#वेकअप
#१००शब्दांचीगोष्ट
महिन्याभरापूर्वी छोट्याशा आजाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या टेस्ट केल्या गेल्या. दुर्दैवाने डॉक्टरांची शंका खरी ठरली. कुटुंबावर आभाळच कोसळलं होतं. थर्ड स्टेजवर ' कॅन्सर ' ऐकून नवरा हादरून गेला... ती पार कोलमडली. भेटायला येणारे सांत्वन करत .... दिलासा देत .... पण तिचं कश्यातच लक्ष नव्हतं. 'आपल्या माघारी लेकरांच काय होणार ' या काळजीने तिला झोप आली नाही. आयुष्यात अनेक संकटे आली पण तिने धीर सोडला नव्हता. शुन्यातून विश्व निर्माण केलं होतं . चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला.. आरशात पाहिलं ...... समोर ती.. मागे मुलं बिनघोर झोपलेली . तेवढ्यात गजर झाला ... क्षणात निर्धार करत स्वतःशीच पुटपुटली, " रडणं पुरे .... घर सावरायला हवं ... योग्य ट्रीटमेंट घेवून बरं व्हायला हवं... खूप कामं पडली आहेत " वेक अप सोनाली वेक अप " .
©️ अंजली मीनानाथ धस्के
(Momspresso Marathi ने थिम अलार्म क्लॉक चे चित्र आणि वेक अप शब्द दिला होता कथा लिहिण्यासाठी.)

No comments:
Post a Comment