- #कामिनी
#भाग१
©️अंजली मीनानाथ धस्के
श्रेया मुंबईत पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करत होती. हेड पोस्ट मास्टर म्हणून बढती मिळाली आणि सोबतच तिची बदली करण्यात आली. तिला ताबडतोब रत्नागिरी जवळच हुंडाळवाडी गावातल्या पोस्ट ऑफिसमधे रुजू व्हाव लागलं. आठवडा कसाबसा पैंगेस्ट म्हणून काढला पण तिला स्वतःच स्वतंत्र घर हवं होतं.
मनासारखं घर मिळत नसल्याने तिची शोधा शोध सुरू होती. सुट्टीच्या दिवशी असाच शोध घेत असताना एक घर रिकामं असल्याचं तिला कळलं . ती तडक मिळालेल्या पत्यावर गेली. घर कसलं तो प्रशस्त पण जुनाट पद्धतीचा बंगलाच होता. घराची देखभाल करणारे सामंत कुटुंब बंगल्या शेजारीच बांधलेल्या छोट्या खोल्यांमध्ये रहात होते.
घराचं भाडही श्रेयाला परवडणार होतं. घर मोठं असल्याने आईबाबा , दादा वहिनी यांनाही काही दिवस येवुन निवांत रहाता येणार म्हणून तिने लगेच त्या सामंत कुटुंबाला घर भाड्याची आगावू रक्कम दिली. काही सूचनाही केल्या.
ठरल्या प्रमाणे ठरल्या दिवशी ती सामान घेवून त्या घरात राहण्यासाठी आली. सामंत काका काकू वयस्कर असले तरी बोलायला एकदम मोकळे असल्याने एकट्याने रहाताना तिला त्यांचा आधार वाटला.
सगळा दिवस सामान लावण्यात गेला. सामान जागच्या जागी लागलं आणि काकू गरमा गरम जेवण घेवून आल्या . त्यांच्या हाताची चव चाखताच रोज त्यांनाच जेवण बनवायला सांगायचं हे श्रेयाने मनोमन ठरवून ही टाकलं. काकूंनी सगळं आवरलं. श्रेयाला रात्रीतून काही हवं असल्यास इंटर कोम फोन वरून कळवण्याची सूचना देवून त्या आपल्या खोलीकडे निघून गेल्या.
दिवसभराचा थकवा , पोटभर जेवण आणि मंद गार वारा तिला दिवाणखान्यात असलेल्या आराम खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागली.
ठक ठक ठक ठक असा आवाज आल्याने ती दचकून जागी झाली.
क्रमशः
©️अंजली मीनानाथ धस्के
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.
सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1
भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1
भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1
भाग ४:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1
भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1
भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1
भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1
भाग ८:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1
भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1
भाग १०:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1
भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1
भाग १२:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1
भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1
भाग १४: अंतिम भाग
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1
No comments:
Post a Comment