#रनरअप
©️ अंजली मीनानाथ धस्के
#भाग३
रोहनचे संशोधन अर्थवट तर होतेच पण प्रत्यक्षात त्याचा वापर दोन्ही मेंदू साठी धोका दायक होता. त्याच्या संशोधनाची मानवी मेंदूवर कोणतीच चाचणी घेण्यात आलेली नव्हती . त्यामुळे त्याने निश्चित केलेले यश हे खात्रीशीर नव्हते. त्याचे हे संशोधन बेंगलोर वैज्ञानिक परिषदेतही नाकारल्या गेल्याने यावर पुढेही कोणी काहीच काम करू इच्छित नव्हते. तिनेही हे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न करू नये असेच त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मत होते.
तिने रोहनला खूप समजावलं पण तो ऐकायला तयार नव्हता.
त्याचं आताच परावलंबी आयुष्य बघता झाला तर त्याला या प्रयोगाचा फायदाच होणार होता. म्हणून तो त्याच्या मतावर ठाम होता. त्याच्या प्रेमापोटी तिने माघार घेतली. संभाव्य धोके माहीत असूनही तिने त्याचे संशोधन त्याच्यासाठी वापरण्याची तयारी सुरू केली.
गार्गीला एक चीप रोहनच्या मेंदूत बसवायची होती हे निश्चित होत पण दुसरा मानवी मेंदू आणायचा कुठून? मुळात दुसरं कोणी स्वतःच्या मेंदूमधे ती चीप बसवायला तयार होणार नव्हतं. उलट तिने अशी मदत मागितली असती तर तिचे अस्तित्व ही धोक्यात आले असते.
कायद्याने बंदी घालण्यात आलेले संशोधन प्रत्यक्षात वापरात आणणे गुन्हा असल्याने इतर कोणाचीही मदत घेण्याचा प्रश्नच नव्हता. तिचे स्वतःचे चेतापेशींचे संशोधनही धोक्यात आले असते. तिला तस झालेलं अजीबात चालणार नव्हतं.
इतर कोणीही ती चीप आपल्या मेंदूत बसवून घ्यायला तयार नसल्याची सबब सांगत गार्गी रोहनची समजूत काढू पहात होती. पण रोहन आता माघार घ्यायला तयार नव्हता. यावरही रोहनने डोळ्यांनी त्यांचा पाळीव कुत्रा टॉमीकडे बघत उपाय सुचवला .
गर्गीच्या मनाविरुद्ध सगळं घडतं होत. पण ती रोहनला विरोधही करू शकत नव्हती. तिच्यासाठी त्याच असणं खूप महत्त्वाचं होत. तिला तिच्या संशोधनासाठी वेळ हवा होता. पण इकडे रोहनचा धीर सुटत चालला होता.
रोहनचां प्रयोग यशस्वी झाला असता तर तिला तिच्या संशोधनासाठी वेळ मिळणार होता. रोहनला नुसते जगवणे महत्त्वाचे नव्हते तर आपण एक ना एक दिवस बरे होवु ही आशा टिकवून ठेवणे गरजेचे होते.
टॉमीच्या मदतीने
रोहन त्याच्या भावना व्यक्त करू शकला असता. छोट्या छोट्या कामासाठी त्याला सर्वस्वी गार्गीवर अवलंबून रहाव लागलं नसतं. तरी संशोधनासाठी टॉमीचा वापर करणे तिला तितकसं पटलं नव्हतच
पण म्हणतात ना प्रेमात माणूस वेडा असतो. तसचं तिचही काहीसं झालं होतं. तिलाही प्रचंड बुद्धिमत्ता असून रोहनच्या प्रेमापुढे तिचा पराभव झाला. हा प्रयत्न तिने एकटीनेच करायचा निर्णय घेतला. कोणालाही मदतीसाठी बोलावणं त्यांच्या प्रयोगासाठी धोकादायक होत.
आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर रोहन आणि टॉमी या दोघांच्याही मेंदूत चीप बसवण्यात तिला यश मिळालं .
आता संगणकात बसवलेल्या छोट्या सर्किटच्या प्रतिक्रियांवर तीच आणि रोहनच्या संशोधनाचं यश अपयश टिकून होत.
रोहन आणि टॉमी या दोघांनाही शुद्धीत यायला वेळ लागला. टॉमी शुद्धीत आल्यावर त्याच्या वागण्यात कोणताच बदल झाला नव्हता. पण जेव्हा रोहन शुद्धीत आला तेव्हा एकीकडे टॉमी जोरजोरात भूंकायला लागला तर दुसरीकडे संगणकावर रोहनच्या मेल अकाउंटला रोहनच्या मेंदूत सुरू असलेले विचार मेल रूपाने येवून जमा होवू लागले.
ती संगणकाकडे जाणार इतक्यात टॉमीने तिच्या हाताला धरून तिला रोहन जवळ नेलं. टॉमी तिला प्रेमाने चाटू लागला. प्रयोग यशस्वी झाला होता. त्याच्या भावना तिला टॉमीच्या कृतीतून कळत होत्या. तीने आनंदाने रोहनला मिठी मारली . टॉमीही तिच्या पाठीवरून आपला पंजा फिरवू लागला.
आता टॉमी फ्रीज मधून पाण्याची बॉटल काढू लागला की गार्गीला समजू लागलं की रोहनला तहान लागली आहे . गार्गी तिच्या संशोधनात गुंतलेली असली की टॉमी तिच्या टेबल जवळ बसून तिला बघत बसायचा तेव्हाही तिला बघण्याच समाधान मात्र रोहनच्या चेहऱ्यावर उमटायचं. रोहनच्या सुचने प्रमाणे घरातल्या खोल्यांमधले दिवे सुरू किंवा बंद करण्याचे कामही टॉमी सहज करत होता.
क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
सोबतीला कथेला साजेशी रांगोळी ही आहेच
#AnjaliMinanathDhaske
इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com उपलब्ध आहे.
टिपः
लिखाण आवडल्यास शेअर करताना नावासहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post.html?m=1
भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_91.html?m=1
भाग ४:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_48.html?m=1
भाग ५: शेवटचा भाग
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_16.html?m=1

No comments:
Post a Comment