#इवलीशीकळी
#रांगोळी
©️ अंजली मीनानाथ धस्के
आमच्या बागेत आज एक छोटी कळी उगवली .... ( हे फुल वर्षभर असच राहतं ..... सुकल्यावर ही असच दिसतं. ह्या फुलांचे हार प्रत्येक तीर्थक्षेत्री विकायला असतात.) तिचे निरीक्षण करता करता अचानक तिच्या मध्यात असणाऱ्या रचनेने माझे लक्ष वेधले. कळीच्या मध्यातली रचना आणि मी काढते त्या रांगोळीत फार साधर्म्य आहे असे जाणवले . येवढ्या छोट्या कळीमधेही इतकी सुंदर रांगोळी दडलेली पाहून भारी गंमत वाटली. सृष्टीच्या निर्मात्याला तोड नाही हेच खरे.... त्या निर्मात्याच्या चरणी माझ्या कलेचे हे पुष्प अर्पण...
#इवलीशीकळी
इवलीशी कळी.... नखरेल भारी
वाऱ्यावर डूले.....खुदकन हसे
पिवळ्या रंगात सुंदर दिसे
हिरवी पाने तिच्या दिमतीस सारी
इवलीशी कळी.... नखरेल भारी
इवलीशी कळी.... नखरेल भारी
कोवळ्या किरणांनी सजे
सूर्याला पाहून हळूच लाजे
मिरवी तोरा... परसदारी
इवलीशी कळी.... नखरेल भारी
इवलीशी कळी.... नखरेल भारी
मध्यात परागकणांची दाटी असे
जवळून बघता गंमत दिसे
तिच्या रांगोळीची तऱ्हाच न्यारी

No comments:
Post a Comment