#करोनाशी_लढा
संकट आहे मोठं
तरी धीर आता धरा
हेही दिवस जातील
काळ थांबत नाही खरा
ऑल इज वेल म्हणत
मनाची समजूत काढा
कारण हे युद्ध नाही सोपं
आहे करोनाशी लढा
करोना योध्यांचा आदर करू
वागू थोड माणुसकीने
जातीभेद सारे विसरू
लढू एकोप्याने
राजकारण नको याचे
नको कोणत्या अफवा
एकच आहे आपला शत्रू
काढू त्याच्याविरुध्द फतवा
धरू सकारात्मक विचारांची कास
बाळगू थोडा संयम
देवू घासातलाही घास
पाळून सोशल डीस्टंसिंगचा नियम
चांगले ते सारे स्वीकारू
जीवनशैली बदलू थोडी
दुःखातही शोधू
आनंदी क्षणांची जोडी
नात्यांमधला वाद विसरत
वाचा संवादाचा पाढा
विस्मृतीतले छंद आता
जोपासायला काढा
कारण हे युद्ध नाही सोपं
आहे करोनाशी लढा
©️अंजली मीनानाथ धस्के
सोबत कवितेला साजेशी माझ्या मुलाने काढलेली रांगोळी ही देत आहे.
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
No comments:
Post a Comment