कामिनी (भाग ११)

#कामिनी
#भाग११
©️ अंजली मीनानाथ धस्के

     श्रेयाला अजून  ताण येवू नये म्हणून पोलिसांनी तिला काहीच न विचारता या प्रकरणाबाबत तिथे असलेल्या इतरांकडे  असलेली सगळी माहिती गोळा करायला सूरवात केली.
सगळ्यांशी बोलून त्यांना अनेक शंका निर्माण करणारे प्रश्न पडले.
त्यातला पहिला प्रश्न म्हणजे ही कामिनी कोण???
  त्याच अनुषंगाने त्यांनी शोध सुरू केला.
      कामिनी खरात ही गावातल्या बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होती. ती सध्या श्रेया राहते तिथेच ती रहायला होती. ज्या दिवशी काका काकूं शेजारच्या गावात एका नातलगाच्या लग्नात मुक्काम करावा लागला नेमकी त्याच दिवशी ती कोणालाही काही न सांगता निघून गेली. ती कुठे गेली हे कोणालाच माहित नव्हतं .
एवढी प्राथमिक माहिती त्यांना पोलीस स्टेशन मधूनच मिळाली.
      ती ज्या बँकेत काम करत होती तिथे चौकशी केल्यावर अजून माहिती मिळाली.
 तीच एकावर प्रेम होतं ती लवकरच त्याच्याशी लग्न करणार होती. ही नवीन माहिती तिच्या बँकेतल्या मैत्रिणीकडून मिळाली होती पण त्या मैत्रिणीला तिचं कोणावर प्रेम होत त्या युवकाच नावं माहीत नव्हतं. कामिनीने तिचं एका मुलावर प्रेम आहे हे इतर कोणासही सांगण्यास मनाई केली होती
 म्हणून तिच्या मैत्रिणीने या आधी ही माहिती लपवली होती.
              आता कामिनीचा प्रियकर कोण?  त्या युवकाच्या नावावर प्रकरण येवुन थांबलं तेव्हा पोस्टात कमिनीची सदाशिव खरात म्हणजेच तिच्या वडिलांना पाठवलेली चिठ्ठी परत आली होती . याची तपास कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला आठवण झाली. त्याने ती चिठ्ठी श्रेयाच्या कार्यालयातून मिळवली. तिच्यावर दिलेल्या पत्त्यावर जावून त्यांनी सदाशिव खरात यांची सगळी माहिती मिळवली.
कामिनीच्या अचानक गायब होण्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. ती त्यांच्या जगण्याचा एकुलता एक आधार होती. तिच्या काळजीने हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे नुकतेच निधन झाले होते. कोणी जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांच्या राहत्या घराला शेजारी राहणाऱ्या एका नातलगाने तात्पुरते कुलूप लावले होते. त्यांच्याजवळ सदाशिव खरात यांच्या निधनाचा पुरावा म्हणून डेथ सर्टिफिकेट ही पोलिसांना मिळाले होते. कामिनी आली की तिला तिचे घर देता यावे यासाठीच ही तरतूद करण्यात आली होती. तेही कामिनीच्या परत येण्याची वाट बघत होते.
              इकडे  श्रेयाच्या पोटात वारंवार दुखत होत. त्यांचं नेमक निदान करता येत नव्हतं. पुढच्या इलाजासाठी तिला मोठ्या दवाखान्यात न्याव असंच इथल्या डॉक्टरांचं म्हणणं पडलं. श्रेयाला थोड बरं वाटायला लागलं. तेव्हा तिला घरी सोडण्यात आलं.
           पोलिसांनी तिला सदाशिव खरात यांचा फोटो दाखवून खात्री करून घेतली की, बेशुद्ध पडण्याआधी ती त्यांनाच भेटली होती का? तीने तो फोटो बघून खात्रीने सांगितलं की ," हेच सदाशिव खरात.. यांनाच ती भेटली होती. श्रेयाच्या वडिलांनी ही तो फोटो बघितल्यावर सांगितलं की याच वृध्द माणसाने त्या रात्री श्रेया कुठे सापडेल हे सांगितलं होतं. तेव्हा त्याच्यांसोबत त्यांची मुलगीही होती. कामिनीचा फोटो बघितल्यावर तर त्यांनीही खात्रीने सांगितलं की हे दोघेच त्या रात्री जुन्या बस थांब्या जवळच्या एका मोठ्या झाडाखाली बसलेले होते.
           हे ऐकुन पोलिसांना खूपच आश्चर्य वाटलं, कारण श्रेया बेशुद्ध पडली होती त्याच्या दहा दिवस आधीच सदाशिव खरात यांचा मृत्यू झाला होता. तसे सगळे पुरावेही त्यांच्याकडे होते.
         श्रेया आणि तिचे कुटुंब या गावात नवीन होते. श्रेयाची तब्येत नाजूक म्हणून पुन्हा एकदा खात्री केल्याशिवाय त्यांना काहीच न सागण्यांचे पोलीस अधिकाऱ्याने मनोमन ठरवले.
श्रेयाला  तर त्यांनी काहीच सांगितलं नाही पण तिच्या वडिलांना लवकरात लवकर त्यांनी हवा पलटासाठी श्रेयाला दुसऱ्या गावी न्याव  असा सल्ला दिला.

