#कामिनी
#भाग६
©️अंजली मीनानाथ धस्के
ती हा प्रसंगही कामाच्या व्यापात विसरून गेली.
अभ्यास करायचा म्हणून जरा लवकरच ती घरी परतली. काकूंनी तिच्यासाठी गरम गरम भजी आणि चहा बनवला. तो बेत बघून श्रेयाच्या मनातले अभ्यासाचे विचार मागे पडले आणि तिने बंगल्याच्या छतावर निवांत बसून भजी आणि चहाचा आस्वाद घेण्याचं जाहीर केले.
काकूंनी सगळी तयारी करून दिली. बागेतल्या झाडांना पाणी देण्यासाठी म्हणून त्या खाली आल्या.
श्रेया मावळतीच्या सूर्याला बघून मस्त मोकळ्या हवेत चहा घेत होती. फिरता फिरता ती मागच्या लोखंडी जिण्याकडे गेली. मागच्या बागेतली गुलाबांची फुले बघून ती पायऱ्या उतरत खाली येतच होती इतक्यात तिच्या पायाखाली काहीतरी आलं. कड् कड् असा बारीकसा आवाज झाला. तिने दचकून बघितलं तर ..... स्प्रिंगची बाहुली. बाहुलीच डोकं तुटलं होतं. शरीराला ठीक ठिकाणी चिरा गेल्या होत्या. चेहराही विद्रूप दिसू लागला. भीतीने तिच्या हातातला कप खाली फरशीवर पडला. खळकन... कप फुटल्याचा आवाज झाला त्या आवाजाने काकू तिच्याकडे धावतच आल्या.
त्यांनाही त्या बाहुलीला बघून आश्चर्य वाटलं. काकांना बोलावून ,' तुम्ही ही बाहुली इथे ठेवली का?' म्हणून विचारले असता त्यांना याची काहीच कल्पना नाही अशी कबुली त्यांनी दिली.
बाहुली खोलीच्या... मुख्य म्हणजे पेटीच्या बाहेर कशी आली?? मांजरीने आणली असेल असं वाटून ते सगळे खोलीकडे गेले तर खोलीचं दार बाहेरून लावलेले होते. खोलीची छोटी खिडकी ही बंद होती. बाहेर तिन्ही सांजेचा अंधार दाटून आला. तेवढ्यात खोलीतला छोटा दिवा आपोआप लागला. तसे तिघेही दचकले.
काकांनी दोघींना समजावलं," इथली वायरिंग जुनी आहे. काल लाईट आपोआप विझला तसाच तो आज आपोआप लागला " लाईटाच बटण दाखवत अधिक खुलासा केला," लाईट बंद झाल्याने इथलं बटण बंद करायला मी विसरूनच गेलो होतो. हे बघा बटण सुरूच राहिलं आहे".
मनाची समजूत काढत तिघे बाहुली जवळ आले.
रात्रीच स्वप्न आठवून श्रेयाच्या मनात एकच गोंधळ माजला. खरंच रात्री ही बाहुली जिण्याकडे जात होती का? कारण तुटलेल्या अवस्थेतही ती बाहुली पायऱ्या चढत असल्यासारखी वाटतं होती. पण ते तर स्वप्न होत खरं कसं असेल ? थंड हवेची झुळूक तिला स्पर्शून गेली. घामाने भिजलेल्या तिच्या शरीरावर शिरशिरी आली. ती भीतीने थर थर कापू लागली.
त्याही समजुतीच्या सुरात बोलल्या ," होत अस कधी कधी .... उद्याच्या उद्या वरच्या दिव्याच काम करून घेवू आणि उंदरांच औषधही मरून घेवू. काळजी नको करूस "
श्रेयाला एकदम आईची आठवण झाली. तिला अशी भीती वाटली की आई तुळशी जवळ दिवा लावून . तिची नजर काढायची. श्रेया तडक घरात गेली. देवाजवळ दिवा लावला. आई म्हणायची तशी रामरक्षा म्हणायला लागली.
देवाजवळच्या दिव्याला बघून श्रेयाला खूप बरं वाटलं.
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित शेयर करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.
सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1
भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1
भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1
भाग ४:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1
भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1
भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1
भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1
भाग ८:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1
भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1
भाग १०:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1
भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1
भाग १२:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1
भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1
भाग १४: अंतिम भाग
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1

काकूंनी सगळे तुकडे गोळा करायला सुरवात केली. काका श्रेयाची समजूत काढण्यासाठी म्हणाले," उंदराने तोंडात धरून बाहुलीला बाहेर आणली असेल आणि मांजरीला बघून इथेच टाकून दुसरीकडे पळून गेला असेल. काही भीती मनात बाळगू नको . बस बरं या खुर्चीत जरा वेळ"
काकूंनी सगळे तुकडे सुपलीत भरून कचरा कुंडीत टाकले.त्याही समजुतीच्या सुरात बोलल्या ," होत अस कधी कधी .... उद्याच्या उद्या वरच्या दिव्याच काम करून घेवू आणि उंदरांच औषधही मरून घेवू. काळजी नको करूस "
श्रेयाला एकदम आईची आठवण झाली. तिला अशी भीती वाटली की आई तुळशी जवळ दिवा लावून . तिची नजर काढायची. श्रेया तडक घरात गेली. देवाजवळ दिवा लावला. आई म्हणायची तशी रामरक्षा म्हणायला लागली.
देवाजवळच्या दिव्याला बघून श्रेयाला खूप बरं वाटलं.
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित शेयर करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.
सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1
भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1
भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1
भाग ४:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1
भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1
भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1
भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1
भाग ८:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1
भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1
भाग १०:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1
भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1
भाग १२:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1
भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1
भाग १४: अंतिम भाग
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1
No comments:
Post a Comment