' नावात काय ठेवलंय हो' या विषयावर लिहिलेली ही
#१००शब्दांचीगोष्ट
#गोष्ट१
#कर्तृत्वाने_मिळते_नावाला_खरी_ओळख
बाळाचं नाव काय ठेवायचं यावर चर्चा सुरू असतांना सायना , दीपिका , प्रियांका , ऐश्वर्या अशी गाजलेली नावच पुढे आलीत . तेव्हा न राहवून नाना बोललेच," अंबानींच्या आणि माझ्या मुलाच नाव सारखंच पण तो मोठा उद्योजक आहे आणि हा चाकरी करतो रिलायन्समधे... तेही त्याचीच . अंधानुकरण नको. नाव अर्थ पूर्ण असणं जेवढं महत्त्वाचं त्यापेक्षा जास्त बाळाला संस्कार कसे देतो हे महत्त्वाचं . नावात काय ठेवलंय हो नुसत्या नावाने माणूस मोठा होत नाही तर आपल्या कर्तुत्वाने त्या नावाला वेगळी ओळख देणाराच माणूस मोठा होतो.
आज बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार पटकावणाऱ्या सावीच्या नावाला पत्रकारितेच्या क्षेत्रात खरी ओळख मिळाली तेव्हा सगळ्यांनाच नानांची आठवण झाली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
#१००शब्दांचीगोष्ट
#गोष्ट२
#माणूस_सोपा_हवा
सुमन, अंजली खास मैत्रिणी. खरेदीसाठी भेटल्या .
पावतीवर काय नाव लिहायचं असं सेल्सगर्लने विचारल्यावर , सुमन :अंजली मीनानाथ धस्के
सेल्सगर्ल : काय?
सुमन: बघ.... तुझी आडनाव विचित्रच आहेत . एलगिरे.... धस्के.
सोपं नाव निवडण्याची संधीही तू फुकट घालवली . लग्न करतांना सोप्या नावाचा माणूस निवडायचा न एखादा.
अंजलीने तोपर्यंत तिच्याकडून पावती पुस्तक घेतलं व स्वतःच नाव त्यावर लिहित बोलली,
" नाव सोपं घेवून काय करू... मी माणूस सोपा निवडलाय . त्याच्यासोबत आयुष्य सोपं आहे बघ".
सेल्सगर्ल: एकदम बरोबर , नावात काय ठेवलं आहे असं कोणते तरी संत सांगुन गेले आहेतचना.
"संत शेक्सपियर " दोघी एका सुरात म्हणाल्या आणि खळाळून हसल्या.
©️ अंजली मीनानाथ धस्के
#१००शब्दांचीगोष्ट
#गोष्ट३
#व्यथा_की_१००शब्दांचीकथा
मुलासाठी शाळा निवडतांना केवळ शाळेच्या नावाकडे बघून अव्वाच्या सव्वा पैसे भरले. आज त्या शाळेचे तेच नाव बदलणार आहे हे समजल्यावर डोक्याला हात लावून बसलेली अमृता.
१२ वर्ष नवऱ्याचे नाव स्वत:ची ओळख म्हणून मिरवणारी आज त्याच नवऱ्याने घटस्फोट दिला . क्षणात त्याच नाव काढून घेतल्याने सुन्न झालेली स्वाती .
बंगल्याला तिचच नाव तरी घरातल्या निर्णयात काडीचीही किंमत दिली जात नाही हे अनुभवून दुःखी झालेली वसुंधरा.
आपल्या उत्तम कथा दुसऱ्याच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पाहून हताश झालेली गीता.
या सगळ्यांशी कुठल्या ना कुठल्या नात्याने जोडल्या गेलेल्या अस्मितेला प्रश्न पडला होता
'नावात काय ठेवलंय हो' या विषयावर कोणाची व्यथा..... १०० शब्दांची कथा म्हणून मांडावी.
©️अंजली मीनानाथ धस्के
Momsoresso Matathi कडून ही" नावात काय ठेवलंय हो"हा विषय दिल्या गेला होता. त्यात मी लिहिलेली ही कथा विजेती कथा म्हणून निवडल्या गेली आहे.

#गोष्ट४
#नावापुढे_जीव_ठरतो_काडीमोल
#गोष्ट४
#नावापुढे_जीव_ठरतो_काडीमोल
खरा बाप आपली ओळख लपवू पाहत होता. त्यांच्यापैकी कोणीही आपलं नाव त्या गर्भाला द्यायला तयार नव्हत.
कुमारी माता ही ओळख तिलाही पुढच्या आयुष्याची वाट खडतर करणारी होती म्हणून त्या गर्भाला स्वीकारणं तिलाही कठीण होत
अशा पद्धतीने जन्माला आलेल्या बाळाला कोणीही सहज दत्तक घेऊन आपलं नाव द्यायला तयार नव्हते
गर्भपात करून संशयितांपैकी मुल नेमकी कोणाचं होत हे शोधण्यासाठी डी.एन.ए चाचणी करण्याकरिता तो गोळा फॉरेन्सिक लॅबमधे पाठवण्याचा निर्णय कोर्टाला घ्यावा लागला
तेव्हा टेबलावर ठेवलेला तो निर्जीव मासाचा गोळा संपूर्ण मानव जातीलाच जणू सांगत होता ,' नावात काय ठेवलंय हो???? ' तुमच्यापेक्षा प्राणी बरे नावाची सबब सांगून कोणाचाही जन्मण्याचा अधिकार हिरावून घेत नाहीत
©️ अंजली मीनानाथ धस्के
#१००शब्दांचीगोष्ट
#गोष्ट५
#रस्सीखेच_नको_आनंद_महत्त्वाचा
वादविवाद स्पर्धेचा विषय ' नावात काय ठेवलंय हो'
नावच खूप महत्त्वाचं हे पटवून देणाऱ्या सानवीला जेव्हा गावगुंड प्रवृत्तीच्या दादासाहेबांच्या हस्ते प्रथम पुरस्कार मिळाला तेव्हा मनातून खट्टू झाली.
ओळख नावाने नाही तर कर्माने असते हा मुद्दा मांडणाऱ्या प्रणालीचे नाव दुसऱ्या क्रमांकासाठी ' प्रांजली' असे पुकारण्यात आले अन् तिच्या आनंदावर विरजण पडले.
एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्या त्याप्रमाणे दोन्ही मुद्दे आपापल्या जागी योग्य आहेत पण खऱ्या आयुष्यात प्रसंगानुसार मुद्दा समजून वागावे. नाव आणि कर्तृत्व यांच्या रस्सीखेचमधे कोणाच्याही आयुष्याचा आनंद हिरावला जाता कामा नये. अशी तिसरीच पण काहीशी पटणारी बाजू जेव्हा श्वेताने मांडली तेव्हा संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाट करून तिला दाद दिली.

No comments:
Post a Comment