#सकारात्मकता_हेच_औषध
#१००शब्दांचीकथा
©️अंजली मीनानाथ धस्के
रुहीचा कोरोना चाचणी निकाल सकारात्मक आला. ती पुरती हादरून गेली. आता पुढचे १४ दिवस दवाखान्यात काढावे लागणार. आपण बरे होवू याची काही खात्री नाही. आपण मेलोच तर कोणी बघायलाही येणार नाही. अशा नाना कल्पना करून ती अजून निराशेच्या आहारी जात होती. त्यात भर म्हणजे तिच्या मुलाने रडून एकच गोंधळ घातला. इच्छेविरुद्ध ती दवाखान्यात दाखल झाली.
तिचा निस्तेज चेहरा बघून शेजारच्या खाटेवरचे अनोळखी काका बोलले,"पोरी काळजी करू नकोस. इथे आयुष्य संपत नाही. फक्त थोड्या दिवसांची विश्रांती घेतं. इथल्या अनुभवाने ते अधिक खंबीरपणे नवीन सूरवात करेल" या शब्दांनी तिला जगण्याची नवीन ऊर्जा मिळाली. त्यांचे शब्द तिने खरे केले. ती करोनाविरूद्ध लढाई जिंकली.
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

No comments:
Post a Comment