#कामिनी
#भाग५
©️अंजली मीनानाथ धस्के
श्रेया तसं बोलली म्हणून काका माघारी फिरले. जागेवर बसता बसता ते बोलून गेले" कामिनी ताईही अगदी असच काळजीने बोलायच्या ".
कामिनी ताई हे नाव ऐकताच श्रेयाला पेटीतल्या बाहुलीची आठवण झाली. तिची नजर त्या वरच्या अंधाऱ्या खोलीवर गेली आणि अंगावर सरसरून काटा आला.
सकाळी लवकर उठून तिला डिपार्टमेंटल परिक्षेचा अभ्यास ही करायचा होता. काकांचा निरोप घेऊन ती माघारी परतली. काका जागीच असतात याची जाणीव होवून तिच्यातली भीती थोडी कमी झाली. ती गाढ झोपली होती.
तिला तहान लागली म्हणून ती उठली. खोलीत पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा ती विसरली होती म्हणून पलंगावरून उठून स्वयंपाक खोलीत गेली. पाण्याचा पेला भरला आणि पाणी पिणार इतक्यात बारीकसा छन छन आवाज तिच्या कानावर पडला. आवाज स्वयंपाक खोलीच्या उघड्या खिडकीतून येत होता. नीट बघता यावं म्हणून ती आवाजाच्या दिशेने खिडकीकडे थोडी सरकली. डोळे बारीक करत बघू लागली. शोधत बघत असतांना तिला अचानक ती छोटी स्प्रिंगची बाहुली मागच्या जिण्याकडे चालत जातेय असं दिसलं. तिला दरदरून घाम फुटला.
तेवढ्यात पहाटे चारचा गजर झाला. ती दचकून जागी झाली. पलंगाजवळच असलेले खोलीतल्या दिव्याचे बटण दाबले. त्या प्रकशात तिची नजर खोलीभर फिरली. टेबलावर ठेवलेल्या तांब्यातलं पाणी पिल्यावर तिला जरा बरं वाटलं. तहान लागल्यामुळे असं स्वप्न पडले असावे असा तिने अंदाज बांधला. फ्रेश होवून ती अभ्यासाला बसली.
काकूही सहाला तिच्यासाठी चहा घेवून आल्या. सकाळच्या कामात तिला स्वप्नाचा विसर पडला. ऑफिसमधे गेल्यावर पत्रांच वर्गीकरण करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा संवाद तिच्या कानी पडला. संवादात विशेष काहीच नव्हतं पण नकळत ती त्या संवादाकडे आकर्षित झाली. तिने संवादात भाग घेत विचारलं ," काय झालं ? कशावर चर्चा सुरू आहे"
तसे ते दोघे उत्तरले ," काही नाही हो मॅडम , या चिठ्ठीला तिकीट नाही म्हणून आम्ही रोज ही चिठ्ठी बाजूला काढून ठेवतो. पण रोज ही चिठ्ठी अमरावतीला पाठवायच्या पत्रांच्या गठ्यात कोणीतरी ठेवत. डोक्याला ताप आहे नुसता. कोणीतरी खोडी काढताय आमची".
त्यावर श्रेया म्हणाली ," काय पत्ता आहे चिठ्ठीवर ?"
त्यांनी लगेच वाचून दाखवलं ," सदाशिव खरात, ४७, कणक वाडी , वलगाव , अमरावती"
श्रेया सहज म्हणाली ," मी देते तिकिटाचे पैसे , तिकीट लावून चिठ्ठी पाठवून द्या . गरजू असेल कोणी , नसेल जमलं तिकीट लावायला. "
तिने तिकिटाचे पैसे दिले आणि आपल्या रोजच्या कामाला लागली.
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.
सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1
भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1
भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1
भाग ४:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1
भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1
भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1
भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1
भाग ८:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1
भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1
भाग १०:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1
भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1
भाग १२:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1
भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1
भाग १४: अंतिम भाग
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

No comments:
Post a Comment