#कामिनी
#भाग१३
©️ अंजली मीनानाथ धस्के
कामिनी गायब झाली त्या दिवशीचे बंगल्या समोरच्या नाक्यावरील एटीएमचे फुटेज चेक केले . त्या दिवशी उशिरा रात्री सचिन खडसे याने कामिनीच्या खात्यातून खूप मोठी रक्कम काढली होती.
घरी न जाता तो बराच वेळ तिथेच कोणाची तरी वाट बघत उभा होता. थोड्या वेळाने तिथे एक मोठा ट्रक येवुन थांबला . सचिन खडसेने ड्राइवरला पैसे दिले आणि तो ट्रक गेला त्याच्या विरूद्ध दिशेने निघून गेला. आता या ट्रकचे रहस्य सोडवणे गरजेचे झाले.
सीसीटीव्ही व्हिडिओ झूम करून बघितल्यावर ट्रक चा नंबर मिळाला. मालकाचा पत्ता मिळाला . या ट्रकचा चालक सध्या एका अपघाताच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. तो तुरुंगात गेल्यावरही महिन्याच्या ठराविक तारखेला त्याच्या खात्यात ठराविक रक्कम जमा होत होती. ही रक्कम सचिन खडसे जमा करत होता.
का जमा करत होता ? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ट्रक चालकाने जो अपघात केला होता त्याची माहिती घेणं गरजेचं होतं. गुंता सुटायला लागला होता. शोध कार्याने वेग घेतला होता.
अपघाताची माहिती घेता कळले की कामिनी रहात असलेल्या बंगल्याची देखभाल करणारे सामंत कुटुंब शेजारच्या गावाहून परत येत असतांना ह्या ट्रक चालकाचा ट्रॅकवरील ताबा सुटून त्यांच्यावर जावून आदळला. त्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला होता तर सामंत कुटुंब जागच्या जागीच ठार झाले होते. याची अपघात म्हणून नोंद करण्यात आली होती पण सचिन खडसेच्या सांगण्यावरून केलेले ते खूनच होते. सचिन खडसेचा हा नवीनच गुन्हा उघडकीस आला होता.
सचिन खडसेला कोणी मारले याचा शोध लागला नसला तरी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता कोणीतरी त्याचा काटा काढला असावा अशी पोलिसांना खात्री वाटू लागली. कामिनीच्या गायब होण्यामागचा बराच गुंता सुटल्याने तपास कार्याचा वेग मंदावला.
इकडे गावा बाहेरच्या माळरानावर गुरख्यांना एक ठीक ठिकाणी पोचे आलेली पेटी सापडली. पेटी उघडून बघता त्यात छोट्या छोट्या दोन घुंगरांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्यातील एकाने ती पेटी स्वतः जवळ ठेवून घेतली तर एकाने ते घुंगरू स्वत:च्या काठीला अडकवले.
क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.
सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1
भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1
भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1
भाग ४:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1
भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1
भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1
भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1
भाग ८:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1
भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1
भाग १०:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1
भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1
भाग १२:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1
भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1
भाग १४: अंतिम भाग
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

No comments:
Post a Comment