२६ जानेवारी २०१८ ( प्रजासत्ताक दिन )

     २६ जानेवारी २०१८ ( प्रजासत्ताक दिन ) :     
  
                     " देणाऱ्याने देत जावे,
                        घेणाऱ्याने घेत जावे.
                        घेणाऱ्याने घेता घेता,
                        एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे."
             विंदा करंदीकरांच्या या ओळी आपल्याला बरंच काही सांगून जातात. सद्य परीस्थिती बघता या ओळींचा अवलंब प्रत्येकाने करणे  गरजेचे आहे. आपली संस्कृतीही आपल्याला हेच सांगते. देण्याचा आनंद काही विलक्षण आहे.  देण्याची इच्छा असून नेहमी देणं जमतंच  असं नाही. नेहमीच दुसऱ्यांना देवु शकतो असं देणं म्हणजे आदर आणि एक छान स्मित.तेव्हा देणं देण्याचा हा वारसा आपण आपल्यापरीने जपला पाहिजे.  माझ्या ह्याचं भावना २६ जानेवारी २०१८ मी रांगोळीत रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. आपला तिरंगा आपला देशाभिमान आहे, आपल्या संस्कृतीचं द्योतक आहे.
     जय हिंद,जय भारत......
©️ सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


२६ जानेवारी २०१८ ( प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेली कविता )

२६ जानेवारी २०१८ ( प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेली कविता )
कवीतेला अनुसरून काही रांगोळ्या इथे पोस्ट करते आहे. कविता आणि रांगोळ्या आवडल्या तर कॉमेंट करायला विसरू नका.
©️ सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३

धन्यवाद 

मकरसंक्रांत (१४-१-२०१८)

मकरसंक्रांत (१४-१-२०१८) निमित्त काढलेली रांगोळी :
          मकरसंक्रांत हा सण  तीळगूळाची गोडी घेवुन येतो. नवीन वर्षातील हा पहिला सण. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला केले जाणारे पदार्थ हे त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थिती आणि ऋतुला अनुसरूनच आहेत. म्हणूनच आजच्या दिवशी  आपण " तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला " असं म्हणत थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतो .
             सुवासिनींच्या जिव्हाळ्याचा हा सण. हलदीकुन्कु या कार्यक्रमातून आपण आपले सामाजिक बंध अधिक दृढ करतो. अजून एक विशेष असं की, येरवी निषिद्ध मानल्या जाणाऱ्या काळ्या रंगाला आज मात्र मानाचे स्थान आहे. प्रत्येक रंगाचं आपलं असं एक वेगळेपण या निमित्ताने जपलं जातं. हया सणाला अनुसरून रांगोळी काढण्याचा माझा हा प्रयत्न तुम्हालाही आवडेल......
(आवडल्यास  कॉमेंट बॉक्स मधे कॉमेंट करायला विसरू नका.)


निसर्ग चित्र

मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की,आज किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ने " नदी वाचवा,नदी संवर्धन,स्वच्छ नदी " या विषयावर  चिंचवड  येथे रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यात मी भाग घेतला होता. स्पर्धेत भाग घेण्याची माझी पहिलीच वेळ होती आणि मला या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तुम्ही माझ्या रांगोळ्यांच नेहमीच खूप कौतुक करता,त्यातूनच मला स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा मिळली.......