन आणि रंगीत रांगोळी वापरून बघितली. तिने  ब्रह्मचारिणी ही रांगोळी काढली आणि मला फोटो पाठवला . " हल्ली बारीक सरळ रेष येत नाही... जपमाळसाठी ठिपके नीट पडले नाही....  डिझाईन नाहीच जमत ग मला तरी आज प्रयत्न केलाच बघ... हवी तशी जमली नाही पण काढून बघितली आणि स्टेटसला ठेवली आहे बघ तुला आवडली तर... " असे सांगितले. 

रांगोळी कशी आली यापेक्षा अनेक वर्षांनी तिने रांगोळी पुन्हा हातात घेतली याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही.

आज एका ज्येष्ठ तर एका बाल चाहत्याने माझ्या नवरात्री सिरीजला अतिशय भावनिक करणारा प्रतिसाद दिला आहे. 

आज हे चाहते माझ्या घरातले आहेत म्हणून मला त्यांची प्रतिक्रिया कळली परंतू माझ्या मैत्रिणी सांगतात की त्यांची आजी, मावशी , काकू माझे व्हिडियो लिंक पाठवल्यास त्यावर क्लीक करून आवर्जून सगळे व्हिडियो बघतात परंतू टेक्निकल अडचणी असल्याने त्यांना लाईक कमेंट करणे सूचत नाही/ जमत नाही.

 त्यामूळेच मला खात्री आहे की असे अनेक चाहते आहेत की ज्यांना टेक्निकल अडचणी असल्याने ते प्रतिसाद नोंदवू शकत नाहीत परंतू ते प्रेरित मात्र नक्कीच होतात. त्यांनी प्रेरित होणे हाच मुख्य हेतू असल्याने तो सार्थकी लागतोय याचा आनंद मोठा आहे.

" किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला "

टिपः माझा व्हिडियो बघण्याची इच्छा झाली तर आधीच्या अनेक पोस्ट मधे लिंक दिलेली आहे. ही जाहिरातीची पोस्ट नसल्याने इथे लिंक देणे संयुक्तिक वाटतं नाही. आजचा लेखा ज्या बाल आणि ज्येष्ठ चाहत्यासाठी आहे त्यांचीच रांगोळी इथे देत आहे.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire )