#आयुष्याची_पाटी
कुठे थांबायचे ते कळले पाहिजे...... या विषयावर लिहिलेली ही कथा.
#१००शब्दांचीकथा
हरीश धडाडीचा, कर्तृत्वाच्या जोरावर संघर्षावर मात करणारा. भविष्याची वाटचाल करतांना भूतकाळातील वाईट अनुभवांना कवटाळूनच त्याने लोकांशी वागण्याची पद्धत ठरवली. त्यानादात त्याने कधी मित्रांना, आप्तगणांना जवळ केले नाही.
प्रत्येकाला तो त्याच अनुभवातून तोले.
भूतकाळाने त्याचा वर्तमान नष्ट केला. त्याच्यात 'मीपणा' वाढीस लागला.
तारुण्यात तर काही वाटले नाही पण आता उतार वयातही तो नवीन अनुभवांचा आनंद घेण्यापेक्षा त्याच्या मीपणाच्या गोष्टीच सगळ्यांना सांगतो. परिणामत: आज तो एकाकी पडला आहे. एकटेपणाचा भावनेने त्याला ग्रासले.
वाईट अनुभव कितीही खरे असले तरी ते किती कवटाळायचे हे ठरवायला हवं. वाईट अनुभवानंतरही नवीन अनुभवासाठी आयुष्याची पाटी कोरी ठेवता यायला हवी.
भूतकाळात रमतांना कुठे थांबायचं हे कळले पाहिजे.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबतीला रांगोळी ही आहेच. इतर लिखाण आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहे. anjali-rangoli. blogspot.com

No comments:
Post a Comment