     श्रेयाच्या समोर कोणीच जुना बाहुलीचा विषय काढत नव्हतं.   सगळेच तिची काळजी घेत होते. पाय मोकळे करण्यासाठी ती बंगल्याच्याच बागेत फिरत होती. नेहमीप्रमाणे मागच्या बाजूला गुलाबाच्या वाफ्याकडे ती गेली असता गुलाबाची झाडं सुकल्या सारखी वाटली. त्यांच्या मुळाशी घुशीने मोठं मोठी बिळ केली होती. त्या वाफ्याची पाहणी करतांना अचानक तिची नजर एका बिळाच्या तोंडाशी मातीत रुतलेल्या एका डायरी वर गेली. तिने उसुक्तेपोटी ती डायरी बाहेर काढली . त्या डायरीची सगळी माती झटकली. डायरीची  अवस्था तशी फार चांगली नव्हती तरी तिने पाहिलं पान उघडंल आणि त्यावर लिहिलेलं ," कामिनी खरात" हे नाव वाचून तिने ती डायरी तिथेच टाकून घराच्या दिशेने धूम ठोकली. तिची तब्येत पुन्हा बिघडली. श्रेयाच्या बाबांनी पोलिसांना बोलावलं. त्यांना डायरी मिळाली ती जागा दुरूनच दाखवली .  तिथे ती डायरी पडलेली होतीच. पोलिसांनी ती ताब्यात घेतली.
      श्रेयाची वारंवार बिघडती तब्येत बघता तिच्या आईबाबांनी लवकरात लवकर हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी श्रेयाच्या कार्यालयात बदलीचा अर्जही  दिला.
       पोलिस स्टेशनमधे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या डायरीत जेवढा वाचण्यासारखा मचकुर होता तेवढा वेगळा करून त्यावर संशोधन सुरू केले. त्यात त्यांना मिळालेली माहिती.
पान १.....
आज मी खूप आनंदात आहे.
मला कोड आहे. सध्या तो दर्शनीय भागात नसला तरी येत्या काही वर्षातच माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा  घेणार आहे. हे सांगूनही त्याच माझ्यावरच प्रेम कमी झालं नाही.
आता माझही संसार मांडण्याचं स्वप्न पूर्ण होईल.
पान ६.....

नवीन गावी बदली झाली.
बंगला छान आहे.

पान १२
आज तिला जरा बरं नव्हतं तर काकाकाकूंनी तिची लेकी प्रमाणे काळजी घेतली.
पान १६....
तिला गुलाब खूप आवडतात म्हणून काकांनी बंगल्याच्या मागील रिकाम्या जागेत खास एक वाफ तयार करायला घेतला.

पान २५..
मी आई होणार आहे.
हे बाळ आमच्या प्रेमाची निशाणी आहे.
मला या बाळाला जन्म द्यायचा आहे.

पान ३०
त्याच्या घरचे माझ्या या कोडाच्या आजाराबद्दल ऐकल्यानंतर लग्नाला तयार नाहीत.

पान ३७

मला शंका यायला लागली आहे की , त्यालाच माझ्याशी लग्न करायचं नाही.

पान ३९
तो आज घरच्या सोबत मुलगी बघायला गेला.
पान ४०
 मी त्याच्या घरी जावून त्या सगळ्यांना आमच्या होणाऱ्या  बाळाबद्दल सगळं सांगणार आहे.

पान ४५
त्याने मला समजावलं . माझ्या सांगण्याने आमच्या बाळाला ते अनैतिक ठरवतील . आमच्या  बाळाला नावं ठेवलेली आम्हाला अजिबात चालणार नाही. ते आमच्या प्रेमाची निशाणी आहे.
 त्याच्या घरी काहीच सांगायच नाही असं आमचं ठरलं
पान ४७
 त्याने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता येत्या शुक्रवारी माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबांना फोन वर सांगण्याची हिंमत होत नाही. त्यांना पत्र पाठवून बोलावून घेणार आहे. आल्यावर नीट समजावून सांगता येईल. तसंही मला आता हे सगळं जास्त दिवस लपवता येणार नाही. बाबा समजून घेतली. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे.
पान ५०
काय सुंदर  योगायोग आहे. उद्या आम्ही लग्न करणार आहोत आणि आज काकांनी मागच्या वाफ्यात  लावण्यासाठी खूप सुंदर गुलाबाची रोपं आणली आहेत.

पुढची सगळी पानं कोरी होती.
   शेवटच्या पानावर अगदी बारीक अक्षरात लिहिलेला एक मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. त्या नंबर वर कॉल केल्यावर कळले की तो सध्या अस्तित्वात नाही.
 तो नंबर कोणाच्या नावावर आहे. याचा शोध सुरू झाला.

क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1





No comments:

Post a Comment