#बाबांनीही_संधीच_सोन_केलं
एका समाजसेवी संस्थेने खेड्यातल्या हुशार विजयची पुढच्या शिक्षणानिमित्त शहरी शाळेत जाण्यासाठी निवड केली. सगळं सोडून जाणं त्याच्या जीवावर आलं. तो रडवेला होवून कोपऱ्यात बसला.
' संधी ' हा शब्द खूपवेळा कानावर आल्यामुळे छोट्या अजयने वडिलांना विचारले , "बाबा हि संधी दिसते कशी?".
संधीचा फायदा घेत बाबा बोलले,
बेटा ते कोणालाच माहिती नाही . पुढच्या लांब केसांनी तिचा चेहरा झाकलेला असतो . ती फक्त एकदाच दार ठोठावते. लगेच तीच्या या लांब केसांना घट्ट पकडायच कारण जर ती निघून गेली तर मागून तिला पकडता येत नाही ... मागून ती टकली असते .
सगळेच खळखळून हसले.
विजयला त्याची चूक समजली. तो तयारीला लागला
©️ अंजली मीनानाथ धस्के

Momspresso मराठी वर ' संधी एकदाच दार ठोठावते ' या विषयावर लिहिलेली ही १०० शब्दांची गोष्ट
No comments:
Post a Comment